Skip to main content

एक काम करण्याची परवानगी दे फक्त

लेखक कहर यांनी मंगळवार, 30/06/2015 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
रागाने झिडकारशील स्वतःपासून दूर करशील पण एक काम करण्याची परवानगी दे फक्त मी बांधलेल्या मंगळसूत्राची वाटी तुझ्या नकळत गळ्यात होईल पलटी ती सरळ करण्याची परवानगी दे फक्त हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त. केसांच्या बटांची ती रेशीमडोर लटक्याने येईल डोळ्यांसमोर ती मागे सारण्याची परवानगी दे फक्त हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त. घाईत कधी हळूवार फसेल कुठेसा पदर तो सोडवण्याची परवानगी दे फक्त हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त. रात्री एकांती कधी चमकेल वीज दचकून अचानक तुटेल नीज कुशीत घेऊन थोपटण्याची परवानगी दे फक्त हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त. तुजवीन सखे काय ठाव कधी अर्ध्यावर मोडेल डाव आठवणीत येण्याची परवानगी दे फक्त हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त (भावानुवाद / प्रेरणा : गुलजार - मुझको_इतने_से_काम_पे_रख_लो)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1693
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

लग्न झाल्यावर कोणत्या कोणत्या परवानग्या घ्याव्या लागतात(स्वतःच्या बायकोच्या) ते सुज्ञ (आणि विवाहित ) मिपाकरांना विचारावे हुकुमावरून कहर ;) ;)