Skip to main content

वरंधा घाटातला व्हिडिओ

रविवार, 21/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.

https://www.youtube.com/watch?v=kBQSdqnIn40 ^^ नितिन किर्लोस्कर नामक एका व्यक्तीने हा व्हिडिओ काल फेसबुकवर अपलोड केला होता. हा व्हिडिओ त्यांनी वरंधा घाटात कालच काढलेला आहे. गेल्या २२ तासांमध्ये १,६७८ लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ काही पत्रकारांपर्यंतसुद्धा पोहोचला आहे आणि त्यांनी या व्हिडिओतल्या व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ आणि Sanctuary Asia चे संपादक बिट्टू सेहगल यांनीसुद्धा त्यांच्या परीने त्या लोकांचा शोध घेण्याचे ठरवले आहे. व्हिडिओमध्ये गाडीचा क्रमांक १७७७ असा दिसतोय. गाडी MH-12 ची होती की MH-14 ची हे त्यांना नेमके आठवत नाहीये. तुमच्या ओळखीतल्या कोण्या व्यक्तीची तर नाही ना ही गाडी ? तर या व्हिडिओच्या निमित्ताने परत एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे की अशा घटनांचा व्हिडिओ काढण्याऎवजी, लोक पुढे जाऊन असला प्रकार थांबवत का नाहीत ? माझे मत विचाराल, तर मला वाटते की प्रत्येक व्यक्ती 'धाडसी' आणि 'मूर्ख' असेलच असे नाही. इथे मूर्ख हा शब्द चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही अर्थाने वापरलाय. आजकाल कारण नसतांनाही लोक दात-ओठ खाऊन अंगावर येतात. आणि अशा घटनांच्यावेळी तर तुम्ही त्यांच्या 'मर्दानगी'ला आव्हान देत असता, त्यामुळे जरा जपून राहावं लागतं. पब्लिक व्हिडिओ काढते म्हणून किमान अशा घटना उजेडात तरी येतात आणि यामुळे अशा घटना थांबू 'शकतात'. त्यामुळे प्रत्येक वेळी व्हिडिओ काढणार्‍याला, 'व्हिडिओ काढण्याऎवजी पुढे जाऊन हस्तक्षेप का केला नाही ?' असा प्रश्न विचारणे योग्य राहणार नाही असे मला वाटते.

वाचने 4886
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

व्हिडीओ खरोखर अस्वस्थ करणारा आहे. त्या व्यक्तींचा शोध लागला तर फार बरे वाटेल. पैजारबुवा,

रिडीक्युलस ! अ‍ॅब्सोल्यूटली रिडिक्युलस. शासन झाल'च' पाहिजे.....

या व्हिडिओतील गाडी झेन आहे हे दिसते आहे. शिवाय नंबरप्लेटवर सेनेचा लोगो दिसतो आहे. आरटीओकडे गाडीचा मेक, रंग याची नोंद असते. पुणे आणि पिं.चिं आरटीओकडे या नंबरच्या गाड्यांचे डिटेल्स मागितले की सहज शोध लागेल. कारण दोन्ही आरटीओकडे त्याच नंबरवर एकाच मेकच्या आणि रंगाच्या गाड्या रजिस्टर झालेल्या असणे संभवत नाही. शोध घेणार्यांपर्यंत हा संदेश पोहोचता करा प्लीज. त्या हरामखोरांना अद्दल घडलीच पाहिजे. Sanctuary Asia चे संपादक बिट्टू सेहगल यांना राज्याच्या वनसंरक्षण महासंचालकांना यात लक्ष घालायची विनंती करायला सांगा.

व्हिडीओ खरोखर अस्वस्थ करणारा आहे. त्या व्यक्तींचा शोध लागला तर फार बरे वाटेल.

In reply to by नांदेडीअन

ओके, असाच प्रकार सशांच्या बाबतीतही होतो. मुंबई-गोवा मार्गावर बर्‍याच धाब्यांवर सशांचे मटण मिळते. आणि त्यांना हे मटण आजूबाजूच्या गावातील लोक आणून देतात.

चला.. ते पिल्लू सुखरूप असल्याचे वाचून बरे वाटले. या माकडचोरांना कडक शिक्षा झाली पाहिजे.

माझी प्रतिक्रिया देखील इतर लोकांसारखीच उद्वेगाची आहे. पण माझे काही प्रश्न आहेत त्याबद्दल कृपया जाणकारांनी मत प्रदर्शित करावे: १. समजा त्या लोकांना माकड मारुन खायचे असेल तर त्यात काय चूक आहे. २. समजा त्या लोकांना माकड पाळायचे असेल तर नक्की काय चूक आहे. वरील दोन्ही प्रकार कदाचित बेकायदेशीर असतील पण ते चूक आहेत असे आपले ठाम मत आहे काय? चूक असेल तर कृपया खालील गोष्टींवर मत प्रदर्शन करावे: १. माणूस बकरा, गाय, कोंबडी, डूक्कर, मासे मारुन खातो. ते योग्य आणि माकड खाणे अयोग्य असे का? की केवळ तुम्हाला माकड खाणे अनकूल आणि क्रुर वाटते म्हणुन ते अयोग्य आहे. २. माणूस कुत्रा, मांजर, बकर्‍या, शेळ्या, कोंबडी, डुक्कर, गाय, म्हैस, घोडे पाळु शकतो तर मग माकडे पाळण्यात नक्की काय गैर आहे (वरती म्हटल्याप्रमाणे ते बेकायदा आहे / असेल ते ठीक पण नक्की चूक का आहे?)

In reply to by मृत्युन्जय

:) .. आमच्या आवडत्या दक्षिण बागेतला हा भाग याच (दांभिकते)संदर्भात आहे. भाग पाहिला नसेल तर किमन प्लॉट वाचा .. मस्तय. शेवट तर जबराच.

In reply to by मृत्युन्जय

तेच लॉजीक थोडेसे पुढे ओढले तर खालील निश्कर्ष काढता येतील... १. एखाद्या माणसाने दुसर्‍या माणसाला पैशांसाठी / धर्मासाठी किंवा कोणताही उद्देश न ठेवता मारुन टाकले तर त्याचे काय चुकले? त्याला वाटले किंवा त्याला शक्य आहे म्हणुन त्याने मारले. समोरचा दुर्बळ होता... मेला बास.... नाहीतरी तो नैसर्गिकरित्या कधितरी मरणारच होता. याच न्यायाने कसाब, लादेन हे देखील निष्पापच होते आणि तैवान का आणखी कुठेतरी लहानबाळांचे मांसखाणारे लोक पण अजिबात चुकीचे नाहित . २. अमेरिका किंवा युरोपातली गुलामगिरीची प्रथा अजिबात चुक नव्हती. एखाद्या स्त्रीला जबरदस्ती वेश्याव्यवसाय करायला लावणे अजिबात चुक नाही. बाकी आजुबाजूला घडणार्‍या घटनांचा अर्थ प्रत्येकाने आपापल्यापरीने लावण्यात काहीच चूक नाही, मी पण आपले माझे मत मांडले इतकेच. (निती अनिती, न्याय अन्याय या व्यक्तीसापेक्ष कल्पना आहेत यावर विश्र्वास असलेला) पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

माणसाने माणासाला मारण्याबाबत अजुन विचार केला नव्हता. या अनुषंगानेही विचार करुन बघता येइल. सध्या तरी प्रतिसाद केवळ माणूस विरुद्ध प्राणी या अनुषंगाने दिलेला आहे. म्हणजे काही प्राण्यांना पाळलेले अथवा खाण्याकरता मारलेले चालते पण इतर काही प्राण्यांना नाही हे असे का याबाबत जाणकारांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत आहे. :)

अखेर त्या मा़कडाची घरवापसी झाली. त्या माकडाच्या नातेवाईकांनी थोडा त्रास दिला, परंतू शेवट गोड झाला.