Skip to main content

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस

लेखक संपादक मंडळ यांनी शुक्रवार, 24/07/2015 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
****************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा ******************************************************** नमस्कार मंडळी! जरा अडखळत सुरुवात झाली, पण आता पाऊस सुरू झाला सगळीकडे. सगळीकडे सृष्टीचे हिरवेगार, शांत रूप बघायला मिळते आहे. मागची स्पर्धा जरा कठीण होती असा विचार बहुसंख्येने ऐकायला मिळाला. यावेळच्या स्पर्धेचा विषय आम्ही कोण ठरवणारे? आपोआपच ठरला तो! सर्वांना सारखंच भिजवणारा पाऊस!
ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा -शांताबाई शेळके -
या पावसाचा उत्सव आपापल्या चित्र प्रतिमांमधून इथे साजरा करू यात तर! आधीच्या स्पर्धेच्या धाग्यावर तुम्ही मंडळींनी सुचवलेल्या विषयांची नोंद पुढच्या स्पर्धांसाठी घेतली आहेच. मात्र यावेळी पावसाशिवाय दुसरे काहीच सुचत नाहीये! स्पर्धेसाठी आपापली छायाचित्रे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंत इथे सादर करा. या स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणेच. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि वाचकांना धन्यवाद!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 79400
प्रतिक्रिया 171

प्रतिक्रिया

खराखुरा पाउस गायब झालाय पण चित्रांनाही दुष्काळ आलाय कि काय....अवघड दिसतेय यावर्षी.

paus पावसाचा थेम्ब माझ्याकडे बघतोय... निकोन डि५२०० लेन्स nikon 50mm 1.8g

2015-06-11_01-43-09 . . . 2015-06-11_01-46-09

In reply to by अभिदेश

अप्रतिम ! या बरोबर जरा कॅमेर्‍याचे डिटेल्स, सेटींग्जही द्या ना.

In reply to by अभिदेश

फोटो अतिशय सुंदर!नेमका कुठे काढला आहे? निसर्गातील रंगसंगती डोळ्यांना रौद्र तरिही आल्हददायक वाटत आहे.

paus

In reply to by कपिलमुनी

OMG.. क्या बात है, मुनीवर.. अत्यंत अत्यंत सुंदर फोटो.. जबराट..

In reply to by कपिलमुनी

अशक्य सुंदर फोटो. हे असे मस्त फोटो बघितल्यावर maze फ़ोटो takane मी कैन्सल केले. maza पहिल मत यालाच.

In reply to by कपिलमुनी

फोटो काढल्यावर त्या ढगानी तुम्हाला गाठलं काय?

In reply to by कपिलमुनी

वा!

In reply to by कपिलमुनी

निव्वळ अप्रतिम!!

In reply to by कपिलमुनी

अगदी झक्कास फोटो

In reply to by कपिलमुनी

झाडे झाली निळी निळी, करांगुळी गोवर्धन धुंद आकाशच झाले, मंद अस्मानी पर्जन्य ... शांताचिया वृष्टीमध्ये, अशी अद्भुताची सृष्टी का या लावण्यात मीही, असा सुखानेही कष्टी? - बोरकर

In reply to by कपिलमुनी

एक नंबर..

सुंदर आहे

वरचे एकापेक्षा एका सुरेख फोटो पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. या वर्षी ज्ञानेश्र्वर महाराजांच्या पालखी बरोबर चालताना काढलेला एका फोटो स्पर्धे साठी देत आहे. चालता चालता दिघी च्या जवळपास अचानक जोरदार पाउस पडायला लागला. या जोरदार पावसा पासून बचाव करण्यासाठी फिनोलेक्स कंपनीने वारकर्यांना हे दिले होते Paus2 प्लास्टिक च्या कापडाचा आधार घेत पावसापासुन बचाव करणार्या काही वारकारी भगिनी. Paus पैजारबुवा

paus2 (हा स्पर्धेसाठी नाही )

1

In reply to by ajaypadwal

लिंक अ‍ॅड्रेस देताना थंबनेलचा देऊ नये (याने चित्र दिसत नाही)... थंबनेलवर डबलक्लिक / क्लिक करून दिसणार्‍या मूळ चित्राचा द्यावा.

पावसाळ्यात हमखास उगवणारे

In reply to by ajaypadwal

लिंक अ‍ॅड्रेस देताना थंबनेलचा देऊ नये (याने चित्र दिसत नाही)... थंबनेलवर डबलक्लिक / क्लिक करून दिसणार्‍या मूळ चित्राचा द्यावा.

उल्हास व्हॅली, लोनावळा इथे वाढला वसंत, दंवे ओलावली माती सुखकर थांब ऐकु दे समीरा गीत हिरवाईचे निवांत क्षणभर थांब जरा बोल हळु ऐक डुलत्या पालवीचे शब्दसुर बघ निशःब्द रानवेली अलवार करीती नाजुक कुरकुर ओज कसे वृक्षगर्भी ओल्या पानांची किंचीत थरथर झाडांमधुनी नागमोडी वाट जशी कुणी नार अटकर हे रान हिरवे लाजले कोवळी जणु नववधु नवथर इथे ओलावला वसंत पालवी गाते हिरवाई निरंतर सभोवार सौंदर्य फाकले क्षणात मिटले स्वर्गाचे अंतर विशाल... U

In reply to by अमृत

आक्षेप कसला आलाय त्यात? तुम्ही विचारताय हा तुमचा सच्चेपणा झाला. न विचारता वापरला असतात तरी कोणी काहीच करु शकलं नसतं. सो गो अहेड !

In reply to by विशाल कुलकर्णी

कविता आणि फोटो यातलं जास्त छान काय ते ठरवता येइना विशालदा