✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

परीकथेचे सव्वा वर्ष .. (facebook status)

त
तुमचा अभिषेक यांनी
Sun, 07/19/2015 - 12:37  ·  लेख
लेख
साधारण सव्वा वर्षांपूर्वी मी मिपावर माझ्या मुलीच्या (परीच्या) जन्माची कहाणी लिहिली होती. तेव्हा येणार्‍या काळात तिच्या छोट्यामोठ्या आठवणी लिहून काढायच्या असे मनाशी ठरवले होते. पण हल्ली आठवणींची साठवण फोटो आणि विडीओमध्येच सोयीस्कर पडत असल्याने अगदी तसेच काही झाले नाही. पण फेसबूक स्टेटसच्या निमित्ताने मात्र काही आठवणी कागदावर उतरल्या. काल सहज त्या पहिल्यापासून वाचतानाही गेल्या वर्षभराच्या आठवणी ताज्या झाल्या. आणि म्हणूनच त्या संकलित करून ब्लॉगवर ठेवायचे ठरवले. बस्स त्याच ईथेही अपडेटतोय :) ............................................................ २० मार्च २०१४ आयुष्यात पहिल्यांदाच एका मुलीच्या बघताक्षणी प्रेमात पडलो......... एका मुलीचा बाप झालो. काल शिवजयंतीच्या मुहुर्तावर राणी लक्ष्मीबाई घरात आली. BLESSED WITH BABY GIRL ...नाचो ..... . . ८ एप्रिल २०१४ परी सारख्या मुलीचे `परी' हेच नाव .. My Little Angel is named "Pari" :) . . १५ जुलै २०१४ कन्फर्मड्..!! माझी मुलगी माझ्यावरच गेलीय.. फोटो काढायची अॅक्शन करत, मोबाईल तिच्यासमोर धरायचा अवकाश .. रडायचे थांबून हसायला सुरुवात :) . . १९ जुलै २०१४ चार दिन की झिंदगी, चार महिने गुजर गये, तेरे बिना.... जिया जाये ना .. हॅपी बड्डे फोर मन्थस बेबी परी .. कम सून :) . . २१ जुलै २०१४ लंगोट आणि कानटोपी .. दोघांतील फरक कसा ओळखायचा याचाही आता क्लास लावावा लागणार .. कठीण आहे ! . . २ ऑगस्ट २०१४ एक चांगली बातमी ! एक वाईट बातमी !! आधी चांगली बातमी - उद्या परी येणार घरी :) आता वाईट बातमी - बरोबर बायको सुद्धा येणार :( Bachelor Life Over :( पण बालपण सुरू :) . . ३ ऑगस्ट २०१४ पाच वर्षांपूर्वी फ्रेंडशिप डे च्या दिवशीच माझी माझ्या बायकोशी ऑर्कुटवर ओळख झाली होती. आज "फ्रेंडशिप डे" च्या दिवशीच मुलीला पहिल्यांदा घरी नेतोय. बापलेकीच्या नात्याची सुरुवात करायला यापेक्षा चांगला मुहुर्त असू शकतो का :) हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ माय फ्रेंडस !! . . ४ ऑगस्ट २०१४ पंधरा मिनिटांची खटपट करुन आज लंगोट बांधायला शिकलो... फक्त दहा मिनिटे टिकला ! मेहनतीवर पाणी पडने म्हणजे काय माहित होते, आज सुसू पडणे अनुभवले ;) . . ८ ऑगस्ट २०१४ हतबल .. हताश .. हात टेकले ! आजवर मी कित्येकांना चिडवून चिडवून छळले, आज माझी मुलगी मला छळून छळून चिडवतेय .. :( . . १० ऑगस्ट २०१४ चार वर्षांपूर्वी गणपतीच्या मिरवणूकीत शेवटचे नाचलेलो, ते आज पोरीबरोबर नाचलो. स्टॅमिना पार गंडलाय राव, तिच्या आधी मी दमलो. माकडाचा माणूस व्हायला उत्क्रांतीची हजारो वर्षे जावी लागली. लेकीने मात्र एका दिवसात माणसाचा माकड केला.. तो देखील चावीवाला :) . . १० ऑगस्ट २०१४ (हे स्टेट्स परीच्या आईचे) दरवाजे की घंटी ४-५ बार बजाने वाले, आज कल दबे पाव आने लगे ऊंची आवाज मे बातें करनेवाले, अब ईशारोंमे बतियाने लगे खुदके काम दुसरोंसे करवाने वाले, अब चुपचाप अपने काम करने लगे घोडे बेच के सोने वाले, अब हलकी आंहट पर जागने लगे घंटो लॅपटॉप मे डूबे, आजकल उसकी शकल तक देखना भूल गये तेरी एक हंसी के लिये, आज ये क्या क्या करने लगे.. माय डीअर परी, ये तूने क्या किया??? मेरे Lazybone Husband को, एक Responsible Father बना दिया.. Love U pari :) - अस्मिता नाईक . . २६ नोव्हेंबर २०१५ माझी मुलगी माझ्या सिक्स पॅकच्या प्रेमात पडलीय, हल्ली रोजच माझ्या अंगावर कार्यक्रम उरकते आणि मला बनियान काढायला लावते. :) . . ७ डिसेंबर २०१५ असे म्हणतात, देव आपले संकटांपासून रक्षण करतो.. पण हल्ली बिचार्‍या देवांवरच माझ्या पोरीपासून स्वत:चे रक्षण करायची वेळ आलीय.. देव्हारा वरती न्यायची वेळ झालीय :) . . ३१ जानेवारी २०१५ "जादूची चटई" आजवर केवळ परीकथांमध्येच वाचले होते. पण हल्ली परीने माझीच जादूची चटई बनवलीय. तिला उचलून घ्यायचे.. आणि मग ती जिथे बोट करेल, तिथे मुकाट जायचे :) . . १८ मे २०१५ चुकून नाव परी ठेवले.. शैतान जास्त सूट झाले असते.. :) . . ३१ मे २०१५ जगातली सारी खेळणी एकीकडे आणि आईबापाचा ड्रॉवर उपसण्यातील आनंद एकीकडे... आधी पाकिटाची जागा बदलावी लागली, मग घड्याळ हलवावे लागले, काल पट्टाही तिथे ठेवायची सोय राहिली नाही.. आता ते ड्रॉवर माझे फक्त नावालाच राहिले आहे. अगदी त्यात बसून खेळते.. सव्वा वर्ष पुर्ण व्हायच्या आतच बापाच्या प्रॉपर्टीवर कब्जा करायला सुरुवात.. स्मार्ट जनरेशन :) . . ६ जून २०१५ परी मागच्या जन्मात बहुतेक चिमणी असावी. काऊ आणि कब्बू'चे कमालीचे आकर्षण. राणीच्या बागेत पिंजर्यातील रंगीबेरंगी पक्षी, पंख फडफडवत बिचारे आमच्या एका नजरेसाठी आस लाऊन राहतात, पण आम्ही मात्र खुल्या फांदीवरच्या कावळ्यांनाच भाव देतो. समुद्राच्या लाटा हिंदकाळत राहतात, वारा बेभान बागडत सुटतो, क्षितिजावरचा सूर्य लाल तांबड्या रंगांची नुसती उधळण करत असतो, अगदी काव्यमय संध्याकाळ असते. पण आम्ही तिथेही आकाशातले कावळेच टिपत असतो. गेले कित्येक वर्षे डॉकयार्ड रेल्वेस्टेशन वरून प्रवास करतोय. पण आजवर कधी माझ्या नजरेस पडले नव्हते. परीने मात्र आज पहिल्याच फटक्यात छ्तावरच्या लोखंडी सांगाड्याच्या बेचकीत लपलेले काऊकब्बू हुडकून काढले, आणि माझ्याबरोबरच प्लॅटफॉर्मवरच्या ईतरही काही अज्ञानी लोकांच्या ज्ञानात भर टाकली ज्यांची नजर रेल्वे ईंडिकेटरच्या वर कधी गेलीच नव्हती :) . . १३ जुन २०१५ मॉडेल, डान्सर, जिम्नॅस्ट, आणि आता मिमिक्री आर्टिस्ट.. परीच्या करीअरची चिंता नाही, काही ना काहीतरी करेलच पोरगी . . २१ जून २०१५ मुलीला खेळवणारे शेजारीपाजारी, दादा मामा, काका आजोबा, मित्र सवंगडी बरेच असतात.. पण तिने सू सू केल्यावर जो लंगोट बदलतो, तो बाप असतो. :) HapPy FatheRs Day 2 all :) . . १ जुलै २०१५ आजवर कधी घरी आल्यावर माझ्या बायकोने मला साधे पाणी विचारले नाही, पण परी मात्र आल्या आल्या माझ्या पायातले बूट काढायला धावते. बूटांना हात नको लाऊस म्हटल्यावर शू रॅकचा दरवाजा उघडून मला बूट ठेवायला मदत करते. सेवा ईथेच संपत नाही. त्यानंतर माझे बोट पकडून माझे कपडे बदलायला मला बेडरूमकडे नेते. तिथून आमचा मोर्चा बाथरूमकडे वळतो. मी बाहेर येईपर्यंत माझी वाट बघत दारातच उभी राहते. मला आत उशीर होतोय असे वाटल्यास बाहेरून दरवाज्यावर थडाथड लाथाबुक्के