निरोप........
आभाळही आज जरा भरुन आलयं
डोळ्यांमध्ये आठवणींचा पाऊस दाटलायं
विशेष असं काही नाही, फक्त आज एक बाप
आपल्या मुलीला निरोप देऊन आलायं
साताजन्मांची पुण्याई एकसाथ फळाला आली
जेव्हा एक इवलिशी नाजुक परी माझ्या पदरी आली
स्मरते तुझ्या चिमुकल्या बोटांची पकड घट्ट
विश्वासावर जिच्या तुझी माझ्याशी नाळ जोडली गेली
तुझ्यावर ठरवूनही कधी मला नाही चिडता आले
तुझ्या लाडीगोडीने सदा माझ्या रागावर मात केली
नाही घातला कधी तडजोडीचा लगाम तुझ्या हौसेला
केवळ तुझ्या हट्टापायी लग्नाचीही सगळी सरबराई केली
गोड बातमीची वाट बघता बघता वर्षे उलटली
वांझपणाच्या ओझ्याखाली माझी छकुली दबून गेली
तोंड दाबून बुक्क्यांचा मारा निमुटपणे सहन करताना
'आपला पप्पा अजुन जिवंत आहे' हे कसं बरं विसरून गेली ?
दोष तुझा नाही, मीच आंधळा झालो होतो
तुझ्या हसर्या नजरेतली व्याकुळता कधी दिसलीच नाही
तुझे गप्प रहाणे ,तुझा पोक्तपणा समझलो
पण ती वादळापुर्वीची शांतता होती हे कधी कळलेच नाही
लहानपणी हट्टाने सोबतीने फिरणारा माझा बछडा
आज इतक्या दूरच्या प्रवासाला एकटाच निघुन गेलाय
बाकी विशेष असं काही नाही...फक्त आज एक बाप
आपल्या मुलीला कायमचा निरोप देऊन आलायं........
छान तरी कसं म्हणु, वेदना
:(
फार भिडली कविता!
आवडली...
तोंड दाबून बुक्क्यांचा मारा
आशय पोहचला.
मू़क मी! नि:शब्द मी!
"वांझपणाच्या ओझ्याखाली माझी
>
धन्यवाद