कट्टा.............
मित्रांच्या मैफिलीत
होता तो ही रंगलेला
हास्यविनोद अन टाळ्यांनी
होता तो ही सजलेला
तेथे जमणार्या सार्या
अवलियांची तो "जान" होता
येणार्या जाणार्यामध्ये
त्याला कौतुकाचा "मान" होता
टिंगल-टवाळी, शेरो-शायरी
किस्स्यांचा तेथे बाजार होता
राग, द्वेष, मत्सर, अविश्वासाला
तेथे किंचितही थारा नव्हता
हरएक पिकनीक ही
त्यालाच विचारुन ठरवलेली
प्रत्येक पार्टीची कुणकुण
सर्वप्रथम त्यालाच कळलेली
एरियामधली नवी आयटम
ह्यानेच पहिली हेरलेली
गुजरणारी हरएक बाला
वहिनी नाहीतर भाभी ठरलेली
आजवर जे कुणा सांगितले नाही
ते इथे बोलायची मुभा होती
सोल्युशन मिळायची गॆरेंटी नाही
पण टेंशनगुलची हमी होती
अश्या चतुरंगी बहुढंगी दुनियेत
रमताना दिवस मजेत जात होते
पण नेहमी हे असेच रहावे
बहुधा नियतीच्या मनात नव्हते
NOKIA ला BB मध्ये बदलताना
फ़्री Talktime हि आता Roaming झाला होता
रंगली असती अजूनही ती ...मैफिल
पण एक एक "शायर" आता उठत होता
हरवुनी गेल्या आठवणीच्या सावल्या
तरी तो अजुनी तेथेच आहे
फिरुनी पुन्हा रंगेल तीच मैफिल
अजुनही त्या वेड्या जीवाला आस आहे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1650
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
:(
वाह....मस्तं.
चांगलं जमलंय....
वाह!!!!!
In reply to चांगलं जमलंय.... by वेल्लाभट
सुंदर गझल!
In reply to चांगलं जमलंय.... by वेल्लाभट
Class
In reply to सुंदर गझल! by सटक
धन्यवाद
छान