Skip to main content

मुल्यांकन (?) : (शतशब्दकथा)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 12/07/2015 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा पेर्णास्त्रोतः ही प्रतिक्रिया हे गंमत म्हणुन लिहिलेलं आहे तस्मात हलकं घेणे हे.वे.सां.न.ल. आक्रमक प्रतिक्रियांसाठीचा ड्रॉपबॉक्स पौड फाट्यावर ठेवलेला आहे. तस्मात :)!! विद्यापीठामधल्या परिक्षा विभागाचा पेपरतपासणीविभाग प्रचंड गडबडीमधे दिसत होता. परिक्षा होउन दोन महिने गेलेले होते. त्यामुळे "निकाल" लावायचं काम जोमानं चालु होतं. सकाळीचं नवा फ्रिज घेण्यावरुन बायकोशी भांडण झालेले प्राध्यापक सोनटक्के घुश्शातचं मेकॅनिक्सचे पेपर तपासत होते. प्राध्यापकांची लेखणी गुण लिहित असली तरी डोकं मात्र सकाळच्या भांडणामधेच अडकलेलं होतं. समोरच्या पेपरवर भोपळा काढताना आपला राग शांत होतोय हे त्यांच्या लक्षात आलं. पंधरा दिवस गेले आणि निकाल लागला. त्याच्या हातामधे गुणपत्रिका होती आणि डोळ्यामधे पाणी होतं. होस्टेलच्या खोलीवर परत येउन त्यानी एकदा गुणपत्रिकेकडे पाहिलं आणि त्यानी खुर्चीवर चढुन दोरीला गाठं मारायला सुरुवात केली. सोनटक्क्यांच्या घरी नव्या फ्रिजच्या खोक्याच्या दोरीची गाठ सोडली जात होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12350
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

माझा गणित बर्‍यापैकी चांगला होता म्हणजे १०वीला १४० वगैरे . आणि डिप्लोमा प्रथम वर्षाचा पेपर चांगला लिहिला होता . ८६-९० च्या आसपास अटेम्प्ट होता. (सिनियर च्या सूचनेनुसार) एक पुरवणीसुद्धा जोडली होती. आणि निकालामध्ये शून्य मार्क आले. रीव्हॅलला टाकला तरीपण शून्य दुर्दैवाने तेव्हा उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मागवायची सोय नव्हती. सर्वच्या सर्व गणिते कशी चुकतील ? फॉर्मुला, स्टेप कशाचे तरी १-२ मार्क पडतील ना ? आजकालच्या वाढलेल्या मार्कांमागे स्वतःची उत्तरपत्रिका मागवता येते हे एक महत्वाचे कारण आहे.

In reply to by कपिलमुनी

पेपर गहाळ झाले असतील हो, परीक्षकाकडून …

वर सर्वांचे रिव्हॅलचे अनुभव वाचल्यावर आणखी एक जुनी आठवण वर आली. आमच्या वर्गात काही विषयांत तीस पैकी १७-१८ जण नापास होत. यापैकी ज्यांना २२/८० असे गुण आहेत त्यांचेही रिव्हॅलमध्ये ४० होत अन आम्ही ३६/८० वाल्यांचे गुण बदलत नसत. त्या २२ वाल्यांना पुढे जाऊन ऑल क्लिअर व्हायला १ किंवा दीड वर्ष अधिक लागायचं. यावरून मी एक काल्पनिक पद्धत मांडली होती की विद्यापीठात रिव्हॅल प्रत्यक्षात कसे होत असेल. एखाद्या विषयात नापास झालेल्या जेवढ्यांनी रिव्हॅल साठी अर्ज केला आहे त्यांच्या रोल नंबर्सच्या चिठ्ठ्या टाकायच्या. त्यातल्या ७-८ टक्के चिठ्ठ्या बाहेर काढायच्या ज्या नशिबवानांच्या चिठ्ठ्या निघतील त्यांचे मार्क पासिंगपुरते करून टाकायचे. या पद्धतीद्वारे कुणी ना कुणी दर वेळी रिव्हॅलमध्ये पास होत असल्याने रिव्हॅल हे एक आशास्थान म्हणून कायम राहते. प्रतिपेपर ₹३०० उत्पन्नही सुरु राहते.

हा मजकूर चेपूवरून साभार. ------------------------------------------------------------------------------- एक सुंदर मुलगी इंजीनियर परीक्षेच्या च्या Exam Hall मध्ये येऊन बसते. तिला बसल्यानंतर लक्षात येतं की ती 'पेन' आणायला विसरली आहे... . . . . . एक छोटीशी मुलगी धावत-धावत त्या मुलीकडे येते आणि हात पुढे करून म्हणते;'' मम्मी पेन.....''.. . वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, '' Ahhhh....मम्मी ''.... संतूर बिंतूर चा काही कमाल नाही....... ATKT होती मागच्या 8 वर्षांपासून -------------------------------------------------------------------------------