Skip to main content

(चालवून टाक चीप)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 08/07/2015 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
चालवून टाक चीप, जागतीक अर्थ मंद राजना रिसेशनात कोण बैंक होय बंद त्या युरोकुली भरीस, भांडते अजून ग्रीस बाय तू करू नकोस, एक वर्ष स्टॉक बंद गीत गात 'टू बिगा'चं, बेलआउटी उगाच सावकार आधुनीक, की मती असेल मंद गार गार एक्सपोर्ट चीन मोरली सपोर्ट गाउनी गुलाबगीत खात जा गुलाबकंद ते तुलाच रे कळेल, कोण कोण रे जळेल सांग ना अता खरेच, टोकियो कि ताशकंद? हाय ते इझी मनीत, क्यूइने कबर खणीत सांग घेउनी बुडेेल, सैमला अनर्थछंद -- स्कैमी संकेतानंद ;) नवी दिल्ली, ०८ जुलै , २०१५
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 10055
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

In reply to by एस

सध्या आयुष्याचे आणि इन्टरनेटचेही ग्रीस लागले असल्याने मिपावर येणे होत नाही. एकूणातच ऑनलाइन कमीच असतो, त्यात हेवी साइट्स बाद होतात.. आज मौका मिळाला तर चौका मारला.:)

कं लिवलंय! कं लिवलंय!! जै हो स्वामीजीकी!

लोल! काय जबरदस्त जमलंय विडंबन. मला प्रथम वाटलं की कोणीतरी (संगणकाची) डुप्लिकेट चिप विकत घेतली आहे, आणि तीच आता नाईलाजाने चालवून घेण्याबद्दल काव्य आहे. =))
त्या युरोकुली भरीस, भांडते अजून ग्रीस
पर्फेक्ट मीटर!

@ते तुलाच रे कळेल, कोण कोण रे जळेल सांग ना अता खरेच, टोकियो कि ताशकंद?>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif वारलो हो स्वामिज्जी! वारलो! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

त्रिवार दंडवत स्वामी, समजायला थोडा उशिराचा लागला, पण च्यायला भन्नाट आहे. पैजारबुवा

थोडं ऑफ होईल पण... वाह वा संकेतानंद, क्लिष्ट हा विषय सबंध त्यावरी ग़ज़ल रचून, तू दिला आम्हा आनंद खत्तरनाक लिहिलीय ! वाह ! शेअर करू का? अर्थात नावासकट.

In reply to by वेल्लाभट

हरकतनाही. सहसा तिकडे नावानिशी पोस्ट गेली तरी पुढे २-३ फॉरवर्ड्सनंतर नाव गायब होते असा अनुभव आहे. पण ढ़ापाढापी काय कुठेही चालते, सो नो इश्यूज. होऊ द्या वायरल:);)

In reply to by स्वामी संकेतानंद

मला जे इतरांना वाचायला सुचवावेसे वाटते तेव्हा त्या लेखनाचा दुवा देतो. मजकूर कॉपी पेस्ट करून कधीच कुणाला पाठवत नाही. लेख मुळातच जाहीररित्या प्रकाशित केला असल्याने त्याचा दुवा इतरांना पाठवण्याबाबत परवानगी घ्यायची गरज वाटत नाही. नंतर लेखकाने लेखन अप्रकाशित केल्यास किंवा बदल केल्यास त्या दुव्यावरून लेखाची सद्यस्थिती दिसते.

एकदम समायोचित अन मार्मिक.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आज ईथे ह्या क्षणी ते 'तत्सम' वगैरे शब्दांचा वापर करायचं पण बघत जा बापु ! बाकी स्वाम्या, फॉर्म टिकू दे रे बाबा. आवडेशच !

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्वामिज्जिंच्या फॉर्म ला क्लोरोफ़ोम बसू नये हीच विच्छा! हो ना, एवीतेवी ग्रीसच्या निमीत्ताने बोळा निघालाच आहे तर वाहू द्या गंगा ;)

एकदम मीटरमध्ये आणि भन्नाट !!विडंबन जमलेय..

Pan tumi asa amachya doctoranchya Kalajaala hath ka ghatala ओ ?