चित्रपट या विषयावरील गप्पांसाठी हा धागा. चालू व आगामी आकर्षण असलेल्या हिंदी / मराठी / इंग्रजी व अन्य भाषेतील चित्रपटाबाबत हा धागा.
काल बाहुबली पाहिला. चांगला वाटला. थ्री डी असता तर अजुन छान वाटला असता.
लहान मुलांसाठी मिनिऑन्स कसा आहे?
थ्री डी , फोर डी , आयम्याक्स थ्री डी यात काय फरक असतो?
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
14493
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाहुबली पाहिला , 3D पाहिजे
बाहुबली पाहिला , 3D पाहिजे होता, अशा वळणावर सोडला कि नंतरचा भाग पहिल्या दिवशी पहावा !
त्वरअगदी असेच म्हणतो. रामायण
In reply to बाहुबली पाहिला , 3D पाहिजे by उगा काहितरीच
त्वरअगदी असेच म्हणतो. रामायण - महाभारतावर असे पिच्चर आले तर सर्व सुपरहीरोंचं मार्केट क्षणार्धात होत्याचं नव्हतं होईल.
(हो हो, त्यात आम्हीही आलोच. :( ;) )
काहिही हां ....
In reply to त्वरअगदी असेच म्हणतो. रामायण by बॅटमॅन
काहिही हां ....
अहो काय करता मग. वैसेभी आमचा
In reply to काहिही हां .... by स्वप्नांची राणी
अहो काय करता मग. वैसेभी आमचा रोल पर्मनंट नसतो असे नोलानसाहेबांनी सांगितलेच आहे. बॅटमॅन एक सोच है-मोर दॅन अ सिंगल पर्सन. त्या अर्थे आम्ही अमरच आहोत.
पानिपत या विषयावर बिगबजेट
In reply to त्वरअगदी असेच म्हणतो. रामायण by बॅटमॅन
पानिपत या विषयावर बिगबजेट पिक्चरच्या प्रतिक्षेत...
बाहुबली
In reply to बाहुबली पाहिला , 3D पाहिजे by उगा काहितरीच
चित्रपट आवडला. एकदा तरी नक्कीच पाहावा असा आहे. (चांगला होउ शकतो वगैरे नेहमीची टीका होउ शकते.)
पण एवढा भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न करणारा हा पहिलाच चित्रपट पाहण्यात आला. युद्धासाठी जोधा अकबर मध्ये खुपच कमी लोक दाखवले होते. इथे बरेच लोक दाखवले तरी आहेत. काही ठिकाणी अॅनिमेशन वाटले पण अॅनिमेशन आणि खरे लोक यामधली सीमारेषा जेवढी छोटी करण्याचा प्रयत्न करता येइल तेवढा केला आहे. तरिही बर्याच ठिकाणी जाणवत राहते. माहिष्मती नगरीच्या अॅनिमेशन चे सर्व अॅंगलने शूटिंग आहे. त्यामुळे त्याची भव्यता ठसण्यास फायदा झाला आहे.
बाकी रथाच्या समोर तलवारी फिरत राहताहेत, कपड्याचा शत्रुवर केलेला वापर या गोष्टी इतर कुठल्या इंग्रजी चित्रपटात पाहिल्या नाही. असे करणारा हा पहिलाच चित्रपट समजावा काय?
गाणी आणि नाच या गोष्टी स्टोरी ला खुप पुढे नेतात असे वाटत नाही.
अवांतरः ह्या डायरेक्टरने मगधीरा पण दिग्दर्शित केला आहे का?
मगधीरा त्याचाच आहे.
In reply to बाहुबली by सव्यसाची
भव्यदिव्य लोकेशन्स आणि युद्धाच्या करामती यात थोडेफार साम्य जाणवते
हे चित्रपट
In reply to मगधीरा त्याचाच आहे. by dadadarekar
सुब्रमण्यमपुरम - तमिळ
कुंजिकुलेन - मल्याळम
हे चित्रपट पाहिलेत का?
आँखों देखी
काहीसा जुना, 'आँखों देखी' चित्रपट अवश्य बघावा.
आँखों देखी : सत्याचं थेट प्रक्षेपण
https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-utpal-v-4798933-NOR.html
@ 'आँखों देखी' >> पाहिला.
In reply to आँखों देखी by चित्रगुप्त
@ 'आँखों देखी' >> पाहिला. आवडलाच आवडला. साधं शांत आणि तरीही कसल्याही तत्वज्ञानाची बळजोरि न करणारं कथानक आहे. कदाचित म्हणुनच चालला नसावा. गाणीही वेगळ्या पठडितलि आणि पटकथेला साजेशी आहेत. मस्स्स्स्स्त वाटत होतं ऐकायला.
मस्त
पिक्चर छान आहे
"...क्षमा कीजए सर, मुझे ये
"...क्षमा कीजए सर, मुझे ये पता नहीं था मोती काला भी होता है..."
गोलमाल पुनरेकवार पाहतो आहे.
हजारवेळा बघावा!
In reply to "...क्षमा कीजए सर, मुझे ये by आदूबाळ
एकच नंबर!
'मुंबई-पुणे-मुंबई' या
'मुंबई-पुणे-मुंबई' या चित्रपटातील 'कधी तू' या गाण्यात स्वप्नील जोशीसोबत असणारी ती मुलगी कोण आहे, जिचा चेहरा कधीही दाखवत नाहीत? मुक्ता बर्वेपेक्षा जास्त चांगल्या बांध्याची आणि छान आहे दिसायला असे वाटते.
सुंग ची !
In reply to 'मुंबई-पुणे-मुंबई' या by एस
सुंग ची !
ते पात्राचं नाव झालं. त्या
In reply to सुंग ची ! by चिनार
ते पात्राचं नाव झालं. त्या अभिनेत्री/नर्तिकेचे नाव काय आहे?
छत्रपतींवर असे चित्रपट का
छत्रपतींवर असे चित्रपट का बनवता येऊ शकणार नाहीत. दक्षिणेकडचे दिग्दर्शक जर बाहुबली सारख्या काल्पनिक पात्रावर इतका भव्य दिव्य सिनेमा बनवू शकतात तर छत्रपतींवर किती भव्य चित्रपट बनवता येतील.
अफझल खान वधाचे पोस्टर
In reply to छत्रपतींवर असे चित्रपट का by जडभरत
अफझल खान वधाचे पोस्टर लावण्यावरून दंगे भडकत असतील तर सिनेमात काय होईल तुम्हीच कल्पना करा…
आणि अफझल खान वध गाळून छत्रपतींवर सिनेमा म्हणजे रावणाविना रामायण …
दुर्दैव आपले!
In reply to अफझल खान वधाचे पोस्टर by कहर
दुर्दैव आपले!
आणि असे करणारे ब्राम्हण नाहीत
In reply to दुर्दैव आपले! by जडभरत
आणि असे करणारे ब्राम्हण नाहीत हे सोयिस्कर रित्या विसरवले जाते
छत्रपतींवर असे चित्रपट का
अगदि मनातल बोललात.. पण परंतु किंतु त्या स्क्रिप्ट ला अप्रुव्हल किति ठिकाणावरुन आणावे लागेल कळतय का.. त्यातहि काहि नावे आणि चरित्र सिनेमातुन / स्क्रिप्ट मधुन गाळावे लागतिल्..आणि हे केल्यानंतर सुद्धा एखादि चींधि-चोर संघटना काहि तरि खुस्पट काढेलच.. मग इतकि रिस्क कुठलाहि निर्माता का घेईल?
भालजि नि सुद्धा कर्ज काढुनच आणि केवळ आपल्या निस्सिम शिव-भक्ति पायिच सुंदर चित्रपट काढले होते.
.
बाहुबली दुसर्या भागात जॉन अब्राहम आहे म्हणे
का? दुसर्या भागात बाहुबली
In reply to . by dadadarekar
का? दुसर्या भागात बाहुबली संन्यास घेऊन वस्त्रत्याग करतो का?
समर
'समर'
दिग्द. शाम बेनेगल.
जातिसंस्था व तदनुषंगिक दांभिकपणा यावर प्रखर प्रकाशझोत टाकणारा
सत्यजित रेंचा 'समाधी' पाहिलात
In reply to समर by चलत मुसाफिर
सत्यजित रेंचा 'समाधी' पाहिलात का? ओम पुरी, मोहन आगाशे, स्मिता पाटील... स्टारकास्टच पुरेशी आहे या सिनेमाबद्दल सांगायला.
..
आता नवीन आकर्षण ... बजरंगी भाइइजान आणि दृश्यम
बायोस्कोप??
कुणाला इंटरेस्ट नाही का या सिनेमात?
थोडासा रुमानी हो जाये!
थोडासा रुमानी हो जाये! पहिला आतिशय सहज, सुन्दर सिनेमा,नाना पाटेकर अप्रतीम!
बाजीराव मस्तानी
फेसबुकवर आत्ताच बाजीराव मस्तानीचे काही फोटो बघितले. तो कोणसा सिंग बरा दिसतो आहे बाजीराव म्हणून. पण प्रियंका चोप्रा काशीबाई असेल तर तिच्या कपड्यांची चांगलीच काशी केली आहे. दीपिका पदुकोण मस्तानी म्हणून धनुष्यबाण घेऊन काय विचित्रच वाटली.
हिंदी चित्रपटांत खुप ऐतिहासिक
In reply to बाजीराव मस्तानी by पैसा
हिंदी चित्रपटांत खुप ऐतिहासिक चुका असतात ज्या इतिहासाचा विद्यार्थी म्हणुन कितीही छोट्या असल्या तरी खटकतात
१ उदा जोधा अकबर मधे जोधाने तिच्या भावाला (सोनु सूद) लिहिलेल्या पत्रात प्लेन देवनागरी लिपी दाखवली आहे ते किंवा
२ लेटेस्ट बाजीराव मस्तानी मधे रणवीर सिंह हा बाजीराव च्या वेशात असताना कानात भिकबाळी च्या जागी मोत्याचे डुल दाखवले आहेत इत्यादी
जोधा राजपूत असल्याने तिच्या
In reply to हिंदी चित्रपटांत खुप ऐतिहासिक by कैलासवासी सोन्याबापु
जोधा राजपूत असल्याने तिच्या वैयक्तिक पत्रव्यवहारात देवनागरी लिपी येणे चूक नाही. मत्र मुघलांनी दुसर्या राजाला पाठवलेले फर्मान देवनागरीतले दाखवलेय, ते कैच्याकै आहे. सर्व फर्माने शुद्ध सदाशिवपेठी फारसी भाषेत असायची त्यांची.
बाकी भिकबाळी अन डूल-डीटेल्सची अपेक्षा कुणाकडून करताय सोन्याबापूसाहेब? रिकामडोक्या बॉलीवुडकडून? हाच जर सौथवाल्यांनी बनवला असता तर खचितच अॅक्युरसीकरिता जास्त कष्ट घेतले असते.
सत्यानास हो त्यांचा
In reply to जोधा राजपूत असल्याने तिच्या by बॅटमॅन
या पिक्चराबद्दल वाचतेय की काशीबाई आणि मस्तानी बाजीरावासमोर एकत्र डॅन्स करणार आहेत. एक रागावलेली आणि वैताग आलेली स्मायली द्या रे कोणीतरी! यक्क्क्क्क!
बाजीरावाचा देवदास होणार तर!
In reply to सत्यानास हो त्यांचा by पैसा
बाजीरावाचा देवदास होणार तर!
काय बोलू कळत नाही.
In reply to सत्यानास हो त्यांचा by पैसा
काय बोलू कळत नाही.
बाकी करण जोहर त्या इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा नामक तद्दन भिकार सेरीजवर पिच्चर काढणारे माहितेय का?
सारुखभाय शिवा का?
In reply to काय बोलू कळत नाही. by बॅटमॅन
सारुखभाय शिवा का? आणि किरण खेर शिवाची आई असेल. भरजरी कपडे, लग्न, समूहनृत्ये वगैरे असेलच! करू देत काय काय ते! म्याड आहेत लोक असले पिक्चर पैशे घालवून बघायला जातात ते!
ओ तै, विचार करकरूनच काटा आला
In reply to सारुखभाय शिवा का? by पैसा
ओ तै, विचार करकरूनच काटा आला ना....."प प प पार्वती" म्हणेल मग तो शंकर. आय होप दॅट मूव्ही बिकम्स अ फ्लॉप. सीरियसलि. इतके वाईट शक्यतो कुणाबद्दल चिंतीत नाही, पण आय कांट हेल्प मायसेल्फ इन धिस केस.
शिवाचा रोल वरुण धवन करणार आहे
In reply to ओ तै, विचार करकरूनच काटा आला by बॅटमॅन
शिवाचा रोल वरुण धवन करणार आहे असेच कळते. एबीसीडी मधे त्याची नृत्याची सिन्सीअॅरीटी व प्रचंड कुवत बघता शिवाचा रोल तो १००% व्यवस्थीत करु शकतो.(शिव हा उत्तम नर्तक दाखवला आहे).
इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा नामक
In reply to काय बोलू कळत नाही. by बॅटमॅन
त्याची रंगीत तालीम म्हणूनच त्याने बाहुबली प्रोड्युस केला...
प्रोड्यूसर करण जोहर नाहीये.
In reply to इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा नामक by द-बाहुबली
प्रोड्यूसर करण जोहर नाहीये. शोबू यर्लागड्डा, राघवेंद्र राव आणि प्रसाद देविनेनी हे प्रोड्यूसर आहेत.
होय...
In reply to प्रोड्यूसर करण जोहर नाहीये. by बॅटमॅन
सॉरी करन जोहरने फक्त हिंदी रिलीज केलयं. तो प्रोड्युसर नाही.
कथा म्हणून चांगली आहे कि
In reply to काय बोलू कळत नाही. by बॅटमॅन
कथा म्हणून चांगली आहे कि 'इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा'. त्याकडे ऐतिहासिक किंवा धार्मिकतेच्या दृष्टीने बघितल्यास खटकू शकते. मध्यंतरी hollywood च्या निर्मात्यानेहि पुस्तकाचे अधिकार घेतल्याचे वाचले होते. करण जोहर फार तर फार निर्माण करेल , दिग्दर्शनाची हिम्मत तो करेल असे वाटत नाही.
पण वाल्गुदस्वामी,
In reply to जोधा राजपूत असल्याने तिच्या by बॅटमॅन
जोधा ही आख्यायिका आहे ना? मी तर असं ऐकलेलं की तो इतिहासकारांचा कल्पविलास आहे.
संजय लीला भंसाली बाजीराव
In reply to बाजीराव मस्तानी by पैसा
संजय लीला भंसाली बाजीराव पेशव्यांवर सिनेमा काढणार ऐकल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया होती ...बापरे...!! पण काल प्रोमो बघितल्यावर जरा हायसं वाटतय. तरीही पूर्ण सिनेमा बघेपर्यंत खात्री नाहीये की भंसाली साहेब काशीबाई आणि मस्तानीवर डोला रे डोला टाइप काही गाणं करणार नाही...keeping fingers crossed...
ऊनपाऊस
"ऊनपाऊस" नावाचा मराठी चित्रपट आहे. कृष्ण - धवल आहे. नक्की महित नाही पण ~१९५० च्या दशकातला असेल. काही वर्षां आधी आलेला बागबान (अमिताभ बच्चन - हेमा मालिनी) ऊनपाऊस वरूनंच बनवला आहे असं वाटतं. बरीच दृश्यं तर जशीच्या तशी घेतलेली आहेत. ऊनपाऊस चॅनेल वर लागत नाही कधी आणी लई शोधून त्याची सीडी पण मिळाली नाही पुण्यात. मी दूरदर्श्न वर बघितला होता. एकदा यूट्यूब वर होता पण उडवला नंतर.
बागबान
In reply to ऊनपाऊस by नाव आडनाव
तु तिथे मीवरुन घेतला हो५आ ना ?
बरोबर, मी पण तसंच एकलं होतं.
In reply to बागबान by dadadarekar
बरोबर, मी पण तसंच एकलं होतं. पण बागबान मधली काही दृश्यं ऊनपाऊस सारखी वाटली म्हणून मला बागबान बघतांना ऊनपाऊस आठवला. उदा. चिठ्ठी वाचायच्या आधी अमिताभ बच्चनच्या चष्म्याची काच पडल्यामुळे फुटते ते आणी पुढचं सगळं एकदम तसंच आहे ऊनपाऊस मधे. अजून बरंच सारखं आहे बागबान आणी ऊनपाऊस मधे.
इनसाईड आउट हा अॅनिमेशनपट
इनसाईड आउट हा अॅनिमेशनपट मोठ्यांनापण खूप आवडेल असा आहे. आपल्या भावना आपल्याला कशा सांभाळतात, चिडवतात, बिथरवतात, तर कधी सावरतात, याची मस्त गोंडस गोष्ट आहे. थ्रीडीमध्ये बघितल्यास आणखी छान.
होय
In reply to इनसाईड आउट हा अॅनिमेशनपट by इनिगोय
माझ्या मैत्रिणीने पाहिला, ती म्हणाली की अॅनिमेशन असला तरी लहान मुलांपेक्षा मोठ्यांसाठी जास्त आहे.
मला आठवत असलेले काही सिनेमे..
मला आठवत असलेले काही सिनेमे.. A Separation, Baran, Tokyo Story, Last Vegas, Mr. Bean's Holiday आणि आपले Mr. & Mrs. Iyer , Queen, Piku, Hera Pheri ..
कधीही बघावे असे - आणि कितीही वेळा.
माझ्या मते -
मराठीत - जगाच्या पाठीवर, पाठलाग, सामना, उंबरठा, सरकारनामा, पक् पक् पकाक ,पोष्टर बाॅइज.
हिंदीत - मुघल-ए-आझम, गंगा जमना, शोले, अनुपमा, गाईड, जिस देश मे गंगा बहती है,
अर्थ, कभी हां कभी ना, जाने भी दो यारों, चक दे इंडिया, स्वदेस, लगान, दिल तो पागल है.
विंग्रजी - Schindler's List, Psycho, Silence of the Lambs, All the President's Men, Chinatown, The Pianist, Rain Man, Million Dollar Baby, Vertigo, Shutter Island.
यातले सगळे मी किमान १० वेळा पाहिले असतील. पण अजूनही ते पाहून संपलेत असं वाटत नाही. चांगलं पुस्तक जसं एकदा वाचून समाधान होत नाही, तसंच.
(Proud to be filmy)
बोका-ए-आझम
हलक्या फुलक्या हिंदी
हलक्या फुलक्या हिंदी सिनेमांमधे सई परांजपे यांचा कथा मस्तं आहे. गंभीर चित्रपटांमधे कलयुग- शशी कपूर.
इंग्रजी पीरियड फिल्म्स मधे- द अदर बोलीन गर्ल, द बटलर उत्तम.
सई परांजपे यांचा 'पपीहा' हाही
In reply to हलक्या फुलक्या हिंदी by पद्मावति
सई परांजपे यांचा 'पपीहा' हाही चित्रपट छान आहे. तसेच मूळ 'चष्मेबद्दूर' ही.
..
थ्री डी आयम्याक्स काय असते ?
बाजीरावासमोर एकत्र डॅन्स
मराठी 'रमा माधव' मध्ये सुध्दा फालतु आयटम साँग घुसडले आहे.
कुणी वास्तुपुरूष पाहीलेला आहे
कुणी वास्तुपुरूष पाहीलेला आहे काय ?
पाहिलाय छान आहे
In reply to कुणी वास्तुपुरूष पाहीलेला आहे by उगा काहितरीच
पाहिलाय छान आहे
पंचवीस हून जास्त वेळा बघितलेला एकमेव
मी पंचवीस हून जास्त वेळा बघितलेला एकमेव चित्रपट (आठ ऑस्कर लाभलेला):
.
.
याबद्दल विक्किती: (विक्कीतील माहिती)
https://en.wikipedia.org/wiki/Amadeus_(film)
माझाही परम आवडता पिच्चर. अफाट
In reply to पंचवीस हून जास्त वेळा बघितलेला एकमेव by चित्रगुप्त
माझाही परम आवडता पिच्चर. अफाट, अप्रतीम, बेफाट सुंदर, अचाट वगैरे.
तसा माझा Schindler's List
काय चित्रपट आहे हा! लियाम नीसनचा शिंडलर अफाट, राल्फ फाईन्सचा अमाॅन गाॅथ म्हणजे नखशिखांत नाझी (विशेषतः तो I pardon you सीन), बेन किंग्जलेचा इत्झॅक स्टर्न अप्रतिम. ज्यू घेट्टो नष्ट करुन नाझी सगळ्यांना श्रमछावणीत नेतात - तो सीन तर अंगावर येतो. ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रण चित्रपटातलं क्रौर्य आणि कारूण्य अजून अधोरेखित करतात. स्टीव्हन स्पीलबर्गने अनेक उत्तम चित्रपट दिग्दर्शित केलेले असतील पण अविस्मरणीय असा शिंडलर्स लिस्टच.
'शिंडलर्स लिस्ट' ह्या
In reply to तसा माझा Schindler's List by बोका-ए-आझम
'शिंडलर्स लिस्ट' ह्या चित्रपटात स्पीलबर्गने त्याचा प्राण ओतला असावा!
असाच रोमान पोलान्स्कीचा 'द पियानिस्ट'.
शिंडलर्स लिस्ट जबरादस्तच.
In reply to तसा माझा Schindler's List by बोका-ए-आझम
शिंडलर्स लिस्ट जबरादस्तच.
जेव्हा जेव्हा पाहिलाय तेव्हा तेव्हा अंगावर काटा उभा राहिलाय.
दोघेही ज्यू असल्यामुळे
स्पीलबर्ग आणि पोलान्स्की हे दोघेही ज्यू. पोलान्स्की तर खुद्द आॅशविट्झमध्ये राहिलेला. त्याची आई तिथल्या मृत्युछावणीतल्या गॅसचेंबरमध्येच मारली गेली. स्पीलबर्गही जर्मनीतून जीव वाचवून पळून आलेल्या नातेवाईकांच्या गोष्टी ऐकत मोठा झाला. त्यामुळे दोघांनीही आपल्या चित्रपटात जीव ओतला यात काही आश्चर्य नाही.
चायनाटाऊन
तसाच पोलान्स्कीचा चायनाटाऊन. जॅक निकलसन आणि फे डनवे यांचा. त्याचं रुपांतर करायचा एक चांगला प्रयत्न नवदीप सिंगने (ज्याने अनुष्का शर्माचा NH10 दिग्दर्शित केलाय) केला होता - मनोरमा ६ फूट अंडर मध्ये.
Apocalypto, Now You See Me
Apocalypto, Now You See Me and Olympus Has Fallen ---- Must watch
and Upcoming MI-5
माझे आवडते चित्रपट
English-The Shawshank Redemption, 300, The Godfather-I, Forest Gump, It's a Wonderful Life (1946), American History X (1998),The Departed (2006), Django Unchained (2012), Lawrence of Arabia (1962),Full Metal Jacket (1987),Scarface (1983), The Bridge on the River Kwai (1957),A Beautiful Mind (2001),Fargo (1996),12 Years a Slave (2013, Groundhog Day (1993), Dead Poets Society (1989),Broken Arrow (1996),Dangerous Minds 1995 , For a Few Dollars More (1965), The Good, the Bad and the Ugly (1966), Ip Man (2008),Kid Cannabis [2014],No Mans Land, The MotorCycle Diaries,The Secret in Their Eyes (2009), City of God (2002),Foolproof (2003), God Bless America (2011),Grease (1978),Love Story (1970), Pathology[2008], A Perfect Getaway (2009), The Devil's Double (2011), The Dictator[2012], The Game (1997), The Odessa File (1974), Under the Tuscan Sun (2003) ...
हिंदीत-सलिम लन्ग्डे पे मत रो, सलाम बोम्बे,कथा(1983),इजाज़त(1987),सूरज का सातवाँ घोड़ा (1993), छोटी सी बात(1975), खट्टा मीठा (1978),बाझार (1982), अरन्यक (1994)...
.(योग्यायोग्य ठरवण्याचा अधिकार दर्श्कावर).
यादी बद्दल धन्यवाद
In reply to माझे आवडते चित्रपट by सुंड्या
Django Unchained (2012)हा कालच बघितला. खुप आवडला.
तसेच The Blues Brothers (1980)हा पण मस्त चित्रपट आहे.
चित्रपट बघायचेत
मला 'एक हजाराची नोट' पाहायचाय …
ऑनलाईन डाऊनलोड करायला लिंक मिळेल का मला …. ?
..
कट्यार काळजात घुसली.
सिनेमा येत आहे.
खान्साहेब ... सचिन.
पंडितजी .... शंकर महादेवन
चांगली गोष्ट आहे
जर 'कट्यार काळजात घुसली' वर चित्रपट येणार असेल तर. पण नाटकांवरुन आलेले चित्रपट अयशस्वी ठरतात असा इतिहास आहे - सुंदर मी होणार वरुन आज और कल, अश्रूंची झाली फुले वरुन आंसू बन गये फूल आणि तो मी नव्हेच वरुन वो मै नही - हे सगळे प्रयत्न सपशेल फसले. मराठीत जयवंत दळवींच्या पर्याय वरुन काढलेला पुढचं पाऊल चालला होता. कट्यार पण असंच अपवादात्मक ठरलं तर छान होईल.