✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिसळ < आणि > पाव : शतशब्दकथा स्पर्धा

आ
आदूबाळ यांनी
Mon, 07/27/2015 - 14:29  ·  लेख
लेख
जवळजवळ दोन वर्षांपूर्वी आतिवास यांनी एक नवाच वाङ्मयप्रकार मिपावर आणला. (शीर्षक सोडून) शंभर शब्दांत कथा. मिपाकरांना हा प्रकार बेहद्द आवडला. इतकंच कशाला, "शतशब्दकथा" हे नावदेखील मिपाकर चिगो यांनी दिलेलं आहे. त्यानंतर अनेक मिपाकरांनी उत्तमोत्तम शतशब्दकथा लिहिल्या, लिहीत आहेत. मिपाकरांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करत आहोत शतशब्दकथा स्पर्धा - पण खास मिसळपाव पद्धतीने - खमंग तर्री मारून! या स्पर्धेच्या दोन फेर्‍या असणार आहेत. आणि त्यात परीक्षकांबरोबर वाचकांचाही सहभाग असणार आहे!
पहिली फेरी:
- ता० १ ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१५ या कालावधीत स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या मिपाकरांनी शतशब्दकथा लिहून स्वतःच प्रसिद्ध करायची आहे. - जर कथा आवडली असेल तर वाचक कथेला आपलं मत देऊ शकतात. वाचकांनी आपलं मत "+१" असं लिहून आपल्या प्रतिक्रियेमध्ये नोंदवायचं आहे. (प्रत्येक प्रतिसादकाचं एकच मत ग्राह्य धरलं जाईल.) - ता० १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट मध्ये वाचकांच्या मतांची बेरीज घेतली जाईल आणि सर्वाधिक मतं प्राप्त करणार्‍या तीन शतशब्दकथा अंतिम फेरीत जातील. - ता० १६ ते २० ऑगस्ट या दरम्यान परीक्षकही तीन इतर कथांची निवड अंतिम फेरीसाठी करतील.
अंतिम फेरी:
- अशा प्रकारे अंतिम फेरीत सहा लेखक आणि त्यांच्या सहा शतशब्दकथा दाखल होतील - ता० २१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट मध्ये या सहा लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) शतशब्दकथेच्या स्वरूपातच लिहायचा आहे! - वाचक पहिल्या फेरीप्रमाणेच आपलं मत प्रतिसादात "+१" लिहून नोंदवू शकतात. - ता० ३१ ऑगस्ट नंतर परीक्षक त्यांचं गुणांकन देतील. - वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या गुणांकनाला समान महत्त्व देऊन तीन विजेते घोषित करण्यात येतील. विजेत्या स्पर्धकांना मिपातर्फे पारितोषिकस्वरूपात पुस्तकं आणि मानपत्र देण्यात येईल. सूचना: प्रत्येकी एकच कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. एकापेक्षा अधिक कथा प्रकाशित केल्यास पहिली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. - स्पर्धेचा हेतू मिपावर नवे साहित्य येणे हा आहे. त्यामुळे पूर्वप्रकाशित शतशब्दकथा (म्हणजे ता० १ ऑगस्ट २०१५ आधी कुठेही प्रकाशित झालेली कथा) स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. - पहिल्या फेरीत कथेचं सीक्वल प्रकाशित करू नये. फक्त सहा लेखकांना/कथांना स्पर्धेसाठी सीक्वल लिहायची संधी मिळेल. - काही प्रश्न असल्यास कृ० साहित्य संपादक मंडळाशी संपर्क साधावा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
21387 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

मस्त कल्पना आहे !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/27/2015 - 14:38 नवीन
मस्त कल्पना आहे ! सर्व इच्छुक स्पर्धकांना शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

वाचकांसाठि ही तर पर्वणीच कि

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 07/27/2015 - 14:43 नवीन
मस्त उपक्रम नवनव्या कथा वाचायला मिळतील पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

सीक्वल!

