Skip to main content

याकुब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने

लेखक विद्यार्थी यांनी शनिवार, 25/07/2015 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनचे फाशी वाचवण्याचे सर्व पर्याय संपत आल्यामुळे त्याला लवकरच फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली. फाशी प्रकरणाचा गाजावाजा होणे ही आजकालचीच गोष्ट वाटते कारण भारतात स्वातंत्र्यापासून अनेक लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची एवढ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे आठवत नाही. समाजातील काही उदार मतवादी लोकांना अतिरेकी, नक्षलवादि, अट्टल गुन्हेगार यांच्या मानवाधिकाराच्या चर्चा करून आणि त्यांच्याबद्दल समाजात नाहक सहानुभूती निर्माण करण्याची घाणेरडी सवय लागली आहे. आणि असे करून ते स्वतःची दुकाने चालवत असतात. फाशी झालेल्या गुन्हेगाराची जात, धर्म याबद्दल वक्तव्ये करून राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार तर फारच घृणास्पद आहेत. बॉम्बस्फोटामध्ये मारले गेलेले सर्व भारतीय नागरिक होते. त्यांची जात किंवा धर्म पाहून त्यांना मारले नव्हते तर मग फाशी झालेल्या या अतिरेक्याच्या धर्माची चर्चा का? भारतात फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा असावी किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण याकुब मेमनने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केलेली मदत आणि या स्फोटांमध्ये २५७ निष्पाप लोकांचे गेलेले बळी, हे भारतीय कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. याशिवाय याकुब मेमनला कायद्यानुसार स्वतःला वाचवण्याचे मिळणारे सारे पर्याय मिळाले आणि त्याने ते वापरालेसुद्धा. गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?

वाचने 50333
प्रतिक्रिया 277

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फाशी, शिरच्छेद, विद्युत खुर्चीत हाय होल्टेज विद्युत पुरवठा करून झटके देणे, हाता पायांवर गोळीबार करणे, विषारी वायूत जीव गुदमरावा यासाठी जीव जाईपर्यन्त अनेकदा तसा प्रयोग करणे, अशा मृत्युदंडाचे विविध प्रकार कायद्यात अंतर्भुत करावे लागतील त्या शिवाय गुन्हेगारांवर वचक बसणार नाही.
अजून कल्पना हव्या असतील तर अफगाणिस्तानात लावलेला इस्लामिक लों वाचा.

In reply to by वॉल्टर व्हाईट

मेलेल्या माणसाला न्यायाची गरज नसते??? हे बघा.. तुमचे विचार साफ गंडलेले आहेत हे खेदपुर्वक नमुद करते. वर खरे आणि बिरुटे काकांनी लिहीलं आहेच. मुद्दा अजुन समजावुन सांगण्याची गरज नसावी. तुम्हाला सहन होत नाही किंवा तुम्ही खुप सेन्सिटीव्ह आहात म्हणुन नको बाबा कुणाला फाशी.. असं नसतं. आज एकानी भारतात घुसुन असे स्फोट घडवुन आणले, तुम्ही त्याला जन्मठेप देवुन आयुष्यभर पोसणार. कशासाठी? शिवाय हे बरंय ना, की या भारतात, करा स्फोट, मरु देत च्यामायला लोक किड्या मुंग्या सारखे, होऊ देत जन्मासाठी अपंग.. एकदा का तुरुंगात जाऊन बसलो की उरलेलं आयुष्य मस्तपैकी आयतं खाऊन पिऊन काढायचं, फाशी म्हणलं की इथलेच लोक येड्यासारखे आपल्याच बाजुने पत्र लिहुन भांडत बसतील.. आपण तंगडे हलवत जन्नत मधल्या पर्‍यांची स्वप्नं बघत बसायचं! वा काय शिक्षा आहे!! आणि हो तशा अर्थानी फाशीला माझाही विरोध आहे.. फार सोप्पी शिक्षा आहे. बिरुटे काका म्हणतात तसल्या शिक्षा हव्यात.

In reply to by पिलीयन रायडर

आज एकानी भारतात घुसुन असे स्फोट घडवुन आणले, तुम्ही त्याला जन्मठेप देवुन आयुष्यभर पोसणार. कशासाठी?
हे पहा माझे मत नीट समजाउन न घेता तुम्हाला bashing करायला सोयीस्कर असा अर्थ तुम्ही काढताय. मी प्रथमत:च स्पष्ट केले आहे की याकुबला फाशी देऊ नये असे माझे मत अजिबात नाही.

In reply to by वॉल्टर व्हाईट

मुळात न्याय आणि शिक्षा हे शब्द व्यक्तीसापेक्ष का वापरावेत? शिक्षा या शब्दाचा अर्थ शिक्षण, किंवा वळण असा होतो. कायदे करताना ते केवळ "एक व्यक्ती" अशी एंटिटी समोर ठेवून केलेले नसतात, न्याय आणि शिक्षा हे समाजाला मिळतात. एखाद्याला जेव्हा फाशी होते, तेव्हा न्यायालये अश्या निष्कर्षापर्यंत आलेली असतात की ही व्यक्ती कोणत्याही प्रकारे जिवंत राहिली तरी सुधारण्याची शक्यता शून्य. किंबहुना अशी व्यक्ती नुसती जिवंत ठेवली तरीदेखील समाजाला अधिक उपद्रव व्हायचीच शक्यता. अन्यथा ती शिक्षा जन्मठेपेत परावर्तित होते. जशी याकूबबरोबरच्या इतर लोकांची झाली. आता राहिला प्रश्न शिक्षा आणि न्यायाचा - शिक्षेचे म्हणाल तर समाजाला अशी शिक्षा मिळते की अश्या प्रकारचे राष्ट्रविघातक कृत्य केल्यास मृत्यू येऊ शकतो. (आत्मघाती अतिरेकयांचे सोडा, तो विषय वेगळा आहे) आणि न्याय म्हणाल तर केवळ मेलेल्या व्यक्तीवरच अन्याय झालेला असतो हे म्हणणेच चुकीचे आहे. उद्या जर देशाच्या पंप्रचा खून झाला, तर तो काय पंप्रवर केलेला अन्याय आहे का? पंप्र हे केवळ उदाहरण आहे. देशाच्या कोणत्याही आजी/ माजी/ भावी नागरिकाचा मृत्यू देशाला, समाजाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे हानी पोचवतच असतो. त्यामुळे मिळालेला न्याय हा देशाने केलेला देशासाठीचा न्याय असतो. आणि म्हणूनच त्या न्यायासाठी संविधान लिहावे लागले आहे. नाहीतर न्याय काय कुठेही चावडीवर पण होतो. न्याय आणि शिक्षेची तत्वे "व्यक्ती"शी निगडीत असू शकतात. पण न्याय आणि शिक्षा या संज्ञा मात्र देश किंवा समाजाशीच निगडीत आहेत. समजले असेल अशी अपेक्षा करतो.

