आंबा कलाकंद

आंब्याचा सिझन संपून गेलाय खरा, पण हल्ली मँगो पल्प तर वर्षभर मिळतो आणि मिपावरची माझी पहिली रेसिपी गोड असावी म्हणून आजचा मान आंब्याला!
हे हलवाई कशा बाई एवढ्या सुंदर बर्फी तयार करतात असं लहानपणी वाटायचं. पण स्वैपाकघरात वावर रोजचा सुरु झाला आणि रेसिपी कमी पडू लागल्या. नेहेमीचीच पक्वान्नं करण्यापेक्षा असे वेगळे प्रयोग सुरु झाले. हे अशक्य वाटणारे पदार्थ यशस्वी झाल्याचा केवढा आनंद असतो नाही का! तर आता ह्या सोप्प्या रेसिपीकडे वळते.
साहित्यः
- १ १/२ वाटी पनीर
- १/२ - ३/४ वाटी साखर
- १ वाटी आंब्याचा पल्प
- १/४ वाटी साय
- केशर
- बदाम पिस्त्याचे काप
- तूप
कृती:
पनीर शक्यतो घरीच करा. छान मऊ आणि ताजं पनीर असलं की बर्फीही मऊसुत होते.
१ लीटर दुधाला २ चमचे लिंबू रस असं प्रमाण मी पनीर करण्यासाठी घेते.
छानपैकी बांधून, पाणी काढलेलं पनीर हलकं मळून, मोकळं करुन घ्या.
कढईमध्ये २ चमचे तूप तापवून पनीर आणि आंब्याचा रस परतायला घ्या.
साखर आणि साय घाला आणि जरा घट्टपणा येईपर्यंत कमी आचेवर परता.
कलाकंद जरा मऊच असतो त्यामुळे खूप वेळ परतू नका नाहीतर पनीर होईल चिवट आणि बर्फीच्या टेक्स्चरची बोंब!
आता चौकोनी ट्रेमध्ये गरम मिश्रण थापून घ्या.
थोडं गार झालं की वड्या पाडा.
बदाम पिस्त्याचे काप आणि केशर लाऊन सजवा.
अलगद डब्यात भरा आणि रेफ्रिजरेट करा.

मलई कलाकंद असाच करू शकता. फक्त आंब्याचा रस वगळा आणि साखर १ ते १ १/४ वाटी घ्या
रेसिपी गोड करुन घ्या आणि चूकभूल माफ करा हो मंडळी! :)
प्रतिक्रिया
क्या बात है
असेच
In reply to क्या बात है by श्रीरंग_जोशी
दुत्त दुत्त :-\
क्या बात है! गोड पाककृती आहे!
खूपच मस्तं.
फोटो मस्त आहे, रेसिपी पण
बुवांना +१
मस्त
नेहमीच्या मलई कलाकंदमध्ये रोझ
In reply to मस्त by अमृत
व्वा ! सुरेख !
व्वा ! सुरेख !
मला ऑनलाईन ट्रांसफर करा :)
अगदी अगदी. मलाही लोकांनी
In reply to मला ऑनलाईन ट्रांसफर करा :) by नाव आडनाव
मिपा पाककृती विभागात स्वागत.
बर्फी सुरेखच. मिपावर स्वागत
बर्फी सुरेखच. मिपावर स्वागत
मस्त
पुढच्या वेळी
In reply to मस्त by ब़जरबट्टू
झक्कास!
गोड पाकृ व फोटू.
आंबा आवडता आहेच... फोटो बघून
वा..
फारच सुंदर!
आभारी आहे
In reply to फारच सुंदर! by रुपी
बेष्टाड बेष्ट दिसतंय प्रकरण.
सुदंर दिसत आहे बर्फी!
धन्यवाद!
वाव काय सुंदर दिसतोय कलाकंद..
यम्मी!! आंबा कलाकंद खूप सुंदर
व्वा! अगदी उचलून खावासा
मस्तच! पार्टीसाठीही देखणा
मस्तच, आत्ताच खावीशी वाटते
खूप छान! नक्की करून पाहीन.
आभार
मस्तच ...........!
काय खत्रा कलर आलाय...
वाह
अप्रतिम ......................
आहाहा... :)
काय रसरशीत रंग आलाय बर्फीला?