Skip to main content

केजरूके गुलाम

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 31/03/2015 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही. सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला. या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी. पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये? मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच. असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो. केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे. नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा. प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली. हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे. अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा. या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर). या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

वाचने 207735
प्रतिक्रिया 893

प्रतिक्रिया

In reply to by नांदेडीअन

>>> आणि मग सांगा की या सगळ्या गोंधळासाठी आम आदमी पक्षाचे सरकार कसे जबाबदार आहे. दिल्लीतील महापालिकांना कचरा सेवकांच्या पगारासाठी दिल्ली राज्य सरकारकडून निधी मिळतो. केजरीवालांनी तो निधी देण्यास नकार दिल्यामुळे ३ महिने कचरा विभाग सेवकांना पगार मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी संप केला व त्यामुळे दिल्लीत कचर्‍याचे ढीग साठले. शेवटी नायब राज्यपालांनी आपल्या अधिकारात ४८२ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केल्यामुळे संप मिटला. आता सांगा या गोंधळासाठी कोण जबाबदार आहे? आणि तुम्ही वर ज्या भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या लिंक्स दिल्या आहेत त्याला काही अर्थ नाही. केजरीवाल आणि आआपवाल्यांना उठसूट कोणावरही निराधार भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचे व्यसन आहे. शकुंतला गम्लीनची केस आठवत असेलच. दिल्लीचे मुख्य सचिव १० दिवसांच्या रजेवर जाणार होते, त्या फक्त १० दिवसांसाठी कोणाला हंगामी सचिवपदी नेमावे यासाठी सिसोदियांनी नायब राज्यपालांना जे पत्र दिले त्यात गम्लीन यांचे नाव होते. केजरीवालांना गम्लीनऐवजी पत्रातील दुसरीच व्यक्ती हंगामी सचिव म्हणून हवी होती. परंतु हंगामी सचिव म्हणून कोणाला निवडावे हा नायब राज्यपालांचा अधिकार असल्याने त्यांनी त्या फक्त १० दिवसांसाठी गम्लीन यांची नियुक्ती केल्यावर केजरीवालांचा संताप अनावर होऊन त्यांनी तमाशा केला. गम्लीन ह्या भ्रष्टाचारात गुंतलेल्या असून वीज कंपन्याशी साटेलोटे करून त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे असा त्यांनी जाहीर आरोप केला. हा आरोप अर्थातच पूर्ण खोटा होता. गम्लीन जर भ्रष्टाचारी होत्या तर हंगामी सचिवपदाच्या नावाच्या शॉर्टलिस्ट मध्ये त्यांचे नाव का पाठविले? नंतर ज्या दुसर्‍या सचिवांनी गम्लीन यांच्या नियुक्तीचे पत्र दिले त्यांच्या कार्यालयाला कुलुप लावून त्यांना काम करण्यास प्रतिबंध करण्याचे विदूषकी कृत्यही केजरीवालांनी केले. तात्पर्य, आआपवाले जे भ्रष्टाचाराचे आरोप करतात त्याकडे सरळ दुर्लक्ष करावे. >>> केजरीवाल साधा शिंकला तर त्याच्या घरापुढे मोर्चा काढणारे सतिश उपाध्याय, विजेंदर गुप्ता वगैरे मंडळी या विषयावर जास्त काही बोलतांना दिसत नाहीयेत. ३-४ वाहिन्यांवर या विषयावर चर्चा झाली आहे व भाजप प्रवक्त्याने याबाबतीत पूर्ण माहिती देऊन आक्षेप घेतलेला आहे. >>> महिन्याला २०,००० लिटर पाण्याव्यतिरिक्त अजून काय फुकट भेटत आहे दिल्लीच्या जनतेला ? ४०,००० करोडच्या बजेटमधून वीज आणि पाण्यासाठी एकूण ३०० करोडची सब्सिडी दिली आहे. त्याच्या मोबदल्यात १,००० करोडचा एक्स्ट्रा टॅक्स VAT च्या रूपात मिळवला होता. यातून नेमका कुठे आणि कशा प्रकारचा त्रास झाला जनतेला ? यालाच म्हणतात एका हाताने देऊन दुसर्‍या हाताने काढून घेणे. बादवे, व्हॅट वाढविणार असे त्या ७० कलमी जाहीरनाम्यात होते का? व्हॅट वाढीविषयी प्रत्येक गल्लीत, वॉर्डात जाऊन जनतेचे मत जाणून घेतले होते का? मुख्य म्हणजे वीज आणि पाण्याची सबसिडी एकूण ३०० कोटींची आणि व्हॅटची वाढ एकूण १००० कोटींची. म्हणजे आवळा देऊन कोहळा काढला.

In reply to by नांदेडीअन

या बजेटमध्ये मागच्या बजेटपेक्षा ३२% जास्त राखून ठेवले आहेत अर्बन डेव्हलपमेंटसाठी. (माहितीचा स्त्रोत - http://indianexpress.com/article/cities/delhi/delhi-budget-housing-funds...) शिक्षणासाठीची आर्थिक तरतूद मागच्यापेक्षा १०६ टक्क्यांनी वाढवली आहे, याबद्दलसुद्धा काही बोला.
एक गोष्ट समजत नाही. केजरीवालांकडे काय जादूची कांडी आहे का? शिक्षणावरचा खर्च १०६% नी वाढवला, अमुक दुसर्‍या गोष्टीवरचा खर्च आणखी काही टक्क्क्यांनी वाढवला, अ‍ॅडव्हर्टायझिंगवर तर ५२६ कोटींचे बजेट, वरीष्ठ आय.ए.एस द्रजाच्या पदांवर उपर्‍यांची नियुक्ती वगरे. या सगळ्याला पैसा कुठून आणणार केजरीवाल? दिल्ली सरकारचे उत्पन्न तितके वाधले का? की नंतर पैसा कमी पडला की परत 'बघा आम्हाला खर्च करायचा आहे पण केंद्र सरकार पैसा देत नाही' ही ओरड करायला हे परत तयार होणार?
केजरीवाल साधा शिंकला तर त्याच्या घरापुढे मोर्चा काढणारे सतिश उपाध्याय, विजेंदर गुप्ता वगैरे मंडळी या विषयावर जास्त काही बोलतांना दिसत नाहीयेत. किमान मी तरी याचा अर्थ असा घेतो की यात नियमबाह्य काहीही झालेले नाहीये.
मग त्याच न्यायाने हगल्यापादल्या (टिपीकल सदाशिव पेठी शब्द आहे हा. उगीच वेगळे फाटे फोडू नका) ट्विट करणारे आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर केवळ आपल्याकडेच उपाय आहे असा आविर्भाव आणणार्‍या केजरीवालांनी दिल्लीतील महापालिका बरखास्त करा ही मागणी का केली नाही? तो अधिकार दिल्ली सरकारला आहे की नाही माहित नाही. महाराष्ट्रात तरी महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमता येतो राज्य सरकारला. दिल्ली सरकारला तो अधिकार नसेल तर मग आपल्या अधिकारात नसलेल्या अनेक गोष्टींची मागणी केजरीवाल करतात त्याप्रमाणे दिल्लीतील महापालिका बरखास्त करा ही मागणी त्यांनी केलेली नाही. तुमच्याच भाशेत सांगायचे तर---किमान मी तरी याचा अर्थ असा घेतो की केजरीवालांनाही त्या कारभारात काही गैर वाटत नाही.
तुमच्याशी, श्रीगुरूजींसोबत आणि इतर १-२ जणांशी चर्चा करतांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते, पण तरीही मूर्खासारखा परत परत इथे का येतो माहित नाही.
कमालच झाली म्हणायची. कोणी तुम्हाला 'मुर्खासारखा' इथे येऊन मते मांडायची सक्ती केली आहे? तुम्ही तुमच्या इच्छेने येता आणि इतर लोक त्यावर प्रश्न विचारायला लागले तर वर म्हणायचे--'मी मूर्खासारखा का येतो हे समजत नाही' तर त्याला काही अर्थ नाही. इथल्या चर्चेत येऊन कोणी कोणावर मेहरबानी करत नाही तेव्हा असल्या वक्तव्यांना कोणीही फारशी धूप घालणार नाही.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

