✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राडा

ज
जागु यांनी
गुरुवार, 07/16/2015 - 11:08  ·  लेख
लेख
विषय वाचून जरा वेगळच वाटल असेल ना? बर आता थोड स्पष्टीकरण. आमच्याइथे आठवड्यातून एकदा तरी हा राड्याचा सीन होत असतो. राडा चालतो तो आमच्या परीसरात फिरणार्‍या सापांच्या जातींवर. एखादा साप दिसला की त्यांच्यावर हल्ला चढविण्यासाठी कर्कश्य आवाजात पहिला साळुंखी पक्षी आपल्या कर्कश्य आवाजात पुढाकार घेतात मग बाकीचे सैन्य जमते. ह्यात एक दोन कावळे , दयाळ, खार असे हे टोळके असते. बर्‍याचदा धामण जातीचा साप असतो. हा झाडावर चढून पक्षांनी घातलेली अंडी, पिल्ल वगैरे खायला जातो म्हणून हे सगळे सैन्य त्याला हुसकावण्याच्या प्रयत्नात असतात. ह्यात सगळ्यात धिट असतात ते साळुंखी पक्षी तडक त्या धामणीवर चोचीने वार करतात. मी खाली फोटो देत आहे त्यात धामण काही मला पुर्ण टिपता आली नाही पण त्या नाट्याच्यावेळी ज्या पक्ष्यांच्या, प्राण्यंच्या हालचाली होत्या त्या दाखवण्याचा मी खाली थोडक्यात प्रयत्न करते. नारळाच्या झाडावर चढलेले हे उत्सवमुर्ती. ह्याच फोटोत डाव्या बाजूला साळुंखी पक्षी वार करण्यासाठी आलेली दिसते. १) नंतर धामण झाडाच्या झावळ्यांच्या खोपच्यात लपली तेंव्हा तिला शोधण्याची एकेकाची धडपड आणि चेहर्‍यावरचे हावभाव पहा. २) साळुंखी २) हा दयाळ त्या नारळाच्या झाडाखालच्या तारेवर. ३) खाली तर नाही ना सटकला? ४) कावळा ५) खारू ताईंचे हावभाव पहा. ६) मी खाली पहाते तू वर पहा ७) जाशील कुठे आता तू. हा राड्याच्या प्लान संध्याकाळी चालू होता. बराच वेळ ती धामण बाहेर येण्याची मी टेरेस वरून वाट पहात होते. पण ती काही येत नव्हती. मग मला एका कामानिमित्ताने बाहेर जावे लागले त्यामुळे हे नाट्य कधी संपुष्टात आले ते कळले नाही. पुढच्यावेळी पूर्ण टिपण्याचा प्रयत्न करेन.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4512 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

@६) मी खाली पहाते तू वर पहा>>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/16/2015 - 11:33 नवीन
@६) मी खाली पहाते तू वर पहा>>> ह्ही ह्ही ह्हा ह्हा! फोटूंना दिलेली शीर्षके वाचून तात्काळ फेसबुकवरील क्रांतिताईच्या अश्या पोस्ट्स'ची आठवण आली.
  • Log in or register to post comments

+११११

स्पा
Tue, 07/21/2015 - 15:38 नवीन
अगदी अगदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

वा! हा संघर्ष निसर्गातील

एस
गुरुवार, 07/16/2015 - 11:35 नवीन
वा! हा संघर्ष निसर्गातील टिकून राहण्याच्या (सर्व्हायवल) स्पर्धेत अटळ आहे. तो कॅमेर्‍यात टिपून मिपाकरांच्या भेटीला आणल्याबद्दल धन्यवाद जागुताई!
  • Log in or register to post comments

हा प्रसंग माझ्याही नित्य

अजया
गुरुवार, 07/16/2015 - 11:42 नवीन
हा प्रसंग माझ्याही नित्य पाहाण्यातला.पण तो मला इतका शांततेने घेता येत नाही!फोटो तर दूरच!
  • Log in or register to post comments

सही!

देश
गुरुवार, 07/16/2015 - 11:49 नवीन
मस्त आहेत छायाचित्रे. आज घरी गेल्यावर पिल्लांना दाखवीन देश
  • Log in or register to post comments

हाहा!

पैसा
गुरुवार, 07/16/2015 - 13:02 नवीन
मस्तय! कावळ्याने त्या धामणीला नक्कीच शोधून हुसकले असणार!
  • Log in or register to post comments

छान आलेत फोटो. अन् वर्णनही

उगा काहितरीच
गुरुवार, 07/16/2015 - 18:53 नवीन
छान आलेत फोटो. अन् वर्णनही सुंदर !
  • Log in or register to post comments

जबराट फोटो आलेत.

प्रचेतस
गुरुवार, 07/16/2015 - 19:46 नवीन
जबराट फोटो आलेत.
  • Log in or register to post comments

अरे क्या बात है, मस्तच फटू

बॅटमॅन
गुरुवार, 07/16/2015 - 19:58 नवीन
अरे क्या बात है, मस्तच फटू एकदम! आमच्याकडे माकड विरुद्ध कावळे असा सामना कैक वेळेस पाहिलेला आहे पण क्यामेराबद्ध करावयाचे कै सुचले नै.
  • Log in or register to post comments

वाह ! नेहमीप्रमाणेच अतिशय

स्रुजा
गुरुवार, 07/16/2015 - 20:12 नवीन
वाह ! नेहमीप्रमाणेच अतिशय कल्पक ..
  • Log in or register to post comments

:) सॉलीड आहे राडा

मनीषा
गुरुवार, 07/16/2015 - 21:22 नवीन
:) सॉलीड आहे राडा
  • Log in or register to post comments

फोटो रिपोर्टिंग मस्तच!

क्रेझी
Fri, 07/17/2015 - 12:20 नवीन
फोटो रिपोर्टिंग मस्तच! पुढच्या वेळेस शक्य असल्यास व्हिडीओ करून इथे शेअर करा :)
  • Log in or register to post comments

तूर्तास

नाखु
Fri, 07/17/2015 - 12:29 नवीन
घराचे आवारात धूळ-धामीण रहिवासास आहे आमचा तीला आणि तीचा आम्हाला काहीही उपद्रव नाही तेव्हा दोघांची काही तक्रार नाही. मुलांना मात्र आवाज केल्याशिवाय(पायाने) आणि लाईट लावल्याखेरीज जावू नका मागच्या बागेत असे सांगून ठेवले आहे> फोटो आळ्शी नाखु
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार

जागु
Fri, 07/17/2015 - 15:18 नवीन
सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार. पुढच्यावेळी शुटिंग करायचा प्रयत्न करते.
  • Log in or register to post comments

५) खारू ताईंचे हावभाव मस्तच आहेत

होबासराव
Fri, 07/17/2015 - 19:20 नवीन
.
  • Log in or register to post comments

सुरेख फोटो ...छान टिपलेत अगदि

इशा१२३
Fri, 07/17/2015 - 19:49 नवीन
सुरेख फोटो ...छान टिपलेत अगदि
  • Log in or register to post comments

जागुताई

सविता००१
Fri, 07/17/2015 - 20:40 नवीन
मस्त फोटो आणि नावं पण छान, आधी गंडले मी. पाकृ सोडून तू कलादालनात? पण छानच गं तू खूप मस्त ठिकाणी रहातेस. काय हिरवाई आहे
  • Log in or register to post comments

मस्त राडा घातलाय.

अविनाश पांढरकर
Fri, 07/17/2015 - 23:56 नवीन
मस्त राडा घातलाय.
  • Log in or register to post comments

जीवनमरणाच्या आकांताचा राडा

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 07/18/2015 - 00:07 नवीन
जीवनमरणाच्या आकांताचा राडा छान टिपलाय !
  • Log in or register to post comments

मग काय झालं त्या सापाच ?

तुडतुडी
Tue, 07/21/2015 - 15:12 नवीन
मग काय झालं त्या सापाच ?
  • Log in or register to post comments

मस्तच जागु..

कविता१९७८
Wed, 07/22/2015 - 18:17 नवीन
मस्तच जागु..
  • Log in or register to post comments

मस्त थरार टीपल्या गेला आहे.

निनाद मुक्काम …
गुरुवार, 07/23/2015 - 05:04 नवीन
मस्त थरार टीपल्या गेला आहे. पूर्वी डिस्कवरी वर असा थरार पाहायचो तेव्हा सुरवातीला भक्षकाची हार व भक्ष्याचा जीव वाचणे म्हणजे जिंकणे असा काहीसा बालिश विचार असायचा आता असा थरार मी तटस्थतेने पाहतो , निसर्गाच्या चक्रात प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. आणि जगण्यासाठी धडपड प्रत्येक सजीवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
  • Log in or register to post comments

खूपच गोग्गोड राडा आहे.

जडभरत
गुरुवार, 07/23/2015 - 06:26 नवीन
खूपच गोग्गोड राडा आहे. धन्यवाद तै. छोटीला दाखवायला मस्त आहेत.
  • Log in or register to post comments

राडा आवडला!

जुइ
गुरुवार, 07/23/2015 - 08:32 नवीन
जगण्यासाठीची धडपड उत्तमरीत्या कॅमेर्‍यात पकडली आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा