विकासराव,
नेहेमीप्रमाणेच तुमचा लेख अभ्यासपूर्ण आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहेच; पण तो योग्य कृती करण्यासाठी प्रवृत्त करणारा ठरावा.
... आणि "आपण बरे आणि आपले पोट बरे" म्हणत जगणार्या समाजवृत्तीशी आहे.
हे अगदी विशेषत्त्वाने आवडलं आणि पटलं.
अदिती
मला लहान होतो तरी देखील चांगलेच आठवते आहे की त्या काळात अफगाण पंतप्रधान की राष्ट्राध्यक्ष - त्याचे नाव आत्ता आठवत नाही, पण इंदीरा गांधी मुळे भारतात बर्याचदा दिसायचा आणि अर्थातच सोव्हीएट पपेट होता, त्याला या मुजाहीदीनने सरळ पकडून फासाला लटकावले.
त्याचे नाव नजीबुल्ला..
इंदिराजींच्या सद्दामसारख्या मित्रांनी भरलेल्या मित्रमंडळात हा देखील होता.
-- सर्किट
त्याचे नाव नजीबुल्ला..
इंदिराजींच्या सद्दामसारख्या मित्रांनी भरलेल्या मित्रमंडळात हा देखील होता.
बरोबर. धन्यवाद! त्याचा चेहरापण मला आठवतो आणि सहजरावांनी त्याची तूनळीतील चित्रफितपण पाठवली!
मात्र जे काही लिहायचे असेल ते भावनाप्रधान होऊन लिहीलेत तर चालू शकेल पण न आवडणार्याविरुद्ध भावनाशुन्य आणि आपल्याला जे वाटते तेच खरे असे भावनाविवश होऊन कृपया लिहू नये ही विनंती.
भावनाप्रधान, भावनाशून्य, भावनाविवश. यातले नक्की काय चालेल, काय चालणार नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करावे.
रामजन्मभूमीचा ४०० वर्षाचा हट्ट (आणि स्वातंत्र्यानंतर जा-ये करत गेलेला हट्ट) हा अचानक इतका मोठा होण्यास शहाबानो प्रकरण आहे. ज्यात अयोग्य घटनादुरूस्ती करत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून एका अर्थाने स्त्रीच्या आणि मानवी हक्कांवर गदा आणली असे येईल.
शहाबानो प्रकरणाचा रामजन्मभूमीशी आणि हिंदू समाजाशी थेट संबंध काय होता? घटनादुरुस्ती करून काँग्रेसने मुस्लिमांचे तुष्टीकरण केले आणि समान नागरी कायद्याची मागणी योग्यच आहे या दोन्ही गोष्टी मान्य.
शहाबानोमुळे भाजपाला चांगलीच संधी मिळाली. भाजपानेही घाणरेडे राजकरण करून अगदी उत्तम भांडवल केले. थोडक्यात काँग्रेस आणि भाजपा दोघेही एकाच माळेचे मणी.
भाजपाचे अनेक मुखवटे आहेत. एकीकडे सामाजिक समरसतेची गाणी गायची, तर दुसरीकडे मंडल आयोगाला विरोधही करायचा. एकीकडे डॉ. आंबेडकरांचा गौरव करायचा, दुसरीकडे 'रिडल्झ इन हिंदुइझम' ला विरोध करायचा आणि 'वर्शिपिंग फॉल्स गॉड्स' कमिशन करायचे. एकीकडे स्त्रीच्या आणि मानवी हक्कांच्या बाता करायच्या आणि दुसरीकडे "लिपस्टिकवाल्या बाया.." सारखी अशोभनीय वक्तव्ये (विहिंपच्या संतांच्या विधानांपुढे हे नकवीचे विधान काहीच नाही) करायची. ही यादी न संपणारी आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मुंबईवर काही दिवसांपुर्वीच महाभयंकर असा अतिरेकी हल्ला झाला.हे हल्लेखोर समुद्रामार्गे बोटीतून मुंबईत आले असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी काढला आहे. याबाबत सरकारचे,गुप्तचर यंत्रणाचे अपयश असे बरेच काही लिहीले गेले बोलले गेले(अर्थात कोणतेही कटकारस्थान शिजताना आपल्या कारस्थानाचा सुगावा लागू नये याबाबत ज्या दहशतवादी संघटनेमार्फत हे हल्ले झाले त्यांनीही योग्य ती काळजी घेतली असणारच) आणि खरोखरच हा हल्ला म्हणजे गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे असे म्हणायला निश्चितच जागा आहे.
फार वर्षापुर्वी मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांची दहशत होती.करीम लाला ,हा़जी मस्तान पासून दाऊद,गवळी,छोटा राजन,अमर नाईक,गुरू साटम,सदा पावले ही त्यांची नावे. बेरोजगार तरूण मोठ्या प्रमाणावर या टोळ्यांच्या आश्रयाला होता.खंडणी,दहशत पसरवणे,टोळी युध्द तसेच राजकीय वरदहस्त सर्वसामान्य माणूस,व्यापारी वर्ग हैराण झाला होता.पोलीसांनी एन्काऊंटर सुरू केले आणि या गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडले.मुंबईत गँगवार संपले(अधून मधून होत असते. ते सोडा)यातील दाऊद,छोटा राजन हे देश सोडून बाहेर पळाले.यापैकी दाऊद दुबईमार्गे पाकीस्तानात पळाला.या गुन्हेगारी टोळ्यांचा दहशतवाद जरी संपला असला तरी मुंबईल पुन्हा एकदा नव्या तर्हेच्या दहशतवाधाने ग्रासले.
तेथील गुप्तचर यंत्रणेणे त्याचा भारतविघातक कारवाया करण्यासाठी पुरेपुर उपयोग केला तो असा.भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्वाचे वारे देशभर वाहू लागले होते.बाबरी मशीदीच्या जागेवर राम मंदीर हा त्यांच्या अट्टाहास होता/आहे.अडवाणी नी रथयात्रा काढली देशभर पेटवापेटवी केली .अनेक हिंदू संघटना एकत्र झाल्या त्यांनी बाबरी मशीद जमीनदोस्त केली.बाबरी मशीद जमिनदोस्त केल्याचे बरेच परीणाम झाले. मुंबईत हिंदू-,मुस्लीम दंगली झाल्या शिवसेनेचा दंगलीत उघड सहभाग होता सहजिकच दोन मने दुभंगली गेली.मुस्लीमांत(अपवाद सोडून) असंतोष वाढू लागला.त्यांत बदल्याची भावना निर्माण झाली.दाऊदने टायगर मेमन मार्फत स्थानिक तरूणांना एकत्र करून मुंबईत भीषण बॉम्बस्फोट केले.अनेक जण ठार झाले.बॉम्बस्फोटातील गुन्हेगार(यांत हिंदू पोलीसही होते) पकडले गेले त्यांना शिक्षाही झाली.टायगर,दाऊद,पाकीस्तानी गुप्तचर यंत्रणा यांनी पध्दतशीरपणे यांचा वापर केला आणि त्यांना फेकून दिले.
त्यानंतर अनेक बॉम्बस्फोट मुंबईत झाले.आणी सीमी सारख्या संघटनाच्या त्या बॉम्बस्फोटात हात असल्याचे सिध्द झाले.येथे एक असे सांगावेसे वाटते सुरूवातीला काश्मिर खोर्यापुरता असणारा दहशतवाद(याला आपण फुटिरतावाध(स्वतंत्र काश्मिर) म्हणू शकतो)पण भाजप जसा जसा वाढू लागला तसतसा या देशात दहशतवाद अधिक जोमाने वाढू लागला असे दिसुन येते.
मुंबईत आता झालेला हल्ला नविन स्वरुपाचा होता.तोपर्यंत मुंबईला बॉम्बस्फोटाची सवय होती. असे काही होईल याची शासनाला कल्पनाही नव्हती. या हल्ल्यात जर स्थानिकांनी हल्लेखोरांना मदत(अजुन पुरावा नाही आहे) केली असेल तर ते ती मदत का करत आहेत याचाच विचार करायची आता वेळ आली आहे.
विकासराव,
आढावा चांगला घेतला आहे.
कमकुवत राजकीय नेतृत्व आणि आपल्या कातडीला धग लागली तरच आगीकडे लक्ष द्यायचे या सामान्यांच्या वृत्तीमुळेच दहशतवाद फोफावतो आहे हे खरेच.
-- लिखाळ.
लेखात काही विसंगती जाणवल्या त्या अशा -
सर्व प्रथम दाउदने अथवा कुठल्याही मुसलमान (अतिरेकी अथवा तात्कालीन विरोधक) संघटनेने असे कुठेही म्हणलेले नाही की हे बाबरी मशिदीच्या घटनेमुळे झाले आहे म्हणून.
न्यायमूर्ती कोदे यांच्या समोर झालेल्या सुनावणीच्या वृत्तांतांत बर्याच आरोपींनी (आता गुन्हेगार म्हणायला हरकत नाही), बाबरी मशिदीचा उल्लेख केल्याचे वाचले होते.
तर ३० लाख काश्मिरी पंडीतांवर स्वतःच्या घरातून बाहेर पडायची आणि स्वतःच्याच देशात निर्वासीत म्हणून रहायची वेळ आली.
जम्मू-काश्मिर राज्याची आजची लोकसंख्या सुमारे १ कोटी आहे. हे लक्षात घेतले तर, ३० लाख हा आकडा बरोबर असेल असे वाटत नाही.
अवांतर म्हणून १९०९ च्या इंपिरीयल गॅझेटीयर मधील हा खाली उतारा (पृष्ट ९९) पहायला हरकत नाही.
The total population includes 2,154,695 Muhammadans, 689,073
Hindus, 25,828 Sikhs, and 35,047 Buddhists. The Hindus are found
chiefly- in the Jammu province, where they form rather less than half
the total. In the Kashmir province they represent only 524 in every
io,ooo of population, and in the frontier wazarats of Ladakh and
Gilgit only 97 out of every io,ooo persons.
बाबरीकांडापूर्वी भारतात दंगली जरूर झाल्या. परंतु, आंतरराष्ट्रीय परिमाण लाभलेल्या संघटीत दहशतवादाची चुणूक १९९३ च्या बॉम्बस्फोटातच दिसली. ज्याचे मूळ निश्चितपणे बाबरीकांडातच आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
वेळेअभावी फार गुगलता आले नाही. परंतु, रॉयटरच्या स्थळावर ही बातमी मिळाली. त्यात, न्या कोदे यांचे हे वाक्य स्पष्ट आहे -
His excuse that the acts were revenge for the Babri masjid is not convincing
दुवा येथे -
http://www.reuters.com/article/worldNews/idUSSP8968120070718
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
न्यायमूर्ती कोदे यांच्या समोर झालेल्या सुनावणीच्या वृत्तांतांत बर्याच आरोपींनी (आता गुन्हेगार म्हणायला हरकत नाही), बाबरी मशिदीचा उल्लेख केल्याचे वाचले होते.
असेलही मी जेंव्हा पाहीले तेंव्हा या समान अर्थाचे वाक्य आढळले ते असे होते, "It is believed that the attacks were carried out in retaliation for the destruction of the historic Babri Masjid on December 6, 1992" (आत्ता पटकन गुगलले तेंव्हा येथे मिळाले पण मी इतरत्रपण पाहीले होते. मला वाटते विकीपिडीयावर पण असेच आहे.) त्याशिवाय, माझे म्हणणे आपण परत वाचाल तर वेगळे होते:
सर्व प्रथम दाउदने अथवा कुठल्याही मुसलमान (अतिरेकी अथवा तात्कालीन विरोधक) संघटनेने असे कुठेही म्हणलेले नाही की हे बाबरी मशिदीच्या घटनेमुळे झाले आहे म्हणून.
आरोपी जेंव्हा स्वत:चा बचाव करत असतो तेंव्हा तो कोर्टात जे बोलतो, ते त्याचे व्यक्तीगत बचावासाठीचे कारण असते. थोडक्यात त्या संबंधात कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतली नव्हती. कारण तो हल्ला मुसलमानांचा धार्मिक कारणाने केलेला हल्ला नव्हता असेच माझे म्हणणे आहे. या उलट आत्ता आणि इतर अनेक अतिरेकी हल्ल्यात त्या त्या संघटना तसे जाहीर करतात कधी लपून बसत नाहीत...
जम्मू-काश्मिर राज्याची आजची लोकसंख्या सुमारे १ कोटी आहे. हे लक्षात घेतले तर, ३० लाख हा आकडा बरोबर असेल असे वाटत नाही.
धन्यवाद! मला ३ लाख म्हणायचे होते. पण आत्ता आपण म्हणल्यावर परत पाहीले तर काश्मिरी पंडीतांच्या मताने ४ लाख आहे. मी मूळ लेखात हा आकडा बदलत आहे.
बाबरीकांडापूर्वी भारतात दंगली जरूर झाल्या. परंतु, आंतरराष्ट्रीय परिमाण लाभलेल्या संघटीत दहशतवादाची चुणूक १९९३ च्या बॉम्बस्फोटातच दिसली. ज्याचे मूळ निश्चितपणे बाबरीकांडातच आहे.
आंतर्राष्ट्रीय संघटीत दहशतवादाची चुणूक ही बाबरीने लागली असे म्हणताना मग एक त्यावेळचा निषेध वगैरे सोडल्यास पाकीस्तान/बांग्लादेश ही इस्लामिक राष्ट्रे सोडल्यास इतर कुठल्याही प्रबळ राष्ट्राने "मुसलमानी" राष्ट्र म्हणून या विरुद्ध सातत्याने आवाज का नाही केला? त्याचे परत कारण तेच आहे की ह्याचा संबंध हा बाबरी मशिदीशी नाही तर या आंतर्राष्ट्रीय दहशतवादाचा संबंध हा आंतर्राष्ट्रीय भूराजकीय घडामोडींशी आणि त्यात आपण सातत्याने घेतलेल्या नाकर्त्या अथवा पडत्या भुमिकेशी आहे आणि हा लेखाचा/चर्चेचा मूळ मुद्दा आहे. आणि आपल्याला सेक्युलॅरीझमचे लाडके वाक्य माहीत आहेचः "दहशतवादाला धर्म नसतो" म्हणून!
श्री. विकास,
अतिशय संयमीत व योग्य ताळमेळ असलेला लेख योग्य उदाहरणांसह व मिमांसेसह दिलात. अभिनंदन!
काही लोक पूर्वग्रह असल्याने जाणूनबुजून हे त्यांच्या मनाला पटू देणार नाहीत व सगळे काही बाबरी प्रकरणाच्या माथ्यावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करतील हे लेख वाचतानाच ध्यानात आले होते. प्रतिसादांवरुन तो अंदाच चुकला नाही हे सिद्ध झाले.
बाकी त्यांचेही खरेच आहे म्हणा - मुसलमान कधीच दहशतवादी कृत्ये करीत नव्हते. हिंदूंनीच शेकडो वर्षे स्वतःची देवळे पाडून घेतली व त्यावर मशिदी बांधल्या. त्या मशिदीत दानधर्माला आलेल्या मुसलमान यात्रेकरुंना आपल्या बाया-पोरी भेट दिल्या व त्यानेही संतोष झाला नाही म्हणून स्वतःच्या प्रिय मातृभूमीचे भागच दान केले.
आपला,
(उद्विग्न) भास्कर
आम्ही येथे वसतो.
व्यक्ती वा संघटना हे शब्दांचे खेळ आहेत. बाबरी पतनाच्या निमित्ताने परदेशी शक्तींची मदत घेऊन कट रचणे, त्यासाठी पैसा पुरवठा करणे, माणसे (देशी/परदेशी) तयार करणे, हे प्रथमच झाले. त्यापूर्वी च्या कोणत्याही दंगलीत असे झाले नव्हते. दाउद आणि आयएसाआय एकत्र येण्याची सुरुवातदेखिल इथेच झाली.
अर्थात, बाबरी प्रकरण घडले नसते तरी हे कधी घडलेच नसते असे नाही, पण बाबरी पतनाने याची सुरुवात झाली हेही खरेच. बाबरी पतन आणि १९९२ चे बॉम्ब्स्फोट यांचा परस्परसंबंध सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट असताना कोंबडे झाकण्याचा प्रयत्न कशापायी?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
कोंबडे झाकण्याचा प्रयत्न
माझे देखील तेच म्हणणे आहे की आपल्यासारखी माणसे बाबरीकडे बोट दाखवत आज ज्यांच्यामुळे इतकी निष्पाप माणसे मेली, पोलीस मेले त्या गुन्हेगारांविरुद्ध ठोस पावले उचला म्हणायच्या ऐवजी ज्या गोष्टीचा संबंध नाही ते दाखवून हे अतिरेक्यांचे कोंबडे झाकण्याचा प्रयत्न करत आहात, असेच वाटते. काय गंमत आहे, सेक्युलर म्हणणारेच कायद्यापेक्षा, धर्माच्या नजरेतून जास्त पहात आहेत असे वाटते. :-)
दाउद आणि आयएसाआय एकत्र येण्याची सुरुवातदेखिल इथेच झाली.