+१ सहमत

In reply to by नांदेडीअन

>>> पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणार नाही असे पक्षाचे सचिव दिलिप पांडे मिडियापुढे येऊन सांगत आहेत. इतका तरी बेनेफिट ऑफ डाउट देऊयात त्यांना. तरीही झालीच दरवाढ, तर मग मिळून शिव्या घालूयात की. आआपवाल्यांनी एक नवीन युक्तिवाद सुरू केलाय. जरी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर वाढविण्याचे विधेयक दिल्ली विधानसभेने एकमताने मंजूर केले असले तरी पेट्रोल व डिझेल यांची दरवाढ होईलच असे नाही असा दिलीप पांडेंचा युक्तीवाद. काल एनडीटीव्ही वाहिनीवर हेच पांडे ५२६ कोटी रूपयांच्या जाहिरातीच्या तरतुदीबद्दल बोलत होते. जरी अंदाजपत्रकात सरकारच्या (खरं तर केजरीवालांच्या) जाहिरातीसाठी ५२६ कोटी रूपयांची तरतूद केली असली तरी म्हणजे ही उच्चतम मर्यादा आहे. यापेक्षा जास्त खर्च केला जाणार नाही व एवढा खर्च केला जाईलच असे नाही. हा युक्तिवाद म्हणजे, जरी मी घरी दारूच्या १० बाटल्या आणून ठेवल्या असल्या तरी त्या सगळ्या पिणार असे नाही, असे म्हणण्यासारखे आहे. उद्या केजरीवालांचा उदोउदो करणार्‍या जाहिरातींवर सर्व ५२६ कोटी उधळले तरी हे म्हणायला मोकळे हा कायदेशीर खर्च आहे कारण विधानसभेने याला मान्यता दिली आहे. आणि कमी खर्च केले तर डांगोरा पिटायला मोकळे की बघा, ५२६ कोटी रूपये खर्चाची कायदेशीर मान्यता असून आम्ही कमी खर्च केले आणि आमचा साधेपणा सिद्ध केला. असला भंपक युक्तीवाद फक्त आपटर्र्ड्सच्याच गळी उतरू शकतो. >>>> अजून एक. मी केजरीवाल यांचा समर्थक नाहीये, मी आदमी पार्टीच्या विचारधारेचा समर्थक आहे. आणि मला कळालेली त्यांची विचारधारा म्हणजे कामं करा आणि निवडून या. (तिसर्‍यांदा लिहितोय बहुतेक हे.) इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिराच्या धर्तीवर, केजरीवाल इज आआप आणि आआप इस केजरीवाल अशी परिस्थिती आहे. >>> उगी टीका करायची म्हणून कशावरही टीका करण्यापेक्षा त्यांच्या कामावर टीका करा. काही काम करायचा प्रयत्न केला असला तर टीका होईल ना. हे मुख्यमंत्री झाल्यापासून कामाच्या नावाने शंख. आपल्या पक्षातील विरोधकांना मारहाण करून पक्षातून हाकलणे, राजस्थानमधल्या शेतकर्‍याला उचकवून आत्महत्या करायला लावणे, त्याच्या आत्महत्येचे खापर इतरांवर फोडून स्वतः नामानिराळे राहून त्याच्या आत्महत्येचा राजकीय फायदा उठविणे, स्वतःला व स्वतःच्या सहकार्‍यांना मोठमोठी सरकारी निवासस्थाने व गाड्या बहाल करणे, स्वतःचा उदोउदो करणार्‍या जाहिराती करणे, स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्रशासनात पदे निर्माण करून त्यांना सरकारी निवासस्थाने, गाड्या व प्रचंड पगारावर ठेवणे, केंद्र सरकार व नायब राज्यपालांबरोबर रोज एक नवीन वाद निर्माण करून तमाशा करणे, नावडत्या सचिवांच्या केबिनला कुलुप लावून त्यांना काम करण्यास प्रतिबंध करणे, नावडत्या सचिवांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करणे, केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला न्यायालयात आव्हान देणे इ. महत्त्वाच्या कामातच हे गर्क आहेत. >>> जवळपास दोन वर्षं झाली, एक तोमर प्रकरण सोडले तर एकही असा मुद्दा दिसत नाहीये ज्यावर खरंच आम आदमी पक्षाचा विरोध करता येईल. मफलर, लाईट बिल, योगेंद्र यादव, निसर्गोपचार केंद्र असे तर यांचे विरोधाचे मुद्दे. वरचा परिच्छेद वाचा. >>> अहो एखादा असा मुद्दा शोधून आणा ज्याच्यामुळे दिल्लीतील जनतेला त्रास होतोय, त्यांची कामं होत नाहीयेत किंवा जिथे पक्षाचे आमदार भ्रष्टाचार करत आहेत... कचरा सेवकांचे आंदोलन हे उदाहरण पुरेसे आहे. एसीबी च्या प्रमुख पदावरून वाद निर्माण करून व त्याविरूद्ध न्यायालयात जाऊन व प्रमुखांशी संपूर्ण असहकार करून एसीबीचे कामही केजरीवालांनी ठप्प केले आहे. >>> जोपर्यंत हे लोक जनतेची कामं करत आहेत, तोपर्यंत माझे त्यांना समर्थन असेल. अजून त्यांनी कामच सुरू केले नाही, तरीसुद्धा तुम्ही त्यांचे समर्थन करीत आहात.

In reply to by श्रीगुरुजी

केजरीवालांचं ४ महिन्यातलं अजून एक महत्त्वाचं काम - स्वतःला बहाल केलेल्या घरात दोन घरगुती वापराचे मीटर बसवून (त्यातला एक घरगुती कामासाठी नसून सुद्धा) दर महिन्याला लाखो रूपयांची वीज वापरणे (वीजेचं बिल अर्थातच करदात्यांच्या पैशातून जाणार).

In reply to by श्रीगुरुजी

याबद्दल तक्रार चाल्नार नाय... यथा प्रजा तथा राजा या न्यायाने ही कृती योग्य आहे, (असे लोक म्हणतात असे ऐकले आहे) =))

In reply to by डँबिस००७

>>> वीज कंपन्या अवास्तव नफा कमावतात ! म्हणुन त्यांच ऑडीट झालच पाहीजे अस म्हणणारे केजरीवाल, निवडून आल्यावर महिनाभरात ऑडीट करून नंतर अजून वीजदर कमी करणार होते हे. अजून ऑडीटचाच पत्ता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

ऑडिटच्या सद्यस्थितीबद्दल मी मागे कोणत्या तरी धाग्यावर बोललो होतो. अधिक माहितीसाठी हे वाचा. http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/CAGs-discom-audit-over-bu…

In reply to by श्रीगुरुजी

प्रत्येक वेळी स्पुन फिडिंगच करून पाहिजे का हो तुम्हाला ? त्या बातमीतला हा उतारा वाचा. "Though the auditor has finalized its report on the discoms, a source said, it would not be possible to submit the same to the state government as the matter is subjudice. " जर या रिपोर्टमध्ये आढळून आले की वीज कंपन्यांना नुकसानाऎवजी प्रॉफिटच झाले आहे, तर मग आप सरकार दिलेल्या वचनाप्रमाणे वीजेचे दर अजून कमी करेल. आणि जर या रिपोर्टमध्ये असे आढळून आले की वीज कंपन्यांनी काहीच झोल केलेला नाहीये आणि त्यांना खरंच नुकसान झाले आहे, तर मग आप सरकार आणि केजरीवाल चांगलेच तोंडावर आपटतील. मग वीज कंपन्या केजरीवाल आणि सरकारला परत कोर्टात खेचतील. इतकं सोप्पं आहे ते.

