Skip to main content

भेट १२ वर्षानंतरची.. { भाग १ }

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 03/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त दोन दिवस राहिले होते माझ्या विसाव्या वाढदिवसाला. त्याचे प्ल्यानिंग करण्यात गुंतलो होतो. आणि आईने हाक मारली. " संजय , अमिताचा फोन आहे. " मी चमकुन तिच्याकडे पाहिलं आणि हातात मोबाईल घेतला. अमिता माझी सख्खी मामेबहिण. पण आमची भेट जास्त वेळा झाली नव्हती.लहान होतो तेव्हा लक्ष्ात आले नाही पण मोठे झालो तसे ही बाब खटकू लागली होती. मामाकडुन कधी मला बोलावणे आले नव्हते आणि आम्ही जरी बोलावले तरी ते कधी जास्तवेळा आल्याचे स्मरत नव्हते. फक्त मी आठ वर्षाचा असताना तिला कोणाच्यातरी लग्नात पाहिले होते. लग्नाकडे दुर्लक्ष करुन आमच्या गप्पा चालल्या होत्या. पुढच्या दिवशी तिने आमच्या घरी येण्याचे कबुल केले. माझी शाळा असल्याने आम्ही लगेच निघालो होतो.पुढच्या दिवशी शाळेत लक्षच लागत नव्हतं. शाळेच्या शेजारुन जाण्यारया रस्त्याकडे मी एकटक बघत बसलो. काहीवेळातच आणि सरांनी कानशिलात भडकावली. "बाहेर काय बगतोस? " " सर माझी बहिण येणार आहे आज. तिची बस इथनच जाईल. ती येईल ना ? " आमच्या सरांच्याही डोळ्यात पाणी तरारलेला एका एकमेव प्रसंग असेल. घरी आलो ती कुठेही दिसली नाही. मी रडुन रडुन आकांत केला. मामाला फोन करण्याचा हट्ट धरुन बसलो. तिकडुन काय उत्तर येणार याची घरच्यांना कल्पना होती म्हणून की काय त्यांनी फोन लावला नाही. त्यानंतर कुठुनही कुणीच फोन लावला नाही आणि आता जवळपास १२ वर्षानंतर तिच्याशी बोलणार होतो. मी हातात फोन घेतला. "संजय काय करतोस ? " तो आवाज कानावर पडताच माझे हात कापु लागले. सिग्नल येत नाहीये इथं अस आईला सांगुन मी घराबाहेर पळालो. मला शब्दच सुचेनात. डोळ्यातल्या पाण्यामुळे समोरचे दिसेना. आवेगाने मी डोळे बंद केले आणि तिच बोलणे एकु लागलो. " अरे आम्ही नवीन घर घेतलय पंढरपुरातच. परवा वास्तुशांती आहे. नक्की ये. आपण पण भेटु. ठेवते. " दोन दिवसानंतर माझा वाढदिवसही होता आणि वास्तशांतीसुद्धा.माझे सगळे प्ल्यान कॅन्सल झाले. आणि आम्ही पंढरपुराकडे रेल्वेने निघालो. रेल्वेत काही वेळाने डोळा लागला. स्वप्नांच्या राज्यात मी शिरलो होते. आपण या राज्याचे स्वामी असतो. आपल्या इच्छा आकांशा इतकच काय खोल रुतुन बसलेली भितीसुद्धा इथे अचानक समोर येते. समोर भिमा नदीचा रम्य किनार होता. तिन मुले त्या पाण्यात खेळत होती. बघता बघता पाण्याने त्या तिन्ही मुलांना आत खेचले. ते पाहुन मी अोरडलो "दादा!!" पण मला उशीर झाला आणि.. खाडकन मी जागा झालो. त्या प्रसंगातुन मी आजपर्यंत बाहेर पडलो नव्हतो. क्रमशः
लेखनविषय:

वाचने 2002
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

हा भाग अजून थोडा मोठा हवा होता असं वाटलं पण थोडी उत्सुकता जागृत झाली आहे, पुढचा भाग लवकर टाका.

छान लिहिले आहे. पण भाग खुपच छोटा आहे. पुढचा भाग जरा मोठा टाका.

आभारी आहे वेगाने लिहिता येत नसल्याने भाग लहान झाला पुढच्या वेळेस मोठे टाकेन.