प्रसाद गोडबोले
Mon, 07/27/2015 - 14:55 नवीन
आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) लिहायचा आहे!
हायला ! ही कल्पना भन्नाटच आहे !! अभिनंदन आणि शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

आतिवास
Mon, 07/27/2015 - 15:01 नवीन
नव्या कथा वाचण्यास उत्सुक आहे. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मस्तच कल्पना . +1

अद्द्या
Mon, 07/27/2015 - 15:03 नवीन
मस्तच कल्पना . +1
  • Log in or register to post comments

+१ :)

टवाळ कार्टा
Mon, 07/27/2015 - 15:06 नवीन
+१ :)
  • Log in or register to post comments

क्या बात है !

अरुण मनोहर
Mon, 07/27/2015 - 15:07 नवीन
क्या बात है ! सर्वाना शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!)

तुषार काळभोर
Mon, 07/27/2015 - 15:12 नवीन
आयला शशक मध्ये जसा एण्डला ट्विस्ट देतात, तसा तुम्ही दिला की!! (हिंट : पहिल्या फेरीत कथा अशी लिहावी की पुढे काय होईल हे कळून घेण्यासाठी लोकांनी तिला मते देऊन अंतिम फेरीत पोहचवावी)
  • Log in or register to post comments

@शशक मध्ये जसा एण्डला ट्विस्ट

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/27/2015 - 15:42 नवीन
@शशक मध्ये जसा एण्डला ट्विस्ट देतात, तसा तुम्ही दिला की!! >> +++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

कटप्पा ने बाहुबली को.... ;)

शब्दबम्बाळ
Wed, 07/29/2015 - 10:35 नवीन
कटप्पा ने बाहुबली को.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

सर्व स्पर्धकांना शुभेच्छा.

पद्मावति
Mon, 07/27/2015 - 16:12 नवीन
या स्पर्धेच्या निमित्ताने खूप छान शतशब्द कथा वाचायला मिळतील. अतिवास यांचे हा एक अनोखा साहित्य प्रकार मिपा वर आणला या बदद्ल त्यांचे आभार.
  • Log in or register to post comments

आपण नै रे भौ.

पगला गजोधर
Mon, 07/27/2015 - 16:15 नवीन
(चखना बिन पेग, कंपू बिन प.ग.)
  • Log in or register to post comments

खुद को कर बुलंद इतना...

एस
Tue, 07/28/2015 - 00:06 नवीन
खुद को कर बुलंद इतना... मिपाकर चांगल्या लेखनाचे कंपूबिंपू न बघता स्वागत करतात. तेव्हा बिनधास्त लिहिणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

चांगल्या लेखनाला मिपावर

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/01/2015 - 13:49 नवीन

चांगल्या लेखनाला मिपावर कंपूच्या कुबड्यांची गरज पडत नाही !

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

मस्त. मी तर प्रिक्वल पण देऊ

सदस्यनाम
Mon, 07/27/2015 - 16:29 नवीन
मस्त. मी तर प्रिक्वल पण देऊ म्हणतो. अब आयेगा मजा.
  • Log in or register to post comments

बक्षीस म्हणून 'मिसळ -पाव ' कूपन पण दया

सामान्यनागरिक
Mon, 07/27/2015 - 16:45 नवीन
विजेत्यांना आपापल्या शहरात मिसळ पाव ची दोन चार कुपन्स द्यायला पाहिजे .
  • Log in or register to post comments

नै पण परीक्षक कोण आहे ते

रातराणी
Mon, 07/27/2015 - 19:52 नवीन
नै पण परीक्षक कोण आहे ते सांगितलच नाही : )
  • Log in or register to post comments

माझी जुनी कथा...

योगी९००
Mon, 07/27/2015 - 21:12 नवीन
माझी आधी प्रकाशित झालेली कथा देऊ शकतो का स्पर्धेत...?
  • Log in or register to post comments

क्षमस्व!

आदूबाळ
Mon, 07/27/2015 - 21:28 नवीन
क्षमस्व!
स्पर्धेचा हेतू मिपावर नवे साहित्य येणे हा आहे. त्यामुळे पूर्वप्रकाशित शतशब्दकथा (म्हणजे ता० १ ऑगस्ट २०१५ आधी कुठेही प्रकाशित झालेली कथा) स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.
अर्थात नवीन कथा लिहू शकताच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

वा ! स्तुत्य उपक्रम .

उगा काहितरीच
Mon, 07/27/2015 - 21:22 नवीन
वा ! स्तुत्य उपक्रम .
  • Log in or register to post comments

आयडी नावामुळे आवडल्याचा

नाव आडनाव
Tue, 07/28/2015 - 11:36 नवीन
आयडी नावामुळे आवडल्याचा प्रतिसाद भारी वाटतो - वा ! स्तुत्य उपक्रम . - उगा काहितरीच - वा ! स्तुत्य उपक्रम . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

+१ छान उपक्रम

ओसु
Tue, 07/28/2015 - 00:18 नवीन
मस्तच कल्पना आहे. संभाव्य स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

झक्कास कल्पना..

चिगो
Tue, 07/28/2015 - 05:33 नवीन
भन्नाट आयडीया.. खास करुन 'सीक्वल'ची. एक कथा आहे मेंदूत, ती टाकावी म्हणतो. अर्थात नामकरण केल्यानंतर दोनेक वर्षांनी आणि तीपण मिपावर शतशब्दकथांचा पुर आलेला असतांना, ती कितपत टिकाव ढरेल, ह्याबद्दल शंकाच आहे..
  • Log in or register to post comments

ह्यानिमित्ताने..

चिगो
Tue, 07/28/2015 - 05:38 नवीन
ह्यानिमित्ताने आतिवासतैंची मिपावरची पहिली (पैला नंबर) शतशब्दकथा इथे डकवतोय..
  • Log in or register to post comments

सिक्वेल..?

योगी९००
Tue, 07/28/2015 - 06:23 नवीन
सिक्वेल हा प्र॑कार पटला नाही..! शशक म्हणजे शंभर शब्दात संपणारी कथा...तेथे सिक्वेलला स्कोपच नसला पाहिजे. त्याऐवजी पुढच्या फेरीत नवीन शशक मागवावी.
  • Log in or register to post comments

थोडासा असहमत..

चिगो
Tue, 07/28/2015 - 07:02 नवीन
थोडासा असहमत..
शशक म्हणजे शंभर शब्दात संपणारी कथा...तेथे सिक्वेलला स्कोपच नसला पाहिजे.
हे मान्य असलं तरी अशी शतशब्दकथा लिहीणं, जी स्वतंत्रपण असावी, आणि गरज पडल्यास जिच्यातून आणखी एक शशक फुलवता यावी, हेच चॅलेंज आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

उत्तम कल्पना

नंदन
Tue, 07/28/2015 - 12:21 नवीन
शशकवाचनोत्सुक!
  • Log in or register to post comments

काही प्रश्न

तुडतुडी
Tue, 07/28/2015 - 17:32 नवीन
काही प्रश्न १. विजेत्याला मिळणारी पुस्तकं हि त्याच्या आवडीची असतील कि संपादकांच्या ? २. "आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) लिहायचा आहे!" हा काय प्रकार आहे ? शतशब्दकथा म्हणजे ती १०० शब्दांत लिहून पूर्ण व्हायला हवी ना . ३. "वाचकांना समजेल अशी " असा निकष आहे का ? कारण सध्या प्रकाशित होणार्या काही शतशब्दकथा आमच्या डोक्यावरून जाणार्या आहेत
  • Log in or register to post comments

१. विजेत्याला मिळणारी पुस्तकं

आदूबाळ
Tue, 07/28/2015 - 17:58 नवीन
१. विजेत्याला मिळणारी पुस्तकं हि त्याच्या आवडीची असतील कि संपादकांच्या ?
बजेट ठरलेलं असेल. विजेते बजेटमध्ये बसणारी आपल्या आवडीची पुस्तकं सुचवू शकतात.
२. "आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) लिहायचा आहे!" हा काय प्रकार आहे ? शतशब्दकथा म्हणजे ती १०० शब्दांत लिहून पूर्ण व्हायला हवी ना .
हेच तर आव्हान आहे. पहिल्या फेरीतली कथा १०० शब्दांत स्वयंपूर्ण तर असायला हवीच, पण त्या कथावस्तूत सीक्वल आणण्याएवढा जीव पाहिजे. तो सीक्वलही १०० शब्दांत बसवता आला पाहिजे.
३. "वाचकांना समजेल अशी " असा निकष आहे का ? कारण सध्या प्रकाशित होणार्या काही शतशब्दकथा आमच्या डोक्यावरून जाणार्या आहेत
वाचकांच्या मतांना ५०% महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हीच ठरवा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

सिक्वलची आयडिया लय आवडलेली

पिलीयन रायडर
Tue, 07/28/2015 - 19:34 नवीन
सिक्वलची आयडिया लय आवडलेली आहे.. थोडक्यात मुद्द्याचं बोलणं तसंही जमत नसल्याने वाचकाची भुमिका आनंदाने निभावण्यात येईल!
  • Log in or register to post comments

सर्वं स्पर्धकांना शुभेच्छा!

मनीषा
Tue, 07/28/2015 - 21:57 नवीन
सर्वं स्पर्धकांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

भन्नाट !!

मितान
Tue, 07/28/2015 - 23:16 नवीन
वाचनोत्सुक !!
  • Log in or register to post comments

श्शक्ला

नाखु
Wed, 07/29/2015 - 10:10 नवीन
आणि स्पर्धेलाही शत्शत शुभेच्छा !!! छटाक नाखु
  • Log in or register to post comments

नव्या उपक्रमाबद्दल अभिनंदन

शब्दबम्बाळ
Wed, 07/29/2015 - 10:40 नवीन
नव्या उपक्रमाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

नमस्कार! आजपासून शतशब्दकथा

आदूबाळ
Sat, 08/01/2015 - 08:42 नवीन
नमस्कार! आजपासून शतशब्दकथा स्पर्धेला प्रारंभ होत आहे.
  • Log in or register to post comments

आज लिहितो एक (बिरुटे सर लक्ष

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 08/01/2015 - 09:31 नवीन
आज लिहितो एक (बिरुटे सर लक्ष असु द्या :). )
  • Log in or register to post comments

हाहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/04/2015 - 20:36 नवीन
शुभेच्छा. :) -दिलीप्ल बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

काही प्रश्न आहेत.

अरुण मनोहर
Sat, 08/01/2015 - 10:59 नवीन
नमस्कार. शतशब्दकथा स्पर्धा सुरू केल्यासाठी अभिनंदन ! १) स्पर्धे साठी एन्ट्री "जनातलं. मनातल" मध्येच टाकायची कां? २) कथेसाठी मत देण्याला नेहमीचा प्रतिसादाचच मार्ग आहे की, व्य.नी. वगैरे? ३) पहिल्या सहाच्या निवडीचे निकष काय आहेत? 4) (जर पहिल्या सहात आली), तर सिक्वेल शंभर शब्दातच हवा, की एका वाक्यात, वगैरे अशा काही अटी आहेत का?
  • Log in or register to post comments

१) स्पर्धे साठी एन्ट्री

आदूबाळ
Mon, 08/03/2015 - 16:07 नवीन
१) स्पर्धे साठी एन्ट्री "जनातलं. मनातल" मध्येच टाकायची कां?
हो
२) कथेसाठी मत देण्याला नेहमीचा प्रतिसादाचच मार्ग आहे की, व्य.नी. वगैरे?
मत देण्यासाठी प्रतिसादात शक्यतो +१ लिहावे. छान, आवडले वगैरे लिहिलेली मतंही ग्राह्य धरली जातील, पण तरीही शक्यतोवर +१ लिहायची शिस्त पाळावी असे सुचवतो. ( - आदूगोपाल बजाज)
३) पहिल्या सहाच्या निवडीचे निकष काय आहेत?
पहिली फेरी: पहिल्या तीन कथा मतांच्या बेरजेवर ठरतील. उर्वरित कथांमधून परीक्षक तीन कथा निवडतील. अंतिम फेरी: वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या निवडीला समान महत्त्व देऊन तीन विजेते निवडण्यात येतील.
4) (जर पहिल्या सहात आली), तर सिक्वेल शंभर शब्दातच हवा, की एका वाक्यात, वगैरे अशा काही अटी आहेत का?
हो. सीक्वेल शंभर शब्दांतच हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

चला...कामाला लागले पाहिजे...