In reply to by नांदेडीअन

ठीक आहे. 'हे प्रकरण न्यायालयात आहे' हा एक्सक्यूज केजरीवाल अजून किती महिने/वर्षे वापरतात ते? बादवे, फेब्रुवारीत वीजदरात ५०% कपात केली, परंतु मागील महिन्यातच वीजेचे दर पुन्हा ६% ने वाढविलेले आहेत. भविष्यातही असेच दर वाढत राहून मुळच्या दरापेक्षा जास्त दर होणार याची खात्री आहे.

In reply to by सव्यसाची

अरविंद केजरीवाल दिल्लीला पूर्ण राज्य दर्जा मिळावा कि नाही यावर जनमत चाचणी घेण्याच्या विचारात आहेत.
खरोखरच असे सार्वमत झाले तर तो एक अत्यंत घातक पायंडा असेल. पार्लामेंट वगरे सगळे बंद करून सगळ्या गोष्टींवर सार्वमतेच घ्या. या अण्णा-केजरीवाल जोडगोळीला कायदे करायला पार्लामेंट हेच योग्य स्थान आहे, कायदे रामलीला मैदानावर होऊ शकत नाहीत असल्या गोष्टी भेजात घुसतच नाहीत. दिल्लीला पूर्ण राज्य बनविले नाही त्याचे काहीतरी कारण आहे. उगीच मनात आले म्हणून कोणी असे निर्णय बदलू शकत नाही. वॉशिंग्टनही स्वतंत्र राज्य नाही तर ते वॉशिंग्टन डी.सी हा अमेरिकेच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतला प्रदेश आहे. अमेरिकेत राज्यांना इतके अधिकार असतानाही राजधानीचे ठिकाण केंद्राने स्वतःच्ज्या अखत्यारीत ठेवले आहे. मग भारतासारख्या राज्यांना कमी अधिकार असलेल्या राज्यात ही मागणी का? आणि जरी तो निर्णय घ्यायचा असला तर तो कुठे घ्यायचा? लोकसभेत की रस्त्यावर? मतदान करणार्‍या सगळ्यांना अशा डायरेक्ट निर्णय घ्यायची इंप्ल्किएशन्स समजली असतील का? मग त्यांनी चुकीचा निर्णय घेतल्यास ती जबाबद्दारी कोण घेणार? पण या सगळ्या गोष्टी त्या आपटार्डांच्या आणि मुख्य म्हणजे त्या केजरीवालच्या टाळक्यात कशा शिरायच्या?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

घातक पायंडा आहे याच्याशी सहमत. मुळात संविधानामध्ये असे काही कलम आहे का जे जनमत चाचणी घ्यायला परवानगी देईल. जनमत चाचणीच हवी असेल तर ती निवडणूक असते असा माझा समज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर दिल्ली ला पूर्ण राज्य द्यायचे कि नाही हा मुद्दा फक्त दिल्लीकर ठरवू शकतात का? दिल्ली हि देशाची राजधानी आहे. तिथे देशाच्या संदर्भातील सर्वात महत्वाच्या गोष्टी घडत असतात. जर दिल्लीच्या संदर्भात असा प्रस्ताव असेल तर इतर लोकांनी पण आपले मत का नोंदवू नये? कुठल्याही राज्याचे विभाजन करण्यासाठी संविधान दुरुस्ती अपेक्षित असते. ज्यात २/३ बहुमत दोन्ही सभागृहात आणि १/२ राज्यांची परवानगी असे सूत्र असते. जर दिल्ली हे राज्य करायचे असल्यास ती पद्धत असेल असे वाटते. मग जनमत चाचणीसाठीही तसे काही सूत्र असावे का?

In reply to by सव्यसाची

मुळात संविधानामध्ये असे काही कलम आहे का जे जनमत चाचणी घ्यायला परवानगी देईल. जनमत चाचणीच हवी असेल तर ती निवडणूक असते असा माझा समज आहे.
संविधान? कसले संविधान? कोणते संविधान? केजरीवाल म्हणतात तोच प्रामाणिकपणा, केजरीवाल म्हणतात तेच संविधान हे तुम्हाला माहित नाही का? सगळ्या गोष्टी केजरीवाल म्हणतील तशाच व्हायला हव्यात हे तुम्हाला माहित नाही का?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

कारण राजधानीमध्ये संसद, राष्ट्रपती भवन आणि इतर महत्वाची आस्थापने असतात. देशाच्या दृष्टीने महत्वाच्या व्यक्ती भरपूर प्रमाणात असतात. तसेच वेगवेगळ्या देशांच्या consulates आणि त्या देशांचे प्रतिनिधी व अधिकारी कायम स्वरूपी असतात. विविध देशांच्या अतिमहत्वाच्या व महत्वाच्या व्यक्तींची सतत ये जा चालू असते. या सर्वांची सुरक्षा एका राज्यावर टाकू शकत नाही. त्यामुळे केजरीवाल असताना किंवा नसताना दिल्ली संपुर्ण राज्य होणे धोकादायक आहे. त्यात केजरीसारखा माणूस असताना तर नकोच.

In reply to by ट्रेड मार्क

+१ प्रशासनिक विचार केला असता राजधानीला (दिल्लीला) पूर्णच काय पण अर्ध राज्याचा दर्जा देणे ही सुद्धा घोडचूक आहे. भारतीय राजकारणाची सद्य पद्धती आणि त्यात असलेले हितसंबंध पाहता, ही चूक करणे सोपे होते पण ती निस्तरणे हे खूप गुंतागुंतीचे आणि डोकेदुखीचे आहे. करणारे करून बसले, देश मात्र पुढे बराच (? अनंत) काळ तिचे दुष्परिणाम भोगत राहील हेच दिसते आहे :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काका अगदि समर्पक आणि योग्य प्रतिसाद. राज्याच्या ऐवजि जर NCR (National Capital Region) ह्या एवढया शब्दानुसार प्रशासनिक व्यवस्था बसवायला हवी होति, अ‍ॅटलीस्ट सुरक्षेच्या कारणास्तव तरी.

मुख्य म्हणजे तो जोकर मुख्यमम्त्री असेपर्यंत तरी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा अजिबात मिळाला नाही पाहिजे. उद्या अमेरिकेचे अध्यक्ष भारत भेटीवर असताना या वायझेड माणूस कुठला तरी मुद्दा घेऊन धरण्यावर बसायचा. त्याने आणि आम आदमी पार्टीने पॅलेस्टाईनवरच्या इसराईलच्या हल्ल्याविरोधात मेणबत्ती मोर्चा काढलाच होता.अमेरिकेचा इसराइलला पाठिंबा आहे हे सगळ्यांना माहित्ये. मग म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भेटीविरोधात असले तमाशे करायलाही तो माणूस कमी करायचा नाही. त्यात भारताची नाचक्की झाली तरी याचे काय जाणार आहे? त्याला स्वतःचा उदोउओद करता आला की झाले. दिल्लीला राज्याचा दर्जा द्यायचा असेल तर जबाबदारीची जाणीव असलेला मुख्यमंत्री आहे याची खात्री करूनच द्यावा.

