ती (शतशब्दकथा)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
"स्त्रीला कधीही नाही जमणार, भालाफेकीत किंवा तिरंदाजीत नीट नेम धरून शिकार टिपायला...... तुझं शरीराचं, तुला अडचणीच होईल त्यावेळी !" त्याचा मृतदेह पुरला, तरी डोक्यातले त्याचे शब्द तिला राहूनराहून छळत होते.
'त्याने शिकार करायची, अन तिने धारदार सुऱ्याने शिकारीची चामडी सोलून, छोटूकले तुकडे करून, शेकोटीवर भाजून, चिल्ल्यापिल्ल्यासकट सगळ्यांना खाऊ घालायचे', असा सरळसोट हिशोब राहिला नव्हता आता……त्याला गुहेजवळ पुराल्यानंतर.
जगण्यासाठी कोडगं व्हायचं ठरवून, इथूनपुढे रोजच, आपल्यासकट पिल्लांसाठीसुद्धा, शिकारीच्या शोधार्थ बाहेर पडावेच लागणार होते तिला तिच्या गुहेतून,
……
……
जाड चामड्याची पट्टी दाताखाली दाबून, दीर्घ श्वास रोखून, डाव्या हातातला सुरा खोलवर चालू लागल्यावर, उडणार्या रक्ताच्या कारंज्यात, असह्य वेदनेने कळवळली ती, उजवा स्तन कापून टाकताना……
स्वतःचाच …….
प्रतिक्रिया
बाप्रे !! असंही असतं ?
भालाफेकीत किंवा तिरंदाजीत नीट नेम धरून शिकार टिपायला......
चित्र दीसत नाहीये. घरी जाउन
अमेझॉन्स!
कुठेतरी वाचल्याच आठवतय
मला सुमेरियन असं वाचल्याचं
???? नाही झेपलं
प्राचीन युगात
आवडली !
काय चाललंय दादा?
माझा मुद्दा थोडा वेगळा आहे.
शशकची शब्दमर्यादा लिहिणार्याने स्वतःहून स्वतःवर स्वीकारलेली असते
ओहो.. क्या खुब..!
तुमच्यामुळे एक नवीन माहिती कळली... कामाला लावलेत सगळ्यांना !