ओली शेवाळलेली
दगडी जन्मठेप
कदंबकाठावर कोण
उसळून घेई झेप
चोरटा एक कटाक्ष
मध्यान्ही काळोखात
पेंगले निवांत नेत्र
मायाळू मंद सूरात
गारढोण श्वासस्पर्श
युगे धरला अबोला
अजागळ अजस्र देह
आतून अथांग ओला
स्पर्शून गंगामाई
घाबरे परत फिरे
दुधाळ स्तनामधुनि
पाझरती नीलहिरे
चुनखड़ी गा त्याचा
अनंत उच्छवास
सालीना मिळतो आहे
लोबानी मुखवास
-------------
.
>>
ओली शेवाळलेली
दगडी जन्मठेप
कदंबकाठावर कोण
उसळून घेई झेप
>> पहिल्या दोन ओळी समाधीचे वर्णन करताहेत हे स्पष्ट आहेच. समाधी असलेल्या बेटांवर कदंबाची झाडे आहेत आणि बगळे म्हणा हवे तर, माशांचा घास घ्यायला तिथून पाण्यात झेपावत आहेत.
>>>
चोरटा एक कटाक्ष
मध्यान्ही काळोखात
पेंगले निवांत नेत्र
मायाळू मंद सूरात
>>> समाधीची इमारत अंधारी आहे. मध्यान्ही मात्र झरोक्यातून सूर्याचे एक किरण थेट समाधीच्या दगडावर पडते आहे. तिसरी आणि चौथी ओळ लिहताना खरे तर डोक्यात झरोक्यातल्या घरट्यात पेंगलेले कबुतराचे पिल्लू आणि त्याची आई मंद गुटर्गू करत आहे. हे पेंगलेले नेत्र समाधीस्त असलेल्या माणसालाही लागू पडते.
>>
गारढोण श्वासस्पर्श
युगे धरला अबोला
अजागळ अजस्र देह
आतून अथांग ओला
>>>> इमारतीशेजारी विस्तीर्ण वटवृक्ष आहे. त्याची पाळेमुळे, पारंब्या भेगांवाटे समाधीपर्यंत पोचली आहेत. तो दगडी स्पर्श गारढोण असणारच. हा गारवा मृत्युचाही निदर्शक आहे. भूतांचा प्रेतांचा श्वासोच्छवास गार असतो असे मानले जाते. आपला उबदार असतो. युगायुगांचा अबोला हा नि:स्तब्ध वटवृक्षाचा, तसाच युगानुयुगे अंतराळात भटकत रहाणार्या विदेही आत्म्यांचा. वटवृक्षाची मुळे बेटापलीकडे असलेल्या जलराशीत आणि पाताळातल्या जलस्रोतांपर्यंत पोचली आहेत. तशीच बेटाला वेढून असलेल्या नदीसुद्धा वटवृक्ष आणि त्याच्या मुळांप्रमाणे अजस्त्र, अजागळ अन ओली.
>>
स्पर्शून गंगामाई
घाबरे परत फिरे
दुधाळ स्तनामधुनि
पाझरती नीलहिरे
>>
पूर आला की नदीचे पाणी समाधीपर्यंत पोचते. समाधीला स्पर्श झाला की ओहोटीला लागते अशी कल्पना आहे.
एखादी इमारत फार जुनी झाली की छताला ओल लागतो आणि तिथून टपकणार्या पाण्यातून चुन्याचे लहान लहान कॉलम बनतात. लवणस्तंभच पण पिटुकले. तुम्ही दगडी आणि चुन्याचे बांधकाम असलेल्या कुठल्याही जुन्या इमारतीत ते पाहू शकता. त्याला दुधाळ स्तनाची उपमा दिली आहे. पावसाळ्यात तिथून गळणारे पाण्याचे थेंब हे नीलहिरे.
>>>
चुनखड़ी गा त्याचा
अनंत उच्छवास
सालीना मिळतो आहे
लोबानी मुखवास
>>>
अंधार्या, दगड-चुन्याचा त्या इमारतीमध्ये एक कोंदट चुनखडी वास भरलेला आहे. त्यासाठी समाधी अनंत काळापासून चुनखडी उच्छवास सोडते आहे अशी कल्पना केली आहे. वर्षातून एकदा, पुण्यतिथि वा स्मृतिदिनी समाधीला धूप, लोबान दाखवले जाते. तर त्या चुनखडी उच्छवास असलेल्या समाधीसाठी हे वार्षीक धूपउदबत्ती करणे म्हणजे त्याला मुखवास चारणे आहे.
>>
ओली शेवाळलेली
दगडी जन्मठेप
कदंबकाठावर कोण
उसळून घेई झेप
>> पहिल्या दोन ओळी समाधीचे वर्णन करताहेत हे स्पष्ट आहेच. समाधी असलेल्या बेटांवर कदंबाची झाडे आहेत आणि बगळे म्हणा हवे तर, माशांचा घास घ्यायला तिथून पाण्यात झेपावत आहेत.
>>>
चोरटा एक कटाक्ष
मध्यान्ही काळोखात
पेंगले निवांत नेत्र
मायाळू मंद सूरात
>>> समाधीची इमारत अंधारी आहे. मध्यान्ही मात्र झरोक्यातून सूर्याचे एक किरण थेट समाधीच्या दगडावर पडते आहे. तिसरी आणि चौथी ओळ लिहताना खरे तर डोक्यात झरोक्यातल्या घरट्यात पेंगलेले कबुतराचे पिल्लू आणि त्याची आई मंद गुटर्गू करत आहे. हे पेंगलेले नेत्र समाधीस्त असलेल्या माणसालाही लागू पडते.
>>
गारढोण श्वासस्पर्श
युगे धरला अबोला
अजागळ अजस्र देह
आतून अथांग ओला
>>>> इमारतीशेजारी विस्तीर्ण वटवृक्ष आहे. त्याची पाळेमुळे, पारंब्या भेगांवाटे समाधीपर्यंत पोचली आहेत. तो दगडी स्पर्श गारढोण असणारच. हा गारवा मृत्युचाही निदर्शक आहे. भूतांचा प्रेतांचा श्वासोच्छवास गार असतो असे मानले जाते. आपला उबदार असतो. युगायुगांचा अबोला हा नि:स्तब्ध वटवृक्षाचा, तसाच युगानुयुगे अंतराळात भटकत रहाणार्या विदेही आत्म्यांचा. वटवृक्षाची मुळे बेटापलीकडे असलेल्या जलराशीत आणि पाताळातल्या जलस्रोतांपर्यंत पोचली आहेत. तशीच बेटाला वेढून असलेल्या नदीसुद्धा वटवृक्ष आणि त्याच्या मुळांप्रमाणे अजस्त्र, अजागळ अन ओली.
>>
स्पर्शून गंगामाई
घाबरे परत फिरे
दुधाळ स्तनामधुनि
पाझरती नीलहिरे
>>
पूर आला की नदीचे पाणी समाधीपर्यंत पोचते. समाधीला स्पर्श झाला की ओहोटीला लागते अशी कल्पना आहे.
एखादी इमारत फार जुनी झाली की छताला ओल लागतो आणि तिथून टपकणार्या पाण्यातून चुन्याचे लहान लहान कॉलम बनतात. लवणस्तंभच पण पिटुकले. तुम्ही दगडी आणि चुन्याचे बांधकाम असलेल्या कुठल्याही जुन्या इमारतीत ते पाहू शकता. त्याला दुधाळ स्तनाची उपमा दिली आहे. पावसाळ्यात तिथून गळणारे पाण्याचे थेंब हे नीलहिरे.
>>>
चुनखड़ी गा त्याचा
अनंत उच्छवास
सालीना मिळतो आहे
लोबानी मुखवास
>>>
अंधार्या, दगड-चुन्याचा त्या इमारतीमध्ये एक कोंदट चुनखडी वास भरलेला आहे. त्यासाठी समाधी अनंत काळापासून चुनखडी उच्छवास सोडते आहे अशी कल्पना केली आहे. वर्षातून एकदा, पुण्यतिथि वा स्मृतिदिनी समाधीला धूप, लोबान दाखवले जाते. तर त्या चुनखडी उच्छवास असलेल्या समाधीसाठी हे वार्षीक धूपउदबत्ती करणे म्हणजे त्याला मुखवास चारणे आहे.| लेखनविषय: |
|---|
वाचने
3244
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्थ कळला नाही पण काहीतरी
सेम हिअर
In reply to अर्थ कळला नाही पण काहीतरी by जडभरत
+११११
In reply to सेम हिअर by पथिक
:o
In reply to +११११ by प्राची अश्विनी
धन्यवाद! आता कळली कविता! आशय
In reply to अर्थ कळला नाही पण काहीतरी by जडभरत
सुरेख
स्वामिज्जी... नका हो नका ऐसे
आता तुम्ही म्हणालात तर करणारच
In reply to स्वामिज्जी... नका हो नका ऐसे by अत्रुप्त आत्मा
अरे स्वाम्या!
मघाशी लिंक चुकली.. :(
In reply to समाधीचे वर्णन आहे फक्त! :) by स्वामी संकेतानंद
आता ठीक!
In reply to मघाशी लिंक चुकली.. :( by स्वामी संकेतानंद
स्मष्टीची व्यामिश्रता अत्यंत
मँन राईट पोएम फॉर थाउसंड फेस्ड गॉड ?
:D :D :D
In reply to मँन राईट पोएम फॉर थाउसंड फेस्ड गॉड ? by पगला गजोधर
फक्त पहिलं आणि तिसरं कडवं
सालीना ऐवजी सालाना हवं आहे का
सालीना बरोबर आहे. मराठीत
In reply to सालीना ऐवजी सालाना हवं आहे का by रातराणी
असं आहे होय. सालीना म्हणजे
In reply to सालीना बरोबर आहे. मराठीत by स्वामी संकेतानंद
कविता आवडली
वा!!! सुंदर!!!
मस्त ओ स्वामी.
अतिशय सुंदर.