बसतात. कारण.... कारण त्यानंतर तिला माझ्याबरोबर "चहा बिस्किट" खायचे असते.. तो मॉरल ऑफ द स्टोरी.., पोरगी शेवटी आईवरच गेलीय :) . . ७ जुलै २०१५ दोघींचा जन्म जणू काही मला छळायलाच झालाय.. पण आयुष्यात जे काही मनोरंजन आहे ते दोघींमुळेच आहे.. मला लुटणे हा दोघी आपला जन्मसिद्ध हक्क समजतात.. पण सोबत आनंदही अनमोल देऊन जातात.. माझ्याकडून आपले लाड करून घेणे, हट्ट पुरवणे.. कारण नसताना उगाचच चिडणे, उगाचच रडणे.. सरते शेवटी मीच हात जोडून त्यांची समजूत काढणे.. कधी कधी वाटते मला दोन बायका आहेत.. तर कधी वाटते, दोन पोरींना सांभाळतोय.. . . १२ जुलै २०१५ शनिवार-रविवारची आंघोळ म्हणजे आमच्यासाठी तासाभराची वनडे पिकनिक असते. बाथटब म्हणजे स्विमिंग पूल.. शॉवर म्हणजे वॉटरफॉल.. आणि बापाच्या अंगाखांद्यावर बागडणे या झाल्या स्लाईडस.. अगदी पिकनिकला काढतात तसे या सर्वांचे फोटोही घेतले जातात, फक्त ते ईथे प्रदर्शित करू शकत नाही ईतकेच :) बरे, पाण्याची आवड तरी किती.. मासा पाण्यातून बाहेर काढल्यावर तो सुद्धा जेवढा तडफडत नसेल तेवढा दंगा आमची जलपरी घालते. या आधी सुट्टीच्या दिवशी कुठे कामानिमित्त बाहेर जायचे असेल, तर आणि तरच आंघोळ करणारा मी.. अन्यथा आंघोळीलाही सुट्टी देत बिछान्यातच लोळत पडणारा मी.. आणि स्साला त्यातच सुख सुख म्हणजे आणखी काय असते असे म्हणनारा मी.. पण हल्ली माझी देखील सुखाची व्याख्या बदलू लागलीय.. हल्ली मी देखील सुट्टीच्या आंघोळीची वाट बघू लागलोय. . . १४ जुलै २०१५ Quiz Time - पहिल्याच चेंडूवर विकेट काढणारी भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण? .... ऊत्तर - परी अ नाईक. विकेट - आपल्याच बापाची. अनपेक्षित वेगाने येणार्‍या पहिल्याच चेंडूवर अंदाज पार फसला आणि मी क्लीन बोल्ड! सारे स्टेडियम तिच्या आईच्या शिट्ट्या आणि टाळ्यांनी दणाणून उठले :) . . १५ जुलै २०१५ लोकांची एबीसीडी शिकण्याची सुरुवात " A for Apple " पासून होते. आमची " i for ice cream " पासून झाली. :) . . १६ जुलै २०१५ आम्ही लहान आहोत म्हणून आमचे सर्वांकडून लाड होतात, की आमचा हावरटपणा आमच्या चेहर्यावर दिसून येतो, काही कल्पना नाही. पण आम्ही मिठाईवाल्याकडे गेलो की न मागता आम्हाला एक पेढा मिळतो. आम्ही तो संपवतो आणि आणखी एक मागतो. आम्हाला आणखी एक मिळतो. मेडीकलवाल्याकडे गेलो की चॉकलेट मिळते, मॅकडोनाल्डवाला आईसक्रीम देतो. हारवाला देखील काही नाही तर एक फूल हातात चिपकवतो. आम्ही ते देखील तोंडात घालतो. परवा नाक्यावर सहजच उभे असताना जवळच्या अंडेवाल्याने उकडलेले अंडे ऑफर केले.. आणि मला हसावे की रडावे समजेनासे झाले .. :) . . १७ जुलै २०१५ जंगलचा राजा सिंह असेल, पण आमच्यासाठी मात्र तो वाघ आहे. कारण आमची लायनपरी फक्त तोंडातल्या तोंडात गुरगुरते, आणि टायगरपरी मात्र सिंघम स्टाईलमध्ये पंजा दाखवत, तोंडाचा आ करून डरकाळी फोडते. . . १८ जुलै २०१५ डेलीसोप मालिका कितीही रटाळ का असेनात, जोपर्यंत त्यांचे टायटल सॉंग हिट आहेत आणि परी त्यावर नाचतेय तोपर्यंत आमच्याघरी त्यांचे स्वागतच आहे. सध्याची टॉप 3 लिस्ट आहे - १. दिल दोस्ती दुनियादारी २. जय मल्हार ३. होणार सून मी या घरची :) ........................... - तुमचा अभिषेक

