Skip to main content

शनिवार वाड्याला जातोय..तरी काही माहिती हवी आहे

गुरुवार, 02/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा http://www.misalpav.com/node/31872) ह्या जुलै मध्ये मित्र-मैत्रिणी सोबत शनिवार वाड्याला जातोय. ६ मुलं आणि एक २.५ वर्ष (मानसिक वय) मुल सोबत आहे. आमचा हा पहिलाच पुणे दौरा आहे. तरी काही माहिती हवी आहे आणि ती मिळेल ह्याची खात्री आहे. आम्ही कसबा पेठ मध्ये दत्त लॉज मध्ये राहणार आहोत. आमच्या ६ तासाच्या ट्रीप मध्ये पहिले ३ तास sightseeing (चालते फिरते प्रेक्षणीय स्थळे) आहेत आणि बाकी चे ३ तास मोकळे जे आम्ही आमच्या सोयीनुसार घालवायचे. ह्या ट्रीप संधर्भात काही प्रश्न आहेत, जसे: १. साधारण जेवण कितपत खर्चाचे असते? कुठल्याही हॉटेलचा कुठलाही प्लान घेतला नाही. म्हणुन दुपारच्या जेवणाची सोय बाहेरच करावी लागणार . २. घरुनच सुटे पैसे न्यावेत ? कि तिथेच बदलावे? कोणत्या नोटात बदलावे? १०-१० , कि ५०-५० ? साधारण किती १-१,५-५ असे सुटे जवळ ठेवावे? ३. बर्याच फोरम्स मधेय वाचतेय कि "शनिवार वाड्याला पिण्याच्या पाण्याचे आबाळ आहे. म्हणजे हॉटेलात जसे आपल्या इथे सर्रास आणि मुबलक पाणी असते तसे तिथे मिळत नहि." ४. शनिवार वाड्या मध्ये करण्यासारख्या बर्याच famous activities आहेत, पण त्याच्या साधारण किमती सांगू शकाल का कुणी? आणि कोणत्या activities worth doing आहेत.? ५. ह्या activities चे साधारण काही packages असतात का? आणि ते कुठून बुक करू शकतो? ६. शनिवार वाड्याच्या बाहेर खरेदी करण्या जोगे असे काही आहे का? ७. साधारण या पुणे दौर्याला काय काय सोबत घ्यावे ? मी इथे विचारलेल्या प्रश्ना व्यतिरिक्त अजून काही अवांतर माहिती मिळाल्यास उत्तम.

वाचने 14526
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

काsss हीssss हीssss हा काहीतरीच...तुमच आपल उगा काहीतरीच ब्वा...

पहिला पेश्वेचा माहित पाहिजे (खास करून नारायणराव पेशवे चा ), जास्त खर्च येत नाही असं समजा आठवडी बाजार ला चालला आहे. ६ तास कमीच पडतील पुणे फिरण्यासाठी. प्रवास PMT बस मधूनच करा (बघा कशा बसेस हाकतात), खरेदी करायची आहे तर जयहिंद किंवा मेन्स avenue जा चांगले branded कपडे स्वस्तात भेटतात, july मध्ये discount सुद्धा असतात. पुस्तके ABC चौक मध्ये खरेदी करू शकता (शालेय सुद्धा ) तेही discount मध्ये. खाण्यासाठी शनिवार वाड्याच्या पुढे corporation आहे न तेथे 'भारती वडेवाले' आहेत, एक नंबर वडापाव , त्याच्या बाजूला एक दाबेली वाला सुद्धा आहे तेही खूप छान आहे. तहान लागली तर हॉटेलात चहा प्या म्हणजे पाणी free मिळेल . कात्रज चा पार्क बघायला विसरू नका. वेळ मिळाला तर सिंहगड ला सुद्धा जा.

In reply to by कर्ण-२

पुण्यात कपडे अथवा वस्तु भेटत नाहीत हो, मिळतात. लोक भेटतात. हां आता कसे लोक भेटतात हे ज्याचे त्याने अनुभवायला हवे. ;)

In reply to by मधुरा देशपांडे

नै हो. "भेटलं" बोलणारे नॉर्मली एम एच ३० किंवा ३१ चे असतात.

In reply to by मधुरा देशपांडे

ी, इतरही बर्‍याच ठिकाणी ;)
एम.एच-१५ मधील काही भागातले लोकही असेच बोलतात (बहुत करून खानदेशी). 'जॉब भेटला का रे?' 'भाड्याचं घर भेटलं का' आणि काय काय... कम्माल्ल गम्मत!!!

In reply to by काळा पहाड

एम एच १६ आणी एम एच १७ (नगर) पण आहेत. मराठवाडा, खानदेश (आमच्या आत्ताच्या प्रोजेक्ट मधे ३ जण आहेत) आणी कोकणातल्या मित्रांना पण असंच बोलतांना ऐकलंय. हा शब्द इतका सर्रास वापरला जातो की त्यात काही चूक आहे हे तुम्हाला जसं वाटतं तसं त्या लोकांना अजिबात वाटणार नाही.

In reply to by काळा पहाड

त्यांना पुढे - समोर, कापने - चिरणे, पाहुणे - नातेवाईक व सगळ्यात महत्त्वाचे पुने - पुणे हा पण फरक स्पष्ट करून सांगावा लागेल बहुतेक .

उगा काहितरीच म्हणून टाकला आहे का हा लेख, असा असेल तर तुमच्या 'ह्य फाल्तु लेखाचि' कीव येईल.

अ एबीसी चौक नाही ओ अप्पा बळवंत चौक म्हणा .

शनिवार वाड्यासमोर एक कारंजे पण त्या तिथे तुम्हाला फोटो काढता येतील. मागच्या ट्रीपला मी काढल होते. पण आधी कारंजे चालु व्हायच्या तारखेची माहिती तुमच्या टुर गाईडकडुन घ्या. तो महानगरपलीकेतुन माहिती काढुन तुम्हाला देवु शकतो. फारच सुवर्णक्षण असतो तो, वर्षातुन एकदाच चालु करतात म्हणे ते कारंजे!! तुमची सहल आनंददायी होवो !!!

In reply to by अत्रुप्त आत्मा

@ अतृप्तजी , तुम्ही येणार का सोबत (व ८ डोकी होतील! )? @पैसाताई मांजर नाही सोबत , अशोक समर्थ घेऊन गेले सगळ्या मांजरी.

शनिवार वाड्या मध्ये करण्यासारख्या बर्याच famous activities आहेत
अश्लील अश्लील

शनिवार वाड्या मध्ये करण्यासारख्या बर्याच famous activities आहेत, पण त्याच्या साधारण किमती सांगू शकाल का कुणी? आणि कोणत्या activities worth doing आहेत.?
famous activities नक्कीच worth doing असाव्यात असा अंदाज आहे, पण सहा मुलांत तुम्ही काय काय आणि कसं म्यानेज कराल हा प्रश्न पडलाय.

शनिवारवाड्यात बघण्यासारखे काहीही नाही. बाहेरून तटबंदी असली तरी तटबंदीच्या आत थोडिशी हिरवळ व काही झाडे आहेत. गेलात तर वेळ फुकट वाया जाईल. त्याऐवजी राजा केळकर वस्तुसंग्रहालय किंवा पु.ल. देशपांडे उद्यान बघा.

शनिवारवाड्याच्या बाहेर एक मशीद कि दर्गदर्गा. तिकडे तोंड करून उजव्या हाताने बाहेर पडलात की नवग्रनमंदीर आहे. तिथे जेवणाची सोय होते. ताट घरून घ्यावे लागते. जुम्मा चुम्मा या गाण्यातील पोर्सेलिनचा मग सोबत असल्यास मज्जाच मज्जा. तिथेच एक पुणेकर आडनावाचे गृहस्थ कवींंची संघटना चालवतात. तिथे जाऊन पुस्तके विकायला आहेत का अशी चौकशी करावी. तीन तासाचा वेळ असल्यास मला कविता आवडतात एव्हढे तरी नक्कीच म्हणावे. तुमच्या मोकळ्या वेळेचा प्रश्न सुटेल. सोबत पुरूष माणसे असतील तर शनिवारवाड्याच्या बाहेर कान कोरणे, दाढी आणि कटींग अत्यंत स्वस्तात करून मिळेल. पाणीपुरीवर एक मसाला पुरी फ्री तसं गालावरून तुरटी मिप्रवण्यात येईल, वरून अंग रगडून देतात. पुण्यात आलात आणि फ्री सोडलंत तर दौरा वाया जाईल. जाऊ द्या, आम्ही सांगायाचो कळकळीने आणि तुम्ही नंतर टिंगल करणार. कुणाला काही वाटत नाही हो पुण्याबद्दल. जळके कुकडे मेले ,मासेखाऊ सगळे !

In reply to by खटासि खट

जाऊ द्या, आम्ही सांगायाचो कळकळीने आणि तुम्ही नंतर टिंगल करणार. कुणाला काही वाटत नाही हो पुण्याबद्दल. जळके कुकडे मेले ,मासेखाऊ सगळे !
नाही करणार हो टिंगल टवाळी , रच्याकने मासे खायची इच्छा आहे , पण कुणीतरी शिकवायला पाहिजे . त्यात काटे वगैरे असतात ना !

In reply to by उगा काहितरीच

रच्याकने मासे खायची इच्छा आहे , पण कुणीतरी शिकवायला पाहिजे . त्यात काटे वगैरे असतात ना !
सुरवात कोळंबीने करा, एकही काटा नसतो. मग सुरमय किंवा पॉम्प्रेट (पापलेट्)खाउन बघा. कर्ली शक्यतो टाळा.

१. साधारण जेवण कितपत खर्चाचे असते? कुठल्याही हॉटेलचा कुठलाही प्लान घेतला नाही. म्हणुन दुपारच्या जेवणाची सोय बाहेरच करावी लागणार .
एकादशीला आलात आणि वृत्तीने धार्मिक असाल तर अजिबात खर्च येणार नाही.
२. घरुनच सुटे पैसे न्यावेत ? कि तिथेच बदलावे? कोणत्या नोटात बदलावे? १०-१० , कि ५०-५० ? साधारण किती १-१,५-५ असे सुटे जवळ ठेवावे?
शक्यतो पुण्यामधे सुट्टे पैसे घेउनचं सगळीकडे फिरावे. साधारण १२-१२ रुपयाची किमान ४३ नाणी, २५०-२५० रुपयांच्या १० नोटा अश्या स्वरुपात असु द्यावेत. त्यावर नवा व्यापारचा शिक्का असेल तर फुकटात व्याख्यान ऐकायची सोय पण होते. बाकी ग्रीस च्या चलनाला पुण्यामधे फाट्यावर मारलं जातं.
३. बर्याच फोरम्स मधेय वाचतेय कि "शनिवार वाड्याला पिण्याच्या पाण्याचे आबाळ आहे. म्हणजे हॉटेलात जसे आपल्या इथे सर्रास आणि मुबलक पाणी असते तसे तिथे मिळत नहि."
सत्यवचन. प्यायचं आणि वापरायचं पाणी माणशी ९० लिटरच्या बादल्यांमधुन घेउन यावं. तांब्याची सोय करुन मिळेल. फुलपात्र दोघात मिळुन एकचं मिळेल
४. शनिवार वाड्या मध्ये करण्यासारख्या बर्याच famous activities आहेत, पण त्याच्या साधारण किमती सांगू शकाल का कुणी? आणि कोणत्या activities worth doing आहेत.?
बैठ्या अ‍ॅक्टिव्हिटी करणार का मैदानी त्यावर खर्च अवलंबुन आहे. मैदानी अ‍ॅक्टिव्हिटी शनिवारवाड्याऐवजी बाहेरच्या रस्त्यावर करा. बेशिस्त वाहतुकीमधुन खो-खो खेळत रस्ता ओलांडणे. समोरच्याच्या गाडीच्या मागच्या बाजुला आपल्या गाडीच्या पुढच्या टायरनी चुंबन देणे हा खेळ हल्ली विशेष लोकप्रिय होतो आहे. बैठ्या अ‍ॅक्टिव्हिटी म्हणाल तर त्याविषयी नुकतेचं बैठी अ‍ॅक्टीव्हिटी करुन गेलेले श्री. शोनुटक्का साहेब उर्फ लाडोबा अधिक माहिती देउ शकतील. तांबीय अ‍ॅक्टीव्हिटीला पर्मिशण णाही. पोकळ बांबु घेउन लोकं जागोजागी बसलेले असतात. (नुसते. तांबे घेउन नाही).
६. शनिवार वाड्याच्या बाहेर खरेदी करण्या जोगे असे काही आहे का?
शनिवार वाड्याच्या शेजारी हल्ली बर्‍याचं सर्व्हिस इंडस्ट्रीज उघडलेल्या आहेत. कानातला मळ काढुन देणे, अत्तरं विकणे, चुना लावणे वगैरे वगैरे. आपला अ-नुभव हिच्चं खात्री.
. ७. साधारण या पुणे दौर्याला काय काय सोबत घ्यावे ?
चितळ्यांसाठी तुमच्या गावची/शहरातली फेमस बाकरवडी आणा. शिवाय सहनशक्ती पण आणा. तुमच्या काल-पनिक पिक-निकला सुबेच्छा!! पुस्प्गुच्च देउन स्वागत.

In reply to by टवाळ कार्टा

जहाज योग्य मार्गे चालले आहे. प्रवासास शुभेच्छा !!! मौजे : कोपच्घेणे (बुदृक) ता: तास(ण) गांव जि: पु(र्)णे

१. साधारण जेवण कितपत खर्चाचे असते? कुठल्याही हॉटेलचा कुठलाही प्लान घेतला नाही. म्हणुन दुपारच्या जेवणाची सोय बाहेरच करावी लागणार .
सगळ्यात स्वस्त हवं असेल तर जोशी वडेवालें कडला वडा खा. तो पुण्याबाहेरच्या लोकांमध्येच जास्त फेमस आहे. असले प्रश्न विचारणार्‍यांना तो खायला लावला की पुन्हा असे लोक पुण्यात येत नाहीत. वैशाली रुपाली नावाच्या दोन बालिका उगाचच अतिमहागड्या आहेत आणि उभ्या उभ्या पायावर वारुळं जमायला लागली की जागा मिळते हे लक्षात ठेवा. बाकी पुण्यवान लोकांच्या पेठेत गेलात तर बर्‍याच ठिकाणी थाळी मिळते ती स्वस्त असते. पण पानात टाकलंत तर दुप्पट पैसे भरावे लागतात (आणि त्यामुळेच थाळी स्वस्त असते, नावालाच फक्त गरीब लोकांची काळजी हे बाहेर पडताना तुमच्या लक्षात येईलच). बाकी जेवण झाल्यावर तोंड धुताना वॅक वॅक, खॉक क्वॅक सारखे आवाज काढत तोंड धुणार्‍याचा सत्कार केला जातो हे लक्षात ठेवा (अर्थात हे आधी सांगतच नाहीत, त्यामुळे त्यांना सरप्राईज दिलंत तर उत्तम, त्यातून तुमच्या कुटुंबसंख्येमुळे हा ध्वनी हॉटेलच्या बाहेर सुद्धा जाईल त्यामुळे ते सत्कार करतीलच करतील याची काळजी बाळगा). २. घरुनच सुटे पैसे न्यावेत ? कि तिथेच बदलावे? कोणत्या नोटात बदलावे? १०-१० , कि ५०-५० ? साधारण किती १-१,५-५ असे सुटे जवळ ठेवावे? पुण्यातल्या बसच्या कंडक्टर्स जवळ भरपूर मोड असते आणि ती कुणाला द्यावी या काळजीत असल्याने ते वैतागलेले असतात. ५००-१००० च्या नोटा फक्त ठेवा. ४. शनिवार वाड्या मध्ये करण्यासारख्या बर्याच famous activities आहेत, पण त्याच्या साधारण किमती सांगू शकाल का कुणी? आणि कोणत्या activities worth doing आहेत.? पक्षीदर्शन ही सगळ्यात चांगली अ‍ॅक्टिव्हिटी. वेगवेगळ्या प्रकारचे व रंगाचे पक्षी दिसतात. काही पक्षी भारताबाहेरून सुद्धा आलेले असतात. दुसरी महत्वाची अ‍ॅक्टीव्हिटी म्हणजे 'काका मला वाचवा' चा आवाज कुठून येतोय का याचा शोध घेणं. यासाठी अमावस्येच्या रात्री जाणं आवश्यक आहे म्हणतात. एक लाईट शो पण सुरू झाला आहे. त्यात मराठ्यांचा इतिहास वगैरे बोरिंग गोष्टी सांगतात (नुस्तं सांगतातच आणि मग घरी जायला सांगतात). ती टाळली तर बरंच. तो बघणार असलाच तर डास मारायसाठीचं रॅकेट घेवून जा. टाईम पास चांगला होईल. ५. ह्या activities चे साधारण काही packages असतात का? आणि ते कुठून बुक करू शकतो? ते बुक करता येत नाहीत. आम्ही अशा गोष्टी सुलभ, सरळ करण्याच्या विरुद्ध आहे. उगीच माणसांचा लोंढा येवून सगळी तिकटं विकली गेली तर उगीच पुण्याची बदनामी व्हायची. तिकीट तिथंच विकत घ्यायचं. ६. शनिवार वाड्याच्या बाहेर खरेदी करण्या जोगे असे काही आहे का? आहे तर. बाहेर परकार आणि आयोडेक्स मिळतो. ७. साधारण या पुणे दौर्याला काय काय सोबत घ्यावे ? १. मराठी डिक्शनरी (जर तुम्ही विदर्भ साईडचे असाल तर) २. एक सुईदोरा ३. एक उदबत्ती ४. दोन बटाटे ५. एक ताडपत्री ६. पाँड्स पावडरीचे २ मोठे डबे ७. व्हिक्स इन्हेलर सध्या एवढं पुरे. मी इथे विचारलेल्या प्रश्ना व्यतिरिक्त अजून काही अवांतर माहिती मिळाल्यास उत्तम. अवांतर माहिती मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाकडे किंवा चितळेंच्या मंडई शाखेकडे चौकशी करावी.

एकापेक्षा एक मौल्यवान सल्ले वाचून जीव धन्य झाला, डोळे पाणावले आणि पुणेकर असल्याचा मनापासून अभिमान वाटला :)

तिथे संध्याकाळी शनिवार वाड्यावर आधारीत ध्वनी-चित्र-प्रकाश कार्यक्रम असतो . रात्री फार उशीरा थांबु नये . कारण 'काका मला वाचवा' असे शब्द कानी येतात .

शनिवारवाड्यातुन पर्वतीला एक भुयार जाते (असे म्हणतात) त्याचा शोध घेऊन भुयारामार्गे पर्वती गाठावी. एकदम मोफत थ्रीलिंग आणि चकट्फु अ‍ॅक्टीव्हिटी

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शोध घेवून? अहो मागे एका पर्यावरणस्नेही संस्थेने हे काम केलं होतं म्हणतात. आत शिरेतो पाहातात तो काय? एक भैया तिथे पाणीपुरीचा स्टॉल लावून आधीच उभा होता म्हणे. कुठल्या जमान्यात वावरता तुम्ही?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

ते भुयार आता बंद करण्यात आले आहे. असे म्हणतात कि त्यातून घोडे जाऊ शकतात इतके मोठे भुयार होते. ते चालू ठेवले असते तर पुणेकरांचे underground मेट्रो नाही पण underground घोडेस्वारीचे स्वप्न नक्की पूर्ण झाले असते. वर मुंबईकरांना हिणवता आले असते.

In reply to by साधा मुलगा

अहो, घोडे काय घेऊन बसलात? इतकं लहान करू नका हो त्या भुयाराला. साधा घोडा जायला ते काय उंदराचं बीळ आहे? त्या भुयारातून अम्बारीसकट हत्ती जायचा म्हणे.

३. बर्याच फोरम्स मधेय वाचतेय कि "शनिवार वाड्याला पिण्याच्या पाण्याचे आबाळ आहे. म्हणजे हॉटेलात जसे आपल्या इथे सर्रास आणि मुबलक पाणी असते तसे तिथे मिळत नहि."
* हे म्हणजे म्हणजे समुद्रात जाऊन पाणी कुठे मिळेल असे विचारणे झालें! पुण्यांत पाण्यांची आबांळ होऊ नये म्हणून खालीलं ठिकाणीं '''नद्यां, तलावं, हौदं आणि कालवें''' उपलब्धं आहेंत !! (सौजन्य मराठी विकिपीडिया) - * आंबील ओढा * ऑलिंपस हेल्थ क्लबचा तरण तलाव, कोथरूड * इंद्रायणी * ए.बी.एस. फिटनेस ॲकॅडमीचा तरण तलाव, विश्रांतवाडी * एलारस पूल्स, पूर्व चिंचवड * एस पी कॉलेजचा तरण तलाव * औंध तरण तलाव, औंध गांव * करपे तलाव(हा काँग्रेस हाउससमोर होता) * कात्रजचा तलाव * काळा हौद * कोंढव्याचे तळे * क्लब ॲक्वाया, कोरेगांव पार्क * [[न.वि. गाडगीळ]] जलतरण तलाव, (गाडगीळ प्रशाला) * गोपाळ हायस्कूलचा तरण तलाव * घोरपडी गाव तरण तलाव * चॉईस स्विमिंग पूल, कोथरूड * विष्णू अप्पा जगताप जल तरण तलाव, धनकवडी * जे.एस स्पोर्ट्‌स क्लबचा तरण तलाव, पिंपळे सौदागर * टिळक तरणतलाव, प्रभात रोडच्या डाव्या हाताला * डेक्कन जिमखाना या संस्थेचा तरण तलाव * केशवराव ढेरे तरण तलाव, येरवडा * तळजाई तलाव * देव नदी * धनकवडी तरण तलाव * नाग नदी * नागझरी * नांदे जलतरण तलाव, बालगंधर्व नाट्यगृह (जंगली महाराज रोड) * नाना हौद * नांदे तरणतलाव * निळू फुले तरणतलाव, स्वार गेटजवळ * न्यू जॉय्ज स्पोर्ट्‌स क्लब तरण तलाव, पाषाण * पंचहौद * पद्मावती तळे * नानासाहेब परुळेकर विद्यालयाच्या आवारातील जल तरण तलाव, विश्रांतवाडी * पवना नदी * पाषाण तलाव * पूना क्लबचा तरण तलाव * पूना स्पोर्ट्‌स ॲकॅडमी तरण तलाव, कल्याणीनगर * पेगॅसस हेल्थ क्लबचा तरण तलाव, हिंगणे बुद्रुक * पेशवेकालीन कात्रजचा पाट * फडके हौद * भामा नदी * महाराष्ट्रीय मंडळाचा तरण तलाव * मानस सरोवर * मावळ सृष्टी रिझॉर्ट, लोणावळा * मुठा उजवा तीर कालवा * मुठा डावा तीर कालवा * मुठा नदी * मुळा नदी * वस्ताद बलभीम मोकाटे जल तरण तलाव, गुजरात कॉलनी (कोथरूड) * मोबियस फिटनेस सेंटर्चा तरण तलाव, बाणेर रोड * नथूजी दगडू भेगडे जलतरण तलाव, कर्वेनगर * भैरोबा नाला * राज एंटरप्रायझेसचा तरण तलाव, शिवणे (खडकवासला) * योगगुरू रामदेव महाराज क्रीडा संकुल व जलतरण तलाव, तळजाई टेकडी * लेखा फार्मचा तरण तलाव, देहू रोड * वंडर पूल्स, तळेगाव दाभाडे * शाहू कॉलेजचा तरणतलाव, पर्वतीदर्शनजवळ * शाहू तरणतलाव, सोमवार पेठ * शिवाजी तलाव(हा बुजवून त्यावर संभाजी उद्यान केले) * श्री छत्रपती शिवाजी महाराज तलाव, आकुर्डी * शेप्स फिटनेस क्लबचा तरण तलाव, विश्रांतवाडी * श्री जिमचा तरण तलाव, विमाननगर * सदाशिव पेठ हौद * स.प. कॉलेजचा तरण तलाव, एस.पी. कॉलेजच्या मागे * साततोटी हौद * वीर सावरकर तरण तलाव, कोंढवा खुर्द * संजय हेल्थ क्लबचा तरण तलाव, पाषाण गाव * सारसबाग तळे * सिंफनी क्लबचा तरण तलाव, पाषाण * सिंबायोसिस कॉलेजचा तरण तलाव * सिल्व्हर तरण तलाव, हॅपी कॉलनी, कोथरूड * सोलॅरिस तरण तलाव * हार्मनी ॲक्वॅटिक क्लबचा तरण तलाव, कोथरूड * पण उपरोक्त प्रत्येक ठिकाणचे पाणी प्रवाशांच्या आरोग्यास हितकार असेलच असे नाही. पाण्याची आबाळ होऊ नये आणि शेजारील परीसरात आरामदायी न्याहारीसाठी बरेच हौद आहेत. * काळा हौद * खाजगीवाले बागेतील हौद * गणेशपेठ हौद * ढमढेरे बोळातील हौद * तांबट हौद * तुळशीबाग हौद * नाना हौद * पंचहौद * फडके हौद * फरासखाना हौद * बदामी हौद * बाहुलीचा हौद * बुधवार वाड्यातील हौद * बोहरी जमातखान्यातील हौद * भाऊ दातार हौद * भाऊ महाराज हौद * भुतकर हौद * रामेश्वराजवळचा हौद * लकडखान्यातील हौद * पुणे विद्यापीठातील पुष्करणी * शनिवारवाड्यातील दोन हौद (पुष्करणी आणि हजारी कारंजे) * सदाशिव पेठ हौद (हे दोन हौद होते) * साततोटी हौद एकेकाळी पुण्यात बरेच हौद होते. या हौदांत एकतर पाण्याचे झरे होते किंवा कात्रजहून कालव्याद्वारे या हौदांना पाणीपुरवठा होत असे. अजूनही काही हौद शिल्लक आहेत. अशा काही अस्तित्वात असलेल्या नसलेल्या हौदांची नावे वर दिली आहेत:(सौजन्य मराठी विकिपीडिया) न्याहारी नंतर भटकंतीसाठी (साइट सिइंग) पुणे शहरात पुढील प्रमाणे बर्‍याच बागा आहेत * अभिरुची गार्डन (रेस्टॉरन्ट) * आशीष गार्डन (सोसायटी) * ओंकार गार्डन (रेस्टॉरन्ट) * ओशो झेन बाग * कबीर बाग * करोलबाग (रेस्टॉरन्ट) * कौसरबाग (कोंढवा-पुणे) * गणेश बाग (सोसायटी) * ग्रीनफील्ड गार्डन (रेस्टॉरन्ट) * चांदणी गार्डन (रेस्टॉरन्ट) * चिमण बाग * ढमढेरे बाग * [[तुळशीबाग]] * नातूबाग * पटवर्धन बाग * पुरंदरे बाग (आता अस्तित्वात नाही) * पेरूचा बाग * पेशवे बाग * बेलबाग * ब्रह्मा गार्डन ((रेस्टॉरन्ट) * भिडेबाग * भुजबळ बाग (बिल्डर्स) * माणिकबाग * मोतीबाग * रमणबाग * राम बाग * वसंतबाग * [[सारस बाग]] * सिताफळ बाग * सुंदर गार्डन (सोसायटी) * सुपारीबाग * सोपानबाग * हिराबाग वाचून आपण अंदाज बरोबर बांधला असेलतर वरील यादी बगीचा नसलेल्या बागांची आहे. (सौजन्य मराठी विकिपीडिया) विकत मिळणार्‍या पुस्तकांचे माहेरघर अप्पाबळवंत चौक दत्तालॉज कसबापेठेपासून जवळच असणार आहे तेव्हा आपल्या प्रश्न मालिकेतील उर्वरीत माहिती खालील पुस्तकात मिळाल्यास पाहणे. * आम्ही करतो तोच कायदा : आम्ही राजे पुण्याचे (विनोदी लेखसंग्रह; लेखक : [[सुधाकर जोशी]]) * नामवंत पुणेकर, संस्था - वास्तू (लेखक: शां.ग. महाजन) (सौजन्य मराठी विकिपीडिया) मंडळी ह. घ्या.

मिपा वरतीच मी शनिवार वाड्यावर दोन लेख लिहिले होते. ती लेखमाला पूर्ण करणे कालांतराने राहून गेले. कधी जमलेच तर पूर्ण करावी असा विचार आहे. शनिवारवाडा (भाग १) : इतिहास शनिवारवाडा (भाग २) : अवशेष वर्णन (तटबंदी, दरवाजे आणि नगारखाना) शनिवारवाड्यात वरवर पाहायचे म्हणाल तसे जास्ती काही नाही परंतु वेगवेगळे चौक, ओसर्या, नगारखाना, कारंजे, हौद इत्यादी आपल्या दिसतात. कुणीतरी माहिती सांगणारे किंवा फिरून दाखवणारे असेल तर अतिशय उत्तम. (कधीकाळी शनिवारवाड्यावर मित्रांना 'गाइडेड टूर'साठी घेऊन गेलेला) सव्यसाची

In reply to by सव्यसाची

(कधीकाळी शनिवारवाड्यावर मित्रांना 'गाइडेड टूर'साठी घेऊन गेलेला)
(कधीकाळी त्या टुरीत सहभागी झालेला) बॅटमॅन.

शनिवारवाड्याला भेट देऊ नये, आत काहीही नाही, गेल्यास निराशा होईल असे अनेक पुणेकरांनी कळवळून सांगितले आहे. त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून तिथे गेलात आणि आत काहीही नसल्याने निराशा झाली तर म्हणू नका की किती बंडल ठिकाण होते, पुणेकरांना स्वतःचंच कौतुक इ. इ.

In reply to by खटपट्या

माहीतगार तुम्ही सुद्धा ?
म्हणजे काय हो ? या निमीत्ताने मीही बर्‍याच दिवसांनी मराठी विकिपीडियाच्या पुणे लेखावर चक्कर मारली तर कुणी हौसेने पुणे शहरातील बगीचे नसलेल्या बागा, आणि अस्तीत्वात नसलेल्या हौदांची नावे लेखात भरली आहेत हे पाहून अंमळ कौतुक जाहले ते आम्ही शेअर केले एवढेचं.

In reply to by बॅटमॅन

बोका वारला . खात्री करण्यासाठी त्याच्या समाधीला भेट द्यावी . पत्ता:मुक्काम पोस्ट हडळ बुद्रुक, बोकोबाची वाडी, जिल्हा मांजरी

(टिप : यानंतर जर कुणी बोक्याचं नाव काढलं तर त्याला सदरील पत्त्यावर पाठविण्यात येईल)


काहो बोका कशानी वारला हो? वैट्ट झालं बघा नाहीतर आणता आलं असतं पुण्याला. जरा शनिवारवाड्यामधले चार उंदिर खाल्ले असतेन तर शहाणा झाला असता. http://www.misalpav.com/node/17219

आमची प्रेरणा: http://www.misalpav.com/comment/713835#comment-713835 १. सर्वप्रथम 'छदाम' - INR currency conversion rate मधे तुमचा घोळ झालेला दिसतोय तो दुरुस्त करतो. १ 'छदाम' = २ INR (१० INR नव्हे) . २. दुपारच्या जेवणाची किंमत तिथे हॉटेल to हॉटेल खुप vary होते असं बघण्यात आलं. आम्ही 'बोकडखाना' रेसोर्त मधे थांबलो होतो. तिथे lunch १००० 'छदाम' ला होतं. Tour कंपनीने आम्हाला क्वाड बाईकिंग साठी एका ठिकाणी नेल होतं. तिथल्या साध्या मर्यादित भारतीय थाळीचा भाव ५०० 'छदाम' होता. तो खूप जास्त वाटला. शॉपिंग मॉल मधे एका भारतीय हॉटेलात १२० 'छदाम' मस्त थाळी मिळाली होती. आमचा तिथला driver आम्हाला सांगत होता कि तिथे local ठिकाणी जेवण स्वस्त मिळत. पण tourist spots ला रेट खूपच जास्त असतात. ३. सहा दिवसांसाठी खर्चासाठी साधारणतः १५००० - २०००० 'छदाम' तुम्हाला लागतील असा पकडून चला. त्या हिशोबाने तुम्ही छदाम सोबत नेऊ शकता. मी ICICI visa डेबिट कार्ड वापरून तिकडच्या ATM मधून लागेल तसे छदाम काढायचो. मला ते स्वस्त पडलं. याबद्दल तुम्ही तुमच्या बँक मधे चौकशी करू शकता. ४. आम्ही airport मधून रेसोर्त ला जात असतांना वाटेत एका दुकानातून १.५ लिटर च्या १० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या घेतल्या होत्या. त्या परत येईपर्यंत पुरल्या. पण त्याची चिंता करायचा कारण नाही. तुम्ही दुसर्या दिवशी पण लागेल तर पाणी विकत घेऊ शकता. तिथले tour guide फार co -operative आहेत. काही रेसोर्ट्समध्ये प्यायचा पाणी available असतं. Airport वर उतरल्यावर टुर गाईड कडून एखादा सीम कार्ड पण घेऊ शकता. ५. अत्युच्च दर्जाचे Glass bottom जांघिये, पारदर्शक बनियान, बिडी-सिगारेट, तंबाखू -पान, गुटका वगैरे आमच्या रेसोर्टमध्ये complimentary उपलब्ध होते. Resort ला private शेतखाना असेल तर तिथे मोस्टली सगळीकडेच असतात. या व्यतिरिक्त स्कूटर driving तुम्ही नक्कीच करू शकता. शनिवारवाड्याच्या च्या चारही बाजूला खूप जास्त कपल्स असल्यामुळे आणि तिथे दृष्टीआडील सृष्टी बघायची मज काहीच औरच आहे. बाकी तुमच्या tour मध्ये १ दिवस सारसबागेसाठी असे लच. प्रचंड गर्दी असते. ६. भिकंभट tours हि तिथली मुख्य tour कंपनी आहे. आपल्याकडच्या बोटावर मोजण्या इतक्या travel कंपन्या सोडल्या तर इतर सगळ्या कंपन्यांचं tie up भिकंभट सोबतच आहे. तुम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या पाच्कागे विषयी माहित गाईड कडून मिळेलच. त्याबद्दल बिनधास्त रहा. ७. राघोबादादा हा फक्त पुण्यात मध्ये आढळणारा आणि काही शे वर्षांपूर्वी नामशेष झालेला, न उडणारा माणूस. त्याची छोटीशी प्रतिकृती आठवण म्हणून आणू शकता. अजून विकत घेण्यासारखं विशेष असा काही नाही. ९. Universal टमरेल converter सोबत नेल्यास फायदा होईल. १०. तुमच्या ३ leisure days मधे तुम्हाला एक दिवस मंडई मधे जाता येईल. स्वस्त आहे ती comparatively . तिची माहिती पुस्तिका पण तुम्हाला पहिल्या दिवशी तुमच्या गाईड कडून मिळेल. ती बघून तुम्ही planning करू शकता. कुटुंबासोबत फिरायला जाण्यासाठी शनिवारवाडा एक अतिशय सुंदर जागा आहे. आणि तुम्ही निवडलेला वेळ पण अगदी योग्य आहे. पुण्यामधली ७५% जनता मराठी आहे. मराठी गाणे सर्रास ऐकले जातात. मराठी भाषा पण त्यांना बऱ्यापैकी कळते. भरपूर मंदिर आहेत. सगळीकडे पुणेरी पद्धतीच जेवण मिळतं. आणि ४-५ पिढ्यान्खाली त्यांचं मूळ पुण्यातलं असल्याने पुण्याविषय त्यांना आत्मीयता पण आहे. तिथली Hospitality पण एकदम मस्त. टवाळक्या हा या शहराचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत असल्याने टवाळक्या ना सगळीकडे atmost priority मिळते. अजून काही आठवलं कि पुन्हा टंकवतो. :)

बोक्याने शन्वार वाड्यातील घुशी उंदीर समजून खाल्ल्या. त्यामुळे त्याला अंमळ अपचन झाले आनि अतीसारामुळे त्याचे देहावसान घडले. सशाने कुत्र्याचा पाठलाग केल्याची कथा शन्वार वाड्या बद्दल सांगितली जाते

भटकंतीचं पोस्ट मॉर्टेम टाकलेलं नाहीत? नै म्हणजे तुमच्या धाग्यावर एवढ्या टिमक्या वाजवल्या त्याचं पुण्यफळ मिळु दे की लोकांना?