Skip to main content

महाभारत... (शतशब्दकथा)

लेखक शब्दबम्बाळ यांनी शनिवार, 18/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
"बरेच दिवस ते युध्द सुरूच होत. न भूतो न भविष्यति असा तो संग्राम होता. एकाहून एक भयानक आणि संहारक अस्त्र शस्त्र वापरली गेली. लाखो लोक मारले गेले, जे युद्धातून वाचले ते उपासमारी आणि रोगराईने मृत्युमुखी पडले. जेव्हा युद्ध संपले तेव्हा जमीन रक्ताने लाल झाली होती, ब्रम्हास्त्राच्या अति वापराने निर्माण झालेल्या काळ्यामिट्ट ढगांनी सुर्य देखील झाकोळला गेला होता, सगळीकडे अंधःकार पसरला होता. निसर्गाची अपरिमित हानी झाली होती. समस्त मानवजातीला याची किंमत मोजावी लागणार होती" हे सगळे ऐकून चिंतातूर होत त्याने प्रश्न केला,"मला हे जमेल?" "मला पूर्ण विश्वास आहे. आपण हि जबाबदारी नक्की पार पाडाल, व्यास!" भविष्यातून आलेला तो प्रवासी म्हणाला…
लेखनविषय:

वाचने 2029
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

हम्म टर्मिनेटरची कथा इतक्या जुन्या काळापर्यंत मागे जाते होय ? फक्त - भविष्यातून आलेला तो रोबॉट म्हणाला. असा शेवट हवा. डॉनट फरगेट जिनेसिस इज स्काय नेट.

In reply to by द-बाहुबली

हम्म, तुम्ही टर्मिनेटरच्या कथेनुसार गेलात! ते हि असू शकते! पण माझा विचार थोडासा वेगळा होता... मला महाभारतातल्या विमान, शत्रास्त्रे यांबद्दल कुतूहल आहे आणि त्या काळी या कल्पना कशा सुचल्या असतील हा विचार करताना भविष्यातला माणूस हि संकल्पना सुचली. म्हणजे भविष्यामध्ये कधीतरी भयंकर युद्ध झाले (इथे माणसांमध्येच हा विचार होता) आणि त्यामुळे सृष्टीची वाताहात झाली. मग तिथल्या कोण्यातरी मानवाने भूतकाळातल्या माणसाना युध्द आणि त्याचे भयानक परिणाम याबद्दल माहिती असावी म्हणून समयप्रवास करून व्यासांना हि कथा सांगितली! त्याने हे करण्यामागे कारणे काहीही असू शकतात! ;)

x-men future past मध्ये पण बसतेय