In reply to by वॉल्टर व्हाईट

>>> शिक्षा- मृत्युदंड दिल्याने 'शिक्षा' या व्यवस्थेचा उद्द्येश कसा सफल होईल? ज्याला शिक्षा दिली जाणार आहे तो व्यक्तीच हयात रहाणार नाही या अर्थाने. मृत्युदंड दिल्याने शिक्षेचा उद्देश सफल होतोच. मृत्युदंड नाही दिला तर नक्कीच शिक्षेचा उद्देश सफल होत नाही, कारण आपण अनेकांचा प्राण घेऊन सुद्धा गुन्हेगार जिवंत असतो. जगात इतर कोणत्याही भीतिपेक्षा मृत्युची भीति सर्वात जास्त असते. अनपेक्षित मरण आलेल्यांपेक्षा ज्यांना दिवस, वेळ ठरवून मृत्युदंड दिलेला आहे त्यांची मृत्युची वेळ जशी नक्की होते त्या क्षणापासून ते अक्षरशः मरण जगत राहतात. >>> न्याय- २५७ लोक जे अस्तित्वातच नाहीत, त्यांना न्याय देऊन काय साध्य होणार. हाच नियम ज्यांच्याकडे चोरी झालेली आहे, ज्यांच्यावर बलात्कार झालेला आहे, ज्यांची फसवणूक झालेली आहे ... अशा इतरांना सुद्धा लावला तर योग्य होईल का? ज्याप्रमाणे खुन्याला फाशी देऊन गेलेली व्यक्ती परत जिवंत होणार नाही त्याचप्रमाणे एखाद्या बलात्कार्‍याला शिक्षा देऊन पिडीतेची अब्रू परत येणार नाही. मग कशाला बलात्कार्‍याला शिक्षा द्यायची? >>> याही पुढे जाउन असेही म्हणता येईल की २५७ लोकांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला, पण सपोज २५७ पैकी २०० जणांच्या नातेवाईकांना असा मध्ययुगीन न्याय नकोच असेल तर त्यांना आपण तो बळजबरी देणार का? भारतात किंवा जगात कोठेही (काही अपवादात्मक देश वगळता) न्याय व शिक्षा हा कायद्यांवर विसंबून दिला जातो. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्या मागणीनुसार न्याय व शिक्षा दिली जात नाही. त्यामुळे २५७ पैकी २०० जणांना ही शिक्षा हवी किंवा नको यावर न्याय व शिक्षा दिली जाऊ शकत नाही. आणि समजा उर्वरीत ५७ जणांच्या नातेवाईकांना फाशी हीच शिक्षा द्यावी असे वाटत असेल तर ती द्यायला नको का? किंवा एखाद्या मृताच्या नातेवाईकाला असी वाटत असेल की खुन्याचा रोज एक अवयव तोडावा व त्याला सावकाश ७-८ दिवसात मारावा, तर अशी शिक्षा देता येईल का?

In reply to by dadadarekar

दादासाहेब श्रीगुरुजींबरोबर इतर एकही शब्द न लिहिता सहमत !!! मी जागा आहे की स्वप्नात हे पाहण्यासाठी स्वतःला चिमटा काढून पाहिला ;) मी तर जागा आहे. दादासाहेब तुम्ही हे जागेपणी लिहिले आहे की स्वप्नात हे पाहण्यासाठी स्वतःला ताबडतोप चिमटा काढून पहा बरे =))

In reply to by जडभरत

खालील बातमी वाचून या उपचर्चेतील आयडी कुणाचे आहेत असा प्रश्न पडला. ;) ओवेसींच्या 'त्या' मताशी शिवसेना सहमत ( अर्थात ";)" या चिन्हाचा अर्थ ह.घ्या/हलकेच घ्या/take it easy असा आहे. )

In reply to by श्रीगुरुजी

धन्यवाद.
हाच नियम ज्यांच्याकडे चोरी झालेली आहे, ज्यांच्यावर बलात्कार झालेला आहे, ज्यांची फसवणूक झालेली आहे ... अशा इतरांना सुद्धा लावला तर योग्य होईल का?
नाही.
ज्याप्रमाणे खुन्याला फाशी देऊन गेलेली व्यक्ती परत जिवंत होणार नाही त्याचप्रमाणे एखाद्या बलात्कार्‍याला शिक्षा देऊन पिडीतेची अब्रू परत येणार नाही. मग कशाला बलात्कार्‍याला शिक्षा द्यायची?
बलात्कार्‍याला देण्यात येणारी शिक्षा मृत्युदंड नसते त्यामुळे हे उदाहरण इथे गैरलागू आहे. मी शिक्षा ही व्यवस्था अमान्य करतोय असे नाही. बलात्कार्‍याला शिक्षा द्यायची गरज आहेच, कारण पिडीत व्यक्तीला त्याने न्याय मिळणार आहे आणि बलात्कार करणारा जेव्हा सुटेल तेव्हा भोगलेल्या शिक्षेच्या अनुभवाने तो पुन्हा गुन्हा करायला धजावणार नाही. प्रश्न फक्त मृत्युदंडाबाबत आहे.

In reply to by वॉल्टर व्हाईट

वॉल्टर व्हाईट साहेब आपल्या विधानांमध्ये वैचारिक गोंधळ दिसतो आहे बलात्कार करणारा जेव्हा सुटेल तेव्हा भोगलेल्या शिक्षेच्या अनुभवाने तो पुन्हा गुन्हा करायला धजावणार नाही. या साठी त्याला जन्मठेपेची काय गरज आहे त्याला लिंग विच्छेदची (CASTRATION) शिक्षा द्या कि म्हणजे तो परत धजावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. न्याय हा नुसता करून उपयोगी नाही तर तो दृश्य सुद्धा असला पाहिजे( justice should not only be done but be seen to be done गुगलून पहा) हे कायद्याचे मौलिक तत्व आहे. याचे कारण त्यातून धडा घेऊन इतर माणसे सुद्धा तो गुन्हा करायला धजावू नयेत हा त्यातील मुद्दा आहे. दहशतवाद्याला फाशी देणे यात हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. अन्यथा बलात्काराला जन्मठेप आणी दोनशे माणसाना उलट्या काळजाने उडवून देणे यालाही जन्मठेप असेल तर त्या गुन्ह्याच्या भयानकतेत फरक कसा करणार? सुडोसेक्युलर लोकांना कोणा मुसलमानाला फाशी दिले कि च कसा कळवळा येतो ते समजत नाही. याकुब फाशी गेला आता सहा महिन्यांनी फाशीची शिक्षा हवी कि नको यावर वादसंवाद करा. यांचे बोलाविते धनी वेगळे आहेत. (गुन्हेगारी पाताळ जगात)

In reply to by वॉल्टर व्हाईट

>>> बलात्कार्‍याला देण्यात येणारी शिक्षा मृत्युदंड नसते त्यामुळे हे उदाहरण इथे गैरलागू आहे. मी शिक्षा ही व्यवस्था अमान्य करतोय असे नाही. बलात्कार्‍याला शिक्षा द्यायची गरज आहेच, कारण पिडीत व्यक्तीला त्याने न्याय मिळणार आहे आणि बलात्कार करणारा जेव्हा सुटेल तेव्हा भोगलेल्या शिक्षेच्या अनुभवाने तो पुन्हा गुन्हा करायला धजावणार नाही. प्रश्न फक्त मृत्युदंडाबाबत आहे. गुन्ह्याची तीव्रता जितकी मोठी, शिक्षा त्या प्रमाणातच असते. >>> बलात्कार्‍याला शिक्षा द्यायची गरज आहेच, कारण पिडीत व्यक्तीला त्याने न्याय मिळणार आहे बरोबर. तसेच खुन्याला, दहशतवाद्याला सुद्धा शिक्षा द्यायची गरज आहेच, कारण पिडीत व्यक्तीला त्याने न्याय मिळणार आहे. आणि पिडीत व्यक्ती म्हणजे केवळ मृत व्यक्ती नसून त्या व्यक्तीचे नातेवाईक आणि खुनी/दहशतवाद्यामुळे कायमचे जायबंदी/जखमी झालेल्या व्यक्ती सुद्धा असतात. >>> आणि बलात्कार करणारा जेव्हा सुटेल तेव्हा भोगलेल्या शिक्षेच्या अनुभवाने तो पुन्हा गुन्हा करायला धजावणार नाही. असे काही नाही. बलात्काराची शिक्षा भोगून सुटल्यावर पुन्हा बलात्कार केल्याची उदाहरणे आहेत. >>> प्रश्न फक्त मृत्युदंडाबाबत आहे. दहशतवादी/खुन्याला मृत्युदंड दिल्याने तो परत असा गुन्हा करूच शकणार नाही. म्हणूनच मृत्युदंड आवश्यक आहे.

In reply to by वॉल्टर व्हाईट

विजय तेंडूलकर हे लेखक म्हणून उच्च दर्ज्याचे आहेत हे वादातीत आहे परंतु या लेखामध्ये नाटकीपणा फार जाणवतो.जसे काही मरणाला समोर जाणारा माणूस पाहणारे ते एकटेच आहेत. जेंव्हापासून त्यांनी विचारवंताचा मुखवटा धरण केला तेंव्हापासून त्यांच्या बद्दलचा आदर दुणावायच्या ऐवजी उणावला. बहुसंख्य डॉक्टरना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते. शेवटची घटका मोजणारा रुग्ण पहायची वेळ कित्येक वेळा येते. आणि हा रुग्ण गुन्हेगार नसून तुमच्या आमच्यातील सामान्य आणि निष्पाप माणूस असतो आणि प्ररीस्थिती समोर अगतिक असतो. डॉक्टर सर्व समजूनही काहीही करू शकत नाहीत आणि ते सुद्धा तितकेच अगतिक असतात. कालच माझ्या वाहिनीची मैत्रीण आली होती. तिच्या वडिलांना बद्धकोष्ठ आणि दम लागत होता म्हणून त्यांची तपासणी केली असता त्यांना मोठ्या आतड्याचा कर्करोग आढळला आणि तो यकृतात आणि फुप्फुसात पसरला आहे, त्यांच्या जवळ फार तर ३-४ महिने आहेत. हा निर्दोष आणि निष्पाप माणूस आहे आणि त्याचे मरण पाहणे हि शिक्षा डोक्तार्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नियतीने दिलेली आहे. याचे कणाकणाने वर्णन एखादा डॉक्टर आणि लेखक करेल तर ते जास्त भावेल( मी लेखक नाही आणि ते मला जमणारे नाही) तेंव्हा एखाद्याने दहशतवादासारख्या मानवतेविरुद्ध केलेल्या गुन्ह्यात असे भावनाविवश लिखाण नंने हि गोष्ट चुकीची आहे. जाता जाता -- एखाद्या गरीब मुसलमान माणसाने आपल्या मुलीवर होणारा बलात्कार टाळण्यासाठी जर दोन खून केले तर त्याला हे विचारवंत एवढी कायद्यातील पळवाटा काढायला मदत करतील का? यात सर्व राजकारण आणि पैसा याची घाण येते आहे. अल्पसंख्यांक म्हणून सलमान खान रस्त्यावरील लोकांना मारून आजही बाहेरच आहे मग अलीस्तीर परेरा अल्पसंख्यांक नव्ह्ता का? कि ख्रिश्चन लोक कमी पातळीचे आहेत. http://www.huffingtonpost.in/2015/05/06/alistair-pereira-sanjeev-nanda_… या सुडोसेक्युलर लोकांच्या दुटप्पीपणाचा संताप येतो. पैसा किंवा राजकीय लाभ असेल तेंव्हा त्यांना मानवतावादाचा कळवळा येतो.