Book traversal links for परीकथेचे सव्वा वर्ष .. (facebook status)

  • ‹ सुखाची चाहूल... आगमन ... अवर्णनीय !
  • Up
  • परीकथा २ - (सव्वा ते दीड वर्ष) (facebook status) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालकथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
17891 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

मस्तयं :)

टवाळ कार्टा
Sun, 07/19/2015 - 13:02 नवीन
मस्तयं :)
  • Log in or register to post comments

:) परीला खूप शुभेच्छा !

खेडूत
Sun, 07/19/2015 - 13:14 नवीन
:) परीला खूप शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

:-)

एस
Sun, 07/19/2015 - 13:18 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

भारी :)

नाव आडनाव
Sun, 07/19/2015 - 13:36 नवीन
भारी :)
  • Log in or register to post comments

वा क्या बात है . मिपावर

उगा काहितरीच
Sun, 07/19/2015 - 14:28 नवीन
वा क्या बात है . मिपावर सध्याच्या जड जड लेखामधे हवच होत एखादं हलकफुलक काहीतरी !
  • Log in or register to post comments

खूप छान लिहिलय.

पद्मावति
Sun, 07/19/2015 - 14:38 नवीन
मस्तं वाटलं वाचून, एकदम फ्रेश.
  • Log in or register to post comments

:)

मधुरा देशपांडे
Sun, 07/19/2015 - 14:47 नवीन
:)
  • Log in or register to post comments

किती गोड!

कवितानागेश
Sun, 07/19/2015 - 15:19 नवीन
किती गोड! बाकी सेम पिंच फॉर कावळे.... आमच्याकडे पण काउ सगळ्यात लाडका आहे.
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय. मस्तचं.

