एवढ्यात राजसिंहासन-क्रिडा* शी संबंधित, दिव्यपटलावर काही दृष्टांत बघत होतो.
(*ह.ब.ओ.उक्त राजसिंहासन प्राप्त्यर्थम्, प्राप्तसिंहासन चीरकाल संरक्षणार्थम्, अंतर्बाह्यरिपू नाशार्थम् पातकक्रिडा. इतिः हिम अग्नी सुगमगीत )
जाणकारांमध्ये विंटरफेलचा सुभेदार, उत्तरदिगरक्षक स्वामी एडार्ड स्टार्कच्या लेकरांसंदर्भात बरेच मतभेद असले तरी एका बाबतीत एकवाक्यता आढळते की जॉन स्नो हा स्टार्क वंशाशी संबंधित होता. राजसिंहासन-क्रिडा* मुळात वास्तवात घडले की नाही ही चर्चा आपण तुर्तास बाजुला ठेउयात. त्याच्या लेकरांबद्दल एकुणात गोंधळच आहे, विशेषतः ब्रान व रीकॉन बद्दल (पण ते पुन्हा कधीतरी ).
एक इंटरेस्टिंग गोष्ट इतक्यात वाचली की जॉन स्नोचा जन्म हा लायेनाच्या (एडार्डची बहिण) पोटचा. असे का ?... यामागची अनेक कारणे त्या लेखात दिली होती. मला त्यात फारसा रस नव्हता पण तो लेख वाचता वाचता राजसिंहासन-क्रिडा* वर एक लेख लिहायचा विचार पक्का केला. नेहमीच्या पात्रांबद्दल अथवा घटनांबद्दल लिहिण्यापेक्षा थोडे अज्ञात असलेले जॉन स्नोचे पात्र डोक्यात होते पण मग नंतर एडार्ड स्टार्कच्या सगळ्याच मुलांवर एक लेख लिहावा असा विचार केला (फोकस तरीही जॉन स्नोवर आहे) :). जॉन लौकिकार्थाने एडार्डचा अनौरस पुत्र, म्हणुन मग ही सगळी स्टार्कची लेकरे :)
जॉन स्वतः राजसिंहासन-क्रिडा*तल्या सर्वात प्रभावी पात्रांपैकी एक. जॉनभवतालचे वलय खरे सांगायचे तर टिरीयन, डीनेरीस, सर्सेइ, स्टानिस अश्या इतर पात्रांमुळे झाकोळुन टाकते. किंवा आपण असे म्हणुयात की टिरीयन, डीनेरीस, सर्सेइ, स्टानिस अशी पात्रे मिळुन राजसिंहासन-क्रिडा*वर राज्य करतात. त्यामुळे इतर पात्रांना उणॅपण येते, असे नाही पण या पात्रांची प्रभा इतर सर्वांना थोडेफार तरी झाकोळुन टाकते. कृष्णकिल्ल्याचा जुना किल्लेदार सेर आलीसरच्या वलयातुन बाहेर पडुन जॉनने स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला दिसतो पण त्यातही शेवटी आपल्याला , 'अरेरे बिचारा कोवळा जीव ६ लोकांनी मिळुन मारला' अशी हळहळच जास्त दिसते. रॉबसुद्धा त्याच्या साहसी मोहिमातील शक्तीमुळे जास्त भाव खाउन जातो. त्यामानाने एका साध्या ४-५ माजली उंचीच्या बुरूजावरून पडल्यामुळे अपंगत्व आलेला ब्रान किंवा त्यासोबतचा रीकॉन मात्र त्या मानाने कमी प्रसिद्धी पावतात.
त्यामुळेच अश्या कमी माहितीतल्या स्टार्कपुत्रांसाठी हा लेख. हिम अग्नी सुगमगीतानुसार एडार्डला ५ औरसमुले:
१.रॉब
२.सांन्सा
३.आर्या
४. ब्रान
५. रीकॉन
(६. जॉन स्नो अनौरस पुत्र)
हिम अग्नी सुगमगीतामध्ये जॉन स्नो रॉबपेक्षा काही वर्षांनी मोठा होता असे म्हणतात (हे देखील माझे एक अनुमानच आहे. स्पष्ट उल्लेख बहुधा कुठेही नाहित). त्यामुळे बंडाच्यापूर्वी रेह्गर टारगेरियनने, लायेना स्टार्कचे अपहरण करून, तिला हर्षमनोर्यावर कैदेत ठेवले असताना, तिचा जबरदस्तीने भोग घेऊन, त्याचा एक मुलगा तिच्या पोटाशी आला असावा असा तर्क करुन कदाचित, जॉन स्नो हे पात्र उभे केले असावे किंवा कदाचित कुठल्यातरी कमी ज्ञात आवृत्तीमध्ये त्याचा उल्लेख असावा.
अजुन एका मुलाचा उल्लेख काही दृष्टांतामध्ये येतो. नेमक्या दृष्टांताचे नाव मला आत्ता आठवत नाही पण बहुधा पहिल्या दुसर्या पर्वात रीकॉनचा उल्लेख येतो. हा एडार्डचा सगळ्यात धाकटा मुलगा. युद्धाच्यावेळेस हा खुपच लहान असल्याने याने युद्धात भाग घेतला नव्हता. यापर्वानुसार रीकॉन ब्रानबरोबर प्राणरक्षणार्थ पलायनामध्ये सहभागी होता आणि बर्याच ठिकाणी त्याने शौर्य दाखवले. हिमभिल्लां बरोबर त्यांचे छोटेखानी चकमक झाली त्यात होडॉरबरोबर ब्रानदेखील बेपत्ता झाला. मात्र नंतर पुढीलकाळात त्यांचे काय झाले आणि विंटरफेलचे राज्य त्याला मिळते का सांन्साला का मिळाले याबद्दलचा कुठलाही संदर्भ सापडत नाही.
पुर्वी युद्धाचे काही नियम ठरवले गेले होते. ठराविक अंतराने जवळजवळ सगळ्याच नियमांना तिलांजली दिली गेली. युद्धाच्या अनेक नियमांपैकी एक नियम होता की कुणीही इशारा न देता दुसर्या यौद्ध्याच्या कुटुंबीयांवर हल्ला करु नये, विशेषतः ज्याच्या संरक्षणात इतकी वर्षे आपण लाहानाचे मोठे झालो . या नियमाला थिऑन ग्रेजॉयकडून तिलांजली दिली गेली. त्यामुळे बहुतेक प्रमुख यौद्धांना मारण्यासाठी कुठुनही कसाही हल्ला होउ शकतो हे लक्षात घेउन सगळ्याच प्रमुख यौद्धांचे रक्षण आजुबाजुला राहुन इतर दुय्यम दर्जाचे यौद्धे नंतर करत असत.
एडार्ड व कँटलीनची जेव्हा तुलना होते तेव्हा एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते की एडार्डच्या उपस्थितीत फार कमी कुटुंबियांचे बळी गेले. त्याने जवळजवळ सर्वांना वाचवले. कधी पुढुन विद्रोह करून तरी कधी मागुन राजहस्तपद स्वीकारून. कँटलीन मात्र आपल्या उपस्थितीत आपल्या मुलांना वाचवु नाही शकली किंवा कदाचित तिला तितकीशी संधी नाही मिळाली. तिच्या दोन मुलांवर तर शत्रूने तिच्या उपस्थितीत प्राणघातक हल्ले केले. सर्वप्रथम बळी गेला रॉबचा. त्याला बोल्टनने मारले. त्याच्यापूर्वी ब्रानचा देखील बळी जायचा मात्र ऐनवेळी पाळलेल्या कोल्ह्याने हल्लेखोरापासुन त्याला वाचवले आणी स्वतः हल्लेखोराशी युद्ध सुरु केले. एडार्ड व कँटलीन स्वतः मात्र इतके सुदैवी नव्हते. या दोघांनाही शत्रूने मारले.
जॉन स्नोच्या मरणोत्तर संदर्भात बराच सावळागोंधळ आहे. एकतर त्याच्याच सहकार्यांनी पाठीत वार केले असे एकेठिकाणी दृष्टांतात दाखवतात, तर दुसरीकडे हेच म्हणतात की त्याला अग्निपूजक चेटकीण मेलीसांद्रे पुनर्जीवित करते. कोणी म्हणतो तो श्वेतचलवादी बनतो, नक्की काय कळत नाही. पण तो जिवंत असताना हिमभिल्लीण यीग्रीट (त्याची एकेकाळची प्रेमी), ऐमनऋषी, सँमवेलं टारली ही लोकं म्हणजे जॉनचे कवच होते. जोपर्यंत हे आजूबाजूला होते तोपर्यंत जॉन सुरक्षित राहिला. मात्र एक एक करत त्याचे विश्वासु संरक्षक मृत्यू पावले किंवा दूर गेले. रानटी हिमभिल्लांना, महाभिंती आड येऊ देणे म्हणजे मृत्युला आमंत्रण द्यायचे असे वाटून, रात्रप्रहरी दलातले इतर सर्व कृष्णयौद्धे, मनाने जॉन स्नोपासून दुरावले, त्याच्या अंतिम काही पळांमध्ये तर आजुबाजुच्या विश्वासू लोकांनी वार केले. तिथे सँमवेलं टारली असता तरीही फारसा फरक पडला नसता.
इतर सर्व प्रमुख यौद्ध्यांच्या विश्वासघातासमोर जॉन थोडासा किरकोळीत गेला आहे. परंतु हिम अग्नी सुगमगीताने त्याचे शौर्य वेळोवेळी मान्य देखील केले आहे. एडार्ड स्टार्कचा सर्वात निष्णात शूर पुत्र दगाफटक्याने पडला. सांन्सा व आर्याकडे दुर्लक्ष केल्यास असे म्हणता येइल की ५ व्या पर्वाच्या शेवटी, जॉन स्नोच्या मृत्युसरशी एडार्ड स्टार्कचा वंश पुर्णपणे संपला.
मंगल सिध्यर्थम्, अमंगलता नाशार्थम्, निंदाबूध्दी नाशार्थम्, मिपाआचार्य वचनात .............. कर्म अहं करिष्ये II
सुचना --- मिपासमस्त ब्रम्हवृंदांच्या सेवेस्तव अल्पज्ञानात लिहीलेले आहे.
वाचने
15955
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
सिंहासनलीलेबद्दल आहे काय...
:(... अर्र
In reply to सिंहासनलीलेबद्दल आहे काय... by बॅटमॅन
जॉन स्नो जिवंत झाला हो ……
In reply to सिंहासनलीलेबद्दल आहे काय... by बॅटमॅन
जॉन स्नो इज अ टार्गारिअन.
तसेंच म्हणतोय ….
In reply to जॉन स्नो इज अ टार्गारिअन. by कॅप्टन जॅक स्पॅरो
तसेंच म्हणतोय ….
In reply to जॉन स्नो इज अ टार्गारिअन. by कॅप्टन जॅक स्पॅरो
;)) :)) :)) लोळ....
घरातील स्त्री वंशजांना असे
In reply to ;)) :)) :)) लोळ.... by द-बाहुबली
जॉन 'स्नो' होता.. स्टार्क
In reply to ;)) :)) :)) लोळ.... by द-बाहुबली
जॉन लौकिकार्थाने एडार्डचा अनौरस पुत्र, म्हणुन मग ही सगळी स्टार्क
In reply to जॉन 'स्नो' होता.. स्टार्क by पिशी अबोली
रात्रपहार्यावर
In reply to जॉन 'स्नो' होता.. स्टार्क by पिशी अबोली
दॅट डजन्ट मेक हिम अ स्टार्क.
In reply to रात्रपहार्यावर by द-बाहुबली
अरेरे ...
In reply to दॅट डजन्ट मेक हिम अ स्टार्क. by पिशी अबोली
हाहा .. शेवटच्या एपिसोडात
In reply to अरेरे ... by पगला गजोधर
सान्सा स्टार्क
In reply to ;)) :)) :)) लोळ.... by द-बाहुबली
आर्या स्टार्क
In reply to ;)) :)) :)) लोळ.... by द-बाहुबली
भलतेच रोचक विवेचन.
ईश…
In reply to भलतेच रोचक विवेचन. by द-बाहुबली
वॅलार मॉर्गुलिस!!
वालार डोहैरीस….
In reply to वॅलार मॉर्गुलिस!! by स्वामी संकेतानंद
जर इंटरेष्ट असेल तर
दुवे द्या
In reply to जर इंटरेष्ट असेल तर by अस्वस्थामा
हे घ्या. हे आमचे आवडते
In reply to दुवे द्या by कपिलमुनी
तो शकुनी आहे :)
In reply to हे घ्या. हे आमचे आवडते by अस्वस्थामा
हा हा हा.. अगदी अगदी मामा
In reply to तो शकुनी आहे :) by द-बाहुबली
:)
In reply to हा हा हा.. अगदी अगदी मामा by अस्वस्थामा
द बॉय हु लिव्ड :- माझ्या
In reply to :) by द-बाहुबली
हम्म मग असे म्हणता येइल के
In reply to द बॉय हु लिव्ड :- माझ्या by अस्वस्थामा
बाप से बेटी सवाई अशी नवी म्हण
In reply to हम्म मग असे म्हणता येइल के by द-बाहुबली
थोडे अज्ञात असलेले जॉन स्नोचे
क्रुप्या
In reply to थोडे अज्ञात असलेले जॉन स्नोचे by पिशी अबोली
वोके..
In reply to क्रुप्या by पगला गजोधर
मस्त
अजून कधी बघितली नै त्यामुळे
आज
बहुतेक
In reply to आज by मी-सौरभ
यु नो नथिंग जॉन स्नो :-)
ब्रान चे काय झाले ह्या बद्दल
अहो मेसि विल्यम्सनेच (आर्या)
In reply to ब्रान चे काय झाले ह्या बद्दल by निनाद मुक्काम …
"सांन्सा व आर्याकडे दुर्लक्ष
त्यांची खबरबात नैयेंनं इतके दिवस !!
In reply to "सांन्सा व आर्याकडे दुर्लक्ष by Pain6
तर रिकॉनबाळा.... तात्पर्य काय ???
In reply to "सांन्सा व आर्याकडे दुर्लक्ष by Pain6
बाकी लेख आवडला.
लिहू की त्याला काये …
सान्सा आणि आर्याकडे दुर्लक्ष
ल्लूल्लूल्लूल्लू ;)
In reply to सान्सा आणि आर्याकडे दुर्लक्ष by पिशी अबोली
बरं..
In reply to ल्लूल्लूल्लूल्लू ;) by पगला गजोधर
अगदी सहमत..
In reply to बरं.. by पिशी अबोली
अगदी याचसाठी मला टीव्ही सिरीज
In reply to अगदी सहमत.. by अस्वस्थामा
(कारण तिने स्वतःच्या भावाला
In reply to अगदी याचसाठी मला टीव्ही सिरीज by sagarpdy
पण सामान्य सैनिकाला हे कुठे
In reply to (कारण तिने स्वतःच्या भावाला by अंतु बर्वा
अग्रीड, त्यांच्या नजरेत
In reply to पण सामान्य सैनिकाला हे कुठे by sagarpdy
ओ काकू, शिरेस होऊ नका
In reply to ल्लूल्लूल्लूल्लू ;) by पगला गजोधर
+1
In reply to सान्सा आणि आर्याकडे दुर्लक्ष by पिशी अबोली
सान्सा...लय भारी
In reply to सान्सा आणि आर्याकडे दुर्लक्ष by पिशी अबोली
हिवाळा आलाय... :)
In reply to सान्सा...लय भारी by sagarpdy
अगदी अगदी, बाप निघाली ती
In reply to हिवाळा आलाय... :) by पिशी अबोली
पुढच्या सीजनमध्ये सरसेई मरतीये बहुतेक...
In reply to अगदी अगदी, बाप निघाली ती by स्रुजा
सरसी नक्की शत्रूच्या हातून
In reply to पुढच्या सीजनमध्ये सरसेई मरतीये बहुतेक... by पगला गजोधर
सरसे जेमी किंवा टिरियन च्या
In reply to सरसी नक्की शत्रूच्या हातून by sagarpdy
सर्सी इतक्या लवकर मरेल असं
In reply to सरसे जेमी किंवा टिरियन च्या by स्रुजा
लवकर मरेल...
In reply to सर्सी इतक्या लवकर मरेल असं by पिशी अबोली
?
बेलिश आणी वेरिस
ट्रेलर आले ! नवीन ट्रेलर आले !
लॉर्ड बेलिशला खतम करून टाकणार
In reply to ट्रेलर आले ! नवीन ट्रेलर आले ! by हर्मायनी
हो ... तसेच होवो .