Skip to main content

खाऊगल्ली

लेखक त्रिवेणी यांनी गुरुवार, 16/04/2015 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा. तर चला एकमेका सहाय्य करू--------- अप्पु ताई ही पहिली रेसीपी तुझ्यासाठी ग. वाग्यांची घोटलेली भाजी साठी तेलात मोहरी, जिरं, हिंग, हळद टाकून भरपूर लसूण आणि हिरवी मिरचीची चुरचुरीत फोडणी करून घ्यायची. नंतर त्यात हिरव्या वांग्यांच्या फोडी टाकुन परतवून घ्यायचे आणि भांड्यावर ताटात पाणी टाकुन मस्त दणदणीत वाफ काढायची. 10 मिनिटात वांगी बर्या पैकी शिजतात आता त्यात मीठ टाकुन वरण घोटायच्या रवीने भाजी मस्त घोटून घ्यावी. परत 5 मिनिट शिजवून भरपूर कोथंबीर टाकुन वरण बट्टी खायची.

वाचने 59805
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

लोकांनो, एक मदत हवी आहे. २० खादाड लोकांसाठी ;) इडली सांबार करायचं आहे. मेनु फक्त आणि फक्त इडली सांबारच आहे. किती डाळ तांदूळ लागतील?

In reply to by मितान

डाळ तांदूळ प्रमाण आपापले वेगळे असते बरेचदा! मी हिवाळ्यात २ मापे तांदूळ व १ माप उ. डाळ घेते. उन्हाळ्यात ३ मापे तांदूळ व १ माप उ. डाळ घेते (त्यातही अर्धे तांदूळ उकडे व अर्धे सोना मसूरी). यापुढे सांगतीये ते प्रमाण मेजरींग कपांचे असेल त्याप्रमाणे घेणे.(माझे वेगळे माप आहे). तुला एकूण ९ मेजरींग कप्स धान्य लागणार आहे. त्यात डाळ किती व तांदूळ किती घ्यायचे ते ठरव. लोक्स जर व्यवस्थित खाणारे असतील तर याच प्रमाणात थोडा फेरफार कर. जसे, ११ मापे धान्य (डाळ +तांदूळ). आता सांबारासाठी तूरडाळ म्हणशील तर पाऊण मेजरींग कप डाळ शिजवून पेठकरकाकांच्या कृतीने सांबार केले तर आम्हाला तिघांना पुरून अजून २ जणांना पुरेल इतके उरते. पण सहभोजनाच्यावेळी पाऊण कप डाळीचे सांबार ४ जणांना पुरेल असे धरलेस तर हिशोब कर. पेठकर काकांच्या सांबाराच्या कृतीनुसार फर्मास सांबार होते, फक्त मी त्यात गूळ घालते. चटणीचे प्रमाण माझ्याकडे नाही. ती अंदाजे करते कारण मुलगा अजिबात चटणी खात नाही.

In reply to by मितान

(२.५ भाग तांदूळास १ भाग उडीद डाळ) माझ्या अंदाजाप्रमाणे उकडे तांदूळ १२.५ वाट्या आणि उडीद डाळ ५ वाट्या या प्रमाणात मध्यम आकाराच्या (१७.५ * ८) साधारण १४० इडल्या होतात. प्रत्येकी ७ इड्ल्या धरल्या तर हे प्रमाण बरोबर होईल.

साहित्य-कच्ची कैरी मेन आहे. क्रुती.- कैरीबारीकचिरा. कढईत पळीभर तेल गरम करुन त्यात मोहरी ,जिरे, चुटकीभर मेथीदाणे टाका. यात कैरीच्या फोडी टाकुन परता. यामध्ये तिखट मीठ शेंग पुड चवी पुरता गुळ टाकुन शिजुद्या.

चित्र १. pattice preparation चित्र २. pattice ready to shallow fry चित्र ३. pattice ready पहिल्या चित्रात दाखवलेले साहित्य व एक/दोन चमचे तेल. बटाटे सोडून इतर पदार्थ एकत्र करून सारण बनवावे. याशिवाय या सारणात बेदाणे छान लागतात. असल्यास एक/दोन चमचे घालावेत. शिजवलेले व सोललेले बटाटे खिसणीवर खिसून थोडे मीठ घालून त्याचे गोळे बनवून त्यात सारण भरावे व दुसर्‍या चित्रात दाखवल्याप्रमाणे पॅटिस तयार करून घ्यावेत. नॉनस्टिक पॅनमध्ये अगदी थोडे तेल घालून त्यामध्ये पॅटिस चित्र तीन मध्ये दाखवल्याप्रमाणे रंग येईतो शॅलो फ्राय करावेत. नुसते दही किंवा दह्यातील चटणीबरोबर खावेत.

In reply to by पलाश

माझ्याकडे pattice करतांना कितीही मैदयात, कोर्न्फ्लौर मध्ये आंघोळ घातली तरी फुटतात. काय करू म्हणजे फुटणार नाहीत.

In reply to by त्रिवेणी

वरच्या कृतीत शॅलो फ्राय केले आहेत. बटाटे अगदी बेताचे उकडून घ्यावेत. म्हणजे सहसा त्यात काहीही न घालतासुद्धा थोड्या तेलावर न फुटता शिजतात. तळून करायचे असतील तर मात्र उकडून खिसलेल्या बटाट्याच्या किसात या प्रकारात उपवासाची भाजणी घालावी व पॅटीस कोरड्या भाजणीत घोळवून तळावेत. उपवासाचे नसतील तेव्हा नेहमीकरता वरील प्रमाणात बटाटे बेताचे उकडून त्यात २/३ ब्रेड स्लाईस अगदी थोड्या पाण्यात भिजवून पाणी पिळून घालावे व पॅटीस करून ब्रेडच्या चुर्‍यात घोळवून तळावे. फुटतात असे वाटले तर बटाटा किसात आणखी थोडा ब्रेड भिजवून घालावा.

In reply to by त्रिवेणी

बटाटे उकडून कीसून घे ,खुप उकडलेस तर चिकटपणा येतो. मैदा, काॅर्नफ्लाॅवर घालून बाईंड करायला सोपे पडतात.

त्रि, धाग्याचे शिर्षक बघून दचकले. का ते तुला समजले असेलच. ;) तू दिलेला मसाला वापरण्यासाठी भाजी कळव ना!

रेवक्का ख्फ वर ये ग उद्या. आता परत एक वांग्याची रेसीपी देते त्या मसल्यासाठी. 1 कांदा, 1 टमाटा खिसून घ्यायचा, त्यातच खिसलेले खोबरे, हळद थोडे लाल तिखट आणि मी दिलेला मसाला 1 चमचा घे. चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घाल. आता या मिश्रणात 1चमचा तेल आणि भरपूर कोथंबीर घालून छान मिक्स कर. मिश्रणात पाणी अजिबात नको. आता वांग्याना + मध्ये कापून वरील मिश्रण भरून थोड्या जास्त तेलात वांगी शिजव. भांड्यावरच्या झाकणात पाणी घालायचे म्हणजे आतले वांगे जळत नाही.

In reply to by आदूबाळ

मी दुवा दिला असता तर तो केवळ युआरएल च्योप्य पस्ते करून दिला नसता. त्यावर क्लिक केल्यास ते पान नव्या टॅबमध्ये उघडले असते. असो दुवा देण्याचे पुण्यकर्म करत रहावे :-) .

In reply to by असंका

दुव्याच्या कोडमध्ये target = "_blank" हे जोडायचे. हे नसल्यास वाचकाला राइट क्लिक करून Open in a new window निवडावे लागते. नुसते क्लिक केल्यास सध्याचे पेज जाऊन त्याच टॅबमध्ये नवे पेज उघडते. डुबुक इडली (मिनी इडली)

मस्त धागा आहे. नविन रेसिपी शिकायला मिळतील.

पॅटीसची रेसेपी वेगळी काढा की नवा धागा म्हणुन.. मस्त आहे.. फोटो ही आहेत.. (तेच महत्वाचे.. अर्धे लोक फोटो पाहुन जातात.. कृती कोण वाचतोय!!!) जोशी साहेब.. छोले मस्त!! वेगळा धागा काडुन रेसेपीपण द्याकी.. फोटो असल्याने तुमचं जवळजवळ सगळं काम झालंच आहे! कुणी लिट्टी चोखा बनवलं आहे का कधी? मी खाल्लं आहे एका बिहारी मित्राकडे.. पुण्यात कुठे मिळेल? किंवा कुणी मला करुन खाउ घालेल का?!!!

In reply to by आदूबाळ

नवं काहीतरी सुचवल्याबद्दल धन्यवाद पिरातै. भविष्यात कधीतरी तपशीलवारपणे आलूछोले ही पाकृ टाकण्याचा प्रयत्न करीन. पूर्वीचा फटू आहे म्हणून थोडक्यात उरकणार नाही. बाकी साहेब म्हणू नका हो.

लिट्टी बाटीसारखाच प्रकार फक्त त्यातले सारण बर्‍याच वेळेला सातूच्या पिठापासून बनवतात. चोखा हा भरीतासारखाच पदार्थ वांगे, बटाटे किंवा मिश्र भांज्यांचे भरीत.

राजमा मसाला बनवताना जर राजमा दहा-बारा तास पाण्यात भिजवून ठेवला तर तो पटकन शिजतो अन चवही टिकून राहते. पण त्यामुळे राजम्याचे दाणे (किंवा बिया) ओबडधोबड दिसतात. याउलट राजमा पाण्यात अजिबात न भिजवता थेट कुकरमधे शिजवल्यास राजमा छान रेखीव दिसतो. पण चविष्टपणा नक्कीच कमी होतो. तर मंडळी किती तास राजमा भिजवला की या दोन गोष्टींचा सुवर्णमध्य साधता येईल?

In reply to by श्रीरंग_जोशी

माझ्याकडील राजमे भिजत घातल्यावर पहिले काही तास त्यात पूर्णपणे पाणी शिरलेले नसताना ओबडधोबड दिसतात पण नंतर पूर्ण भिजल्यावर व्यवस्थित दिसतात. समजा मी सकाळी भिजवले तर रात्री राजमा राईस करता येतो. म्हणजे सात ते आठ तास लागतात. पुन्हा राजमा कोणत्या प्रकारातला आहे यावरही टैम बदलेल.

डाळ कांदा किंवा डाळीची उसळ! तूर डाळ अथवा चणा डाळ करायची असेल तर जरा जास्त वेळ डाळ भिजवायची ,अथवा आम्ही करतो तस सरळ जरा जास्त पाण्यात घालून सऱळ बोटचेपी होइतो उकळायची. हे डाळ उकळलेले पाणी मी नंतर रसम साठी वापरते एखादा टोमॅटो त्यात चुरडून घालून. मसूरीची डाळ असेल तर मात्र नुसती धुवायची आणि चाळणीवर निथळत ठेवायची. तर अशी बोटचेपी अथवा मसूरीची भिजवलेली डाळ (३ माणसांना एक दिड वाटी बस होइल) अन कापलेला कांदा भरपूर. (मी अश्या उसळींसाठी थोडा मोठा कापते कांदा. जवळ जवळ दिड सेमी आकाराचा. एक वेगळीच चव येते मोठ्या कापलेल्या कांद्याची, तो मिसळुन जात नाही उसळीत) तर फोडणीला कडीपत्ता हिंग आणि कांदा भरपूर तेलात. वरुन हळद. कांदा व्यवस्थीत ट्रान्स्परन्ट झाला की त्यावर डाळ घाला. मिसळलेलं तिखट किंवा कांदालसूण मसाला, मिठ थोडासा गूळ अथवा साखर, आणि आमसूल. मस्त एकसारखे परतून घ्यायचे आणि झाकण ठेवुन शिजवायचे. भरपूर कांद्याने शिजते डाळ व्यवस्थीत. वरुन हव तर जरासा दुधाचा हबका मार! डाळ शिजली की गॅस बंद करण्यापूर्वी भरपूर कोथींबीर चिरुन!. माझ्या प्रत्येक भाजीत कांदा लसूण मसाला (आम्ही तिखट म्हणतो) जरी असला तरी आम्ही वरुन आणि पुन्हा नुसत लसूण खोबर एकत्र चेचुन घालतो. गरमा गरम चपाती बरोबर काय लागते सांगू? कालवलेल्या दही भाता बरोबर सुद्धा फर्मास! दुध भात, ताक भात सगळ एकदम चव वाढवुन जातं याच्या बरोबर!

In reply to by स्पंदना

गरमा गरम चपाती बरोबर काय लागते सांगू? >> यामुळे तर कधी बनवून पाहिन आणि खाईन असं झालंय!

मुंबईचे मूळचे भूमिपुत्र ? महेश कोठारेने एका मुलाखतीत आम्ही मुंबई चे पहिले स्थलांतरित असे सांगितले होते इस्ट इंडिया कंपनीसाठी कारकून हवे होते तेव्हा देशस्थ व प्रभू ह्यांची काही कुटुंबे स्थलांतरित झाली पुढे पारशी व्यापारासाठी आले गुजरात वरून मूळ भूमिपुत्र फक्त कोळी

In reply to by निनाद मुक्काम …

>>मूळ भूमिपुत्र फक्त कोळी ते सुद्धा गुजरातेहून आले होते म्हणे. येताना त्यांची देवी सोबत आणलंनीत 'मोमाई', तीच पुढे मुंबई झाली असं जग्गनाथ शंकरशेट यांच्या आयुष्यावरचं पुस्तक वाचनात आलं होतं मध्यंतरी त्यात वाचलं.

घरी भरपूर पिकलेल्या पपया आल्या आहेत. कोणाला याची बर्फी किंवा इतर पाकृ माहित आहे का ?

मी बऱ्याचदा गोड_आंबट वरण करण्याचा प्रयत्न केलाय tamate आणि चिंच घालून पण दोन्ही चे वरण काही केल्या जमत ना ही असे वाटते. प्लीज तुमच्या रेसिपी शेयर करा ना. दुसर्यांच्या घरी खालेले जास्त छान वाटले.(त्यांच्या रेसिपी ने केले तरी वेगळेच वाटते.)