Skip to main content

पाऊस (शतशब्दकथा)

लेखक तिमा यांनी मंगळवार, 07/07/2015 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पावसाचं कवतिक तुमा लोकांनला! पावसावर गानी लिवता, मोट्या मोट्या गाड्यांमदी भिजायला जाता तिकडं डोंगरात. आमाला काय त्याचं ? दर वर्साला येतोय आन जिनं हराम करतोय बगा. आत्ता, दर वरसाला झोपड्याचं पलास्टिक बदलायला पैका कुटं हाय ? औंदा पन असाच आला माज्या दादल्यासारका आन लई झोंबून ग्येलाय कुटं तरी उंडारायला! सगली बरबादी क्येली बगा माज्या संसाराची. आता नसला तरी पान्याची बोंब व्हनार. कुटं उलथलाय कोनास टाऊक! येईल आता दुसर्‍या आखाडाच्या टायमाला आन येकद्म पडून सूड उगवंल मागील जलमाचा. मागल्या मैन्याला माजी दोन टोपली वाह्यली. आता दोनच भांड्यांत खायाला कसं बनवावं मानसानं ? प्वारं बी रडताती त्येंची बुकं भिजली म्हनून. दादल्याचं लक्ष फकस्त माज्या ............!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2413
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

दारिद्रय परिणामकारकपणे मांडलय.

In reply to by अत्रुप्त आत्मा

+१

In reply to by रातराणी

+१

कथा छान जमली आहे. सर्व प्रतिसादांशी सहमत.

आवडली असे तरी कसे म्हणू? पैजारबुवा,