माझं बाळ अगदीच लहान आहे;
अजून कड सुध्दा बदलता येत नाही त्याला.
ठेवलं तिथे ते पडून राहतं.
भूक लागली कि रडतं; पोट भरलं कि झोपतं,
झोपून झालं कि त्याच्या अबोध नजरेने टुकुर टुकुर कुठेतरी बघत राहतं.
आत्ता कुठे त्याला वस्तू आणि माणसं यांच्यातला फरक कळू लागला आहे.
अगदीच अजाण आहे माझं बाळ. अगदीच निष्पाप.
दुनियादारीचा, चांगल्या-वाईटाचा, कश्शाकशाचा त्याला गंध नाही.
कशा प्रकारच्या जगात तो आलेला आहे हेही त्याला ठाऊक नाही.
आणि या कोवळ्या मनाच्या कोऱ्या पानावर लिहिण्याची,
त्याच्यावर संस्कार करण्याची,
त्याचं बोट धरून त्याला योग्य वाटेने नेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे
हि जाणीव झाली कि मन थरथरतं.
त्या शूभ्र हृदयाला आपल्या मलीन हातांनी स्पर्श करायला संकोचतं.
मनावर विकारांची पुटं चढलेला मी,
चाचपडत धडपडत स्वत्तःच वाट शोधणारा मी
त्या निष्पाप जीवाला काय मार्ग दाखवणार ?
खरं तर मीच माझ्या बाळाच्या पायाशी बसून
नव्याने जगणं शिकण्याची गरज आहे.
| लेखनविषय: |
|---|
याद्या
3755
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुद्दा पकड में नहीं आया है।
काही मुद्दा नाहीच. मनात सहज
In reply to मुद्दा पकड में नहीं आया है। by अत्रुप्त आत्मा
सुरेख ....खूप आवडलि.
धन्यवाद!
In reply to सुरेख ....खूप आवडलि. by पद्मावति
आवडले... :)
पथिकभौ, याला कविता का
खरं सांगायचं तर मला माहिती
In reply to पथिकभौ, याला कविता का by दमामि