Skip to main content

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस

लेखक संपादक मंडळ यांनी शुक्रवार, 24/07/2015 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
****************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा ******************************************************** नमस्कार मंडळी! जरा अडखळत सुरुवात झाली, पण आता पाऊस सुरू झाला सगळीकडे. सगळीकडे सृष्टीचे हिरवेगार, शांत रूप बघायला मिळते आहे. मागची स्पर्धा जरा कठीण होती असा विचार बहुसंख्येने ऐकायला मिळाला. यावेळच्या स्पर्धेचा विषय आम्ही कोण ठरवणारे? आपोआपच ठरला तो! सर्वांना सारखंच भिजवणारा पाऊस!
ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा -शांताबाई शेळके -
या पावसाचा उत्सव आपापल्या चित्र प्रतिमांमधून इथे साजरा करू यात तर! आधीच्या स्पर्धेच्या धाग्यावर तुम्ही मंडळींनी सुचवलेल्या विषयांची नोंद पुढच्या स्पर्धांसाठी घेतली आहेच. मात्र यावेळी पावसाशिवाय दुसरे काहीच सुचत नाहीये! स्पर्धेसाठी आपापली छायाचित्रे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंत इथे सादर करा. या स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणेच. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि वाचकांना धन्यवाद!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 79413
प्रतिक्रिया 171

प्रतिक्रिया

In reply to by बेन१०

छान आहे फोटो. अप्रतिम

एकापेक्षा एक जब्बरदस्त. जियो फ्रेंड्स जियो. -दिलीप बिरुटे

सर्व फोटो चांगले आहेतच पण भर पावसाचा धिगाणा दाखविणारा एकही फोटो नाही म्हूनशान नाराज !

In reply to by Vikrant

त्रुटी:
  • तुम्ही फोटोचा प्रत्यक्ष पत्ता .jpg चा समावेश असलेला न वापरता गुगल फोटोजच्या पेजचा युआरएल वापरला आहे.
  • त्या युआरएल वर गेलो असता फोटो किंवा अल्बमला पब्लिक अ‍ॅक्सेस नसल्याचे दिसत आहे.
उपायः
  • सर्वप्रथम या फोटोला पब्लिकली शेअर करा.
  • गुगल फोटोजमध्ये फोटो उघडल्यावर त्यावर राइट क्लिक करून कॉपी इमेज युआरएलद्वारे प्रत्यक्ष पत्ता मिळवा अन तो पत्ता इथे वापरा.
एक महत्वाची चाचणी:
  • यापुढे इथे फोटो प्रकाशित करताना फोटोचा युआरएल गुगल अकाउंटमधून लॉग आउट करून उघडून पहावा म्हणजे जालावर प्रत्येकाला तो दिसू शकतोय की नाही याची खातरजमा करता येईल.

In reply to by Vikrant

आवडले एकदम गरद लेणी (पळू) जवळील गीरन्यांची* आठवण आली * - गीरी-नद्या याचा अपभ्रंश असावा हा बहुतेक

सगळेच फोटो अप्रतीम...अॉफीसच्या रुक्ष वातावरणात हे फोटो सहलीचा फिल घेताहेत. जियो मिपा आणी मिपाकर्स. ..

In reply to by आशय ढवळे

पण रस्ता सोडुन बाहेर चालली आहे ना गाडी (फोटो बाहेर चाललाय)

Paau-1 अजून एक....... Paaus-2 दोन्ही फोटो मोबाईल ने क्लीकले आहेत. (Samsung S-II) टेक्नीकल डिटेल्स ....... माहीत नाही..... ऑटो मोड मध्ये क्लीकले आहेत रस्ता आपला नेहमीचाच..... खोपोली ते पाली याच्यामध्ये कुठेतरी.... २०१३ चे आहेत फोटो.. त्यामुळे आठवत नाही......

पावसाळ्यातला उन - पावसाचा खेळ आणि इंद्रधनुष्य नेहमीच मनमोहक दिसते. mipa

पाऊस Paus सोनी सायबरशॉट डब्ल्यू ५० एफ २.८ १/१०० आयएसओ ८०

.

In reply to by किल्लेदार

बेष्ट फ़ोटो ! पाउस यापेक्षा सुंदर असूच शकत नाही :)

In reply to by किल्लेदार

स्पर्धेसाठी दिला असेल किंवा सहज दिला असेल, फोटो पटला नाही. आंतरजालावर सार्वजनिक संस्थळावर वावरताना असे फोटो देऊ नयेत हे माझे वैयक्तीक मत.

In reply to by मधुरा देशपांडे

मधुरा, मी तुझ्याशी १०० टक्के सहमत आहे. मलाही हा फोटो मि.पा.वर योग्य वाटत नाही.बाकी ज्याची त्याची आवड आणि निवड!!

In reply to by मधुरा देशपांडे

ऑलदो, आय से इट्स अ ग्रेट कॅप्चर, पण तुमचं म्हणणं १००% रास्त आहे.

In reply to by मधुरा देशपांडे

हे चित्र राजा रविवर्मा यांच्या ओलेती सारखा वाटला आणि ते चित्र हे जगभरात मास्टर पीस म्हणून प्रसिद्ध आहे. चित्राचा दुवा

In reply to by कपिलमुनी

ते चित्र एस. जी. ठाकूरसिंग यांचे आहे. औंधच्या संग्रहालयात राजा रविवर्मांच्या चित्रांबरोबरच हेही चित्र आहे. पण ते राजा रविवर्माचे नाही.

In reply to by किल्लेदार

स्पर्धेचा विषय निट समजून फोटो टाकावेत. पावसापेक्षा पावसाळ्याचेच फोटो जास्त वाटतात. वरील फोटोतील प्रेमीयुगलासारखे फोटो मिपावर येवू लागले तर भाद्रपदातलेही फोटो यायला लागतील.

In reply to by ऋतुराज चित्रे

वरील फोटोतील प्रेमीयुगलासारखे फोटो मिपावर येवू लागले तर भाद्रपदातलेही फोटो यायला लागतील.
ह्या वाक्याच्या 'ठ्ठोऽऽ" पोटेंशियलशी सहमत.. पण ह्या फोटोने पावसाचा 'रोमँटीक' किंवा 'प्रणय' मुड बरोबर पकडला आहे असं वाटतं.. ह्या फोटोला 'संस्कारी' विरोध करणारे, 'लहान मुलांचा पावसात बागडण्याचा किंवा कागदी होड्या सोडण्याच्या' फोटोला असाच विरोध करणार का? तो पावसाचा 'निरागस' मुड तसाच हा पावसाचा 'नॉट सो निरागस मुड'..
स्पर्धेचा विषय निट समजून फोटो टाकावेत. पावसापेक्षा पावसाळ्याचेच फोटो जास्त वाटतात.
हे वाक्य ह्या फोटोच्या बाबतीत गैरलागू आहे.. बाकी बर्‍याच फोटोंना मात्र लागू होतंय..

In reply to by चिगो

वरील फोटो विषयाला धरुनच आहे, परंतू बघताना अवघडल्यासारखे वाटते. अशा फोटोंची लाट यायला वेळ लागणार नाही भले मग स्पर्धेचा विषय कोणताही असो. म्हणुन भाद्रपद म्हटले.

In reply to by किल्लेदार

या छायाचित्रावर संमिश्र प्रतिसाद येणे अपेक्षितच होते. सर्वप्रथम मी संपादक मंडळाला विनंती करतो की छायाचित्र आक्षेपार्ह असल्यास प्रथम इथून काढून टाकावे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य असेल. पण थोडा प्रतिवाद नक्कीच करावासा वाटतो. काही मुद्दे इथे मांडणार आहे पण त्याही आधी संपादक मंडळास काय वाटते ते जाणून घ्यायचे आहे.