ऐका हो ऐका.... जगातील सर्वात स्वच्छ आणि प्रामाणिक पक्ष---आम आदमी पक्ष बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार करणार हो. ते स्वतः निवडणुक लढवणार असतील तर स्वतःचा प्रचार करायचा त्यांना अधिकार आहेच. पण ते स्वतः निवडणुक लढवणार नाहीत तर टॅक्टिकली भाजपविरोधात प्रचार करणार आहेत. आणि भाजपविरोधी आघाडीत लालूप्रसाद यादव यांचाही समावेश आहे. म्हणजेच भाजपविरोधी प्रचार याचाच अर्थ ते लालूंना मदत करणार हो.... आणि अर्थातच केजरीवाल आय.आय.टी मधले म्हणजेच हुषार असल्यामुळे बोलताना ते म्हणणार की ते भाजपविरोधी प्रचार करणार. पण भाजपविरोधी प्रचाराचा फायदा लालूंना होणार हे सूज्ञांना वेगळे सांगणे न लागे. वाचा--- http://www.firstpost.com/politics/bihar-polls-2015-aap-not-contesting-e… जर का यांना भ्रष्टाचाराची इतकीच पडली असती तर लालू सारख्या न्यायालयाने शिक्षा दिलेल्या भ्रष्ट राजकारण्याविरूध्द का बोलत नाहीत? भाजप भ्रष्ट आहे हे मान्य.पण लालू त्याच्यापेक्षा नक्कीच भ्रष्ट आहेत. तरीही हे लालूंविरूध्द काही बोलत नाहीत पण भाजपविरूध्द बोलतात याचा अर्थ स्पष्ट आहे. या माणसाचा भ्रष्टाचाराविरोधातला लढा म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. या गोष्टीविषयी नांदेडिअनसारखे आपटार्ड नेहमीप्रमाणेच काही बोलणार नाहीत. डिजगस्टींग!!

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

केजरीवालांनी ज्या तर्‍हेने प्रचार केला व निवडून आल्यानंतर त्यांचे दिल्लीत जे काही चालू आहे, ते पाहून मला जॉर्ज ऑरवेलच्या अत्यंत गाजलेल्या "अ‍ॅनिमल फार्म" या पुस्तकाची आठवण होत आहे.

आम आदमी का फैला हुआ रायता सिमटता दिख नही रहा !! आजतक पंजाबातील आआपचे तीन खासदार बंडखोरीच्या मुड मध्ये आले आहेत, संजय सींग विरुद्ध ! कुमार विश्वासच्या पी ए ने त्या मुलीला भर दिवशी धमकावले ! आआपचे पुर्वी चे कायदा मंत्री सोमनाथ भारतीनां अटकपुर्व जामिन कोर्टाकडुन फेटाळले !

खरोखरच असे सार्वमत झाले तर तो एक अत्यंत घातक पायंडा असेल. पार्लामेंट वगरे सगळे बंद करून सगळ्या गोष्टींवर सार्वमतेच घ्या. या अण्णा-केजरीवाल जोडगोळीला कायदे करायला पार्लामेंट हेच योग्य स्थान आहे, कायदे रामलीला मैदानावर होऊ शकत नाहीत असल्या गोष्टी भेजात घुसतच नाहीत. >>>>>>>>>>>> असल्या गोष्टी भेज्यात घुसत नाहीत ? अरे तो माणुस आयआयटीचा ईंजीनीयर आहे आणी वर आयएस सुद्धा !! दिल्ली सारख्या राजधानीला पुर्ण राज्याचा दर्जा मिळावा वैगेरेच्या गोष्टी मुद्दाम करत आहे, कारण कोणी तरी देशाच्या वाईटावर असलेलाच त्याच्या मागे उभा आहे आणी त्यामुळेच तो अस करत आहे.

In reply to by संदीप डांगे

अरेवा! बराच धुमाकूळ चाललाय की इथं! वा वा वा. चलु द्या!
धुमाकूळ नाही हो. मिपावर असे होण्याला धाग्याचा काश्मीर होणे म्हणतात. ते का हे माहित नसल्यास काळे काकांचा इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत? हा मिपाप्रसिध्द धागा बघावा.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आता नवीन शब्दप्रयोग करूयातः "धाग्याचा केजरू होणे"! ;)

AAP Lawmaker Manoj Kumar Arrested by Delhi Police in Land Grab Case

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

यापुढे कोणीही आपण इतरांपेक्षा वेगळे असल्याचा दावा करू लागला तर त्यावर मतदार विश्वास ठेवणे कठिण आहे. मग ती पार्टी विथ डिफरन्स (बीजेपी) असो की स्वयंघोषित प्रामाणिक पक्ष (आप).आता मतदार एवढेच म्हणू शकतो की खायचे तर खा पण निदान कामे तरी करा. बीजेपीने पार्टी विथ डिफरन्स हे स्लोगन तसेही खूप वर्षात वापरलेले नव्हते. आणि बंगारू लक्षण आणि येडियुरप्प प्रकरणानंतर बीजेपी भ्रष्ट नाही हे कोणीच म्हणू शकणार नाही. तसेही बीजेपीचे पार्टी विथ डिफरन्स हे स्लोगन १९९६-९८ नंतर वापरलेले बघितलेले नाही आणि त्यांनी वापरले असते तर ते तोंडावर आपटले असते हे नक्की. सध्याच्या कालात आप ही नवीन स्वयंघोषित 'पार्टी विथ डिफरन्स' झाली होती. तो पक्षपण तसाच म्हटल्यावर असल्या सवयंघोषित पार्टी दिथ डिफरन्सेसना लोक फाट्यावर मारतील यापुढे. हे असे सिनिसिझम सध्याच्या काळात मतदारांमध्ये आणण्यात केजरीवालांचा हात मोठा आहे.

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

नशीब यावेळी आशुतोष आणि कुमार विश्वास गप्प राहिले. गजेंद्रसिंहला आत्महत्या करायला भाग पाडल्यावर हाच आशुतोष आजतक वाहिनीवर 'आशुतोषाश्रू' ढाळत भेसूर आवाजात ढसाढसा रडण्याचा बेमालूम अभिनय करीत होता. नंतर ९ जूनला जितेंद्र तोमरला अटक झाल्यावर तर आआपवाल्यांचा तमाशा बघण्यासारखा होता. आशुतोष कॅमेर्‍यापुढे येऊन केंद्र सरकारच्या नावाने बेंबीच्या देठापासून किंचाळत होता आणि तोमरला पोलिसांनी मारहाण करून कबुलीजबाब घेतल्याचे सांगत होता. कुमार विश्वास सुद्धा केंद्र सरकार, मोदी, राजनाथ सिंह इ. ना शिव्या घालत होता. सिसोदियांनी तर पत्रकार परीषद घेऊन दिल्लीत आणिबाणी आणली जात आहे असे तारे तोडले होते. आम्ही न्यायालये, पोलिस इ. ओळखत नाही असे संजयसिंह जाहीरपणे सांगत होता. आणि अवतारी महापुरूष मिठाची गुळणी घेऊन बसले होते. सर्वजण तोमरचे समर्थन करीत होते. आज ९ जुलैला तोमरला अटक होऊन १ महिना झाला. त्याच्यावरचे आरोप गंभीर असल्याने व त्याच्याविरूद्ध सबळ पुरावे सापडल्याने न्यायालय त्याला जामिनावर सोडण्यास तयार नाही. तो अजूनही तुरूंगात आहे. या पार्श्वभूमीवर मनोजकुमारची अटक आआपने फारच सौम्यपणे घेतल्याचे दिसतेय.

तुम्हिपण ना गुरुजि... अहो हे सगळ केंद्र सरकार स्वारि मोदि सरकारने रचलेला कुंभाड आहे. "His party has accused the BJP of revenge politics" अरे कोण हा मनोजकुमार...केंद्र सरकार कडे काय एवढेच काम राहिलेय का?

Manoj Kumar has several cases of cheating and one of assault against him. AAP leader Sanjay Singh attacked the BJP-ruled Centre, which controls the Delhi Police. "Modi is doing 'gundaraj'... this must be one of the FIRs filed in 2014 against us when we were protesting," Mr Singh said, adding, "The Delhi Police are not arresting other people in even more grave cases." AAP had also cried foul when the capital's police dramatically arrested its Jitender Singh Tomar, then Delhi's law minister, last month. He is accused of faking degrees. मज्जा आहे बॉ..

In reply to by विकास

त्याचा फायदा उठवून परत केजरू म्हणायला मोकळा… जरी आम्ही VAT वाढवला तरी लोकांना जास्त किंमत द्यायला लागत नाहीये… म्हणजे परत जाहिरात करायला बरं!!!

In reply to by ट्रेड मार्क

आआपचे प्रचारक श्री. रा. रा. नान्देडिअन यान्चे याच पानावरील खालील प्रतिसाद वाचा. http://www.misalpav.com/comment/714566#comment-714566 या प्रतिसादात ते म्हणतात.
पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणार नाही असे पक्षाचे सचिव दिलिप पांडे मिडियापुढे येऊन सांगत आहेत. इतका तरी बेनेफिट ऑफ डाउट देऊयात त्यांना. तरीही झालीच दरवाढ, तर मग मिळून शिव्या घालूयात की.
http://www.misalpav.com/comment/713367#comment-713367 वरील प्रतिसादात ज्या वस्तून्वर व्हॅट वाढविलेला आहे त्यान्ची यादी आहे, पण त्यात पेट्रोल व डिझेलचा समावेश नाही. http://www.misalpav.com/comment/714197#comment-714197 वरील प्रतिसादात खालील वाक्ये आहेत.
>>> एक शंका आहे. ज्या वस्तूंवर मूल्यवर्धित कर वाढविलेला आहे त्यात पेट्रोल व डिझेल चा समावेश आहे का?
^^
माझ्या माहितीप्रमाणे नाही. मला ही माहिती आपच्या काही अधिकृत ट्विटर हॅंडलवरून मिळाली होती. आता तर दिल्लीच्या आप संयोजकांनी ही माहिती अधिकृतपणे जाहिर केल्यावर शंका घ्यायला काही वाव नसावा अशी अपेक्षा आहे.
म्हणजे आआपच्या अधिकृत हॅन्डलवर खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल केलेली होती. आआपचे अधिकृत सन्योजक दिलीप पान्डे यान्नी "पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट वाढविणार नाही" अश अधिकृतपणे खोटी माहिती दिली होती. केजरीवाल अत्यन्त धूर्त आहेत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. पेट्रोलियम कम्पन्या दर महिन्याच्या १५ व ३०/३१ तारखेला पुढील पन्धरवड्यासाठी पेट्रोल व डिझेल च्या दरातील बदल जाहीर करतात. आज १५ तारखेला पेट्रोल व डिझेल चे देशभरातील दर प्रत्येकी २ रूपये प्रतिलिटर कमी झाले आहेत. बरोबर आजच केजरीवालान्नी दिल्लीत व्हॅट वाढवून पेट्रोलचे दर ३ रूपयान्नी व डिझेलचे दर २ रूपयान्नी वाढविले. म्हणजे दिल्लीकरान्ना प्रत्यक्षात डिझेल आहे त्याच किमतीने मिळेल व पेट्रोलमध्ये फक्त १ रूपयाची वाढ होईल. पेट्रोलियम कम्पन्यान्नी घटविलेल्या दरात आपले दर वाढवून वाढीव दराचा परीणाम दडविण्यात केजरीवाल यशस्वी झाले आहेत.

काही बातम्यांमध्ये सांगत आहेत की पेट्रोल २८ पैशांनी वाढले आणि डिझेल ५० पैशांनी स्वस्त झाले. http://www.hindustantimes.com/business-news/petrol-diesel-prices-cut-by… & http://profit.ndtv.com/news/commodities/article-petrol-price-in-delhi-i… & http://m.economictimes.com/industry/energy/oil-gas/petrol-diesel-prices… http://www.mypetrolprice.com/ या वेबसाईटवरसुद्धा हीच माहिती आहे. म्हणजे दिल्लीमध्ये सध्या पेट्रोल ६६ रूपये ९० पैसे आणि डिझेल ४९ रूपये ७२ पैशांना मिळत आहे. पण काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले होते की पेट्रोल आणि डिझेलवरचा व्हॅट वाढवण्यात येणार नाही. त्यांच्या या खोटारडेपणाचा निषेध करावा तेव्हढा कमीच आहे. उत्तरेकडच्या राज्यांच्या टॅक्समध्ये सुसुत्रता असावी म्हणून पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीच्या अर्थमंत्र्यांनी मिळून व्हॅट वाढवला आहे असे ते आता सांगत आहेत. हेच त्यांनी अगोदर सांगितले असते, तर त्यांचा एव्हढा विरोध झाला नसता. पण आज प्रत्येक आप समर्थक या दरवाढीचा निषेध करतोय.

In reply to by नांदेडीअन

केजरीवालान्च्या धूर्तपणाला सलाम! भविष्यात जेव्हा पेट्रोलियम कम्पन्या पेट्रोल व डिझेलच्या भावात एखाद्या महिन्याच्या १५/३० तारखेला बदल जाहीर करतील, बरोब्बर तोच मुहूर्त साधून त्याच दिवशी दिल्ली सरकार पेट्रोल व डिझेल च्या व्हॅटमध्ये अजून ५% वाढ करेल (कारण व्हॅटची कमाल मर्यादा यापूर्वीच ३०% पर्यन्त वाढविली आहे व काल तो २५% पर्यन्त पोहोचला. म्हणजे अजून ५% वाढ होऊ शकते), जेणेकरून दिल्ली सरकारची वाढ झाकोळली जाईल.

केजरीवालान्चा जनतेच्या हितासाठी अजून एक निर्णय - http://indiatoday.intoday.in/story/arvind-kejriwal-dcw-chief-appointmen… Opposition parties had accused Kejriwal of nepotism after the AAP government announced the decision to name Swati Maliwal as the next chief of Delhi Commission for Women. A former India Against Corruption (IAC) activist, Swati is married to party's Haryana leader Naveen Jaihind who is considered a close associate of Chief Minister Arvind Kejriwal. Presently, she is the advisor (grievances) to the Delhi CM. यापूर्वीच आआपने एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेन्द्र चौहान यान्च्या नेमणुकीला विरोध करून जनहिताचा निर्णय घेतला होता. या सन्स्थेच्या सन्चालक मन्डळात व अध्यक्षपदी गुणवत्ता न बघता सन्कुचित विचारान्च्या सन्घाची माणसे बसविण्याला आआपने विरोध केलेला आहे. http://www.siasat.com/english/news/aaps-youth-wing-backs-ftii-students-… The AAP today extended support to FTII students protesting against the appointment of TV actor and BJP member Gajendra Chauhan as the new chairman of the premier institute's governing council. "Moreover, individuals like Anagha Ghaisas, Rahul Solapurkar have been nominated to the institute's apex governing body. These individuals have openly endorsed 'Sangh ideology' and their latest statements run contrary to freedom of expression and its related freedom of unhindered and unconstrained creativity, which is essential for an institute like FTII," it added. "Since the Modi government's ascent to power, RSS-affiliated organisations and individuals have begun pursuing their agenda through tacit support from the government. AAP will not tolerate the interference of forces emanating from narrow ideologies in the country's education system," the release said. आआपच्या या दोन्ही जनहिताच्या निर्णयान्बद्दल अभिनन्दन!

ऐका हो ऐका..... केजरीवाल सरकारला 'आपल्या' लोकांची किती काळजी आहे बघा. लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यावर आशीष खेतान या 'आपल्या' माणसाच्या पोटापाण्याची तजवीज म्जणून त्यांच्यासाठी एक नवे पद निर्माण करून खेतान यांना सरकारी बंगला, गाडी, पगार, भत्ते, मोफत वीज, पाणी आणि नोकर-चाकर द्यायचा निर्णय घेतला हो.... 'आपल्या' माणसांची काळजी घ्यावी ती अशी.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आम आदमी पक्ष हे कॉन्ग्रेसचाच धाकटा भाऊ आहे. साहेबान्ची भ्रष्टवादी कॉन्ग्रेस आणि इन्दिरा कॉन्ग्रेस यान्च्यात जितका फरक आहे, तितकाच फरक आम आदमी पक्ष व इन्दिरा कॉन्ग्रेसमध्ये आहे.

ऐका हो ऐका.. केजरीवालांना रडायला आता आणखी एक कारण मिळाले आहे हो.... महिला आयोगाच्या अध्यक्षपदी केजरीवाल सरकारने स्वाती मालिवाल यांची नियुक्ती नजीब जंग यांनी कॅन्सल केली हो.... पूर्वी बरखा सिंग या अध्यक्षा होत्या त्या काँग्रेस नियुक्त असल्यामुळे अनबायज्ड काम करणार नाहीत असे महापुरूष त्यांच्या पूर्वीच्या ४९ दिवसांच्या कारकिर्दीत म्हणाले होते. http://www.tehelka.com/2015/07/jung-vs-kejriwal-najeeb-jung-cancels-swa… पण आता महाक्रांतिकारी पक्षाच्या व्यक्तीला त्या पदावर नियुक्त करताना मात्र त्या अनबायज्ड काम करणार की नाही असे प्रश्न महाक्रांतिकारी नेत्याला पडणे शक्यच नाही. जर का प्रोसिजर अशी असेल की दिल्ली सरकारच्या नियुक्त्या राज्यपालांमार्फत व्हाव्यात तर राज्यपालांना आधी निदान इन्फॉर्म तरी करायला नको का? हे सगळी प्रोसिजर डावलून परस्पर नियुक्त्या करून मोकळे होणार. मग राज्यपालांनी ते मान्य केले नाही की परत भोकाड पसरायला हे मोकळे. सगळ्या प्रोसिजरना केराच्या टोपलीत हे टाकणार आणि त्यासाठी इतरांनी यांच्या टपलीत मारली की परत हे भोकाड पसरणार. कित्ती कित्ती ढोंगी असू शकतो माणूस याला काही लिमिटच नाही.

हम्म... (या धाग्याचा अजूनही केजरू होताना दिसला. म्हणून केवळ माझ्याकडून खारीचा वाटा म्हणून हा प्रतिसाद टाकला आहे)

सतत रडत राहणारी काही माणसे असतात. अगदी सगळ्या गोष्टी अनुकूल होत असल्या तरी सतत पीरपीर, कटकट करत राहणं हा त्यांचा स्वभाव असतो. आम आदमी पक्ष आणि आपटार्ड त्यातलेच आहेत. आता नवीन काय तर दिलीप पांडे या आपनेत्याला दिल्ली पोलिसांच्या गाडीने उडवायचा प्रयत्न केला हा आरोप. मागे १०-१२ वर्षांची मुले क्रिकेट खेळत असताना राखी बिर्लाच्या गाडीवर बॉल लागला आणि काचेला तडा गेला, त्या मुलाच्या बापाने माफी मागून भरपाई द्यायची तयारी दाखवली तरी ही बया 'आपल्यावर हल्ला झाला' म्हणून एफ.आय.आर दाखल करा म्हणून हटून बसली. राईचा पर्वत करणे वगरे मराठी म्हणींचा लाईव्ह प्रत्यय या आपनेत्यांच्या वर्तणुकीतून दिसून येईल. इतके प्रचंड एक्स्ट्रापोलेशन करायची सवय असेल तर पोलिसांची गाडी शंभर फूट बाजूने गेली तरी आपचे लोक 'गाडीने आम्हाला चिरडायचा प्रयत्न केला' असेच म्हणतील इतकी खात्री या अडाण*ट नेत्यांविषयी आहे. आणखी काय तर पोलिसांनी आप कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीत त्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर वळ कसे आले होते ही चित्रे फेसबुकवर पोस्ट झाली. आणि लगोलग कुणीतरी आणखी सर्च करून ती चित्रे मुळातली नेपाळमधील होती हे पण पोस्ट केले. अरे किती खोटारडेपणा कराल!! सतत रडत राहायचे, सतत कटकट करायची, आखे जग आपल्याविरूध्दच आहे असे समजून विनाकारण हौतात्म्य पत्करायचा प्रयत्न करायचा या ढोंगीपणात त्या आपवाल्यांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. लोकशाहीतूनच वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, नंबुद्रीपाद असे चांगले मुख्यमंत्री मिळतात.आणि त्याच लोकशाहीतून हा केजरीवाल नामक जोकरही मिळतो. काय करणार? इलाज नाही. हा ढोंगी आणि आक्रस्ताळा माणूस दिल्लीच्या लोकांना हवा होता ना. मग २०२० पर्यंत तो काही तुमच्या मानगुटीवरून जाणार नाही. तेव्हा दिल्लीकरांनो भोगा तुमच्या कर्माची फळे!!

>>> आणि त्याच लोकशाहीतून हा केजरीवाल नामक जोकरही मिळतो. +९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९..... राजनारायण, लालू, रामदास आठवले इ. ची उच्च परम्परा केजरीवाल चालवित आहेत. त्यान्च्या माकडचेष्टान्मुळे कधी करमणूक होते तर कधी चीडही येते. जितेन्द्र तोमरला पकडल्यावर आणि २ आठवड्यान्पूर्वी आआपच्या अजून एका आमदारावर एफआयआर दाखल झाल्यावर हे विनोदमूर्ती आआपच्या सगळ्या आमदारान्ना घेऊन पोलिस कमिशनरकडे गेले होते आणि 'फक्त त्या दोघान्ना कशाला पकडता, आमच्या सर्व आमदारान्वरच एफआयआर दाखल करून एकदाचे आत टाका म्हणजे तुमचे समाधान होईल' असा कान्गावा करून आले. आपल्या पक्षात जे गुन्हेगार आमदार आहेत त्यान्ची पाठराखण करायची आणि त्यान्च्यावर गुन्हे दाखल झाले की माध्यमान्समोर कान्गावा करायचा असे यान्चे सन्तापजनक वागणे आहे.

ऐका हो ऐका. या आम आदमी पक्षाचे सरकार म्हणजे किती नालायक होऊ शकते याला काही सुमारच राहिलेला नाही. नाफेड म्हणत आहे की एप्रिल महिन्यातच दिल्ली सरकारला १९ रूपये किलोने कांदा खरेदी करायला सांगितले होते.http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/delhi-gove… पण तो त्यांनी केला नाही.आता दिल्लीत कांदा ५० रूप्यांच्या पुढे गेला आहे. १९ रूपयाने कांदा घेतला असता तर एखाद वेळेस कांद्याची किंमत कमी राहिली असती पण या रड्या बाळाला मोदी आणि केंद्र सरकारच्या नावाने भोकाड पसरायला मिळाले नसते. डिजगस्टींग

१६ डिसेंबर २०१२ च्या त्या काळरात्री निर्भयाची विटंबना करून 'मर साली' असे म्हणत तिच्यात लोखंडी सळई खुपसणार्‍यांपैकी एक हरामखोर तो त्यावेळी १८ पेक्षा कमी वयाचा होता या कारणावरून सुटला. आता त्याचे पुढे कसे होणार, तो आपले पोट कसे भरणार याची केवढी चिंता युगपुरूषजींना सतावत आहे. म्हणून त्याच्या उदरनिर्वाहाची सोय व्हावी म्हणून दिल्ली सरकार त्याला शिवण मशीन आणि १० हजार रूपये देणार !! यातून केजरीवाल नक्की काय संदेश पाठवत आहेत? बलात्कार्‍यांनो, दिल्लीत या, तुमची काळजी दिल्ली सरकार घेणार हा? या प्रकारानंतर केजरूविषयी जे काही थोडेथोडके कन्सिडरेशन राहिले होते ते पण आता पूर्णपणे खतम झाले आहे. निर्भयावर अत्याचार करणारे तक्षक आणि त्यांना पाठिशी घालणारे केजरीवालांसारखे इंद्र कधीनाकधी सर्पसत्रात भस्मसात होतील आणि व्हावेत असे फार वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

THE JUVENILE JUSTICE (CARE AND PROTECTION OF CHILDREN) BILL, 2014' which was amended/passed by Central( Modi) Govt in 2014, every state govt has to provide rehabilitation to each and every Juvenile after his terms ends in Juvenile jail. दुवा जो नियम आहे तो दाखवला , त्या रेपिस्टबद्दलच्या कृतीचे समर्थन नाही. पण ज्याप्रमाणे न्यायालय कायद्यावर बोट ठेवून चालते तसेच सरकारला चालावे लागते.

In reply to by कपिलमुनी

पण ज्याप्रमाणे न्यायालय कायद्यावर बोट ठेवून चालते तसेच सरकारला चालावे लागते.
हा हा हा. वाटलेच होते की केजरूचा कोणीतरी गुलाम हे लिहिणार. हे मला माहित नाही असे नाही पण हा युक्तीवाद केजरीवालांना उपयोगी पडणार नाही. त्याच कायद्याने आणि राज्यघटनेने दिल्ली सरकारच्या अधिकारांवर घातलेल्या मर्यादांचा केजरीवालांनी कधी सन्मान केला आहे? प्रत्येक ठिकाणी आपल्या अधिकारकक्षेत नसलेल्या गोष्टीत नाक खुपसायला जायचे आणि ते कापले गेले की मग मोदींविरूध्द किंवा जंगविरूध्द कांगावा करायचा हाच यांचा खाक्या. आता बरे यांना कायद्यावर बोट ठेऊन चालायची उपरती होते? आता का नाही हे धरण्यावर बसत? आता का नाही प्रजासत्ताक दिनाच्या ठिकाणी तमाशे करायची धमकी देत? गेलाबाजार त्याविरूध्द साधे ट्विटही करत? कर्णाने आयुष्यभर अधर्माची बाजू घेतली होती त्यामुळे शेवटी रथाचे चाक जमिनीत अडकल्यावर धर्माने त्याचे रक्षण करावे अशी त्याची अपेक्षा असेल तर ती चुकीची आहे. अर्थात केजरूच्या गुलामांना हे समजेल ही अपेक्षाही नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

केजरूचा कोणीतरी गुलाम
मी तुम्हाला कधीही या प्रकारची भाषा वापरली नाहिये त्यामुळे मर्यादा पाळून लिहा. वरती लिहिला आहे. "जो नियम आहे तो दाखवला , त्या रेपिस्टबद्दलच्या कृतीचे समर्थन नाही" मी केवळ नियम सांगितला , त्याचे समर्थन केले नाही. पण सिलेक्टीव रीडींग करायचे ठरवल्यावर सोयीस्कर तेवढे वाचले गेले. सद्य मुद्द्यामध्ये त्या राज्य सरकारचा काय चुकला ते सांगा ? इतर वेळेस काय केला ते उकरत बसू नका ! उद्या न्यायालयाने सुटकेच्या वेळेस पुर्नवसनाबद्दल विचारणा केली असती तर राज्य सरकार बांधील होता ( जसा महाराष्त्र सरकार डान्स बार सुरू करण्याबद्दल आहे, कारण हे न्यायालयाचे निर्णय असतात , सरकार त्याच्या विरूद्ध काही करू शकत नाही)

In reply to by कपिलमुनी

सद्य मुद्द्यामध्ये त्या राज्य सरकारचा काय चुकला ते सांगा ? इतर वेळेस काय केला ते उकरत बसू नका !
मजाच म्हणायची. म्हणजे केजरीवाल स्वतःच्या सोयीप्रमाणे कायद्यावर बोट ठेवणार आणि इतर वेळी फाट्यावर मारणार आणि वर स्वतः नितीमत्तेचे पुतळे असल्याचा टेंभा मिरविणार? या गृहस्थाला कायद्याची नक्की किती चाड आहे याचे किस्से शेंबड्या पोराला देखील ठाऊक आहेत.

In reply to by गॅरी ट्रुमन

तुम्ही एका स्पेसिफिक प्रकरणाचा उल्लेख करून प्रतिसाद टाकला आहे. त्याच्या अनुषंगाने चर्चा करू या. टेंभे , पुतळे , शेंबडे पोर यांवर इतरत्र चर्चा झाली आहेच.

In reply to by कपिलमुनी

आजपर्यंत मोदींवरील एकतरी चर्चा आहे का जी २००२ चा उल्लेख न होता संपली आहे? काही कारण आणि संबंध नसताना केजरीवाल (आणि आशीष खेतान आदी चमचे) इतरांना अडानी/अंबानीचे एजंट वगैरे बकवास चालवतात तेव्हा मुद्द्यांवर अनुषंगून असलेली चर्चा असते का ती? की त्यावेळी केजरू समर्थकांना सोयीची म्हणून 'मुद्द्यांवर चर्चा करा' वगैरे गोष्टी बासनात गुंडाळलेल्या असतात? तेव्हा अंगाशी आले की स्पेसिफिक प्रकरणावर चर्चा करू आणि इतर वेळा यांना वाटेल तेव्हा वाटेल ते मुद्दे चर्चेत संबंध असो वा नसो खेचून आणायचे हे शिफ्टिंग गोल पोस्टचे उत्कृष्ट उदाहरण आहे.केजरूशाहीचा पीळ पुरेपूर उतरल्याचे लक्षण आहे का हे?

In reply to by गॅरी ट्रुमन

इतर वेळेस इतर चमचे काय करतात त्याच्याशी मला देणेघेणे नाही. मी चर्चा करताना इथे वा कुठेही प्रत्येक वेळेस २००२ चा उल्लेख करतो का ? या संस्थळावर किती वेळा केला आहे ? आणि आज स्पेसिफिक मुद्द्यावर चर्चा करण्यास योग मुद्दे नाहीत म्हणून आकांडतांडव करू नका. सध्या तुम्ही सोयीनुसार गोलपोस्ट शिफ्ट करत आहात.आतासुधा तुम्ही केजरूशाहीचा पीळ वगैरे भाषा वापरत आहात. अशा आक्रस्ताळेपणाची गरज योग्य मुद्दे असताना पडत नाही.

In reply to by कपिलमुनी

कायद्याप्रमाणे त्याला राज्य सरकारने मदत करावी असं आहे. पण मुद्दा हा आहे त्याच्या सुटकेविरुद्ध एवढे प्रयत्न चालले असताना केजरीला एवढी घाई का झाली मदत जाहीर करायची? त्यात आम्हा सर्वसामान्यांना फक्त एवढेच दिसले की एवढे घृणास्पद कृत्य करणाऱ्याला केजरी मदत करणार, ती पण कसली? तर शिवण मशीन देणार. म्हणजे मुली/ स्त्रियांशी संबध येवू शकतो. त्यातही खुले आम कात्री, सुया बाळगायची मुभा मिळणार. कायदा असं सांगतो का की फक्त शिवण यंत्र द्यावे? अफरोज जो एका बस मध्ये हरकाम्या म्हणून होता त्याला शिवण कला येते का? डिसेंबर २०१२ मध्ये हाच केजरी अपराध्यांना पकडावे, कडक शिक्षा द्यावी यासाठी आग्रही होता. त्यावेळच्या दिल्ली सरकारच्या नावे शंख करत होता. विचारात आणि कृतीत एवढा फरक पडण्याएवढे या ३ वर्षात काय झाले? त्या टोळीतील सगळ्यात जास्त अत्याचार करणाऱ्याला योग्य शिक्षा व्हावी या साठी केजरीने काय केले? तो ३ वर्षात सहज सुटून जाईल हे माहीत असताना, सुधारित कायदा राज्यसभेत लटकला असताना केजरीने तो मान्य व्हावा या साठी काय प्रयत्न केले?

A gem from BACHI KARKARIA FOrget cars and numbers Delhi has an ODD chief minister who wants to get EVEN with everyone else

अवतारी महापुरूष श्री श्री १००८ केजरीवाल यांची स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःवर शाई फेकून घ्यायची नाटके परत सुरू झालेली दिसतात. नेहमीप्रमाणेच शाई फेकणारी महिला आआपची कार्यकर्ती आहे व केजरीवालांनी नेहमीप्रमाणेच भाजपवर खापर फोडले आहे. http://indianexpress.com/article/cities/delhi/woman-throws-ink-on-arvin…

In reply to by श्रीगुरुजी

ती महिला आपची कर्यकर्ती आहे असे कुठे लिहिले आहे. एएन आय च्या बातमीमधे Aam Aadmi sena's Punjab unit ची कार्यकर्ती आहे असे लिहिले आहे. आणि आम आदमी सेना हा आपच्या विरोधातला गट आहे.

In reply to by कपिलमुनी

आम आदमी सेना हा पूर्वाश्रमीच्या आआपच्या कार्यकर्त्यांचाच गट आहे. या गटाचा भाजपशी काहीही संबंध नाही. तरीसुद्धा केजरीवालांनी या प्रकारामागे भाजप/संघच असल्याचा थेट (आणि अर्थातच बिनबुडाचा) आरोप केला. या पूर्वी योगेंद्र यादव, सोमनाथ भारती, दस्तुरखुद्द केजरीवाल इ. जेव्हाजेव्हा शाई फेकली गेली व ३ वेळा केजरीवालांना थोबाडीत मारली गेली त्या प्रत्येकवेळी प्रकार घडल्यावर लगेच केजरीवालांनी भाजपवर आरोप केले होते आणि नंतर या प्रकारांमागे आआपचेच कार्यकर्ते असल्याचे सिद्ध झाले होते. सवंग लोकप्रियता व सहानुभूती साठी केजरीवालच हे प्रकार मॅनेज करतात हे स्पष्ट दिसून येते. काल झालेला प्रकार तसाच आहे असे दिसून येते. पण हद्द म्हणजे हा केजरीवालांच्या हत्येचा कट होता आणि भाजप/संघाने हा कट केलेला होता इतके हास्यास्पद आरोप करण्याइतकी केजरीवालांची मजल गेलेली आहे. स्वतःकडे दिल्लीमध्ये ७० पैकी ६७ आमदार असताना ते असली सवंग लोकप्रियतेसाठी मॅनेज केलेली नौटंकी का करतात हे अजूनही गूढ आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही असे खोटं का लिहीता ?
शाई फेकणारी महिला आआपची कार्यकर्ती आहे
ती कार्यकर्ती आप सेनेची आहे. त्यामुळे ती सध्या आपची कार्यकर्ती नाहीये . त्यामुळे तुमचा वरचा वाक्य चुकीचा आहे पूर्वाश्रमीची कार्यकर्ती असल्यास तसे मूळ प्रतिसादात नमूद करावयास हवे होते. कारण १ दुवा १ २. दुवा २ यामधे हे काम आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याच नसून आम आदमी सेनेचे आहे त्या सेनेबद्दल अधिक माहिती खालील दुव्यामध्ये आहे आम आदमी सेना म्हणजे कोण ? तुम्ही योग्य विदा देवुन लिहा , आंधळ्या विरोधामुळे चुकीचे लिहू नका .

In reply to by कपिलमुनी

त्यात खोटे काय? ती मूळची आआपचीच कार्यकर्ती आहे. ती इतर कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. तिचा एखाद्या पक्षाशी संबंध असेल तर तो फक्त आआपशीच असेल. राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी ब्रिगेड किंवा इंदिरा काँग्रेस व सेवा दल हे जसे वरवर वेगळे वाटतात तसेच आआप पक्ष व आम आदमी सेना आहेत. गंमत अशी की भाजप, संघ, विहिंप, हिंदू महासभा इ. ना सर्वजण एकाच मापात तोलतात. पण आआप पक्ष आणि आम आदमी सेना हे मात्र वेगळे मानतात. यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मागील १-२ वर्षात केजरीवाल व इतर आआप नेत्यांवर शाई फेकण्याचे झालेले प्रसंग आणि हा प्रसंग यात विलक्षण साम्य आहे. मागील प्रत्येक प्रसंगानंतर केजरीवालांनी लगेचच त्यासाठी भाजपला जबाबदार ध्ररले होते व काही काळाने त्यामागे आआपचेच कार्यकर्ते असल्याचे सिद्ध झाले होते. ते प्रसंग केजरीवालांनीच मॅनेज केले होते. यावेळीही तसेच असणार आहे. फक्त यावेळी ही नौटंकी थेट आआपच्याच कार्यकर्त्याकडून मॅनेज करण्याऐवजी केजरीवालांनी कागदोपत्री वेगळ्या भासणार्‍या आम आदमी सेना या गटाकडून सर्व प्रसंग मॅनेज केलेला दिसतो. शाई फेकल्यानंतर काही काळ कॅमेरा केजरीवालांच्या चेहर्‍यावर स्थिरावला होता. त्यावेळचा त्यांच्या चेहर्‍यावरील लबाड भाव सर्व सत्य परिस्थिती सांगून जातात.

In reply to by श्रीगुरुजी

फॅक्टस् डावलून तर्कट लावण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे. जर तर न करता आहे त्यावर बोला आणि खोटारडे पणा बंद करा

In reply to by कपिलमुनी

अहो, केजरीवालच खोटारडेपणासाठी प्रसिद्ध आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी आजतगायत त्यांनी अनेकवेळा नौटंकी केलेली आहे व ती नौटंकी प्रत्येकवेळा उघडकीस आलेली आहे. स्वत:वर हा शाई फेकून घेण्याचा हा नवीन प्रकार हा त्या नौटंकीचाच एक भाग आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही पण आता तेच करत आहात ! कोणीही शाई फेकली की तो माणूस आपचाच आहे असा ओरडा करायचा . सग़ळ्या माहितीचे दुवे देउनसुद्धा तुम्ही कबूल होत नाही. तुम्ही मिपाचे केजरीवाल आहात

In reply to by कपिलमुनी

शाई फेकणारे आआपचेच आहेत. पूर्वीच्या प्रकरणातही आआपचीच माणसे होती आणि आताही आआपचीच महिला आहे. आआप पक्ष आणि आम आदमी सेना हे फक्त वरवर वेगळे आहेत (जसे इंदिरा काँग्रेस व सेवादल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी ब्रिगेड). ही सर्व नौटंकी मागील नौटक्यांचीच पुनरावृत्ती आहे. त्यात तसूभरही फरक नाही. आता एक नवीन माहिती येत आहे. त्या महिलेने शाई फेकण्यापूर्वी काही मिनिटे आधी केजरीवालांच्या व्यक्तिगत सहाय्यकानेच केजरीवालांच्या जवळ स्टेजवर उभ्या असलेल्या पोलिसाला खाली उतरून लांब उभे रहायला सांगितले होते. तो तिथेच उभा असता तर त्या महिलेला केजरीवालांच्या जवळ स्टेजवर येताच आले नसते व पुढचा प्रकार घडलाच नसता. हा मॅनेज्ड प्रकार आहे हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. NEW DELHI: On a day when the Aam Aadmi Party said the ink thrown on chief minister Arvind Kejriwal on Sunday part of a deep-rooted conspiracy and that the CM wasn't being adequately protected, one of the cops from Kejriwal's security detail told his seniors that he was asked to step down from the dais when Kejriwal was addressing the gathering in Chhatrasal stadium on Sunday. http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Kejriwals-PA-asked-me-to-…