✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भात

प
प्रसाद गोडबोले यांनी
Fri, 07/24/2015 - 16:30  ·  लेख
लेख
भात हां तर झाले असे की गणेशा म्हणाला "समाधान हॉटेल , रावेत ला जाऊ , मस्त चुलीवरील मटन भाकरी खाऊ , कोणी आले तर आले नाही तर आपले आपण! " . 'आपले हाल होणार' हे स्पष्ट दिसत असल्याने आमच्या शाकाहारी मित्राने टांग दिली , आणि मग दुसर्‍या शाकाहारी मित्राला बोलावण्यात काही पॉईंट नाही असे वाटल्याने त्यांन्ना फोन करण्याचे टाळेल पण अस्मादिकांन्नी विचार केला की हे अत्ता लगेचच चातुर्मास सुरु होत आहे त्या आधी एकदा जोरदार बेत होऊनच जाऊदे ! मग काय , अप्रतिम मटन भाकरी खाल्ल्या नंतर पाना मध्ये आला

भात

... आई शप्पथ ! काय चव होती म्हणुन सांगु ! लगेच वेटर कडुन माहीती कळाली की हा "इंद्रायणी" आहे , गणेशा आधी म्हणालाच होता की इथे अप्रतिम भात मिळतो म्हणुन ! खरेतर मी अजिबात म्हणजे अजिबात भात न खाणारा माणुस पण चक्क मागुन मागुन भात खल्ला ! घरी येवुन विचारले की आपण कोणता भात खातो तर उत्तर आले "आपण ? तु तर हातही लावत नाहीस भाताला :-\ " मी : ":-\ बरं तुम्ही कोणता भात खाता ? " " बासमती आणि आंबेमोहोर " माझ्या डोक्यात एकदम ट्युब पेटली !! हायला , आपण ह्या बासमतीच्या नादाने भाताच्या कित्येक व्हरायटीज ला मुकतोय ! इंद्रायणी सारख्याच अशा कित्येक व्हरायटीज असतील वेगवेगळ्या चवीच्या ! इथेच मावळातच कित्येक व्हरायटीज आसतील !! एकदा तेजस होटेल ला खल्ला होता तोही हातसडीचा भात अप्रतिम लागला होता ! तुम्हाला भाताच्या अशा अजुन व्हरायटीज माहीत आहेत का ? त्या चवीला अ‍ॅपीयरंसला स्वादाला कशा असतात ? विकत कूठे मिळतील ? इंटरनेटवर आणि आजुबाजुला चिंचवडात माहीती शोधत आहेच मी , पण मिपाकरांच्या माहीतीत असे काही खास असेल तर सांगा ! अवांतर : १)गणेशाने त्या हॉटेल मालकाला तो इंद्रायणी तांदुळ मागितला पण त्याने ह्याना त्या निमित्ताने टाळले ...ल्ल्ल्लूऊऊऊउ २) मुंबईत असताना , हेल्ठ कॉन्शस असल्याने ब्राऊन राईस खायचो पण त्याला भात म्हणवत नाही हो . ३) आणि ह्यावरुन आठवले , आमच्या सातार्‍यातील तांदुळाअळी मधील एका दुकानातील पाटी "एकदा घेतलेला माल कोणत्याही सबबीवर ताबडतोब बदलुन मिळेल ! "आता एकदा तांदुळ आळीत चक्कर टाकायलाच हवी !! ४)https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/component/content/article?id=9998&start=1
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
46091 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

भातप्रेमी असल्याने कल्पना खूप

जडभरत
Fri, 07/24/2015 - 16:36 नवीन
भातप्रेमी असल्याने कल्पना खूप आवडली. बासमती सतत खाण्यापेक्षा बरेच वेळा साध्या दुकानातून आणलेले साधे तांदूळ सुद्धा खूप मस्त लागतात. कोकणात अनेक ठिकाणी छोट्याशा होटेलात किंवा घरगुती खानावळीत खूप छानसा साधा भात खाल्लाय. मात्र नाव कधी विचारले नाही. त्या द्रिष्टीने कधी पाहिलेच नव्हते तांदळाकडे. आता मात्र पहाणार.
  • Log in or register to post comments

हा भात गुरगुट्या करुन वरुन

आनंदराव
Fri, 07/24/2015 - 16:38 नवीन
हा भात गुरगुट्या करुन वरुन तुपाची धार ओतून खा ! लै भारी
  • Log in or register to post comments

नुसताच भात?

पैसा
Fri, 07/24/2015 - 16:40 नवीन
वरण नाय घेतलंत?
  • Log in or register to post comments

अवांतर ४) मधे दिलेल्या विश्व

प्रसाद गोडबोले
Fri, 07/24/2015 - 16:45 नवीन
अवांतर ४) मधे दिलेल्या विश्व कोशाच्या लिन्कच्या नुसार ...
जगात भाताचे तीस हजारांपेक्षा जास्त प्रकार आहेत. एकट्या भारतात ५,००० ते ६,००० प्रकार आहेत, असे मानण्यात येते.
आधी वेगवेगळया प्रकारचा भात शोधु मस्त आणि मग डाळींच्या मागे लागु ! हा.का.ना.का. बाकी परवा खल्लेला इंद्रायणी भात नुसत्या तुप मिठा बरोबरही अप्रतिम लागला असता ! त्याला स्वतःची अशी जेन्युईन चव होती वास होता ! अशा काही अजुन भाताच्या व्हरायटीज मिपाकरांच्या माहीतीत असतील तर जरा टेस्ट बड्स ना प्यँपर करावे असे म्हणतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हम्म

पैसा
Sat, 07/25/2015 - 14:33 नवीन
तूप मिठाबरोबर खायला भात हवाय? कोकणात आणि गोव्यात जाड, बुटके आणि तांबड्या रंगाचे तांदूळ मिळतात. त्यांचा मऊ भात जबरदस्त लागतो. अगदी मऊ शिजतो. गोव्यात मऊ भातापेक्षा पेज जास्त लोकप्रिय. त्यात उकडे तांदूळ असतील तर बघायला नको. त्याबरोबर अगदी साध्या पद्धतीने केलेल्या ठराविक भाज्या मस्त लागतात. तसेच उकडे-हुमण असलेले जेवण गोंयकाराला मिळाले तर तो स्वर्गाचे राज्य पण तुच्छ म्हणेल. उकड्या तांदुळाची चव आणि वास मात्र डेव्हलप व्हावी लागते. ते सगळ्यांचे काम नाही. साधा भात पटकन पचून जातो. उकड्या तांदुळाचे तसे नाही. ते जेवल्यावर बराच वेळ भूक लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

उकड्या तांदुळाचे तसे नाही. ते

प्रसाद गोडबोले
Mon, 07/27/2015 - 12:57 नवीन
उकड्या तांदुळाचे तसे नाही. ते जेवल्यावर बराच वेळ भूक लागत नाही.
वाह ! हे तर बेस्टच ! भाताचा एकच प्रॉब्लेम असतो कि तो पटकन पचतो आणि परत खा खा होते आणि आपण विनाकारण जास्त खातो . मुंबैत बईठे काम असल्याने आम्ही आणि आमच्या काही मित्रांन्नी प्रायोगिक तत्वावर म्हणुन असा हळु हळु पचणारा ब्राऊन राईस खायला सुरुवात केली होती ! आता एकदा हा उकड्या तांदुळाचा भात खाऊन पहायला पाहिजे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बासमती उरलाय कोठे बासमती? पार

स्पंदना
Fri, 07/24/2015 - 16:41 नवीन
बासमती उरलाय कोठे बासमती? पार वाट लावलीय बासमतीची जेनेटिक बदल करुन. आता बासमती कायमचा हद्दपार केलाय आम्ही घरातुन, हल्ली सोना मसूरी खातो गपचुप!
  • Log in or register to post comments

+१००.. सोना मसुरीची चव अन्य

आनन्दा
Fri, 07/24/2015 - 17:02 नवीन
+१००.. सोना मसुरीची चव अन्य कशाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

मावळात बहुसंख्य शेतकरी

प्रचेतस
Fri, 07/24/2015 - 16:49 नवीन
मावळात बहुसंख्य शेतकरी इंद्रायणी वाणाचेच उत्पादन घेतात. आंबेमोहोर परवडत नै शिवाय पीक लहरी. इंद्रायणी अमाप उत्पादन देते. थोडासा चिकट भात असतो पण अतिशय चवदार. कधी ऑक्टोबर नोव्हेंबर मधे मावळात फिरायचे. लोंब्यांमधे दाणे भरू लागलेले असतात. सम्पूर्ण मावळपट्टा भाताच्या सुगंधाने घमघमलेला असतो.
  • Log in or register to post comments

+१११ पुरंदरच्या आसपास खासच !

मितान
Sat, 07/25/2015 - 16:18 नवीन
+१११ पुरंदरच्या आसपास खासच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मला भेट

नाखु
Fri, 07/24/2015 - 16:58 नवीन
खात्रीशीर माणसाची गाठ घालून देतो. तळटीप : माझा त्याचा काहीही व्यावसायीक संबंध नाहीम, तसेच त्याच्याकडे अस्सल इंद्रायणी मिळतो इतकेच माहीती आहे, मी आजून आणला नाही कारण घरी कन्येला-लेकाला आवडत नाही. पुढच्या मोसमात आणून थोडी थोडी सवय लावणार आहे. (मला व्यक्तीशः आवडतो पण हसूं नकोस बर्याचदा दुकानात आंबेमोहोरसारखाच भेसळ मिळतो. आणि मला इंद्रायणीत थोडासा कोलम घालून चांगला वाटतो .लेकरं कायम गरगट्या भात खात नाहीत म्हणून तडजोड-प्रकल्प) संसारी अनुभवी नाखु
  • Log in or register to post comments

जिरेसाळ ( जिरग्या) अन घनसाळ

इन्ना
Fri, 07/24/2015 - 17:03 नवीन
जिरेसाळ ( जिरग्या) अन घनसाळ नावाचा तांदूळ मिळातो , कोल्हापूर कडे. बिना पॉलिश चा घेतला तर अती उत्तम.
  • Log in or register to post comments

होय

सस्नेह
Fri, 07/24/2015 - 18:59 नवीन
हा जिरगा आता दिसत नाही पण घनसाळ आजरा भागात होतो तो ठराविक सीझनला मिळतो. इंद्रायणीपेक्षा भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्ना

'गरी-कोळपी'

पगला गजोधर
Fri, 07/24/2015 - 17:05 नवीन
'गरी-कोळपी' जातीचा तांदूळ ट्रायवा एकदा :)
  • Log in or register to post comments

चुकुन गळ चेपी असे वाचले. ;)

जडभरत
Fri, 07/24/2015 - 17:07 नवीन
चुकुन गळ चेपी असे वाचले. ;) असो, पण हा मिळतो कुठे? महाराष्ट्रीच आहे की दुसर्‍या राज्यातला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

कळसूबाई जवळील एरियातील

पगला गजोधर
Fri, 07/24/2015 - 17:14 नवीन
आदिवासी शेतकर्यांकडे मिळू शकतो, पण आजकाल ते बिचारे सुद्धा त्याची शेती परवडत नाही म्हणून, जास्त (संख्येणे) आणि फास्ट (उगवण्याचा कालावधी) च्या संकरीत पिकांकडे वळले बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत

हायब्रिड जातींमुळे अनेक

जडभरत
Fri, 07/24/2015 - 17:20 नवीन
हायब्रिड जातींमुळे अनेक दुर्मिळ आणि चवदार अशा भाज्या व धान्यांच्या जाती नष्ट होत आहेत. अर्थात याला जंगलतोड, लोकसंख्या वाढ ही पण कारणीभूत आहेत. कुठे तरी या जातींचे संगोपन करून ठेवलं जात असेल का? एखादी जात कायमची नष्ट झाली तर केवढं नुकसान?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

गरी कोळपी अहमदनगर साइडला

मृत्युन्जय
Fri, 07/24/2015 - 17:22 नवीन
गरी कोळपी अहमदनगर साइडला मिळतो बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

बरोबर

पगला गजोधर
Fri, 07/24/2015 - 17:32 नवीन
अहमदनगर साइडला मिळतो बहुधा.
बरोबर आहे आपलं, नाशिक-पट्ट्यात पण तो आढळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

घोटीमध्ये मिळतो.