+1

मेमनचा सुटकेचा शेवटचा मार्ग संपला! चेकमेट!

याकुबला मिळालेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर अंमलबजावणी झाली आहे. समाधान वाटतय.

याकुबला फाशी दिल्या गेली समाधान वाटलं. विषय संपला. फाशी देऊ नये, तो मुस्लिम म्हणून फाशी दिल्या गेली असे विधानं करणा-यांवर गुन्हे दाखल करून यांना उठता येणार नाही असे फटके देणा-या पोलिसांच्या ताब्यात देता येईल अशी काही कायद्यात तरतुद हवी असे वाटते. -दिलीप बिरुटे

खरच ? कि नवीन चाप्टर सुरु होणार ? अजुन किती बळी घेईल हि आग :(

जातीय दंग्ल , धार्मिक दंगल यासाठी फाशेचीच्शिक्षा योग्य आहे.

फाशी कायम . बाकी कोणी कितीही काहीही म्हणोत . हवं तर आसुरी आनंद म्हणा . पण खूप बरं वाटलं . आता फक्त ते फाशी रद्द करायला सह्या दिलेले लोक आणि टीवी वर येउन ओकलेले लोक . यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून केस चालवा कोणी तरी. माजलेत साले

कलाम सरांच्या जाण्याचे दु;ख तर आहेच पण त्यांच्या सारख्या निस्सीम देश भक्ताच्या अंतिम यात्रेच्या दिवशी आम्हाला एका कट्टर देशद्रोह्याच्या मृत्युच्या बातम्याच जास्त पाहाव्या लागल्या याचे दु;ख जास्त झाले. सकाळपासून फक्त 'तो' आणि 'तोच' . एका माजी राष्ट्रपतीपेक्षा 'तो' महत्वाचा होता का? भले त्याच्या विषयीच्या बातम्या देणे गरजेचे असेल पण त्या फिरत्या पट्टीवर दाखवून कलाम साहेबांचे (जसे आता दाखवत आहेत)अंतिम दर्शन दाखवले असते तर 'त्याला' अवास्तव महत्व मिळाले नसते.

In reply to by भिंगरी

भिंगरी ताई दोघेही धर्माने मुसलमानच एकाचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून लष्करी अधिकारी अभिमानाने खांद्यावर घेऊन वायुसेनेच्या विमानाने नेतात दुसर्याचे पार्थिव चोरासारखे काळ्या कापडात गुंडाळून न्यावे लागते. एकाच्या दर्शनासाठी लोकांची रीघ लागते. दुसर्याचे पार्थिव येणार म्हणून हजारो पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा लागतो. एकाच्या मृत्यूमुळे आदराने डोके झुकते दुसर्याच्या फाशीमुळे शरमेने मन खाली जाते. एकाच्या मृत्यूमुळे आपल्या कुटुंबातील एक व्यक्ति( आपलेच आजोबा) गेल्या इतके दुःख होते दुसरा हरामखोर मेल्याने सुटकेचा निः श्वास सोडला जातो. एक आयुष्यभरासाठी हृदयात मखर करून बसेल दुसरा उद्या -कोण? म्हणून विचारावे लागेल कोणते मरण सार्थक आहे?

In reply to by भिंगरी

अपवाद फक्त 'टाइम्स नाऊ' चा. काल तेथे नेमके उलटे चित्र होते. फक्त कलामसाहेबांचे दर्शन व बातम्या.

पहाटे चार पर्यन्त कोर्टात युक्तिवाद चालले, भारतात गुन्हेगाराला वाचविण्यासाठी असा प्रकार पहिल्यांदाच झाला असे वाटते, गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी असे रात्रं दिवस कोर्ट चालले असते तर असे विस विस वर्ष गुन्हेगारांना पोसावं लागलं नसत ""भाई ये कैसा मजाक चल रहा अपने देश में। ये कोर्ट है या चौक के बाबा जी की पान की दूकान ? की जब मर्जी अधी रात को शटर खुलवा के 2 गोल्ड फ्लेक ले लिये" -दिलीप बिरुटे

या सुडोसेक्युलर लोकांच्या हट्टापायी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीश( अगोदर सरन्यायाधीश आणि त्यांच्या आदेशाने तीन न्यायाधीशांचे पूर्णपीठ ) आणि महा अधिवक्ता ( Attorney General) यांनी मध्य रात्री अडीच वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडून न्यायदान केले. अशी सुविधा एखाद्या गरिबासाठी हे बोकड (सुडोसेक्युलर) उपलब्ध करून देतील काय? http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/yakub-memo…

These blood thirsty people will hang him tomorrow. If so called legal pundits say so - what else can you expect from fanatics and opportunists?