दाउदला, त्यावेळेस त्याच्या वेश्याव्यवसाय, ड्रग्ज, आणि जुगारातील पैशाचे (कदाचीत आता आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा व्यापार) याचे पडले होते, मुसलमानांचे अथवा मुसलमान धर्माचे पडले नव्हते... तेच आयएसआय च्या बाबतीत त्यांना भारतात घातपाती कृत्ये त्यांच्या (पाकच्या आणि पाक सैन्याच्या) राजकीय मह्त्वाकांक्षा आणि वैयक्तिक स्वार्थाच्या पोळ्या भाजत ठेवण्यासाठी करायची आहेत हे आपल्याला माहीत असेलच. त्याचा संबंध बाबरीच काय पण साधा मुस्लीम धर्मासाठी लावणे पण ना-पाक आहे :-)
व्यक्ती वा संघटना हे शब्दांचे खेळ आहेत.... बाबरी पतन आणि १९९२ चे बॉम्ब्स्फोट यांचा परस्परसंबंध सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट असताना कोंबडे झाकण्याचा प्रयत्न कशापायी?
मी शब्द वापरताना त्याला अर्थ असलेले वापरलेत. खेळ करायला वापरत नाही. अशा मोठ्या कारवाया (एकाच वेळी अनेक ठिकाणी बेकायदेशीर स्फोटके आणून उडवणे) एखादी व्यक्ती करत नसते. त्याच्या मागे संघटना असाव्या लागतात. बाबरीचा आणि १९९३चे (९२चे नाही) बाँबस्फोट यांचा काही संबंध नाही तर हा संबंध दाउद्च्या माफिया टोळीला मुंबई पोलीसांकडून मिळालेल्या तत्कालीन शेवटच्या धक्क्याला उत्तर म्हणून आहे हेच वरती दाखवून दिले आहे. परत म्हणतो की एकाही अतिरेकी संघटनेने ते हल्ले बाबरी मशिदीला उत्तर म्हणून केलेत असे जाहीर केले नव्हते. अगदी आत्ता पण "डेक्कन मुजाहीदीन" ने पाठवलेल्या इ-मेल प्रमाणे त्यांना त्यांचे सर्व मुजाहीदीन तुरूंगातून सोडवून हवेत अशी एक अट आहे आणि हे मुजाहीदीन हे काश्मिरसंबधात कारवाया करतात हे आपल्याला माहीत असेलच.
माझे देखील तेच म्हणणे आहे की आपल्यासारखी माणसे बाबरीकडे बोट दाखवत आज ज्यांच्यामुळे इतकी निष्पाप माणसे मेली, पोलीस मेले त्या गुन्हेगारांविरुद्ध ठोस पावले उचला म्हणायच्या ऐवजी ज्या गोष्टीचा संबंध नाही ते दाखवून हे अतिरेक्यांचे कोंबडे झाकण्याचा प्रयत्न करत आहात
कृपया माझ्या कोठल्या प्रतिसादातून मी गुन्हेगारांविरुद्ध ठोस पावले उचलू नये असे म्हतले ते दाखवून द्यावी, ही विनंती.
बाबरीकांडापासून हे सर्व सुरू झाले असे म्हणणे म्हणजे १९९२ च्या बॉम्बस्फोटापासून सुरू झालेल्या दहशतवादाचे समर्थन करणे असे आपणास का वाटावे, हे कळत नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
कृपया माझ्या कोठल्या प्रतिसादातून मी गुन्हेगारांविरुद्ध ठोस पावले उचलू नये असे म्हतले ते दाखवून द्यावी, ही विनंती.
आपण गुन्हेगारांबद्दल अथवा दहशतवादांबद्दल ठोस पावले उचलली पाहीजेत असे पण म्हणाला असाल तर गोष्ट वेगळी आहे...
बाबरीकांडापासून हे सर्व सुरू झाले असे म्हणणे म्हणजे १९९२ च्या बॉम्बस्फोटापासून सुरू झालेल्या दहशतवादाचे समर्थन करणे असे आपणास का वाटावे, हे कळत नाही.
मला सांगा जर कोणी मुंबई दंगलीचे विश्लेषण करताना राधाबाई चाळ आणली, गुजरात दंगलीचे विश्लेषण करताना गोध्रा रेल्वे प्रसंग आणला तर ते योग्य आहे का? त्या त्या वेळेस ज्या काही हिंसक कारवाया चालल्या असतील तेंव्हा त्यांना त्या एकाच मुद्द्यावरून विरोध करून कुठलेही विश्लेषण देत न बसणे योग्य नाही का?
पण त्या ऐवजी बाबरी मशिद आणून कडवे हिंदू म्हणायचे आणि आत्ता जे काही झाले त्याला जबाबदार असणार्यांना साधे दहशतवादी पण म्हणायचे नाही, गुन्हेगार म्हणायचे? हे काय योग्य वाटते? ते काय सीएसटीवर पाकीटमार करत होते का मंगळसुत्री खेचत होते? ते दहशत तयार करत होते, ते राष्ट्रविरोधी आणि मानवता विरोधी कारवाया करत होते, त्यांना आधी गुन्हेगार म्हणण्याऐवजी दहशतवादी म्हणा मग पुढे बोलू.
त्यांना आधी गुन्हेगार म्हणण्याऐवजी दहशतवादी म्हणा मग पुढे बोलू.
कृपया मी याच धाग्यावर दिलेला पहिला प्रतिसाद पुन्हा एकवार वाचा - http://misalpav.com/comment/reply/4939/71856
त्यातील एक वाक्य असे आहे -
परंतु, आंतरराष्ट्रीय परिमाण लाभलेल्या संघटीत दहशतवादाची चुणूक १९९३ च्या बॉम्बस्फोटातच दिसली
असो, हिंदुत्ववादी नसणे म्हणजे दहशतवाद्यांचे मित्र असणे किंवा दहशतवाचा विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी असणे आवश्यक आहे, अशी काहिशी आपली समजूत दिसते. तशी ती नसेल, तर उत्तम. पण असेल, तर ती समजूत चुकीची आहे, असे सांगावेसे वाटते.
(रूढार्थाने हिंदुत्ववादी नसलेला, हिंदू धर्माचा रास्त अभिमानी) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
असो, हिंदुत्ववादी नसणे म्हणजे दहशतवाद्यांचे मित्र असणे किंवा दहशतवाचा विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी असणे आवश्यक आहे, अशी काहिशी आपली समजूत दिसते. तशी ती नसेल, तर उत्तम. पण असेल, तर ती समजूत चुकीची आहे, असे सांगावेसे वाटते.
आपण कोणते विचारधारेचे आहात अथवा नाही, मी कुठल्या विचारधारेचा आहे अथवा नाही याने हा दहशतवाद थांबणार नाही. हिंदूत्ववादी नसणे म्हणजे दहशतवाद्यांचे मित्र असणे असा मी कुठे म्हणालो? उलटे मी धनंजयला त्याच्या चर्चेत काय म्हणालो ते पहा: "मुंबई प्रकरणानंतर्च्या प्रत्येक चर्चेत कोणीतरी एकाबाजूने असते आणि कोणीतरी विरोधात. म्हणले तर दोघेही प्रामाणिक आहेत."
प्रश्न प्रामाणिकपणाचा आणि विचारधारेचा नाही आहे तर, तो आहे चुकीच्या वेळेस चुकीचे विश्लेषण करण्याचा. आणि आपल्याला माहीत असेलच दोन चुकांनी एक बरोबर होत नाही ते...
जेंव्हा आत्ता ऐरणीवर असलेला विषय सोडून - आणि तो दहशतवाद हा आहे, उगाच कुठलेतरी बौद्धीक विश्लेषण करायचे, करायचे ते करायचे वर त्या संदर्भात "कडवे" हिंदू वगैरे शब्द वापरायचे आणि बुद्धीभेद करायचा याला माझा विरोध आहे. तुम्ही कदाचीत म्हणाल की मी (म्हणजे सुनीलने) असे कधी म्हणले?" तर माझे देखील तेच म्हणणे आहे की मी कुठे तुमच्यावर व्यक्तिगत आरोप करतोय ज्यामुळे तुम्हाला वैयक्तिक वाटावे? तसेच माझ्या लिहीण्यात असे कुठे दिसले की ज्यात मी मुसलमानांच्या विरोधात आहे आणि त्या संदर्भात हिंदुंची आणि त्याहूनही हिंदुत्ववाद्यांची बाजू घेत आहे असे? तसे असते तर मी आमच्या कडील कँडल लाईट व्हिजील मधे मुसलमानी संस्थांशी संपर्क करायला गेलो नसतो...
बरं तुम्ही म्हणालात की आपण आंतरराष्ट्रीय दहशतवादाची चुणूक वगैरे म्हणालात आणि ते खरे आहे. पण त्याच धाग्यात ज्यांनी बाँब उडवले हे सप्रमाण सिद्ध झाले त्यांना "गुन्हेगार"च म्हणालात. त्याने परत माझे काही बिघडत नाही, तो काही विकास-सुनील हा वाद नाही... पण असेच म्हणणारे येथे अथवा इतरत्र ज्या हिंदूंवर अजून साधे आरोपपत्र पण ठेवले गेले नाही त्यांच्या संदर्भात "हिंदू दहशतवादी' म्हणतात आणि त्याला प्रसिद्धी देतात ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे. बरे आज एकही प्रमुख हिंदू पुढारी/पक्ष/संघटना असे म्हणत नाही आहे की सिद्ध झाल्यास त्यांना शिक्षा करू नका म्हणून...पण जे सिद्ध नाही तेथे धर्माच्या नावाने दहशतवादी म्हणायचे आणि जे सिद्ध झाले तेथे "गुन्हेगार" म्हणायचे आणि परत तसे का झाले याची कारणे देत परत इतरांना (म्हणजे हिंदूंनाच) दोषी ठरवायचे. ह्याला बुद्धीभेद आणि समाजभेद म्हणतात.
विचार करा , अशीच कारणे देत जर शिख १९८३च्या दंगलीचा सूड म्हणून अजूनही मारत बसले, तसेच इतर देशात होत राहीले म्हणजे - अमेरिकेने जपान विरुद्ध, जपानने अमेरिकेविरुद्ध, (चुकून दम असला तर) भारताने चीन विरुद्ध करत बसले तर काय होईल आणि प्रत्येक वेळेस अशी कारणे दिली जातील का? याचे उत्तर नाही असे आहे आणि तसेच असायला हवे. पण मग हेच उत्तर आत्ता पण लागू आहे. उगाच बाबरी मशिद प्रकरणाचे थडगे उकरून काढायची गरज नाही किंबहूना ते करून आत्ता ज्यांचे बळी पडलेत त्यांची नकळत क्रूर थट्टाच होत आहे असे वाटते.
याहून जास्त काय लिहू?
पण असेच म्हणणारे येथे अथवा इतरत्र ज्या हिंदूंवर अजून साधे आरोपपत्र पण ठेवले गेले नाही त्यांच्या संदर्भात "हिंदू दहशतवादी' म्हणतात आणि त्याला प्रसिद्धी देतात ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे. बरे आज एकही प्रमुख हिंदू पुढारी/पक्ष/संघटना असे म्हणत नाही आहे की सिद्ध झाल्यास त्यांना शिक्षा करू नका म्हणून...पण जे सिद्ध नाही तेथे धर्माच्या नावाने दहशतवादी म्हणायचे आणि जे सिद्ध झाले तेथे "गुन्हेगार" म्हणायचे आणि परत तसे का झाले याची कारणे देत परत इतरांना (म्हणजे हिंदूंनाच) दोषी ठरवायचे.
सामनातल्या अग्रलेखातल्या शेवटच्या परिच्छेदाबद्दल काय म्हणायचे आहे?
ठळक वाक्येः
इस्लामी दहशतवादास तोंड देण्यास हिंदू दहशतवादही तयार झाला पाहिजे
इस्लामी आक्रमणाबद्दल फक्त दंड थोपटून नव्हे तर बॉम्ब आपटून तयार असायला हवे.
हिंदुत्त्ववाद्यांनी स्फोट घडवले हे वाचून मन प्रसन्न होते.
फुसक्या बॉम्बचे पीक काढून हिंदूंची इज्जत घालवू नका.
हा काही दिवसांपूर्वीचा नमुना... साध्वी बाईला पकडल्यावर आलेले सामन्यातले सगळे अग्रलेख पाहा. सगळीकडे तिचे समर्थन केले आहे.
आज मुसलमानांना स्टीरीओटाईप करून त्यांच्यावर जसे सरसकट आरोप होत आहेत तसे हिंदूंबद्दल टाळायचे असेल तर अशा प्रवृत्तीला आवर घालायला नको का? ह्या असल्या लोकांमुळे स्वतःला हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटते.
सर्वप्रथम माझे आपणच ठळक केलेले वाक्य पहा (पुन्हा ठळक करून लिहीत आहे): बरे आज एकही प्रमुख हिंदू पुढारी/पक्ष/संघटना असे म्हणत नाही आहे की सिद्ध झाल्यास त्यांना शिक्षा करू नका म्हणून.
तो अग्रलेख तिरकस (सार्कॅस्टीक) आहे, ह्याची आपल्याला कल्पना असेलच, पण तसे धरले नाही तरी, आपण दिलेला संदर्भ हा जास्त करून दहशतवादास (शिवसेना/ठाकर्यांचा भाषेत "इस्लामी दहशतवादास") कसे उत्तर देयचे या संदर्भात सामन्यातील अग्रलेखात काय आले आहे.
आता आपण २९ नोव्हेंबरच्या अग्रलेखातील शेवटचा परीच्छेद पहा: येथे संपूर्ण टंकतोय. (परत यात काही शिवसेना/ठाकरे/सामना यांचे मत बरोबर का चूक ह्या संदर्भात नाही, फक्त काय म्हणले ते दाखवण्यासाठी पहा):
काही टिनपाट वृत्तपत्रांनी प्रश्न विचारला आहे की, करकरे यांच्यावर टिका केल्याबद्दल शिवसेना त्यांची माफी मागणार आहे काय? आम्ही हेमंत करकरेसह सर्व पोलीस हुतात्म्यांना साष्टांग दंडवत घातलेच आह, पण पोलिसांना अशा प्रकारे मरणाच्या खाईत ढकलणार्या सरकारचा धिक्कार केला आहे. "दहशतवाद विरोधी पथकास 'हिंदू' संघटनांच्या मागे लावून इस्लामी आतंकवादास मोकळे रान देणार्या राज्यकर्त्यांची खेटरानेच पूजा करायला हवी. करकरे, कामठे व साळसकर यांनी बेडरपणे दहशतवाद्यांचा सामना केला. आयुष्यभर ज्या बेडरपणे, झुंझारपणे ते जगले, त्याच बेडरपणाने मृत्यूशी अखेरच्या क्षणापर्यंत निकराने झुंझत त्यांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या जीवनाचा कण आणि कण राष्ट्रभक्तीने प्रेतित होता. अशी शूर माणसे अधूनमधून या पृथ्वीवर अवतार घेतात म्हणून मानवजातीला काही आशा आहेत. करकरे, कामठे, साळसकरांच्या हौतात्म्याने आशेचे दिवे जणू विझले आहेत. अतिरेक्यांचे हल्ले आजही सुरूच आहेत व लष्कराचे कमांडोज त्या दोन-पाच इस्लामी दहशतवाद्यांशी तीन दिवस युद्धच करीत आहेत. शेकडो प्रेतांचा खच पडला. रक्ताच्या नद्या वाहील्या. पोलीस व सैनिक मेले. यालाच म्हणतात दहशतवाद व या दहशतवादाचे पूर्ण उच्चाटन करण्याची खरी गरज आहे. सनातन संस्थेच्या साधकांना गडकरी रंगायतनमध्ये फुसके बाँब फोडले म्हणून जरूर कायद्याने शिक्षा ठोठवा. मालेगाव प्रकरणातील आरोपींनाही पुरावा असल्यास शिक्षा द्या, पण जणू काही हेच लोक देश जाळायला निघाले आहेत, हेच लोक दहशतवाद घडवीत असल्याचा प्रचार शिगेला नेउन काय मिळवले? हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना उलटे लटकवून मारलेत. त्या बद्दल आम्ही शाब्दिक टिका केली. पण इस्लामी दहशतवाद्यांनी चोबीस तासात मुंबईस जखमी केले व पोलीस अधिकार्यांना ठार केले. आम्ही त्याला "हौतात्म्य" म्हणतो व त्या हौतात्म्यावर श्रद्धेने, आदराने अश्रूंचा अभिषेक करून रे. टिळकांच्या शब्दात इतकेच सांगतो की, 'जिंकुनी मरणाला, जीव कुडीतून गेला!'
आता विरोधी पक्षनेते आणि भाजपचे अडवानी काय म्हणलेत ते पहा: "New Delhi, October 31:: Talking to reporters, BJP's Prime Ministerial candidate L K Advani said on Friday that if the controversial Sadhvi Pragya Singh Thakur is found guilty, she should be punished.