माम्लेदारचा पन्खा
Sat, 08/01/2015 - 12:04 नवीन
शतशब्द २०- २० सुरू होतेय .......मात्र गोष्टींची जातकुळी ललित लेखासारखी नजाकतदार असणार ह्यात शंका नाही.... सगळ्या लेखकुंना शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

कुठली कथा स्पर्धेसाठी आहे

तुडतुडी
Sat, 08/01/2015 - 14:28 नवीन
कुठली कथा स्पर्धेसाठी आहे कुठली नाही हे कसं कळणार ? कि १ ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१५ या कालावधीत लि प्रत्येक कथा स्पर्धेसाठी ग्राह्य असतील ?
  • Log in or register to post comments

या कालावधीतली प्रत्येक कथा

आदूबाळ
Mon, 08/03/2015 - 16:08 नवीन
या कालावधीतली प्रत्येक कथा "बाय डिफॉल्ट" स्पर्धेत ग्राह्य धरली जाईल. लेखकाला कथा स्पर्धेत द्यायची नसेल तर तसे साहित्य संपादक मंडळापैकी कोणाला तरी कळवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

शुभेच्छा !!

खेडूत
Mon, 08/03/2015 - 16:12 नवीन
शुभेच्छा !! आणि शुद्धलेखन - ह्रस्वदीर्घ , विरामचिन्हे - साचा असे सगळे चारदा तपासून मगच प्रकाशित करावे असे सुचवतो!
  • Log in or register to post comments

अनुमोदन

पाटीलअमित
Fri, 08/07/2015 - 21:36 नवीन
अनुमोदन आणि ज्यांना शुद्ध लेखन हा मुद्दा गौण वाटतो त्यांनी सोडल्य दह्यात मिश्या जे मोकलाया दाहि दिश्या चे विडंबन आहे नक्की बघावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

एक सुचना....

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 08/03/2015 - 16:42 नवीन
स्पर्धे साठी आलेल्या शाताशब्द कथा एकाच ठिकाणी दिसतील अशी व्यवस्था करता येइल का? त्यामुळे कथा शोधून शोधून वाचाव्या लागणार नाहीत आणि मत द्यायला पण सोपे पडेल. पैजारबुवा
  • Log in or register to post comments

हेच लिहायला आले होते.

पिलीयन रायडर
Mon, 08/03/2015 - 22:45 नवीन
हेच लिहायला आले होते. सगळ्या शतशब्दकथा एकत्र दिसतील असे करावे. तसंही आजकाल शशक इतक्या येत असतात की त्याचा कायमचा वेगळा टॅब असला तरी हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अगदी !!

नीलमोहर
Tue, 08/04/2015 - 10:09 नवीन
खरंच स्पर्धेसाठी आलेल्या शतशब्द कथा एकाच ठिकाणी दिसतील अशी व्यवस्था करावी. एक शंका होती, प्रत्येक सदस्याला एकाच कथेला मत देता येईल की कितीही कथांना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

कितीही कथांना मत देता येईल.

आदूबाळ
Tue, 08/04/2015 - 10:54 नवीन
कितीही कथांना मत देता येईल. पण एका कथेवरचं एकच मत ग्राह्य धरलं जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

खुपच अभिनव प्रयोग !

गौरी लेले
Mon, 08/03/2015 - 17:19 नवीन
खुपच अभिनव प्रयोग ! मराठी साहित्य क्षेत्रातील ह्या अभिनव प्रयोगाला शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

कथेचा विषय..

निमिष सोनार
Mon, 08/03/2015 - 17:28 नवीन
..कोणताही चालेल का?की त्याबद्दल काही मर्यादा आहेत?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा