Skip to main content

ठोसेघर धबधबा आणि कास पठार बद्दल माहिती पाहिजे आहे

लेखक प्रशांत हेबारे यांनी गुरुवार, 09/07/2015 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो मी व माझी फ्यामिली जुलै एंडला ठोसेघर धबधबा आणि कास पठार ला जायचा विचार आहे. जर आपल्यापैकी कोणी गेले असेल तर माहिती हवी आहे. आता हा काळ योग्य आहे का. तसेच धबधबा आता चालू झाला असेल का.

वाचने 6191
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

कास चा सीजन अजुन सुरु vhyayacha आहे. आणि ठोसेघर धबधबा pavus जुलै एन्ड पर्यन्त जर चांगला zala तर सुरु होईल म्हणजे बऱ्यापैकी पाणी असेल.

शनिवार - रविवार- राष्ट्रीय सुट्टी असे दिवस टाळून जावा . नाहीतर मनस्ताप होइल

धबधबा फेन्सिंग लाऊंन कायम स्वरूपी बंद करण्यात आलेला आहे । कास पठारावर प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्यान चे पिक घेण्यात येत २०११ पासून । तस्मात् कास ठोसेघर ला जाणे टाळावे। महाबलेश्वर पंचगनी है ना उदर कु जावो ।।

मागच्या वर्षी जाउन आलो दोन्ही ठिकाणी तर फुलं फारशी पहायला मिळाली नाहीत. ठोसेघर तर फार कंटाळवाणं झालं.. (पाणीच नव्हतं..) कास पठारावर जायला तिकिट लागतं. ते ऑनलाइनही मिळतं, पण काही गरज नाही. तिथे जाऊन घेता येते. फकत खुप लवकर जायचं. ६ ला वगैरे पोहचलात तर काहीच गर्दी नसेल. पण जस जसा दिवस वर चढत जातो तशी भयानक गर्दी होते. 1 2 3 4 5 ठोसेघरचे फोटो नाहीत. जाताना बामणोली पहा.. (कास पठाराच्या पुढे सरळ गेलं की काही तरी १०-१५ किमी वर असेल..) फार सुंदर जागा आहे.. तलावात बोट घेऊन फिरुन येता येते. आम्ही शंकराच्या मंदिरात गेलो होतो. ती सुद्धा शांत आणि सुंदर जागा आहे. 7 8 9 10 11 12 13 14 सर्व फोटो बहीणीने काढले आहेत.

In reply to by पिलीयन रायडर

अरे वा पिराताई! छान आहेत फोटो. रचनाविचार उल्लेखनीय आहे.