१९९३ चे बॉम्बस्फोट ही दंगलीनंतरची 'रिअॅक्शन' होती. त्यामुळे 'रिअॅक्शन'ला शिक्षा होते मग 'अॅक्शन'ला शिक्षा का नाही?, असा सवाल समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी याकूब मेमनच्या फाशीनंतर केला आहे. दाऊद असोत नाहीतर याकूब मेमन. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून निष्पापांचे प्राण घेणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी मात्र संपूर्ण परिस्थिती लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईत १९९३ मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते त्याआधी जातीय दंगल उसळली होती. या दंगलीत २५०० बळी गेले होते. या दंगलीची 'रिअॅक्शन' म्हणून बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. आज याकूबच्या फाशीने बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना शिक्षा दिली गेली आहे. मात्र ज्यांनी दंगल घडवून जातीय तणावाची ठिणगी टाकली त्यांचे काय?, त्यांना अशी शिक्षा का नाही?, असा सवाल आझमी यांनी माध्यमांशी बोलताना केला

In reply to by dadadarekar

दादा दरेकर, अबू आझमी आणि ओवेसी सारखे मुर्ख लोक असे बरळत असतात. खेदाची गोष्ट ही आहे की तुमच्या सारखी शिकली सवरलेली माणसे त्यांच्या वक्तव्यांना महत्व देतात. आता जनताही ओवेसी आणि अबू आझमीच्या बडबडीकडे दुर्लक्ष करते. म्हणतात की शिक्षण माणसाला शहाणं बनवते. पण खेदाने म्हणावेसे वाटते की चार्टर्ड अकांउंट सारखे शिक्षण घेतलेला तरूण ज्याने आपल्या कुटूंबाला दीशा द्यायला पाहीजे तो अशा देशविघातक क्रुत्यांमधे गुंतला. कोणाच्या वक्तव्याला किती महत्व द्यायचे ते आपण ठरवुया..

In reply to by अनुप ढेरे

बाबरी ढाँचा मध्ये मशिदीमध्ये चालतात तशा प्रकारची कुठली सत्कृत्ये होत होती? ती कधीपर्यंत सुरु होती? कधी कोर्ट केस सुरु झाली? ती संपली का? संपली नसल्यास निकालापूर्वी तिथलं कुलुप कोणी उघडलं? का उघडलं? मुंबई दंगल कशी सुरु झाली? राधाबाई चाळ नाव ऐकलंय का? तिला आग कशी लागली? किती लोक मेले? कुठल्या धर्माचे लोक मेले? बाबरी ढांचा पाडताना किती आणि कुठल्या धर्माचे लोक मेले? नंतरच्या दंगलीमध्ये किती आणि कुठल्या धर्माचे लोक मेले ? मुंबई दंगली आधी किती धार्मिक दंगली वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या होत्या? त्यातले आंकड़े काय सांगतात? बाबरी ढांचा पडला तोवर भारतात किती मशिदी पडल्या आणि त्या बरोबर किती देवळं पाडली गेली?

In reply to by प्यारे१

बाबरी पाडणं => मुंबै दंगली => मुंबै बॉम्बस्फोट हा घटनाक्रम आहे. नंतरच्याचा घटनांचा पहिल्याशी संबंध नाही हे धादांत खोटं आहे. खरोखर बदला होता वा बॉम्ब फोडायला कारण मिळालं. पण बाबरी पाडल्याने हे सगळं ट्रिगर झालं हे नक्की.

In reply to by अनुप ढेरे

बाबरी पाडण्यापूर्वी कधी दंगली झाल्या नाहीत? मुळात हिन्दू उत्तर देऊ शकतो हे बाबरी पाडण्यातून सिद्ध झालं. तोवर मार खाणं किंवा मरणं हेच मुख्यत्वे नशिबी होतं. नंतर दंगली केल्या गेल्या तेव्हाही रोखठोक उत्तर मिळालं. या सगळ्या घटनांमुळं सैरभैर झालेल्या लोकांनी चिरडीला येऊन बॉम्ब स्फोट घडवले. 93 साठी बाबरी हे मान्य करु एक वेळ. 2006 ला मुंबई ट्रेन ब्लास्ट साठी काय कारण होतं हो???

In reply to by प्यारे१

>>> 2006 ला मुंबई ट्रेन ब्लास्ट साठी काय कारण होतं हो??? १९८४ आणि १९६९ मधील मुम्बईतील दंगली; १९६८, १९७४ आणि १९८८ मधील पुण्यातील दंगली इ. दंगली बाबरी प्रकरणापूर्वीच झालेल्या होत्या. दंगल ही पूर्वनियोजित असते. कोणते तरी निमित्त वापरून पुर्वनियोजित दंगल केली जाते. १९९२-९३ मधील दंगल अशीच पूर्वनियोजित होती. बाबरी केवळ निमित्तमात्र. बाबरी प्रकरण झाले नसते तरी दंगल झालीच असती. तसेच बॉम्बस्फोट देखील झाले असते. १९८० च्या दशकात माफियांनी व दंगलखोरांनी पारंपारिक शस्त्रांच्या बरोबरीने बॉम्ब वापरायला सुरूवात केली. त्याचा पुढे अधिकाधिक व सफाईने वापर होत गेला.

In reply to by अनुप ढेरे

>>> पण बाबरी पाडल्याने हे सगळं ट्रिगर झालं हे नक्की. बाबरी मुद्दा चर्चेत सुद्धा नव्हता (म्हणजे १९८६ च्या आधीच) त्याच्या आधीपासून मुम्बई व देशात इतरत्र असंख्य भीषण दंगली झालेल्या होत्या आणि बॉम्बस्फोट देखील झालेले होते. बाबरी पडली नसती तरी दंगली, बॉम्बस्फोट झालेच असते.

In reply to by श्रीगुरुजी

या स्केलचे कुठले स्फोट आधी झाले होते? आणि बॉम्ब लावणार्‍यांपैकी एकाने हे सांगितलय की बाबरी आणि दंगली याचा बदला घेण्यासाठी बॉम्ब लावले.

In reply to by अनुप ढेरे

>>> या स्केलचे कुठले स्फोट आधी झाले होते? दिल्लीत १९८४ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या ट्रान्झिस्टर बॉम्बच्या स्फोटात ७० हून अधिक नागरीक मृत्युमुखी पडले होते. >>> आणि बॉम्ब लावणार्‍यांपैकी एकाने हे सांगितलय की बाबरी आणि दंगली याचा बदला घेण्यासाठी बॉम्ब लावले. दंगल करणारे आणि बॉम्बस्फोट करणारे आपल्या कृत्यांच्या समर्थनार्थ वेगवेगळी कारणे शोधत असतातच. त्यांना १९९२ पर्यंत काश्मिरचा मुद्दा हे कारण पुरलं. १९९२ ते २००२ पर्यंत ते बाबरी हे कारण वापरत होते. २००२ पासून गुजरात हे कारण वापरात आहे. भविष्यात वेगळे कारण वापरणे सुरू होईल.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, आझाद मैदान हिंसा आणि "अमर जवान" स्मारक तोडण्या मागचे कारण काय हो ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-Chandan Sa Badan... :- Saraswatichandra

In reply to by मदनबाण

>>> गुरुजी, आझाद मैदान हिंसा आणि "अमर जवान" स्मारक तोडण्या मागचे कारण काय हो ? देशात इतरत्र झालेल्या दंगली व बॉम्बस्फोट व त्यातून झालेली वित्त व मनुष्य हानी या तुलनेत आझाद मैदान हिंसा/"अमर जवान" हे प्रकरण अगदीच शुल्लक होते. यामागचे कारण म्यानमारच्या सैनिकांनी म्यानमारमध्ये राहणार्‍या निर्वासित बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांची केलेली हत्या हे कारण होते.

In reply to by अनुप ढेरे

>>> मुंबई बॉम्बस्फोट हे बाबरी पाडल्याची आणि नंतरच्या दंगलीची रिअ‍ॅक्षन होती हे चूक आहे काय? होय. हे चूक आहे.

In reply to by अनुप ढेरे

अनुप सर, अभ्यास वाढवा अशी नम्र विनंती. बाँबस्फोटातले आरडीएक्स हे बाबरी ढाचा पाडला जाण्याच्या अगोदर २ महिने अलिबागच्या किनार्‍यावर उतरले गेले होते. आता ते टायगर मेनन वगैरे अंतर्ज्ञानी होते असे म्हणायचे असेल तर भाग वेगळा.

ओ हितेस राव त्या अबू आझमीचं कसला कौतुक सांगताय? जोड्याने मारण्याच्या पण लायकीचा माणूस नाही. देश के कितनेभी तुकडे हो जाये हम किसीको अपने मजहब से खिल्वाद करणे नाही देंगे म्हणणारा देशद्रोही माणूस हा. तुम्ही त्याच्या तोंडाला तोंड कशाला लावताय?

In reply to by सुबोध खरे

पेप्रात आलय आजच्या मटात.

In reply to by dadadarekar

म टा मध्ये राशिभविष्यात कौटुंबिक कारणासाठी अनावश्यक खर्च होणार आहे आणि वायफळ बोलणे टाळा हे पण लिहिले आहे. खरुज नायटा आणि गजकर्ण वर बी टेक्स मलम वापरा हेही लिहिले आहे. बरं मग?

१. पहिली गोष्ट म्हणजे याकुब मेमन विषयी एव्हढी चर्चा कशाला ?समाजातचं ते एक विकृत अंग आहे. उशीरा का होईना व्यवस्थीत कायदे प्रक्रिया राबवुन ते समाजातुन काढुन टाकलं जातंय. त्यात समाधान मानुन शांत रहायला हवे. २. आपण सगळ्ञांनी जर अशीच चर्चा करत राहिलो तर एका विकृतीला महत्व दिल्यासारखे होईल. जेव्ह्ढी चर्चा जास्त तेव्हढेच असेप्रयत्नं चालु रहातील. ३. जे पत्र राष्ट्रपतींना दिले गेले आहे ज्याची एव्हढी चर्चा होतेय, त्यावर फक्त मुस्लीम आमदार, खासदारांच्या सह्या मुस्लीम लोक आपल्या धर्माच्या माणसाला वाचवण्यासांठी हे असं करणारंच.त्यात नवल ते काय ? त्यांना बकी कशाहीपेक्षा धर्म जास्ती प्यारा असते ही गोष्ट सर्वश्रुत आहे. ४. त्याही उपर अश्या लोकांना जाणवु द्यायचे असेल की त्यांचे कृत्य असमर्थनीय आहे तर या लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. त्यांना कुठल्याही सामजिक समारंभांना बोलावु नका. च्यानेलांवर चर्चेस बोलावु नकस, कुठल्याही घडामोडींवर त्यांची प्रतिक्रीया दाखवु नका. थोडक्यात त्यांच्यावर राजकीय, सामाजिक अंधार येईल असे करा. ५. उद्यापासून ही चर्चा थांबवा कारण सकाळी सातनंतर याकुन अस्तित्वात नसेल. उगीचच वाढवण्यात काही अर्थ नाही.

@dadadarekar या दंगलीत २५०० बळी गेले होते??? काय टिंग्या सोडताय हो ? कोणी सांगितलं तुम्हाला ? दंगलीत ९०० बळी गेले होते . आणि दंगलीची सुरवात त्या लोकांनी केली होती मशीद पाडल्यानंतर . 'रिअॅक्शन' बद्दलच बोलायचं असेल तर बाबरी मशीद पडणं हि सुधा रिअॅक्शनच होती . इस्लामी धर्मांधतेला , त्या लोकांनी मांडलेल्या उच्छादाला दिलेलं उत्तर होतं ते . आज सुधा अबू आझमी , ओवेसी आणि इतर धर्मांध मुस्लिम ज्या प्रकारे वागतात बोलतात त्यावर हिंदू सुधा रिअॅक्शन देवू शकतात . मग पुन्हा दंगल झाली कि पुन्हा दहशतवादी हल्ला . मग पुन्हा तुम्ही 'रिअॅक्शन' म्हणून गळे काढायला मोकळे . भिंगरी तै चा प्रतिसाद योग्य अहे. आता हि चर्चा बास करावी . त्याच्या फाशीची इतकी publicity करायची गरज नाही असं वाटतंय

In reply to by तुडतुडी

९०० बली गेले असे दिले aàhe. विकि. Dead – 900 (575 Muslims, 275 Hindus, 45 and 5 others). The causes for the deaths are police firing (356), stabbing (347), arson (91), mob action (80), private firing (22) and other causes (4).

@श्रीगुरुजी नामवंत मुस्लिम ह्यातच सगळं काही आलं . तो काहीही म्हणेल हो . सत्य आपल्यासमोर आहे

असदुद्दिन औवेसि, मिपा वरील काहि सिरिया रीटर्न माकड आणि ह्यांचेच काहि उतावळे इलेक्ट्रॉनिक मिडियातले जातभाइ (मर्कट ह्या नात्याने) ह्यांच्या मर्कट लिलाना काय उधाण आलय, आता ज्या विमानातुन त्याचे पार्थिव नेले त्याचि सुद्धा शुटींग, त्याच्या नातेवाईंकाचे चेहर्यावर काय हाव्-भाव आहेत ते सुद्ध कॅमेराबध्द. ह्या मीडियावाल्याना म्हणुनच नेपाळ्मधुन पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलण्यात आले होते.

The Gujarat government has refused permission to the Supreme Court-appointed SIT to file an appeal in a higher court seeking death penalty for former minister Maya Kodnani in the Naroda Patiya riot case. This was decided on the basis of advocate general Kamal Trivedi's opinion that there was "no direct evidence" against her. Maya Kodnani and Bajrang Dal activist Babu Bajrangi, along with 30 others, were sentenced to life imprisonment in the 2002 post-Godhra Naroda Patiya riot case, in which 96 people were killed. http://m.timesofindia.com/india/Gujarat-govt-asks-SIT-not-to-seek-death…

In reply to by dadadarekar

ओ हितेस बुवा धार्मिक दंगल करणे आणी देशाविरुद्ध (परदेशातून मदत घेऊन) युद्ध पुकारणे(WAGING WAR) हे दोन वेगवेगळे अपराध आहेत आणी ते एकाच तागडीत तोलताय याचा अर्थ साधा सरळ आहे आपल्याला कायदा नीट माहित नाही. पहिल्यांदा अभ्यास वाढवा.

In reply to by सुबोध खरे

परदेशाच्या मदतीने देशाविरुद्ध युद्ध याला फाशीच असते. ...द्।धार्मिक दंगल .... यालाही फाशीच हवी.

राहून राहून नवल वाटले अनेक सेलेब्स लोकांनी फाशी विरोधात मत मांडली, तो प्रसिद्धी चरितार्थाचा भाग असेल मात्र फाशीच्या समर्थन करणारा एकही सेलेब्स भारतात होऊ नये एरवी संजय सोबत काम करणार नाही म्हणणारा नाना सुध्धा काही बोलला नाही ,सामान्य जनता फाशीच्या बाजूने होती त्यांच्या मुखातील बोल एखाद्या सेलेब्स कडून ऐकायला बरे वाटले असते. कराची ची दहशत बॉलीवूड मध्ये अजून आहे हेच दिसून येते .

In reply to by निनाद मुक्काम …

कराची ची दहशत बॉलीवूड मध्ये अजून आहे हेच दिसून येते
मंत्री,अनेक आय.पी.एस.अधिकारी,कस्टम अधिकारी दाऊदच्या पे-रोलवर तेव्हाही होते व अजूनही आहेत. हे लोक काहीच करणार नाहीत ह्याची खात्री असल्याने ती दहशत आहे.

१९९३ चे बॉम्बस्फोट ही दंगलीनंतरची 'रिअॅक्शन' होती. त्यामुळे 'रिअॅक्शन'ला शिक्षा होते मग 'अॅक्शन'ला शिक्षा का नाही?, जर हि रिअ‍ॅक्शन होति तर मग गुजरात मधल्या आफ्टर गोध्रा रीअ‍ॅक्शन बद्दल तुमचे किंवा जे तुम्हाला मेंढरा सारखे सतत चरवत असतात आणि तुम्हि चरत असता त्यांचे काय म्हणणे आहे ? कारण ह्या न्यायाने मग ति रीअ‍ॅक्शन सुध्दा जस्टीफाय होते. आमच्या साठि तर ह्या दोन्हि घटना तुम्हि त्याला 'अ‍ॅक्शन' म्हणा कि 'रीअ‍ॅक्शन' दुखद होत्या. पण तुम्हा लोकांचि हिच मेंटॅलिटि राहिलि तर तुम्हि पुन्हा एक गोध्रा कराल पुन्हा त्याला एक रीअ‍ॅक्शन येइल्..पण ह्यावेळेस भारतच सोडावा लागेल जसा तेव्हा गुजरात मधुन पळाव लागल होत. ईश्वर तुम्हाला सदबुध्द्दि देवो.

In reply to by होबासराव

पिवळे केलेल वाक्य mahaaràshTra टाइम्समधले आहे. ते वाक्य माझे नाही. http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48276592&section=mumbai वीनाकारण माझ्यावर टीका करु नये.

एक शोकान्त उन्माद आजच्या लोकसत्ता मध्ये वेगळी बाजू मांडण्यचा प्रयत्न केला आहे. गिरीश कुबेर सध्याच्या संपादकांमध्ये सर्वात चांगले लिहितात त्यामुळे एकदा वाचायला हरकत नाही

In reply to by कपिलमुनी

काही मुद्दे खटकले ...
  • याकूब यास फाशी देणे म्हणजे देशप्रेम सिद्ध करणे असा जो उन्माद वातावरणात दिसतो, तो दूर करून याचा विचार करावा लागेल
  • टायगरच्या या पाताळयंत्री उद्योगाची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना नव्हती
  • त्यास फासावर लटकावल्यास आपली न्यायव्यवस्था शासकीय तालावर नाचते, असे चित्र निर्माण होऊ शकते.

In reply to by अत्रन्गि पाउस

गिरीश कुबेर यांचा अग्रलेख आवडला नाही. अग्रलेखातील एक वाक्य---
तो स्वत:हून शरण आला की आपण त्यास पकडले याबाबत संदिग्धता असली तरी एक बाब निर्वविाद सत्य आहे. ती म्हणजे आपल्या सरकारने त्यास त्या वेळी अभय देण्याचे वचन दिले आणि त्या बदल्यात त्याने बॉम्बस्फोटातील पाकिस्तानी सहभाग उघड करावा, असा हा करार होता. याचा अर्थ याकूब हा माफीचा साक्षीदार होता आणि आहे.
बॉम्बस्फोटात पाकिस्तानचा हात होता हे भारत सरकारला याकूब मेमनला पकडण्यापूर्वी माहित नव्हते आणि ते याकूब मेमनने दिलेल्या माहितीतून सिध्द झाले हे निखालस खोटे आहे. गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी २१ एप्रिल १९९३ रोजी लोकसभेत दिलेल्या निवेदनात बॉम्बस्फोटात पाकिस्तानचा सहभाग कसा होता याची इत्थंभूत माहिती दिली आहे. सगळ्या जगाला उपदेश करणार्‍या लोकसत्ताच्या संपादकांना ही गोष्ट माहिती नसावी याचे आश्चर्य वाटते.

In reply to by कपिलमुनी

याकुब मेमन 'माफीचा साक्षीदार' होता???? मला वाटते लेखातील चुकांची सुरुवात इथूनच करावी लागेल. माफीचा साक्षीदार होण्यासाठी गुन्हा कबुल करावा लागतो. याकुब मेमनने गुन्हा कबुल केला होता का? माफीच्या साक्षीदाराची मदत घेऊन तुम्ही मुख्य गुन्हेगाराला पकडता. मुख्य गुन्हेगाराला माफीचा साक्षीदार करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने धनुर्धारी - बाण (archer - arrow) अशी उपमा दिली आहे .

In reply to by कपिलमुनी

@कपिलमुनी हे बॉम्बस्फोट हे भारतावर लादलेले युद्धच होते, हे युद्ध छुपे होते आणि पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेने ते लादले होते, हेही निश्चितच मान्य. त्यास जबाबदार असणाऱ्यांना, निरपराधांचे प्राण घेणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे हे तत्त्वदेखील मान्य. आता प्रश्न असा येतो कि भारताच्या संघराज्याच्या विरुद्ध युद्ध पुकारले हे तुम्ही मान्य करता आणी तरीही त्याला फाशी द्यायला नको होती असे म्हणता. याकूब या कुटुंबाचा सनदी लेखापाल. त्यासही आपला थोरला भाऊ नक्की कोणत्या उद्योगात मग्न आहे, हे माहीत नव्हते. म्हणजे आपल्या सरकारने त्यास त्या वेळी अभय देण्याचे वचन दिले आणि त्या बदल्यात त्याने बॉम्बस्फोटातील पाकिस्तानी सहभाग उघड करावा, असा हा करार होता. आपल्या सरकारने( म्हणजे कुणी? तेंव्हा असलेल्या कॉंग्रेसच्या गृह मंत्र्यांनी?) त्यांना अभय देण्याचे वचन दिले. हे याकुब ने यांच्या कानात येऊन सांगितले का? परंतु याचा अर्थ असा निश्चितच नाही की मुख्य आरोपीचा भाऊ आहे आणि मुख्य आरोपी हाती लागणे शक्य नसल्याने जो कोणी हाती लागला त्यास फासावर लटकावले जावे. या अर्थाकडे आपल्या व्यवस्थेने पूर्ण दुर्लक्ष केले. यात टाडा न्यायालयदेखील आले. या न्यायालयाने तांत्रिक बाबींची पूर्तता न करताच याकूब यास फाशी देण्याचा निर्णय दिला. टा डा न्यायालयापासून उच्च न्यायालय आणी सर्वोच्च न्यायालय हे सर्व लोक बधीर आहेत आणी सरकारचे बाहुले आहेत. त्यानी या सर्व गोष्टी पहिल्याच नाहीत किंवा त्यांना पुनर्विचार याचिकेत सुद्धा याकुब्ने सांगितले नाही फक्त कुबेर साहेबांच्या कानात सांगितले ( ते सुद्धा कॉंग्रेस च्या राजवटीत UPA १ आणी २). कारण मोदी साहेब एक वर्ष पूर्वीच आले आहेत. सरकार आणि अन्य या संदर्भात इतके उतावीळ होते की याकूबची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे हे माहीत असतानाही त्यास फासावर लटकावण्याचा निर्णय झाला. सर्वोच्च न्यायालयाने त्याची फाशी कायम केली त्यानंतर राष्ट्रपतीनि त्याचा दयेचा अर्ज फेटाळला त्यानंतर पुनर्विचार याचिकाही फेटाळली त्यावर ची दुरुस्ती याचिकाही फेटाळली. यावर त्याने परत राज्यपाल आणी राष्ट्रपतींकडे दयेचे अर्ज केले तेही फेटाळले गेल्यावर रात्री ३ वाजता तीन न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय उघडून त्याच्या याचिकेवर विचार करतात आणी ती फेटाळतात असे असूनही कुबेर बेताल वक्तव्ये करतात हे पाहून त्यांची लाज वाटली. त्यांचे वक्तव्य ओवैसिपेक्षाही लाजिरवाणे आहे. त्यास फासावर लटकावल्यास आपली न्यायव्यवस्था शासकीय तालावर नाचते, असे चित्र निर्माण होऊ शकते.हे सर्व कॉंग्रेस च्या राजवटीत UPA १ आणी २) झालेले असताना केवळ भाजप च्या राज्यावर शिंतोडे उडवण्यासाठी गिरीश कुबेर अशी बेफाट विधाने लिहीताहेत याचा अर्थ त्यांचा बोलविता धनी दुसराच आहे. गिरीश कुबेर यांची पातळी सुमार केतकर यांच्यापेक्षाहि खाली गेली. त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला भरायला पाहिजे. काही वेळेस श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे मत पटते "आपल्याला लोकशाही नको ठोकशाहीच पाहिजे" मुनिवर डोळे उघडून वाचत चला