Skip to main content

अनुभव - विवियाना - राजधानी - पोट बिघडणे

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 11/07/2015 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार दिनांक ५ जुलै रोजी आमच्या घरातील दोन जण आणि त्यांचे इतर ६ मित्र मैत्रिणी ठाणे येथील विवियाना मॉल मधल्या राजधानी या प्रसिद्ध भोजनालयात जेवायला गेलो होतो. तिथले जेवण आवडण्यासारखे नव्हते, सर्व्हिस तत्पर नव्हती या गोष्टी होत्याच. दुस-या दिवशी सकाळपासून आमच्यापैकी ४ जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. हा त्रास इतका झाला की डॉक्टरांकडे जाऊन औषध घेण्याची वेळ आली. त्या दिवशी संध्याकाळपासून बाकी ४ जणांनाही असाच त्रास झाला व औषध आणण्यापर्यंत वेळ आली. भोजनालय कितीही मोठ्या नावाचं, लोकप्रिय असलं तरी त्यातील खाण्याची खाण्याचा दर्जा कसा बिघडलेला असू शकतो याचं हे उदाहरण मिळालं. ही गोष्ट परिचितांमधे शेअर करताना आणखी धक्का बसला. कारण अनेकांनी आमच्याही मित्राला, नातेवाईकांना, किंवा स्वत:ला असाच अनुभव आला आणि असाच त्रास झाला अशी माहिती दिली. त्याच दिवशी व्हॉट्सअ‍ॅप्प वर एक संदेश फ़िरत होता. ज्यात असं म्हटलं होतं की विवियाना मॉलमधे पाण्याचा काहीतरी घोळ झालेला असून दूषित पाणी लोकांना दिलं जात आहे. त्यामुळेच गेल्या एक दोन आठवड्यात विवियाना मधे ज्या ज्या लोकांनी खाणं खाल्लं त्या त्या लोकांना त्रास झाला आहे. प्रशासनाने म्हणे पाण्याचे नमुने तपासाकरिता घेतले आहेत. पण त्रास झाला त्याबद्दल कोण जबाबदारी घेणार? राजधानी इत्यादी सारख्या मोठ्या हॉटेलांनी, ज्यांनी एवढी मोठमोठी ठिकाणं थाटून ठेवलेली आहेत, याची जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षा करणं ही गोष्ट आलीच. परंतु त्याही आधी, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, म्हणजे तुम्ही जेंव्हा हे वाचाल तेंव्हा त्या नंतर तुम्ही या ठिकाणी जाऊन जेवायचं, खायचं ठरवताना पुन्हा विचार करावा, एवढाच हे शेअर करण्यामागचा हेतू आहे.

वाचने 16018
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by खटपट्या

एक शंका - प्रत्येक उपहारग्रुहाची महापालीकेतर्फे आणि अन्न आणि औषध प्रशासनातर्फे पहाणी होत नाही का?
आपण भारतातच रहाता का? इथं नेहमीची कामं (म्हणजे रिएक्टिव्ह पद्धतीची ( म्हणजे अर्ज केल्यावर होणारी)) हे लोक करत नाहीत. असली प्रो-एक्टिव्ह पद्धतीची (म्हणजे जिथं जनतेचा संबंध पण येत नाही ) ती करतील होय?
कालच एक बातमी वाचली - मालाड्मधे पाणीपुरी, भेळ, चायनीज नूडल्स बनवण्याचा कारखाना अत्यंत गलीच्छ जागी होता. त्यावर धाड घालून तो आता बंद करण्यात आला आहे.
तो पकडला गेला म्हणून. बाकी तुम्हाला काय वाटतं पाणीपुरी तल्या पुर्या, पोळी भाजीतली पोळी आणि भाजी, बटाटे वड्याचा मसाला वगैरे सगळं काय स्वच्छ वातावरणात बनतं काय? काही ठराविक सोडलं तर बाकी सगळं असंच बनत असणार.
वर सर्वसाक्षी यांनी गरमागरम वडा उत्तम सांगीतला आहे. पण बर्‍याचवेळा बटाटे एका पत्र्याच्या डब्यात कोंबून त्यावर एक अत्यंत घाण झालेली गोणी ठेउन उकडताना पाहीलेले आहे.
खरं आहे. बटाटे वडा असो वा मिसळ, जंतू सगळीकडेच वाढू शकतात. तेव्हा घरी खाणे हे उत्तम.

आजकाल बाहेर खाणेच बंद केले पाहिजे असे वाटू लागले आहे...पण मग पोट जरा जास्तच नाजूक होते आणि जर्रा कुठे काही बाहेरचे खाल्ले तर लगेच बिघडू शकते...त्यामुळे आठवड्यातून एकदा गाडीवर वडापाव खातो...बनवणारा ओळखितला आहे त्यामुळे पदार्थांची क्वालिटी उत्तम अस्ते

In reply to by टवाळ कार्टा

हा माझ्या मते अतिशय चुकीचा विचार आहे. बाहेरचं न खाल्यामुळे पोट नाजूक होत नाही. खाल्यामुळे होतं. त्यामधल्या जंतू मुळे होतं. बाकी तसं नसतं तर गटारीचं पाणी डायरेक्ट पिवून पोटं एकदम 'तयार' व्हायला हवं होतं. डागदर लोकांनी या गोष्टीवर प्रकाश पाडला तर बरं हुईल.

मद्यपान करताना बर्फ टाळावा, तो कुठल्या पाण्याचा असतो सांगता येत नाही. होय चांगली किंवा फार चांगली दारू प्यावी आणि शकतच किंवा सिंगले मालत असेल तर " नीट " प्यवि. खाणे खराब असेल तरी चांगली खरी दारू खराब असल्याचे कधी हि आढळले नाही