अवघडच आहे हे वळण,
चालवतही नाही आणि थांबवतही नाही..
झालंय असं काहीतरी.
वेळ काढणंच चालू आहे सध्या,
शेवटचाच आहे हा प्रवास नाहीतरी.
कणाकणाने मी झालीच आहे जीर्ण,
टाकवतही नाही आणि ठेववतही नाही..
झालंय असं काहीतरी.
मोडलंस एकदाच तर बरं होईल,
तुझी मुळं आता पसरलीत नाहीतरी.
तू यावस म्हणून रेंगाळलेय दारात,
बंद करवतही नाही आणि उघडतही नाही..
झालंय असं काहीतरी.
तोही सोपस्कार करून जा,
मनाची दारं बंदच आहेत नाहीतरी.
स्वप्नांचे डाव माझ्या रचलेस खरे,
खेळवतही नाही आणि मोडवतही नाही..
झालंय असं काहीतरी.
जा,कर विजयाचा जल्लोष,
हार मानलीच आहे मी नाहीतरी.
आयुष्याच्या संध्याकाळी मात्र,
आठवतही नाही आणि विसरतही नाही..
होईल असं काहीतरी.
डोळे मिटून फक्त एकदा मार हाक,
तुझ्याच अंतरात असेन मी नाहीतरी.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2279
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्जे ब्बात !!
ज्जे ब्बात !!
मस्त
मस्त
क्लास ! वेगळी आहे. सुरेख!
क्लास ! वेगळी आहे. सुरेख!
सुरेख
आयुष्याच्या संध्याकाळी मात्र,
आठवतही नाही आणि विसरतही नाही..
होईल असं काहीतरी.
डोळे मिटून फक्त एकदा मार हाक,
तुझ्याच अंतरात असेन मी नाहीतरी.
मस्तच
छान.
छान.
कविता खूप वेगळी आहे. पण मस्त
कविता खूप वेगळी आहे. पण मस्त आहे.
झालंय असं काहितरी या ओळीवर जो ब्रेक येतो तो मस्तच वाटतो.
वेगळी आणि मस्त कविता, आवडली.
वेगळी आणि मस्त कविता, आवडली.
मस्त मस्त मस्त
फारच सुरेख आणि प्रामाणीक पणे लिहीलेली कविता.
अतिशय भावली.
पैजारबुवा,
वेगळी
वेगळी आहे. आवडली.
पु. ले. शु.
धन्यवाद! __/\__ :)
धन्यवाद! __/\__
:)
कविता
ट्चिन्ग !
आवडली!
आवडली!