Skip to main content

महाराष्ट्रात दारुबंदी ?

शुक्रवार, 24/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.dnaindia.com/india/report-after-beef-maharashtra-government-… या बातमीचा आशय खरा मानला, तर सरकार संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच संपूर्ण दारुबंदी लागू करण्याच्या विचारात आहे. मला वाटते असा कोणताही निर्णय घेणे अतिशय धोकादायक ठरू शकते. याची कारणे खालीलप्रमाणे - १. जर कायदेशीर दारुबंदी झाली, तर बेकायदेशीर दारुधंद्याला बरकत येईल, व भ्रष्टाचार वाढीस लागेल. कारण अट्टल बेवडे आणि विरंगुळा म्हणून पिणारे आपली तहान कुठेतरी कशीतरी भागवणारच. २. दारूतून मिळणारा प्रचंड महसूल बुडेल, त्यामुळे सरकारी व प्रशासकीय खर्च चालवण्यास पैसे अपुरे पडू शकतात. याचे कारण अनधिकॄत आकडेवारी नुसार सरकारच्या एकूण उत्पन्नापैकी ४०% उत्पन्न दारू व तंबाखूजन्य पदार्थान्च्या वरिल करांमधून येत असते. साहजिकच विकासकामाना निधीअभावी खीळ बसेल. ३.महाराष्त्ट्रात येणार्या पर्यटकांच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊन पर्यटन व्यवसायाला फटका बसेल. ४.राजकीय दॄष्ट्या भाजप ला हा निर्णय धोकादायक ठरेल कारण दारूबंदी केल्यास पुढील निवडणुकीत त्याचा फटका भाजपला बसू शकतो. आपली मते अपेक्षित.

वाचने 6194
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

धोकादायक आहे का नाही ते माहीती नाही, पण असला विचार सुद्धा करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. त्या ३ जिल्ह्यातली दारुबंदी ताबडतोब उठवण्याची गरज आहे.

नितीश कुमारांनी परत निवडून आल्यास बिहारमध्येही दारूबंदी करायचे आश्वासन दिले आहे म्हणे. आणि गेली १० वर्षे सत्तेत असूनही त्यावेळी का दारूबंदी केली नाही याचे उत्तर अर्थातच ते देणार नाहीत. असो. असल्या गोष्टी कधी यशस्वी होत नसतात. त्यांना फाट्यावर मारावे.

पक्षाला निधी मिळायचा मार्ग मोकळा झाला. समस्त लिकर लॉबी हॉटेल बार वाले आता आपली धनशक्ती पणाला लावणार. नुसती हूल उडवून द्यायची आणि मग गंमत पहायची हा राजकारणातील जुना खेळ झाला.

हे सरकार बंदी घालण्यात आघाडीवर आहे. बंदीचा अर्थ स्पष्ट असतो... हप्ता गोळा करणे. साईबाबा बंदी गोमांसबंदी गोहत्याबंदी शिकवणीबंदी दारुबंदी

निषेध ! आर्य सनातन वैदिक धर्माचा प्रतिनिधी म्हणुन मी ह्या असल्या आतातायी दारुबंदीचा आणि त्या योगे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा घालणार्‍यांचा निषेध करतो ! ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ

खिक्क....शिवसेनेचा सगळ्यात जास्त फायदा होइल असे झाले तर...भाजपा स्वतःच्या पायावर स्वतःच कुर्हाड मारून घेइल

काळजी नसावी.
+ ज्यांना दारू प्यायचीच नाही ते लोक चर्चा करीत बसत नाहीत. + ज्यांना दारू प्यायचीच आहे (त्यांना बंदीचाच काय कशाचाच फरक पडत नाही उदा गुटखा प्रेमी) असे मदीराप्रेमी लोक कसल्याही बंदीची चर्चा न करणे यात धन्यता मानतात. + ज्यांना दारूशिवायही जग आहे, असे शिकलेले लोक कुठलिही मतं (उदा: महाभारतकाळी दारू होती/नव्हती हा दावा) इतरांवर लादून किंवा मांडून नवीन वादाला जन्म घालत नाहीत.
संकल्पना श्रेय का.पा. याचकांची पत्रे.

In reply to by नाखु

नाखु काका, याची एक टेम्प्लेट बनवून कॉपीराइट करुन घ्या. दारु आणि बंदी ऐवजी राजकारण,प्रेम, देव, धर्म, अशा हुकमी विषयांसाठी याचकपत्रे पाठवता येतील. बघा दारु ऐवजी राजकारण हां शब्द व आनुषंगिक बदल करुन!

मा. मुख्यमंत्र्यांनी सरकारचा असं करण्याचा विचार नसल्याचे निवेदन केले आहे. तेव्हा 'नो फिकर' तुमचा खटोला उडन घेनार 'क्विकर'

एकंदरीत मिळणारा महसूल दारूचे वाढते (उपभोग) प्रमाण पाहता दारू बंदी हे कोणत्याही सरकारला परवडणार नाही, व्यसनी माणूस तर बंदी असताना दारू मिळवण्या साठी कोणत्या थराला जाईल याची कल्पना न केलेलीच बरी

In reply to by शंतनु _०३१

व्यसनी माणूस तर बंदी असताना दारू मिळवण्या साठी कोणत्या थराला जाईल तसलं काही होणार नाही कारण "दारू बंदी होऊ नये म्हणून सरकार आधीच कोणत्याही थराला जाईल" :)