In reply to by किल्लेदार

सर्वप्रथम या छायाचित्राबद्दल …… कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात न डोकावता घेतलेले हे छायाचित्र आहे. (लोणावळ्यात एका चित्रपटाचे छायाचित्रण चालू असताना इतर पाचशे लोकांसमक्ष घेतलेले आहे) १. "आंतरजालावर सार्वजनिक संस्थळावर वावरताना असे फोटो देऊ नयेत" "मलाही हा फोटो मि.पा.वर योग्य वाटत नाही" …. विषयास अनुसरून वाटला म्हणून मी तो इथे दिला. आणि मुळात मिपाकर प्रगल्भ आहेत म्हणूनच तो इथे डकवतांना मला संकोच वाटला नाही. २. पाऊस म्हणजे फक्त नद्या, डोंगर, ओढे आणि निसर्ग-चित्रच असले पाहिजे का ? पहिल्या पावसात पिसारा फुलवणारा मोर, पावसात नाचणारी मुले, भातखाचरात काम करणारे शेतकरी, आडोश्याला बसलेली पाखरे, कडाडणाऱ्या विजा, अगदी खिडकीत ठेवलेली भज्यांची प्लेट आणि बाहेर कोसळणारा पाऊस असे अनेक विषय आणि मूड्स असूच शकतात. चिगो यांनी म्हटले तसे हा मूड पाऊस विषयाला धरून का वाटत नाही ? ३. पाऊस या विषयाला धरून आपल्याकडे कितीतरी सुरेख शृंगारिक गाणी लिहिली गेलीत, छायाचित्रीत झाली आणि लोकप्रिय पण झालीत. त्यातला पाऊस वगळला तर ही गाणी तेवढी परिणामकारक वाटतील का? या छायाचित्रात हाच एक मूड टिपायचा प्रयत्न केला आहे. तरीही मिपाकर सुज्ञ आहेत. त्यांनीच काय ते ठरवावे. बादवे ……. हा स्पर्धेसाठी नाही.

In reply to by किल्लेदार

स्पष्टीकरणाबाबत धन्यवाद. १. फोटो न पटण्यामागे पहिले कारण होते की जर स्पर्धेसाठी दिला असे गृहित धरलं, म्हणजेच तो तुम्ही काढलाय (आंतरजालावरुन घेतलेला नाही) असे समजुन, तेव्हा आता जी पार्श्वभुमी सांगितली (लोणावळ्यात एका चित्रपटाचे छायाचित्रण चालू असताना इतर पाचशे लोकांसमक्ष घेतलेले आहे) ती आधीच दिली असती तर हा एक मुद्दा आला नसता. हे कुणाच्या व्यक्तीगत आयुष्यात न डोकावता घेतले असेल हे वाटत नव्हते, पण आंतरजालावर ज्या प्रमाणात अशा घटना घडु शकतात, त्यामुळे शंका आल्याशिवाय राहात नाही. हे तुम्हाला पर्सनली म्हणत नाहीये. हा किंवा तत्सम फोटो कुणीही टाकला असता तरी हेच वाटले असते. अर्थात तरीही - २ आणि ३. पाऊस म्हणजे फक्त नद्या, डोंगर, ओढे आणि निसर्ग-चित्रच असले पाहिजे का ? पाऊस या विषयाला धरून आपल्याकडे कितीतरी सुरेख शृंगारिक गाणी लिहिली गेलीत, छायाचित्रीत झाली आणि लोकप्रिय पण झालीत. त्यातला पाऊस वगळला तर ही गाणी तेवढी परिणामकारक वाटतील का? असे नक्कीच नाही. पाऊस म्हटला की रोमान्स, प्रणय या बाबी येणारच. आणि त्यावर आक्षेपही नाही. फक्त यातले काही आनंद हे अधिक सार्वजनिक रीत्या सहजगतीने मांडता येतात, तसेच काही हे प्रत्येकाचे खाजगी असु शकतात. हेही अर्थात व्यक्तीसापेक्षा धरुन चालु. पण गाणी कविता लेख यातुन व्यक्त होणे वेगळे आणि या छायाचित्रातुन व्यक्त होणे वेगळे. हे छायाचित्र मला अश्लीलतेकडे झुकणारे वाटले, म्हणुन मी तसे लिहिले. आक्षेप रोमान्सला नव्हता, या छायाचित्रातुन दिसणार्‍या त्या सादरीकरणाला होता आणि म्हणुनच मला मिपावर ते योग्य वाटले नाही. मी फक्त माझे वैयक्तीक मत सांगितले. मिपाकरांची मते वेगळी असु शकतात, त्यामुळे फोटो काढुन टाका असे मी म्हणाले नाही. फक्त पटले नाही हे मत नोंदवले.

भेडसे लेण्यांना जाताना एका पानावर जमलेले पावसाचे दवबिंदू... मोबाईल क्यामेर्‍याने टिपलेले. paus

सगळे फोटू आवडले फक्त तो वरचा बाई आणि मनुष्याचा अस्थानी आहे...........आणि आपण क्लिकवलेलेच द्यायचे आहेत ना?

. एन एच फोर इन रेन स्थळ - वाघजाई उतार -खंडाळा वेळ सकाळी साडे दहा दि. गुरू ३० जुलै २०१५