भिंगरी
Fri, 07/24/2015 - 20:27 नवीन
घोटीमध्ये मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

घोटी त्र्यंबकेश्वर भागात

भुमन्यु
गुरुवार, 07/30/2015 - 15:56 नवीन
घोटी त्र्यंबकेश्वर भागात मिळतो. इंद्रयणी भात असेल तर मस्त मेतकुट घालून त्यावर घरच्या ताज्या तुपाची धार ओता आणि खा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

कालच आवनी उरकली. 2 दिवस पाऊस

सोंड्या
Fri, 07/24/2015 - 17:06 नवीन
कालच आवनी उरकली. 2 दिवस पाऊस चांगला परला, खाचरान पानी आसल तरच वाही चांगली होते. पावरटेलरनी सावा बरबाटात चंगला दरपलाना तर एक गोन युरीया कमी लागतो आसा आज्या बोलाचा. यंदा गरव्या मधी झीनी लावले 3 रोमटी, आनी हालवारात दोन रोमटी रत्ना, 3 रोमटी जया लावले. आमचा झीनी चा बियाना घरचाच आस्तो, आई आगोटचे निसून ठेवते. झीनी चा तांदूल येकदम बारीक जिर्या सारखा आनी कवडीपन नसते येकदम पानीदार खायला मऊ. बाजारात दुर्मीळ. बाकी रत्ना आनी जया राकट जाती, हत्तीच्या पावसात पन काडी झोपत नय. भाकर खायची तर जयाच्या तांदलाची, तोंडात इरते.
  • Log in or register to post comments

तुम्ही

अदि
Fri, 07/24/2015 - 17:32 नवीन
कुठ्चे सोंड्या भाउ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोंड्या

बर्रोब्बर मग

पगला गजोधर
Fri, 07/24/2015 - 17:40 नवीन
, तुमच्या झीनी ला आमच्यासारकी जीरा-राइस म्हणून ओलीख्त्यात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोंड्या

कृष्णासाळ तांदुळ

शंतनु _०३१
Fri, 07/24/2015 - 17:32 नवीन
कृष्णासाळ तांदुळ :- ह्या तांदळात लाल रंगाची रेघ असते ( ओळखण्याची खुण ) , हा तांदुळ शिजवल्यावर यावर तुपासारखा तवंग येतो, पण हा तांदुळ फक्त अकोला ( भंडारदरा) कोतूळ या ठिकाणीच मिळतो. अत्यंत पौष्टिक असतो हा तांदुळ
  • Log in or register to post comments

भोर-वेल्हा

तुषार काळभोर
Fri, 07/24/2015 - 17:38 नवीन
आम्ही भोर तालुक्यातल्या शेतकर्‍यांकडून दरवर्षी वर्षभराचा विकत घेतो. चव अशी की कशाबरोबरही: साधं वरण, फोडणीचं वरण, डाळीची आमटी, दूध, तुप, साखरः एकदम झकास लागतो.
  • Log in or register to post comments

एकदम सहमत

माझिया मना
Wed, 07/29/2015 - 16:34 नवीन
भोरवेल्ह्याकडील भाताबद्दल एकदम सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

आध्यात्मिक भात आवडला. ह घ्या.

प्यारे१
Fri, 07/24/2015 - 17:43 नवीन
आध्यात्मिक भात आवडला. ह घ्या. ;) बाकी बासमती ला लैच डोक्यावर बसवून ठेवलाय लोकांनी. आम्बेमोहोर इंद्रायणी च भारी आहेत.
  • Log in or register to post comments

@अदि मुरबाड

सोंड्या
Fri, 07/24/2015 - 17:44 नवीन
@अदि मुरबाड
  • Log in or register to post comments

कोकणात लहानपणी शीजवल्यावर लाल

खटपट्या
Fri, 07/24/2015 - 17:48 नवीन
कोकणात लहानपणी शीजवल्यावर लाल/गुलाबी होणारा भात खाल्ला आहे. कोणाला नाव माहीत असल्यास कळवावे.
  • Log in or register to post comments

त्याला म्हाडी चा तांदूळ

सोंड्या
Fri, 07/24/2015 - 17:53 नवीन
त्याला म्हाडी चा तांदूळ बोलतात आगरी बांधवांची फेमस डिश - म्हाडी ची लाल भाकर आणी मटण
  • Log in or register to post comments

आम्ही "हावळा" म्हणतो त्या

स्पंदना
गुरुवार, 07/30/2015 - 06:35 नवीन
आम्ही "हावळा" म्हणतो त्या तांदळाला. फार गुरगुरीत भात. लालसर. दुध घालुन इतका मस्त लागतो ना!! वर पैसा तै पण तेच म्हणते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोंड्या

Rice Knowledge Management Portal

रुस्तम
Fri, 07/24/2015 - 17:58 नवीन
Rice Knowledge Management Portal http://www.rkmp.co.in/node/8817 १. संशोधन केंद्राचे नाव - वडगाव २. जारी केल्याचे वर्ष -१९८७ ३. कूळ - आंबेमोहोर १५७xआयआर ८ ४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक ५. उत्पन्न (टन/हे) - ४ ४.५ ६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस- १३०-१३५ ७. वैशिष्ट्ये - सुगंधी, उष्णतेच्या लाटेस, जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील, ८. सुचविलेला प्रदेश - पश्चिम महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश
  • Log in or register to post comments

आडरानात खाचखळग्यात ऊगवनारा

सोंड्या
Fri, 07/24/2015 - 17:58 नवीन
आडरानात खाचखळग्यात ऊगवनारा रानटी देवभात पण लाल असतो. आईलोक्स ऋषीपंचमी ला शिजवतात फराळासठी
  • Log in or register to post comments

छान धागा. माहितीपूर्ण चर्चा

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/24/2015 - 18:23 नवीन
छान धागा. माहितीपूर्ण चर्चा चालू आहे ! सहज मनात आले म्हणून: १. भाताचे जे बीज शेतात पेरतात त्याला 'भात' म्हणतात व ते पेरल्यावर उभे राहणार्‍या पिकालाही 'भात' म्हणतात, (उदा : भातशेती). २. शेतातले भात कापून आणून आणि त्याला झोडून वेगळे केलेले दाणे सालासकट साठवलेले असतात किंवा वाहतूकीत असतात तेव्हा ते एकत्रितपणे 'भात'च असतात. ३. भात सडून* त्यांचे साल (तूस) काढून टाकले की त्यांचे 'तांदूळ' बनतात. ४. तांदूळ शिजविले की त्यांचा 'भात' बनतो. भाताचे अनेक शाकाहारी आणि मांसाहारी प्रकार मला अत्यंत आवडतात... तांदळाचे पीठ चूलीवरच्या/शेगडीवरच्या उकळत्या पाण्यात मिसळून केलेल्या भाकरीची चव इतर कोणत्याच भाकरीला नाही असे माझे आवडते मत आहे :) ====== * : इथले सडणे हे क्रियापद मराठीतले आहे, हिंदीतले नाही; आणि ही क्रिया केली जाते, होत नाही :)
  • Log in or register to post comments

धान..

चिगो
गुरुवार, 07/30/2015 - 12:43 नवीन
भाताचे जे बीज शेतात पेरतात त्याला 'भात' म्हणतात व ते पेरल्यावर उभे राहणार्‍या पिकालाही 'भात' म्हणतात, (उदा : भातशेती).
मला वाटतं, त्याला 'धान' म्हणतात, डॉक्टरसाहेब.. धान-तांदूळ-भात, असा प्रवास असतो.. अवांतर : माझ्यामते, धानाच्या/भाताच्या वेगवेगळ्या प्रजातींची जपवणूक करायला हवी. म्हणजे 'मास प्रोडक्शन' साठी जरी एचएमटी किंवा 'बासमती'च्या नावानी खपणार्‍या वारेमाप जाती पिकवल्या जात असल्या तरी ह्या खास प्रजातींच्या तांदळाना आपण मुकू नये.. 'काला नमक' आणि इथे सांगत असलेल्या अनेक भातांच्या जाती नुसत्या स्मरणातच ऊरु नये म्हणून हा विचार.. अतिअवांतरः आसाम/मेघालयमध्ये 'जोहा' भात मिळतो, तोपण अत्यंत चविष्ट लागतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

धान हा हिंदी शब्द आहे... काही

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/30/2015 - 14:40 नवीन
धान हा हिंदी शब्द आहे... काही ठिकाणी मराठीतही तसे म्हणत असतील, विषेशतः हिंदी भाषीक राज्यांच्या सीमेजवळ. पण महाराष्ट्रातल्या भात हे मुख्य पीक असलेल्या ठिकाणी भातच म्हणतात... भातशेती, भाताचे पीक, इ शब्द त्यावरूनच आले आहेत. अवांतराशी १००% टक्के सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

(शेतातल्या) भाताला काही

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/30/2015 - 18:12 नवीन
(शेतातल्या) भाताला काही ठिकाणी साळ असेही म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

ह्या बाबतीत

जेम्स वांड
Wed, 12/15/2021 - 07:29 नवीन
वंदना शिवा ह्यांचे कार्य मोठे आहे, पण त्या डाव्या राजकीय विचारांच्या असल्यामुळे जास्त त्याज्य असाव्यात, तरीही, एतद्देशीय तांदळाची वाणे (त्यात काही काही तर पार नैसर्गिकरित्या जांभळ्या रंग असलेले तांदूळ वगैरे) जपण्यासाठी त्यांनी सीड बँक्स कॉन्स्टिट्यूट करून जवळपास ५०+ जमातींचे संवर्धन करून ते बियाणे स्थानिक शेतकऱ्यांना वाटले होते. मला वाटते हे एक मोठे काम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

अक्षता

सौन्दर्य
Wed, 12/15/2021 - 00:27 नवीन
आणि तांदळात हळद-कुंकू मिसळले की त्याच्या अक्षता होतात. हलकेच घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आमची आई अलिबाग जवळच्या

सुबोध खरे
Fri, 07/24/2015 - 18:24 नवीन
आमची आई अलिबाग जवळच्या नागावची त्यामुळे ती असे वेगवेगळे तांदूळ आणून भात करत असे. असा गुलाबी तांदूळ "पटणी" म्हणून तिला एका कोळीण मैत्रिणीने दिला होता. या पटणीच्या भाकरया खाउन पहिल्या आहेत. या भाकर्या ते माशांच्या कालवणा बरोबर खात असत. शिवाय झीना कोळंबा, जिरेसाळ, साधा कोलम, सुरती कोलम, आंबेमोहोर हे तांदूळ लहानपणी खाल्लेले आहेत. तांदूळ शिजवताना त्यात कसलेतरी लांब पान घालत असे त्याने तांदुळाला अगदी बासमती सारखा वास येतो. वडिलांनी भोपाळ हून काली मुच म्हणून अत्यंत सुवासिक तांदूळ आणला होता तो बासमतीच्या तोंडात मारेल असा होता.
  • Log in or register to post comments

ते

भिंगरी
Fri, 07/24/2015 - 20:33 नवीन
ते लांब पान म्हणजे आंबेमोहराचे. म्हणजे त्या पानांना आंबेमोहर तांदळासारखा वास असतो.भात शिजताना त्यात ते पान टाकले की घरभर सुगंध दरवळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

व्यनि द्या

सत्याचे प्रयोग
Fri, 07/24/2015 - 18:50 नवीन
घरी पिकतोय इंद्रायणी तांदूळ आणि तांदूळ चे बद्दल वाचून ऊर भरून आला ह्या मावळ्याचा. फक्त दुधाबरोबर खाऊन बघा १दा. अप्रतिम चव. व्यनि द्या हवा तेवढा अस्सल इंद्रायणी देऊ
  • Log in or register to post comments

वाह !!

प्रसाद गोडबोले
Fri, 07/24/2015 - 19:51 नवीन
वाह !! व्यनि करण्यात आलेला आहे !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग

व्यनि करतोय.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 07/25/2015 - 16:40 नवीन
व्यनि करतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग

कोलम

राही
Fri, 07/24/2015 - 19:13 नवीन
मुंबईत सहसा कोलम खाल्ला जातो. इंद्रायणीचे नाव पुण्यात सहा सात वर्षांपूर्वी ऐकले. पाषाण गावात ओझा म्हणून मला वाटते कच्छ्याचे घाऊक दुकान आहे. पाषाण भाजीबाजारात आलेले शेतकरी टेंपोतून पोतीच्या पोती इंद्रायणी घेऊन जात तेव्हा कुतूहलाने थोडासा आणून घरी भात केला होता. पण तितकासा आवडला नव्हता. इतरत्र पुण्यात बहुतेक आंबेमोहोर चालतो असे वाटते. मुंबईत मात्र कोलम जास्त चालतो. पूर्वी आम्ही भिवंडीहून कोलम आणीत असू. अगदी सुईसारखा बारीक. जिभेवर एक एक दाणा वेगळा तरीही मऊ जाणवे. अलीकडे चांगला कोलम मिळत नाही. जिरेसाळसुद्धा पूर्वीसारखा नसतो. सुरती कोलमही जाड असतो. अलीकडे सहा सात वर्षे वाडा कोलम आणत आहोत. पण मध्यंतरी एक बातमी वाचली की वाडा कोलमला चांगला दर मिळतो (सध्या किरकोळ विक्री ७५-८० रु. किलो) म्हणून व्यापारी लोक इतर पेठांतून वाड्याला भात आणून ते वाड्यात सडून घेतात आणि वाडा कोलम म्हणून विकतात. मुंबईत सध्या लाल तांदूळ, चिनी तांदूळ, उकडा तांदूळ हेल्दी म्हणून खाण्याचे प्रस्थ दिसते. पण या तांदुळाचा भात भयाण होतो. लाल तांदूळामध्येसुद्धा जाती असतात. एक राते भात किंवा खारे भात असते. ते खारटाण जमिनीत मुठीने पेरत. ते उपजत जोरकस असल्यामुळे पुन्हा उपटून लावणी करण्याची गरज नसे. पण दाणा चांगलाच टणक. हे भाकरीसाठी किंवा इतर पिठात मिसळून उत्तम असे. राते म्हणजे रक्ती-रक्तवर्णी. ह्यालाच कोणी पटणी म्हणतात. तांदूळ दळून पीठ करायचे असल्यास आय.आर.८ उत्तम. ह्याच्या भाकरी छान होतात. आता आय.आर.मध्ये आणखी वाणेसुद्धा शोधली/निर्माण केली गेली आहेत. मोदक-धिरडी-घावन-शेवयांसाठी मात्र नवा आंबेमोहोरच चांगला. बासमतीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो. भातही फडफडीत होतो. कर्जतबाजूला केवळ पोह्यांसाठी एक वेगळे वाण होते. पोह्यांसाठीचे आणखी एक वाण म्हणजे कोथिंबिरे भात. पोहे कुटल्यावर आणि शिजवताना त्याला ओल्या कोथिंबिरीसारखा सुगंध येई. एक गरवा कोलम असे. हे भात पेरल्यानंतर उशीराने म्हणजे दीडदोन महिन्यांनी रोपे चांगली वाढल्यावर लावायचे. ते उशीरानेच म्हणजे दिवाळीनंतर तयार होई. अगदी बारीक दाणा. ही उंच वाढणारी जात होती. त्यामुळे पावसात रोपे लोळत आणि नुकसान होई म्हणून मग याचे पीक घेणे बंद झाले. त्याऐवजी तायचुंग आले. हे आग्नेय आशियातले बुटके वाण. पावसाच्या मार्‍याने लोळत नसे. पण चव आणि टेक्स्चरमध्ये मार खाल्ला या वाणाने. वाण्याकडे कमीत कमी दहापंधरा जाती असतात. त्यात बासमतीचेच सहासात प्रकार. दुबराज हा तांदूळ बासमतीत भेसळीसाठी वापरला जातो. बाकी कमोद, परिमल चिनोर, लुचाई वगैरे जाती असतातच.
  • Log in or register to post comments

पाषाण गावात ओझा म्हणून मला वाटते कच्छ्याचे घाऊक दुकान आहे

होबासराव
Fri, 07/24/2015 - 19:19 नवीन
कच्छ्याचे म्हणजे भुसार - किराणा मालाचे का ? त्याच भागात राह्तो आणुन बघेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

इंद्रायणी आवडला नव्हता?

सत्याचे प्रयोग
Fri, 07/24/2015 - 20:41 नवीन
इंद्रायणी आवडला नाही म्हणता. शिजवताना पाण्याचे प्रमाण नेहमीचे नाही लागत तर १ वाटीस साधारण पाऊण वाटी पाण्यात शिजवा नक्कीच आवडेल आणि पाषाणचा ओझा दुकानदार काय किंवा इतर दुकानदार भेसळ ची शक्यता असते. जमल्यास कामशेत बाजारात जा तिथे भात गिरणी आहे अस्सल तांदूळ मिळेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

डॉक तो काली मुछ आहे

होबासराव
Fri, 07/24/2015 - 19:16 नवीन
अकोला - अमरावती कडे मिळतो. इथे पुण्यात नेमका मिळत नाहि.. खरच बासमतीच्या तोंडात मारेल असा असतो.
  • Log in or register to post comments

खा बास मति राव

Sanjay Uwach
Fri, 07/24/2015 - 21:39 नवीन
खा बास मति राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा