✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ती (शतशब्दकथा)

प
पगला गजोधर यांनी
Tue, 07/28/2015 - 10:47  ·  लेख
लेख
"स्त्रीला कधीही नाही जमणार, भालाफेकीत किंवा तिरंदाजीत नीट नेम धरून शिकार टिपायला...... तुझं शरीराचं, तुला अडचणीच होईल त्यावेळी !" त्याचा मृतदेह पुरला, तरी डोक्यातले त्याचे शब्द तिला राहूनराहून छळत होते. 'त्याने शिकार करायची, अन तिने धारदार सुऱ्याने शिकारीची चामडी सोलून, छोटूकले तुकडे करून, शेकोटीवर भाजून, चिल्ल्यापिल्ल्यासकट सगळ्यांना खाऊ घालायचे', असा सरळसोट हिशोब राहिला नव्हता आता……त्याला गुहेजवळ पुराल्यानंतर. जगण्यासाठी कोडगं व्हायचं ठरवून, इथूनपुढे रोजच, आपल्यासकट पिल्लांसाठीसुद्धा, शिकारीच्या शोधार्थ बाहेर पडावेच लागणार होते तिला तिच्या गुहेतून, …… …… जाड चामड्याची पट्टी दाताखाली दाबून, दीर्घ श्वास रोखून, डाव्या हातातला सुरा खोलवर चालू लागल्यावर, उडणार्या रक्ताच्या कारंज्यात, असह्य वेदनेने कळवळली ती, उजवा स्तन कापून टाकताना…… स्वतःचाच …….
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शब्दक्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
3545 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

बाप्रे !! असंही असतं ?

खटपट्या
Tue, 07/28/2015 - 11:34 नवीन
बाप्रे !! असंही असतं ? मग एवढ्या महिला भालाफेकपटू असतात त्या कशा ?
  • Log in or register to post comments

भालाफेकीत किंवा तिरंदाजीत नीट नेम धरून शिकार टिपायला......

पगला गजोधर
Tue, 07/28/2015 - 11:56 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

चित्र दीसत नाहीये. घरी जाउन

खटपट्या
Tue, 07/28/2015 - 12:08 नवीन
चित्र दीसत नाहीये. घरी जाउन बघतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

अमेझॉन्स!

तुषार काळभोर
Tue, 07/28/2015 - 12:11 नवीन
ग्रीक युद्धदेवता आर्टेमिस हिच्या योद्ध्यांचं नाव अमेझॉन्स होतं. (अमेझॉन या शब्दाची व्युत्पत्ती a- and mazos, "without breast" (ग्रीकमध्ये) अशी असल्याचं मानलं जातं) तर या अमेझॉन स्त्रिया त्यांचे उजवे स्तन कापत असत. याची कारणे वेगवेगळी दिली जातात. एक असं सांगितलं जातं की त्यामुळे उजव्या स्तनातील शक्ती उजवा खांदा व हात यात पुरवली जाते (जी कदाचित भालाफेक्/तीरंदाजी यात उपयोगी ठरत असेल.) माहिती स्रोतः विकी (ही ग्रीक पौराणिक थियरी आहे. खरं खोटं झ्युस जाणो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

कुठेतरी वाचल्याच आठवतय

भीमराव
Tue, 07/28/2015 - 12:04 नवीन
कुठेतरी वाचल्याच आठवतय प्राचीन युरोपात अशी एक जमात होती जिच्यामधे स्त्री तिरंदाज त्यांचा एक स्तन कापुन घेत असत. अभ्यासक/जाणकार याबद्दल अधिकची माहीती देऊ शकतील.
  • Log in or register to post comments

मला सुमेरियन असं वाचल्याचं

जडभरत
Wed, 07/29/2015 - 17:01 नवीन
मला सुमेरियन असं वाचल्याचं आठवतंय. आ.जा. वर सर्च मारायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

???? नाही झेपलं

तुडतुडी
Tue, 07/28/2015 - 17:34 नवीन
???? नाही झेपलं
  • Log in or register to post comments

प्राचीन युगात

पगला गजोधर
Tue, 07/28/2015 - 17:46 नवीन
आदिवासि स्त्री तिरंदाज त्यांचा एक स्तन कापुन घेत असत, तिरंदाजीत नीट नेम धरून शिकार टिपायला. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

आवडली !

उगा काहितरीच
Tue, 07/28/2015 - 18:18 नवीन
आवडली !
  • Log in or register to post comments

काय चाललंय दादा?

मुक्ती
Tue, 07/28/2015 - 18:40 नवीन
असे एकेक किश्शाची एकेक कथा कशाला करताय? आतिवास तैंच्या कथा वाचा जरा एकदा सगळ्या.
  • Log in or register to post comments

माझा मुद्दा थोडा वेगळा आहे.

जडभरत
Wed, 07/29/2015 - 17:05 नवीन
माझा मुद्दा थोडा वेगळा आहे. शशक ऐवजी थोडासा इतिहासातील कच्चा माल आणि कल्पनाशक्तीची फोडणी देऊन या विषयावर उत्तम कथा लिहिता येतील. कारण असं इतिहासात घडून गेलंय. तसेच शशकची शब्दमर्यादा लेखनावर बर्‍याच मर्यादा आणते! असो माझे वैयक्तिक मत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्ती

शशकची शब्दमर्यादा लिहिणार्याने स्वतःहून स्वतःवर स्वीकारलेली असते

पगला गजोधर
Wed, 07/29/2015 - 17:23 नवीन
तसेच शशकची शब्दमर्यादा लेखनावर बर्‍याच मर्यादा आणते! असो माझे वैयक्तिक मत!!!
माणसाच्या दिवसात २४च तास असतात नं, जसं तो त्याचा उपयोग कसा करतो हे महत्वाचे, तसेच आपण (लिहिणार्याने) स्वतःवर १०० शब्दांचे बंधन घालून, जास्तीत जास्त प्रभावी सादरीकरण करायचे ठरवले तर ?? अवांतर: शिवाय तुम्ही मुळचे "पिचर" चे भोक्ते असाल तर तुम्हाला "टक़ीला-शाँट" रुचणार नाही कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत

ओहो.. क्या खुब..!

द-बाहुबली
Wed, 07/29/2015 - 20:52 नवीन
बहोत खुब. बहोत बहोत खुब. आप लिखते रहो लोग पढते रहेंगे. अवांतर :- शटशब्दकथा लिहायचा विचार चालु आहे.
  • Log in or register to post comments

तुमच्यामुळे एक नवीन माहिती कळली... कामाला लावलेत सगळ्यांना !

माम्लेदारचा पन्खा
Wed, 07/29/2015 - 21:18 नवीन
तुम बने रहो पगला....काम करेगा तुम्हारे अगला !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा