https://www.youtube.com/watch?v=kBQSdqnIn40 ^^ नितिन किर्लोस्कर नामक एका व्यक्तीने हा व्हिडिओ काल फेसबुकवर अपलोड केला होता. हा व्हिडिओ त्यांनी वरंधा घाटात कालच काढलेला आहे. गेल्या २२ तासांमध्ये १,६७८ लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ काही पत्रकारांपर्यंतसुद्धा पोहोचला आहे आणि त्यांनी या व्हिडिओतल्या व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ आणि Sanctuary Asia चे संपादक बिट्टू सेहगल यांनीसुद्धा त्यांच्या परीने त्या लोकांचा शोध घेण्याचे ठरवले आहे. व्हिडिओमध्ये गाडीचा क्रमांक १७७७ असा दिसतोय. गाडी MH-12 ची होती की MH-14 ची हे त्यांना नेमके आठवत नाहीये. तुमच्या ओळखीतल्या कोण्या व्यक्तीची तर नाही ना ही गाडी ? तर या व्हिडिओच्या निमित्ताने परत एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे की अशा घटनांचा व्हिडिओ काढण्याऎवजी, लोक पुढे जाऊन असला प्रकार थांबवत का नाहीत ? माझे मत विचाराल, तर मला वाटते की प्रत्येक व्यक्ती 'धाडसी' आणि 'मूर्ख' असेलच असे नाही. इथे मूर्ख हा शब्द चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही अर्थाने वापरलाय. आजकाल कारण नसतांनाही लोक दात-ओठ खाऊन अंगावर येतात. आणि अशा घटनांच्यावेळी तर तुम्ही त्यांच्या 'मर्दानगी'ला आव्हान देत असता, त्यामुळे जरा जपून राहावं लागतं. पब्लिक व्हिडिओ काढते म्हणून किमान अशा घटना उजेडात तरी येतात आणि यामुळे अशा घटना थांबू 'शकतात'. त्यामुळे प्रत्येक वेळी व्हिडिओ काढणार्याला, 'व्हिडिओ काढण्याऎवजी पुढे जाऊन हस्तक्षेप का केला नाही ?' असा प्रश्न विचारणे योग्य राहणार नाही असे मला वाटते.
वाचने
4886
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
अस्वस्थ...
रिडीक्युलस !
भयानक. या माकडाच्या पिलाचं
शोध लागणे शक्य आहे
झेन कुठून दिसली? अहो आय २०
In reply to शोध लागणे शक्य आहे by अनंत छंदी
या माकडाला का पळवले त्यांनी?
अस्वस्थ
या बाबतीतली एक आशादायक बातमी
हीच बातमी शेअर करणार होतो
In reply to या बाबतीतली एक आशादायक बातमी by ज्ञानोबाचे पैजार
आता तो व्हीडीओ यूट्यूबवरुन
त्यांनी तो व्हिडिओ त्यांच्या
In reply to आता तो व्हीडीओ यूट्यूबवरुन by खटपट्या
ओके,
In reply to त्यांनी तो व्हिडिओ त्यांच्या by नांदेडीअन
माकडचोर अखेर शरण
(No subject)
In reply to माकडचोर अखेर शरण by ज्ञानोबाचे पैजार
वा !! आनंदायक बातमी !!
चला.. ते पिल्लू सुखरूप
माझी प्रतिक्रिया देखील इतर
:) ..
In reply to माझी प्रतिक्रिया देखील इतर by मृत्युन्जय
हे आठवलं
In reply to माझी प्रतिक्रिया देखील इतर by मृत्युन्जय
हे लॉजिक बरोबर आहे असे गृहीत धरुन...
In reply to माझी प्रतिक्रिया देखील इतर by मृत्युन्जय
माणसाने माणासाला मारण्याबाबत
In reply to हे लॉजिक बरोबर आहे असे गृहीत धरुन... by ज्ञानोबाचे पैजार
अखेर त्या मा़कडाची