भात
भात
हां तर झाले असे की गणेशा म्हणाला "समाधान हॉटेल , रावेत ला जाऊ , मस्त चुलीवरील मटन भाकरी खाऊ , कोणी आले तर आले नाही तर आपले आपण! " .
'आपले हाल होणार' हे स्पष्ट दिसत असल्याने आमच्या शाकाहारी मित्राने टांग दिली , आणि मग दुसर्या शाकाहारी मित्राला बोलावण्यात काही पॉईंट नाही असे वाटल्याने त्यांन्ना फोन करण्याचे टाळेल पण अस्मादिकांन्नी विचार केला की हे अत्ता लगेचच चातुर्मास सुरु होत आहे त्या आधी एकदा जोरदार बेत होऊनच जाऊदे ! मग काय , अप्रतिम मटन भाकरी खाल्ल्या नंतर पाना मध्ये आला
भात
... आई शप्पथ ! काय चव होती म्हणुन सांगु ! लगेच वेटर कडुन माहीती कळाली की हा "इंद्रायणी" आहे , गणेशा आधी म्हणालाच होता की इथे अप्रतिम भात मिळतो म्हणुन ! खरेतर मी अजिबात म्हणजे अजिबात भात न खाणारा माणुस पण चक्क मागुन मागुन भात खल्ला ! घरी येवुन विचारले की आपण कोणता भात खातो तर उत्तर आले "आपण ? तु तर हातही लावत नाहीस भाताला :-\ " मी : ":-\ बरं तुम्ही कोणता भात खाता ? " " बासमती आणि आंबेमोहोर " माझ्या डोक्यात एकदम ट्युब पेटली !! हायला , आपण ह्या बासमतीच्या नादाने भाताच्या कित्येक व्हरायटीज ला मुकतोय ! इंद्रायणी सारख्याच अशा कित्येक व्हरायटीज असतील वेगवेगळ्या चवीच्या ! इथेच मावळातच कित्येक व्हरायटीज आसतील !! एकदा तेजस होटेल ला खल्ला होता तोही हातसडीचा भात अप्रतिम लागला होता ! तुम्हाला भाताच्या अशा अजुन व्हरायटीज माहीत आहेत का ? त्या चवीला अॅपीयरंसला स्वादाला कशा असतात ? विकत कूठे मिळतील ? इंटरनेटवर आणि आजुबाजुला चिंचवडात माहीती शोधत आहेच मी , पण मिपाकरांच्या माहीतीत असे काही खास असेल तर सांगा ! अवांतर : १)गणेशाने त्या हॉटेल मालकाला तो इंद्रायणी तांदुळ मागितला पण त्याने ह्याना त्या निमित्ताने टाळले ...ल्ल्ल्लूऊऊऊउ २) मुंबईत असताना , हेल्ठ कॉन्शस असल्याने ब्राऊन राईस खायचो पण त्याला भात म्हणवत नाही हो . ३) आणि ह्यावरुन आठवले , आमच्या सातार्यातील तांदुळाअळी मधील एका दुकानातील पाटी "एकदा घेतलेला माल कोणत्याही सबबीवर ताबडतोब बदलुन मिळेल ! "आता एकदा तांदुळ आळीत चक्कर टाकायलाच हवी !! ४)https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/component/content/article?id=9998&start=1वर्गीकरण
प्रतिक्रिया
भातप्रेमी असल्याने कल्पना खूप
हा भात गुरगुट्या करुन वरुन
नुसताच भात?
अवांतर ४) मधे दिलेल्या विश्व
हम्म
उकड्या तांदुळाचे तसे नाही. ते
बासमती उरलाय कोठे बासमती? पार
+१००.. सोना मसुरीची चव अन्य
मावळात बहुसंख्य शेतकरी
+१११ पुरंदरच्या आसपास खासच !
मला भेट
जिरेसाळ ( जिरग्या) अन घनसाळ
होय
'गरी-कोळपी'
चुकुन गळ चेपी असे वाचले. ;)
कळसूबाई जवळील एरियातील
हायब्रिड जातींमुळे अनेक
गरी कोळपी अहमदनगर साइडला
बरोबर
घोटीमध्ये मिळतो.
घोटी त्र्यंबकेश्वर भागात
कालच आवनी उरकली. 2 दिवस पाऊस
तुम्ही
बर्रोब्बर मग
कृष्णासाळ तांदुळ
भोर-वेल्हा
एकदम सहमत
आध्यात्मिक भात आवडला. ह घ्या.
@अदि मुरबाड
कोकणात लहानपणी शीजवल्यावर लाल
त्याला म्हाडी चा तांदूळ
आम्ही "हावळा" म्हणतो त्या
Rice Knowledge Management Portal
आडरानात खाचखळग्यात ऊगवनारा
छान धागा. माहितीपूर्ण चर्चा
धान..
धान हा हिंदी शब्द आहे... काही
(शेतातल्या) भाताला काही
ह्या बाबतीत
अक्षता
आमची आई अलिबाग जवळच्या
ते
व्यनि द्या
वाह !!
व्यनि करतोय.
कोलम
पाषाण गावात ओझा म्हणून मला वाटते कच्छ्याचे घाऊक दुकान आहे
इंद्रायणी आवडला नव्हता?
डॉक तो काली मुछ आहे
खा बास मति राव