Advani went on to say that she has nothing to do with the BJP and if any one from any Sangh outfit found guilty of any crime that person should be brought to book. "
रा.स्व. संघाचे आत्ता गुगलल्यावर जे काही मिळाले त्याप्रमाणे त्यांच्या प्रेस रिलीज मधे असे म्हणले आहेः "Ever since this turn of events took place in the Malegaon case there has been an unrelenting cacophony about the rise of so-called 'Hindu Terror' and the involvement of the RSS and other Hindu organizations in terrorist activities not only at Malegaon but also at several other places. It is an article of faith for the RSS that it will never sponsor or support any form of violence. Being a law abiding organization committed to peace and social harmony we took a principled stand that the investigations into the case must be conducted thoroughly and professionally and truth brought out."
विहीपचे अधिकृत आत्तातरी मिळाले नाही, पण त्यांनी इतकेच म्हणलेले दिसले की, 'महीना होऊन गेला तरी आरोपपत्र ठेवले नाही, कुठल्याही अतिरेक्याची नार्को चाचणी केली जात नाही (असे ते म्हणतात, मला माहीत नाही) तर मग साध्वीची का?'
तुम्हीच दाखवा की माझे जे वर ठळक केलेले वाक्य आहे त्यात नक्की काय चूक आहे ते.
आज मुसलमानांना स्टीरीओटाईप करून त्यांच्यावर जसे सरसकट आरोप होत आहेत तसे हिंदूंबद्दल टाळायचे असेल तर अशा प्रवृत्तीला आवर घालायला नको का? ह्या असल्या लोकांमुळे स्वतःला हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटते.
स्टीरीओटाईप करयाचाच प्रश्न असेल तर मग हिंदू दहशतवाद, कडवे हिंदू असा सरसकट शिक्का मारताना काय होत असते? तेंव्हा लाजाळू पणा कुठे जातो? 'जिथे आग असते तेथे धूर असतो' हे आपल्याला माहीत असेलच. बरं मी जे काही या लेखात म्हणले आहे त्यात मुसलमानांना मुसलमान म्हणून कुठे स्टीरीओटाईप केले आहे? किंबहूना माझे म्हणणे आहे की दाऊद हा मुसलमान नाहीच (त्याला आता सेक्युलर म्हणायचे का ते तुम्ही ठरवा, :-) तो हिंदू नक्कीच नाही!). जे काही झाले आहे त्याची कारणे माझ्या लेखी भूराजकीय आहेत आणि त्यात स्पष्ट म्हणले नसले तरी आंतर्राष्ट्रीय तस्करी आहे.
पण त्यावर बोलायचे नाही. परत परत बाबरी बाबरी करत हिंदूंना झोडपायचे आणि आत्ता ऐरणीवर असलेल्या दहशतवादाच्या प्रश्नाला बगल देयची. हा काय बुद्धीवाद आहे? असला तर तो लाजीरवाणा आहे इतकेच म्हणून थांबतो.
सामन्याला अशी उपरती होणे स्वाभाविकच आहे. मरेपर्यंत करकरेंना शिव्या घातल्यानंतर आता तोंड कुठे काळे करणार.
ही बातमी देखील वाचाः
http://www.expressbuzz.com/edition/story.aspx?Title=Karkare+was+disturbed+ahead+of+death&artid=/pF7GERRZdk=&SectionID=b7ziAYMenjw=&MainSectionID=b7ziAYMenjw=&SectionName=pWehHe7IsSU=&SEO=Karkare,%20Mumbai,%20Malegaon
सामना पेपरात उघडउघड हिंदूंनी दहशतवादी व्हावे अशी चिथावणी देण्यात येते... अजून दहशतवादाच्या समर्थनाचे काय पुरावे हवेत.
सामन्याला अशी उपरती होणे स्वाभाविकच आहे. मरेपर्यंत करकरेंना शिव्या घातल्यानंतर आता तोंड कुठे काळे करणार.
एक उदाहरण द्या ज्यामधे करकर्यांना शिव्या दिल्या आहेत. ज्या अर्थी इतके बोलले जाते त्या अर्थी करकर्यांना शिव्या दिल्या असतील असे मला वाटले होते आणि अजूनही वाटते. पण म्हणून जेंव्हा मी माझ्या उत्सुकतेपोटी शोधायचा प्रयत्न केला आणि एकही दुवा मिळाला नाही. आपल्याला मिळाला तर धन्यवाद पण मिळाला नाही तर तसे अवश्य सांगा.
एटीस ला नावे ठेवली आहेत आणि ती का ते त्यांनी स्पष्ट केले आहे. जे साध्वीबरोबर वागले गेले असते ते अफझलगुरू बरोबर वागले गेले असते तर एटीस आणि सरकारला जेव्हढ्या सुडोसेक्युलर्सने शिव्या दिल्या असत्या तितक्याच त्यांनी दिल्या आहेत.
आणि हो आपल्या सादप्रतिसादातील"रे आज एकही प्रमुख हिंदू पुढारी/पक्ष/संघटना असे म्हणत नाही आहे की सिद्ध झाल्यास त्यांना शिक्षा करू नका म्हणून." या मुद्द्याचा आणि आपल्या वरील भाष्याचा काही संबंध नाही हे आहेच...
>>जे साध्वीबरोबर वागले गेले असते ते अफझलगुरू बरोबर वागले गेले असते तर एटीस आणि सरकारला जेव्हढ्या सुडोसेक्युलर्सने शिव्या दिल्या असत्या तितक्याच त्यांनी दिल्या आहेत.
म्हणजे नक्की काय करायला हवे होते साध्वीला? साध्वी आणि अफजलगुरू मध्ये असा काय भेदभाव केला म्हणे एटीएस ने?
म्हणजे नक्की काय करायला हवे होते साध्वीला? साध्वी आणि अफजलगुरू मध्ये असा काय भेदभाव केला म्हणे एटीएस ने?
मी फक्त एटीस म्हणले नाही अर एटीस आणि सरकार असे म्हणले आहे. एटीस आणि कुठल्याही कायदा संरक्षण (पोलीस इत्यादी) चे काम हे गुन्हेगारांना शोधणे, त्यांचा गुन्हा शाबीत करण्यासाठी गोळा केलेला पुरावा हा न्यायालयात सादर करणे असते. पत्रकारांसमोर जाऊन गुन्हा शाबीत होण्याआधीच गुन्हेगार असल्यासारखे बोलणे, आरोपपत्र महिनोंमहीने अगदी योग्य कारणांमुळे ठेवता आले नाही तरी मधल्याकाळात बातम्या फोडणे वगैरे अनुचीत वाटते. हे अर्थातच साध्वीबरोबर झाले आहे.
अफझलगुरूचे गुन्हे हे सर्वोच्च न्यायालयापर्यंत शाबीत झालेत तरी देखील तो निर्णय, त्यातील पुरावे मान्य नाही म्हणत सुडोसेक्युलर्स आरडाओरडा करत आहेत.
मी फक्त एटीस म्हणले नाही अर एटीस आणि सरकार असे म्हणले आहे.
माझा प्रतिसाद हा फक्त एटीएस संबधीत आहे. सरकार वगैरे मधे आणण्यात काय हशील? पुन्हा पुन्हा सुडो सेक्युलर्सचा मु्द्दा आणुन तुम्ही तेच तेच उगाळत आहात.
पत्रकारांसमोर जाऊन गुन्हा शाबीत होण्याआधीच गुन्हेगार असल्यासारखे बोलणे, आरोपपत्र महिनोंमहीने अगदी योग्य कारणांमुळे ठेवता आले नाही तरी मधल्याकाळात बातम्या फोडणे वगैरे अनुचीत वाटते.
ह्या सगळ्यात एटिएसचा कुठे आणि कसा सहभाग ह्याच दुवे द्या.
माझे सुरवातीचे (वरील अजानुकर्णाला दिलेल्या प्रतिसादातील) वाक्य - "...जे साध्वीबरोबर वागले गेले असते ते अफझलगुरू बरोबर वागले गेले असते तर एटीस आणि सरकारला जेव्हढ्या सुडोसेक्युलर्सने शिव्या दिल्या असत्या तितक्याच त्यांनी दिल्या आहेत..."
त्यावर तुमचे म्हणणे -".. साध्वी आणि अफजलगुरू मध्ये असा काय भेदभाव केला म्हणे एटीएस ने?"
त्यावर माझे स्पष्टीकरण - "...मी फक्त एटीस म्हणले नाही अर एटीस आणि सरकार असे म्हणले आहे."
त्यावर परत तुमचे तेच:- "माझा प्रतिसाद हा फक्त एटीएस संबधीत आहे. सरकार वगैरे मधे आणण्यात काय हशील?"
आता खालील उत्तर Smile
सर्वप्रथम एटीएस हा सरकारचा भाग आहेतच हे आपण दोघेही लक्षात ठेवूया. दुसरा भाग असा की एकदा गुन्हा शाबीत झाल्यावर कायद्याप्रमाणे जास्तीत जास्त शिक्षा झाली तरी काहीच चूक नाही. मग तो अफझल गुरू असोत अथवा साध्वी प्रज्ञा...असे माझे मत आहे. मात्र ते गुन्हा कायद्याने शाबीत झाल्यावर. त्या आधी कोणाला पण पकडले तरी तो/ती कथीत गुन्हेगार असतात आणि पोलीसांनी त्या संबंधात उलट सुलट बाहेर बोलणे अयोग्य आहे, कदाचीत बेकायदेशीर पण ठरू शकेल. किंबहूना त्यांना ते अडचणीत आणणारे पण ठरू शकेल. त्यांचे काम गुन्हे अन्वेषण करणे आहे लोकांसमोर जाऊन कुणालाच "ब्रँड" करणे नाही...
बाकी स्पष्टीकरण आधीच दिले आहेच की, "पत्रकारांसमोर जाऊन गुन्हा शाबीत होण्याआधीच गुन्हेगार असल्यासारखे बोलणे, आरोपपत्र महिनोंमहीने अगदी योग्य कारणांमुळे ठेवता आले नाही तरी मधल्याकाळात बातम्या फोडणे वगैरे अनुचीत वाटते."
आता आपला प्रश्न हे कशाच्या जीवावर. तर सातत्याने येणार्या बातम्यांच्या जीवावर. मला सर्व बातम्या शोधायला वेळ नाही, हौस असल्यास अवश्य पहा. एक त्याच संदर्भातील आणि माझा मुद्दा स्पष्ट करणारी बातमी खाली देत आहे:
ATS quizzes Muthalik on Malegaon blast
MANGALORE: A team from the Maharashtra Anti-Terrorism Squad on Saturday interrogated Sri Ram Sene chief Pramod Muthalik here on Saturday for over two hours on his suspected links to the Malegaon blast.
According to ATS sources, Mr. Muthalik remained calm and denied any links to the Malegaon blasts.
When he was asked about the blast accused, Lt. Col. Srikant Prasad Purohit, he reportedly said, “I saw him for the first time on television channels and newspapers after you accused him of being behind the Malegaon blast.”
The investigators also asked him about the purported telephone conversation where Purohit dwells on the “good work being done by Muthalik in Karnataka.” Mr. Muthalik was believed to have said, “He need not know me personally to be aware of the good work that I am doing.”
.....
» पुन्हा पुन्हा सुडो सेक्युलर्सचा मु्द्दा आणुन तुम्ही तेच तेच उगाळत आहात.
कारण या समस्येचे ते मूळ आहेत म्हणून
बाकी स्पष्टीकरण आधीच दिले आहेच की, "पत्रकारांसमोर जाऊन गुन्हा शाबीत होण्याआधीच गुन्हेगार असल्यासारखे बोलणे, आरोपपत्र महिनोंमहीने अगदी योग्य कारणांमुळे ठेवता आले नाही तरी मधल्याकाळात बातम्या फोडणे वगैरे अनुचीत वाटते."
तुम्ही दिलेल्या बातमीत हे कुठेही नाही.
आता आपला प्रश्न हे कशाच्या जीवावर. तर सातत्याने येणार्या बातम्यांच्या जीवावर. मला सर्व बातम्या शोधायला वेळ नाही, हौस असल्यास अवश्य पहा. एक त्याच संदर्भातील आणि माझा मुद्दा स्पष्ट करणारी बातमी खाली देत आहे: आणि वरचा प्रतिसाद वाचा.
या पुढे या विषयावर आपण नवीन चर्चा चालू केल्यास अवश्य लिहीन , येथे ट्रॅकींग करणे अवघड जाते. तुम्हाला लिहीत बसायचे असले तर अवश्य बसा.
मोदी, तोगाडियांची भाषणे ऐकून 'ते' चवताळतात आणि हाफिज सईदची 'भारताला केवळ बळाचीच भाषा समजते' ही दर्पोक्ती ऐकूनही आम्ही शांतच. इतकेच काय 'ते' (अवघे १० -१५ जण) मुंबईत येतात, २००-२५० लोकांच्या कत्तली करतात, पोलिस, एन्.एस्.जी कमांडोंना ६० तास झुलवत ठेवतात तरीही आपण ढिम्मच. आणि वर आपण मोदी-तोगाडियांना 'त्यांना' चिथावल्याबद्दल जबाबदार धरणार!
धर्मनिरपेक्षतावाद्यांनो एकदाचे जाहिर करून टाका की
१. हिंदूंनी स्वतःच आपल्या देशाची फाळणी केली आणि पाकिस्तान-बांगलादेशाचे दान त्यांना दिले.
२. दिले तेवढे दान कमी वाटल्यामुळे नंतर हिंदूंनी आपल्या जुलमी राजवटीतून आझाद काश्मीरची मुक्तता केली. आजही काश्मीर इतकी वर्षे दडपशाहीने ताब्यात ठेवल्याचा हिंदूंना पश्चात्ताप होत असून हवे असेल तर काश्मीर खोरे, आसाम किंवा त्यांना पाहिजे तो भाग द्यायची तयारी हिंदूंनी ठेवली पाहिजे.
३. फाळणीच्या वेळी आपल्याच काही लाख लोकांना हिंदूंनीच ठार मारले.
४. हजारो लोकांनी स्वखुषीने धर्मांतर केले.
५. हिंदूंनीच आपली शेकडो मंदिरे पाडली आणि ठिकठिकाणी मशिदी उभारल्या.
६. कलकत्त्यातील प्रत्यक्ष कृतीदिनापासून २ महिन्यांपूर्वी झालेली धुळ्यातील आणि ठाण्यातील राबोडीतील दंगल या सर्व गोष्टी खरोखरच घडल्याच नव्हत्या. तर हा सर्व हिंदू धर्मांधांनी मुस्लिमांविरुध्द मते कलुषित व्हावीत म्हणून काही कपोलकल्पित कहाण्या रचून केलेल्या प्रचाराचा एक भाग आहे.
तेव्हा तरी तुम्हा धर्मनिरपेक्षतावाद्यांचे समाधान होईल का पामर हिंदूंनी अजून काही त्याग करावा अशी तुमची अपेक्षा आहे?
पूर्वी माझा मराठी संकेतस्थळांवर यायचा माफक उद्देश मायबोली मराठीतून इतरांशी संवाद साधून टाईमपास करावा असा होता. पण आता धर्मनिरपेक्षतावादी (खरं म्हणजे हिंदूविरोधी) लोकांचे पितळ उघडे पाडणे हा ही एक नवीन उद्देश झाला आहे.
(धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या कारवायांमुळे वैतागलेला) विल्यम जेफरसन क्लिंटन
पूर्वी माझा मराठी संकेतस्थळांवर यायचा माफक उद्देश मायबोली मराठीतून इतरांशी संवाद साधून टाईमपास करावा असा होता. पण आता धर्मनिरपेक्षतावादी (खरं म्हणजे हिंदूविरोधी) लोकांचे पितळ उघडे पाडणे हा ही एक नवीन उद्देश झाला आहे.
माझाही उद्देश असाच आहे. हिंदुत्त्वाची राजकीय दुकानदारी करून 'हिंदुत्त्व' या शब्दाला व एकंदर हिंदुत्त्वाला कमीपणा आणणाऱ्या बारतीय जंता पक्षा सारख्या पक्षांचे पितळ उघडे पाडणे व हिंदुत्त्वाची बदनामी टाळण्याचा प्रयत्न करणे.
संतां नाही मान । देव मानीं मुसलमान ॥१॥
ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥धृ॥
घाली लोटांगण । वंदी नीचाचें चरण ॥२॥
तुका म्हणें धर्म । न कळें माजल्याचा भ्रम ॥३॥
तुमच्या प्रतिसादावर आधीच जे उत्तर दिले ते वाचले असते तर समजले असते की, मी काय म्हणालो ते,
"धन्यवाद! मला ३ लाख म्हणायचे होते. पण आत्ता आपण म्हणल्यावर परत पाहीले तर काश्मिरी पंडीतांच्या मताने ४ लाख आहे. मी मूळ लेखात हा आकडा बदलत आहे." पण कदाचीत, "आपला चष्मा केव्हढा, आपण वाचतो केव्हढे आणि त्यातले न समजता बोलतो/लिहीतो किती" या मधे आपला अंदाज गेला असावा :-). असो.
संबंधितांनी 'पाञ्चजन्य' सोडून मोदी, तोगडियांची भाषणं ऐकून 'ते' उसळले! ही 'मटा'तली बातमी वाचावी.
अस्स अस्स! म्हणजे हे १७०+ निष्पाप माणसांना मारणे, वरीष्ठ पोलीसांना मारणे, त्या ज्यूंना, कोळ्यांना, हालहाल करत मारणे, ताज-ओबेराय आणि इतर नागरी संपत्तीचा विध्वंस करणे, तीन दिवस संपूर्ण देशाला ओलीस ठेवणे, हे आणि याहून ही अधिक केवळ मोदी-तोगाडीयांची भाषणे ऐकून केले असे एकदा म्हणले की पापक्षालन झाले म्हणायचे.
मग काय हो, तसे त्या साध्वीला की अजून कुणाला जर खरेच असेच त्यांचे (म्हणजे अतिरेक्यांचे) वागणे पाहून जर वागावेसे वाटले तर योग्य ठरते का? माझ्या मते नाही. कायदा असा हातात कोणिही कोणत्याही कारणासाठी घेणे आणि निष्पापांना मारणे हे अयोग्य. त्याला कोणतेही कारणे जबाबदार असू शकत नाहीत, त्यात फक्त एकच मानसीक विकृती असते ज्याला द्वेष असे म्हणतात. पण तुम्हाला ते कसे कळणार? आणि कळले तरी कसे वळणार? :-(
अस्स अस्स! म्हणजे हे १७०+ निष्पाप माणसांना मारणे, वरीष्ठ पोलीसांना मारणे, त्या ज्यूंना, कोळ्यांना, हालहाल करत मारणे, ताज-ओबेराय आणि इतर नागरी संपत्तीचा विध्वंस करणे, तीन दिवस संपूर्ण देशाला ओलीस ठेवणे, हे आणि याहून ही अधिक केवळ मोदी-तोगाडीयांची भाषणे ऐकून केले असे एकदा म्हणले की पापक्षालन झाले म्हणायचे.
सोयीस्कर निष्कर्ष काढू नका हो काका. ती बातमी वानगीदाखल होती. वाचून झाली का? झाली असल्यास सांगावे. आणखी बरेच काही वाचण्यासारखे आहे. वाचायला देईन. लोभ असावा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
याने काय फरक पडेल. उद्धटपणा तर काढून टाकता येत नाही ना? मुद्दा कुठलाही असो. पगार आणि वाचन विचारण्याचा जो जबरदस्त उद्धटपणा आणि अरेरावी वृत्ती आहे ती कुठून काढणार? दुसर्या काही प्रतिसादात येइल परत.
असं स्वतःचे दुर्गुण दाखवायला काय आवडतं देव जाणे. पण हेही खरं की दांभिकपणा नाही कुठे. मी उद्धट आहे हे स्पष्ट आणि बिनधास्त पणे दाखवत राहायचं.
स्वगत : अरेच्या... हे पण व्यक्तिगतच झालं. असो. संपादक मंडळ जे ठरवेल ते मान्य.
याने काय फरक पडेल. उद्धटपणा तर काढून टाकता येत नाही ना? मुद्दा कुठलाही असो. पगार आणि वाचन विचारण्याचा जो जबरदस्त उद्धटपणा आणि अरेरावी वृत्ती आहे ती कुठून काढणार? दुसर्या काही प्रतिसादात येइल परत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
ही स्वाक्षरी आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
दिसते आहे. त्यातून वृत्ती ही दिसते. आणि प्रत्येक प्रतिसादात ती स्वाक्षरी पाहून सवयीने विसर पडू नये यासाठी प्रतिसादाचा टोन शक्य तितका उद्धट, कुजका, दुसर्या व्यक्तीला झोंबेल असा आणि शिवाय आपण कसे महान या स्वरुपाचा राहील याचा व्यवस्थित काळजी घेणं किंबहुना आटोकाट प्रयत्न करणं. की सरळ शब्दात मुद्द्याला मुद्दा उत्तर द्यायचंच नाही.
सरळ दिसतं हो. पण इतकं धडधडीत पणे वागणं ही मोठी गोष्ट आहे. की बिनधास्त पणे मी दांडगट आहे हे तोंडावर सांगायला हिंमत लागते. की आहे मी असाच. सरळपणा नाहीच आहे. मानलं !
मराठीत एकच शब्द आहे त्याला... असो...
सोयीस्कर निष्कर्ष काढू नका हो काका. ती बातमी वानगीदाखल होती. वाचून झाली का? झाली असल्यास सांगावे. आणखी बरेच काही वाचण्यासारखे आहे. तुमची क्षमता वाढेल तसे वाचायला देईन. लोभ असावा.
मी निष्कर्ष काय काढला असे म्हणायचे आहे? मी आपल्याबद्दल त्यात काहीच बोललो नाही तरी मी बरळतो असे का बरं वाटते? मी कुठे असे म्हणालो आहे की आपण, "मोदी-तोगाडीयांची भाषणे ऐकून केले असे एकदा म्हणले की पापक्षालन झाले" असे म्हणताहात म्हणून?
हे दहशतवादी (ह्या संदर्भात कसाब) जेंव्हा,"हिंदूंविरुद्ध चिथवण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांच्या भाषणाचं व्हिडिओ फुटेज दाखवण्यात आलं होतं," असे म्हणतात तेंव्हा, "तसे म्हणल्यावर आपले (म्हणजे कसाब चे) पापक्षालन झाले असे त्याला म्हणायचे आहे" मला सांगा यात काय चूक आहे?
या दहशतवाद्यांना "नाठाळाच्या माथी हाणू काठी" इतके म्हणून चालणार नाही... त्यांना धम्मकलाडूच दिला पाहीजे :-)
या दहशतवाद्यांना "नाठाळाच्या माथी हाणू काठी" इतके म्हणून चालणार नाही... त्यांना धम्मकलाडूच दिला पाहीजे
याला गांधीवाद म्हणणार का दहशतवाद्यांचं ब्लॅकमेलिंग? ;-)
त्यांनी आणि इतरेजनांनी हेही वाचावे. "आम्हाला असे सांगण्यात आले की आपला मोठा भाऊ [भारत] कितीतरी श्रीमंत आहे आणि आपण गरिबी आणि भूक अनुभवतो आहोत".
हे लिहीलेले शिरोधार्ध मानून आता आपण सर्वांनी गरिबी वाढवण्याच्या प्रयत्नात मग्न व्हावे!
असे जर त्या अतिरेक्यांना सांगितले असेल तर एक चांगली सुरवात आहे असे मी समजेल. पाकिस्तानच्या गरिबी आणि दारिद्र्याला तेच जबाबदार आहेत. हेही काळाच्या ओघात समजेलच आणि त्यावरचे उत्तर अशा हिंसा हे नसुन योग्य नेतृत्व आणि त्यासाठीची कृती हेच असेल. उदा. भारतातील सहकारी चळवळ, शिक्षण, स्त्रींचा सहभाग, गरिब, दलित यांना आरक्षण इत्यादी इत्यादी.
भारताची स्पर्धा करण्यापेक्षा त्यांचा याबाबतीतला आदर्श त्यांनाही प्रगतीपथावरच आणेल.
( अनंत आशावादी)
[आपण त्यांचे भाऊ आहोत]असे जर त्या अतिरेक्यांना सांगितले असेल तर एक चांगली सुरवात आहे
मान्य.
पाकिस्तानच्या गरिबी आणि दारिद्र्याला तेच जबाबदार आहेत. हेही काळाच्या ओघात समजेलच आणि त्यावरचे उत्तर अशा हिंसा हे नसुन योग्य नेतृत्व आणि त्यासाठीची कृती हेच असेल
इथे अमान्य. कारण कुठल्या आधारावर असे मानायचे? आतापर्यंतचा त्यांचा इतिहास तसे दर्शवत नाही. तेव्हा ह्या आपल्या आशावादाला आधार काय?
पूर्वापार आम्ही 'समृद्ध पाकिस्तान हा चांगला, जबाबदार शेजारी असेल' असे ऐकत/ वाचत आलो आहोत. पण तसे कधी कोईल कोण जाणे. ते आर्थिक दृष्ट्या सबल झाले (किंवा/आणि आपण 'त्यांच्या प्रेमापायी') मुद्दाम आर्थिक दृष्ट्या गरीब झालो, तरी दहशतवाद करण्याचे नवे मुद्दे उपस्थित होतीलच. येथील अनेक प्रतिसादातून तर असे दिसते आहे, की निव्वळ बाबरी अनेक दशके/शतके पुरून उरेल. नंतर गोध्रा आहेच. मला तरी आतापर्यंतच्या इतिहासातून ह्याबाबरीत (ह्याबाबतीत) 'मूव्हिंग गोलपोस्ट'च दिसतो.
विकासराव,
लेख खुप छान आहे. उठसुठ हिंदूंना बडवणार्या लोकांनी हा जरूर वाचावा.
केवळ बाबरी मशिदीमुळे भारतातील तसेच जगातील मुसलमान आज म्हणजे २००८ मध्ये (१५ वर्षानंतर ) सुध्दा जर त्याच कारनाने हिंदूंची कत्तल न्यायोचीत ठरवत असतील आणि आमचे सुडो सेक्युलर्स त्याला अनुमोदन देण्यात धन्यता मानत असतील तर ह्या वर कठोर कारवाईशिवाय पर्याय नाही असं मला वाटते.
बाकी जे लोक मुस्लीम दहशतवादाला बाबरीची प्रतिक्रिया म्हणतात त्यांनी -
खुप मागे न जाता केवळ गेल्या पन्नास-शंभर वर्षांतील खालील घटनांचा अभ्यास करावा. मुद्दे देत आहे , गुगलायला सोईचे होईल.
अल कायदा , अयमान अल जवाहीरी , त्याची इजिप्त मधील कारकिर्द, नंतर अफगाणीस्तानातील वास्तव्य, ओसामा बिन लादेन, त्याचं आणि जवाहिरीचं साटं लोटं, सौदीच्या कारभारावरील आक्षेप, त्यात अमेरिकेच्या सैन्य तळाचा मुद्दा, पुढे सद्दामची सौदीतून हकालपट्टी, अफगाणीस्तानातील सोवियत विरूध्दचे युध्द, अमेरिकेचा ओसामाला पाठींबा, तालीबानचा व मुजाहिदीन नावाच्या भस्मासुराचा उदय.
गेले पन्नास वर्षे इस्त्रायलचा प्रश्न, इरानचा आयातुल्ला खोमेणी त्याचे इराणला परतणे आणि पुढील क्रांती ( याचे प्रायोजक कोण होते ?) आज इराणला अण्व्रस्त्र का हवेत ? पाकीस्तानचा १९४८ पासूनचा काश्मिर मिळवण्याचा प्रयत्न. त्यांचं लश्कर आणि आयएसाआयच्या कारवाया.
केवळ धर्मांधताच नाहीतर यासोबतच चालणारी अर्थव्यवस्था, शस्त्रास्त्र आणि अमली पदार्थांचा बाजार, पेट्रोल मधील पैसा. पॅलेस्टाईन असो अथवा पाकिस्तान दहशतवादासाठी होत असलेला पतपुरवठा, यालाच असलेली जागतीकीकरणाची किनार, सत्तासंघर्ष.
याच वेळी भारताचं मवाळ धोरण, भारताचं सतत युध्द टाळण्याचं संयमी धोरण, भारताची प्रगतीकडे वाटचाल. तीनवेळा सरळ युध्द करून अपयश आल्याने १९८८ सालापासूनचं काश्मिर मधील आतंकवादाचं धोरण. त्याला सुरूवातीला जनतेचा प्रतिसाद , पुढे तो कमी होत गेला. आता काश्मिरमध्ये कारवाया करणारे आतंकवादी हे इराण, इराक, अफगाणीस्तान मधील व्यवसायीक लढवय्ये असतात. हा होणारा बदल. हुर्यीयत कॉन्फ्ररंसचे कमी होत जाणारे बळ. शेख अब्दुला पासून ते आज ओमर अब्दुला पर्यंत बदलत गेलेली भुमिका आदींचा अभ्यास व्हावा.
ह्यासोबतच,
अयोध्येचे राममंदीर बांधण्याचे आंदोलन कधी पासून आहे ते बघावे. संघ किंवा विहिंप स्थापन व्हायच्या आधी भारतातील अनेक संत परंपरेतील लोकांनी यासाठी आंदोलने केलेली आहेत.
राममंदीर प्रश्न भाजपने उचलला आणि त्यावर राजकारण केले, हा मुद्दा मान्य मात्र....
यामुळे आम्ही समस्त भारतीयांनी निमुट हे होणारे हल्ले पहावे आणि त्यावर सुध्दा त्यांना फाशीवर न लटकवता त्यांना पि.व्हि. नरसिंह रावांच्या हॉटेलातील बिर्याणी खाऊ घालावे अशी या सर्वांची अपेक्षा असेल तर कृपया माफ करा !!!
यापुढे हे होणे नाही. आज भारतातील सामान्य मानुस प्रतिक्रिया देण्या एवढा तरी समजदार झाला आहे.
लोकस्मृती खुप कमी असते असं म्हणतात. असं असल्यावरसुध्दा येत्या १० महिण्यांतील निवडणुकाबघता कॉग्रेस काहीतरी कठोर पावले उचलेल असं वाटतं. सोबतच यावेळी या दहशतवादाची झळ सामान्य नागरिकांपेक्षा उद्योग जगताला आणि उचभ्रु लोकांना झाल्याने ते सुध्दा भारतात आतंकवाद पसरतो आहे असं आजच साक्षात्कार झाल्यासारखे बोलताहेत. काही का कारण असेनाका, शेवटी काहीतरी कठोर पावले उचलली पाहिजेत.
तुमच्या या लेखात दाऊदचा मुस्लीम वगळता गुन्हेगार म्हणुन परिचय खरोखर खुप छान आहे. प्रत्येकाने याचा विचार करावा. मुंबई पोलीसांनी या गुन्ह्याचा शोध घेतला असता. डिसेंबर च्या आधीच म्हणजे ऑक्टोंबर मध्येच रायगड जिल्ह्यात आरडीएक्स उतरवले गेले होते असं मला आठवतं.
बॉम्बस्फोट करतांना ज्यांचा वापर करण्यात आला होता ते लोक कदाचीत बाबरीमुळे चिडलेले असु शकतात. मात्र स्फोटाचे खरे सुत्रधार जे होते ते अतिशय थंड डोक्याने हे सर्व करीत होते. बाबरी होवो अथवा न होवो. भारताच्या अर्थव्यवस्थेला हादरवण्यासाठी हे स्फोट झालेच असते आणि मुंबईतच झाले असते. त्यामागे धर्म कमी आणि अर्थ जास्त होता.
असो.
लेख छान झाला आहे. मला आवडला.
नीलकांत
नीलकांत,
आपली प्रतिक्रिया आवडली. आपण सांगीतलेल्या मुद्द्यांची सवडीने माहिती सुद्धा करुन घ्यायला आवडेल.
हिंदूंनी अरे ला कारे केले की त्यांच्या पाठीत धपाटे घालून त्यांना गप्प करणारे अनेक हिंदू असतात. हिंदूंनी आवज काढला की अचानक यांना जाग येते आणि समानतेचे सूत्र आठवते. असो....प्रत्येकाचे विचार असतात.
-- लिखाळ.
अवांतर-दाऊद इब्राहीम कासकर ला बहुतेक गुन्हेगारी जगतात करीअर करायचे होते.म्हणून तो असा वागला.कितीही झाले तरी तो एका पोलीस शिपायाचा मुलगा तसेच तात्यांच्या कोकणातील सुपुत्र होता.त्याने कोकणचो नाव मातीत मिळवल्यान.
प्रतिक्रिया
विकासराव, न
सहमत
असेच
अफगाण
बरोबर
यातले नक्की काय चालेल
मुंबईवरील हल्ल्याची मुळे
विकासराव,आ
काही विसंगती
रॉयटर
सुधारणा
पूर्वग्रह
कोंबडे झाकण्याचा प्रयत्न
तेच म्हणतोय
कृपया..
गुन्हेगार?
पुन्हा एकदा वाचा..
गैरसमज आहे
बुद्धीभेद
हे घ्या...
सामना
एक उदाहरण द्या
>>जे
म्हणजे
मी फक्त
मूळ प्रतिसादाशी संबंध
बाकी
हे परत वाचा...
अगदी बरोब्बर!
धर्मनिरपेक्षतावाद्यांना शतशः प्रणाम
द्या टाळी
खुलासा करून झाला
+१
सोयीस्कर निष्कर्ष काढू नका हो काका
तुमची
एक प्रतिसाद काढून काय होणार?
स्वाक्षरी आहे
स्वाक्षरी ...
अर्थाचा अनर्थ
या
ह्यावर आता काय करावे?
"आम्हाला
महाजन
चांगली सुरवात.
मान्य आणी अमान्य
एक कारण असू शकते..
उत्तम लेख
काही उत्तरे हवी आहेत
नीलकांत, आप
विकास