Skip to main content

डिस्टिलेशन (शंबर लंबरी कथा)

लेखक सोंड्या यांनी गुरुवार, 16/07/2015 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा तो अगदी घामेजून गेला होता! ! त्याने नवसागर, काळा गुळ, मोहाची फुलं, युरिया, जुन्या बॆट-या हे सगळे जिन्नस वापरून काहीतरी बनवीले होते. उत्सुकता म्हणून त्याने ते बोटावर ओतुन जाळावर धरलं. भपकन पेटणारा तो द्रव जबरी वास मारत होता. त्यांच्या धंद्याच्या उसुलात प्रत्येक बाटलीला "बूच" लावने आवश्यक होतं. त्याच्या जवळच काम करणार्या मित्राला त्याने विचारलं "दादूस...मांझा माल खपल ना...." "हेच्या आसला हेच्या बेंबट्या.... कं बोलतोस कं तू....हा तर पयल्या धारंचा माल हं.... खपलाच पायजे बोल.... उद्या गटारी आमोशा हं.... तू तूंजा माल बिंधास्त मांझे गुत्त्याव लाव इकायला........."भट्टी" लावणारा बाला खुषीन येऊन बोल्ला.... जाळावरनं आपले लक्ष किंचीतही ढळू न देता.......
लेखनविषय:

वाचने 3159
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

मस्त! हटके रेसेपी! माणसाची सुद्धा आज पहिल्यांदाच भीति वाटली.बाद्वे तो द्रव म्हणजे हातभट्टीच का? कारण विनाझैरात विपणन हा सिद्धांत फक्त हातभट्टीलाच लागू होतो. येरवाळीच चांगला फुगा फोडलात!

In reply to by सदस्यनाम

भारीच्च. पैल्या धारेची गोष्ट! >>>> येरवाळीच झाली की तिन्हीसांज. पावलं गुत्त्याकडं वळायचीच. (येरवाळी ऐकून फार दिवस झाले होते. धन्स)

झकास !

सर्वांचे आभार @सदस्ययनाम प्रतिसादाचे विडंबनही जबरी

गटारी अमावस्या कुठल्या महिन्यात येते. एक प्रश्न डोक्यात आला गटारी अमावस्येला यमदूताना ओवर टाईम मिळत असेल का?

नाम चैये था तेरा रतन-नुरा क्योंकी इडंबन किया तुने खतम-पुरा ;)