भाते
Sun, 07/19/2015 - 15:39 नवीन
एखाद्या चित्रपटाचे कथानक हळुवारपणे उलगडत जावे तसं काहीसं वाचताना वाटलं.
  • Log in or register to post comments

अभिषेक

सविता००१
Sun, 07/19/2015 - 16:06 नवीन
मस्त. फेबु. वर पहातच असते. इथे तिचे काही फोटो टाक की. मस्त आहेत
  • Log in or register to post comments

हा हा, हो फोटो तर तिचे मस्तच

तुमचा अभिषेक
Sun, 07/19/2015 - 21:01 नवीन
हा हा, हो फोटो तर तिचे मस्तच असतात, पण ईथे टाकायची परवानगी तिची आई देणे कठीण आहे. आधीच फेसबूकवर मी तिचे भरमसाठ फोटो टाकतो अशी ओरड आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

हो

सविता००१
Mon, 07/20/2015 - 07:51 नवीन
आधीच फेसबूकवर मी तिचे भरमसाठ फोटो टाकतो अशी ओरड आहे. :) हे खरय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

मस्त आहे परीकथा!

अजया
Sun, 07/19/2015 - 16:48 नवीन
मस्त आहे परीकथा!
  • Log in or register to post comments

खूप गोड लिहिले आहे :)

सानिकास्वप्निल
Sun, 07/19/2015 - 16:48 नवीन
खूप गोड लिहिले आहे :) छान वाटलं वाचून.
  • Log in or register to post comments

खूप गोड आहे...परीचं जादूई जग

सुबक ठेंगणी
Sun, 07/19/2015 - 17:05 नवीन
खूप गोड आहे...परीचं जादूई जग आणि तिच्या बाबाचं त्या जगात गुरफटून जाणं दोन्ही :)
  • Log in or register to post comments

चांगलंय !!

खटपट्या
Sun, 07/19/2015 - 17:09 नवीन
चांगलंय !!
  • Log in or register to post comments

वा! बहोत खूब..

सुधांशुनूलकर
Sun, 07/19/2015 - 18:24 नवीन
मस्तच लिहिलंय. आमच्या लेकीच्या लहानपणीच्या आठवणी अगदी सहज जाग्या झाल्या. मुलीचा बाप होणं खूपच छान असतं.. स्वानुभव. फेसबुक स्टेटस अपडेट्सच्या फॉर्ममध्ये लिहायची कल्पनाही मस्तच.
  • Log in or register to post comments

मस्तच!

पैसा
Sun, 07/19/2015 - 18:42 नवीन
तुम्हाला तिघांनाही खूप शुभेच्छा! पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!!
  • Log in or register to post comments

तेच तर.

राही
Sun, 07/19/2015 - 19:53 नवीन
हा तर नुसता ट्रेलर. पण मस्त. हळुवार आणि निरागसपणे टिपलाय सगळा निरागसपणा. परीबरोबर 'पेरे'न्ट्सचीही वाढ होतेय म्हणायची. आपल्या नकळत वाढणे ही मज्जा असते. सुखच सुख.
  • Log in or register to post comments

कल्पना व त्याची अंमलबजावणी

कानडाऊ योगेशु
Sun, 07/19/2015 - 20:25 नवीन
कल्पना व त्याची अंमलबजावणी दोन्हीही सुरेखच! अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसाद :)

तुमचा अभिषेक
Sun, 07/19/2015 - 20:57 नवीन
सर्व प्रतिसाद :)
  • Log in or register to post comments

वाचता वाचता २७ वर्ष मागे गेलो

विवेकपटाईत
Sun, 07/19/2015 - 21:30 नवीन
वाचता वाचता २७ वर्ष मागे गेलो, आमच्या परीने ही असाच आनंद आम्हाला पण दिला होता. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. वेळ हातात येत नाही, उडून जाते.
  • Log in or register to post comments

आवडले

श्रीरंग_जोशी
Sun, 07/19/2015 - 21:46 नवीन
नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने लिहिलेले हे प्रकटन आवडले. फारच गोड आहे तुमची परी. मलाही लहान मुलांचा खूप लळा असतो. गेल्या दीड वर्षांपासून माझ्य दीड वर्षांच्या भाचीबरोबर (इरा तिचे नाव) थोडेबहुत असेच अनुभव आहेत. ती दोन तीन आठवड्यांची असतानापासून बेबी बलुगा हे गाणे मी गाऊन दाखवत असे अन फोनवरून त्या गाण्याचा व्हिडिओ दाखवत असे. अजुनही गातो पण आत ती एका ठिकाणी थांबत नाही. तिला नेहमी घराबाहेर अंगणात खेळायचे असते. तिच्या भोवताली मी असलो की ती मी सोडून इतर कुणाकडेच जात नाही कारण तिला कधीही न रागावणारा एकच माणूस आहे तो म्हणजे मी :-) .
  • Log in or register to post comments

धमाल आहे ! :)

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/20/2015 - 00:14 नवीन
धमाल आहे ! :)
  • Log in or register to post comments

चांगले लिहिले आहे.

जुइ
Mon, 07/20/2015 - 05:28 नवीन
आवडले!
  • Log in or register to post comments

:) मस्तं!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 07/20/2015 - 07:13 नवीन
:) मस्तं!!
  • Log in or register to post comments

परी

नाखु
Mon, 07/20/2015 - 09:26 नवीन
जग आहे त्यापेक्षा सुंदर आणि निरागस आहे याचा साक्षात्कार कन्या-आगमनानंतर झाला लेकीच बापुस नाखु
  • Log in or register to post comments

कसलं भारी आहे हे!

शब्दवेडी
Mon, 07/20/2015 - 10:37 नवीन
तुमची परीकथा वाचून आता मी पण माझ्या Superman बाबांबद्दल लिहावं असं वाटतंय :)
  • Log in or register to post comments

नक्की..

तुमचा अभिषेक
Tue, 07/21/2015 - 02:12 नवीन
ज्या क्षणाला वाटेल त्याच क्षणाला लिहून काढा.. तो गेला तर तेवढीच उत्कटता लिखाणात उतरेल याची शाश्वती नसते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दवेडी

सुरेख ! सुरेख

वेल्लाभट
Mon, 07/20/2015 - 10:57 नवीन
काही काही खूपच गोड आहेत ! हा अनुभव शब्दात मांडता येणारा नसूनही इतक्या सुरेख प्रकारे तुम्ही तो व्यक्त करताय त्याबद्दल तुमचं कौतुक ! क्या बात है.... रिलेट करू शकलो. अप्रतिम. आता संकलन करा आणि एखाद्या साजेशा फॉर्मॅट मधे जपा. कधीतरी भेट म्हणून देता येईल परी ला
  • Log in or register to post comments

थोबडापुस्तक कॉंमेंटस

मित्रहो
Mon, 07/20/2015 - 11:13 नवीन
व्वा क्या बात है मस्त अब तू डायपर बदलना सिख गया. ..... बाकी फेसबुकच्या स्टेट्स माध्यमातून ही भावना अशी सुरेख व्यक्त करता येते हे आज तुमच्यामुळे कळले. खूप सुंदर
  • Log in or register to post comments

+ १

तुषार काळभोर
Mon, 07/20/2015 - 11:14 नवीन
माझं आयुष्य पण तुमच्याशी समांतर चाललंय भौतेक. याच टाईमलैनवर असंच सगळं अनुभवतोय. (आमचं पोरगं दर मिनिटाला पिलीयन रायडरतैंच्या लेखाची आठवण करून देतं.) -(गुंड पोराचा अभिमानी बाप) पैलवान
  • Log in or register to post comments

हि हि हि

अद्द्या
Mon, 07/20/2015 - 11:14 नवीन
हि हि हि फेसबुक वर बघत असतोच . भारी गोड आहे पोर :)
  • Log in or register to post comments

:)

ब़जरबट्टू
Mon, 07/20/2015 - 11:28 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments

मस्तच लिहिलय!

भिंगरी
Mon, 07/20/2015 - 11:28 नवीन
मस्तच लिहिलय! बाकी काऊ आणि कबू आमच्या पालवीचेही लाडके सवंगडी आहेत.
  • Log in or register to post comments

झकास्स रे ...

विशाल कुलकर्णी
Mon, 07/20/2015 - 12:18 नवीन
झकास्स रे ...
  • Log in or register to post comments

भावा हे एक्दम पटलं...!

बन्डु
Tue, 07/21/2015 - 01:24 नवीन
"कधी कधी वाटते मला दोन बायका आहेत.. तर कधी वाटते, दोन पोरींना सांभाळतोय.."
  • Log in or register to post comments

ख़ास लिहिलंय! जपून ठेव लिखाण.

प्यारे१
Tue, 07/21/2015 - 01:59 नवीन
ख़ास लिहिलंय! जपून ठेव लिखाण. पुढंमागं मराठी वाचेल आणि कवतुक करेल कधीतरी बापाचं.... खरंच छान.
  • Log in or register to post comments

आमीन

तुमचा अभिषेक
Tue, 07/21/2015 - 02:08 नवीन
हा माझ्या अगदी मनातला प्रतिसाद .. माझ्या मुलीने हे तितक्याच आवडीने आणि कौतुकाने हे वाचावे जितक्या मी लिहिलेय अशीच एक ईच्छा. नाहीतर एक खंत कायमच राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अग्दी अग्दी

टवाळ कार्टा
Tue, 07/21/2015 - 09:52 नवीन
अग्दी अग्दी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

वा छान!

मोहनराव
Tue, 07/21/2015 - 13:54 नवीन
सध्या हे सगळं स्वतः अनुभवतोय... मजा आली वाचताना... सगळं सेम टु सेम माझ्या मुलीसोबत रिलेट होतंय...
  • Log in or register to post comments

आमच्याकडे विक्रम वेताळ कथेचे

प्रसाद गोडबोले
Tue, 07/21/2015 - 14:06 नवीन
आमच्याकडे विक्रम वेताळ कथेचे दीड वर्ष चालु आहे =))
  • Log in or register to post comments

लय भारी

बोबो
Tue, 07/21/2015 - 22:20 नवीन
:) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

क्या बात है. मस्तं!

बॅटमॅन
Tue, 07/21/2015 - 15:08 नवीन
क्या बात है. मस्तं!
  • Log in or register to post comments

परीकरता लोरी हवीच नाही का .....

नरेंद्र गोळे
Tue, 07/21/2015 - 22:06 नवीन
अभिषेक तुमच्या परीकरता ही सुरेख लोरी .... http://anuvad-ranjan.blogspot.in/2015/05/blog-post_16.html#links
  • Log in or register to post comments

:) धन्यवाद ..

तुमचा अभिषेक
Tue, 07/21/2015 - 22:46 नवीन
:) धन्यवाद .. परी नावाच्या बरेच फायद्यांपैकी हा एक.. परी हे नाव असलेली बरीच गाणी कविता रेडीमेड मिळतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे

गोड आहे : )

रातराणी
Tue, 07/21/2015 - 23:24 नवीन
गोड आहे : )
  • Log in or register to post comments

मस्त!

बोका-ए-आझम
Wed, 07/22/2015 - 15:43 नवीन
मुलीचा बाप होऊन सर्व मुलांच्या बापांना जळवल्याचा तीव्र णिशेध!
  • Log in or register to post comments

मस्त ! इंटरेस्टींग आहे

बाळ सप्रे
Wed, 07/22/2015 - 15:57 नवीन
मस्त ! इंटरेस्टींग आहे टाईमलाइन !! ४ ऑगस्टचा स्टेटस मस्तच :-)
  • Log in or register to post comments

१ नंबर

आदिजोशी
Wed, 07/22/2015 - 15:58 नवीन
मस्त प्रवास उलगडलायस. असंच लिहित रहा पुढेही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा