Skip to main content

निखिल वागळे

लेखक काळा पहाड यांनी शनिवार, 27/06/2015 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
निखील वागळे धर्म बदलणार आहे अशी बातमी आहे. याविषयीची भाऊ तोरसेकरांची टिप्पणी इथे आहे: http://jagatapahara.blogspot.in/2015/06/blog-post_9.html मी मुंबापुरीशी निगडीत नसल्यामुळे महानगर आणि निखील वागळे बद्दल फक्त ऐकून होतो. पण आजचा सवाल नावाची डोकेदुखी सुरू झाल्यानंतर काही दिवस ती पहाण्यात गेल्यानंतर वागळेची पार्शियल वृत्ती ध्यानात आल्यावर तो चॅनलच बंद केला. नंतर या महाशयांना तो चॅनल अंबानींनी विकत घेतल्यावर हाकलण्यात आल्याचं कळलं. सध्या मी मराठी नावाचा थोडा का होईना चालू असणारा चॅनल आम्ही बंद ठेवतो. वागळेचे अनिरुद्ध जोशींशी बोलतानाची क्लिप इथे आहे: http://www.knowyourlaw.com/nikhil-wagle-change-religion/ या महाशयांवर या क्लिप मुळे अजून एखादा गुन्हा दाखल झाल्याचं ऐकिवात नाही. पहिलं म्हणजे ही क्लिप मी मराठी चॅनलनं किंवा त्यांच्या ओनर्स नी ऐकली नसेल का? असं असताना सुद्धा निखिल वागळे अजून तिथे कसं काम करतायत? दुसरं म्हणजे दुसर्‍या चॅनल्स नी ही क्लिप जनतेला का ऐकवलेली नाही? हा माणूस सरळ सरळ धमकी देत असताना शिवसेना जिला या माणसाशी लढण्याची खुमखुमी आहे ती काय करतेय?

वाचने 53186
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

सदस्यांनी सुविधेसाठी रेकर आणि फुजी असे लघूरुप वापरावे. (कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे कुठे कुठे शोधु तुला, तुझे अनंत देव्हारे)

In reply to by संदीप डांगे

दुरुस्ती कुठे कुठे शोधु तुला, तुझे अनंत देव्हारे ऐवजी कुठे कुठे बोधु तुला, तुझे (आय डी) अनंत देव (सुद्धा) हारे !

In reply to by dadadarekar

"अहो रूपम् अहो ध्वनि:" असं आहे ते.

वागळे किंवा तत्सम मंडळी असली नाटकं करतात त्याचं काहि वाटत नाहि.... ते खपतं याचं दु:ख वाटतं

In reply to by अर्धवटराव

बोलल्ले ते वागळे आणि अनिरुद्ध जोशी ना ? हा निखिल जोशी कुठून मधे आला ?

In reply to by dadadarekar

आपल्यासारख्यांना याची फोड करुन सांगावी लागु नये दादा.

In reply to by अर्धवटराव

दोन माणसे फोनवर बोलत असताना तिसर्‍याने कसे काय रेकॉर्डिंग केले. ? तॉ जोशी या जोशीला सामील होता म्हणजे फोन रेकॉर्ड होतोय हे बोलणार्‍या जोशीला ठाउक होते. वागळेला फोन रेकॉर्ड होतोय हे ठाउक नव्हते.

In reply to by dadadarekar

वागळे साहेब जर घटीत-अघटीत गोष्टी आपल्या मर्जीप्रमाणे कधिही-कुठेही ऐकु शकतात तर निखील जोशीने रेकॉर्डींग केल्यास आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे त्यात??

In reply to by अर्धवटराव

स्वतःला शोध पत्रकार म्हणवणार्‍या माणसाला आपला कॉल रेकॉर्ड केला जाऊ शकतो हे समजत नसेल का?

In reply to by पैसा

जोशीने आधी निनावी मेसेज करुन वागळेला इरिटेट केला. नंतर कॉल केला. आता त्या संवादात वागळे जहाल शब्दात बोलणार हे नक्कीच होते. चतुरपणे जोशीने त्यामुळे हा कॉल रेकॉर्ड केला. वागळेने ' कावा ' असा उल्लेख केला आहे, तो असाच तर असतो ना ?

In reply to by dadadarekar

शोध पत्रकारिता म्हटल्यावर हे चालतच ना? परवा अर्णवकडे ललित मोदीच्या संबंधित ईमेल्स कशा पोचल्या हेच लोक विचारत होते ना!

In reply to by dadadarekar

मिपावरदेखील काही कावेबाज लोक ====> कोण? जिनियस माणसाना ====> कुठल्या? डिवचत बसले आहेत =====> कशावरून?

In reply to by dadadarekar

जोशीने आधी निनावी मेसेज करुन वागळेला इरिटेट केला.
गेट वेल सून या एसएमएस मध्ये इरिटेट होण्यासारखं काय आहे?
आता त्या संवादात वागळे जहाल शब्दात बोलणार हे नक्कीच होते. चतुरपणे जोशीने त्यामुळे हा कॉल रेकॉर्ड केला. वागळेने ' कावा ' असा उल्लेख केला आहे, तो असाच तर असतो ना ?
तसं असेल तर वागळे ज्या जमातीला रिप्रेझेंट करतोय त्यांचा 'गुढघ्यात' असा उल्लेख केला तर चालेल ना? की हे वाक्य टाकून मी तुम्हाला 'इरिटेट' केलं? लै इरिटेट होणारे लोक ब्वा तुम्ही. गेट वेल सून, दादा.

In reply to by काळा पहाड

नाही हो.... ते तसे नाहीत. ते फार ज्ञानी आणि उदारमतवादी आहेत. ते फक्त त्यांचे ज्ञान आपल्याजवळच ठेवतात, असे वाटते. शंका विचारल्या तर त्यांच्याकडे उत्तरे असतात.पण ते देत नाहीत.दादा, असें ज्ञान झाकून कसे चालेल? पुर्वी एक गहन-विचारी होते, ते पण असेच. हो की नाही हो, दादा. (दादांचा आणि फुलथ्रॉटल जिनियस, यांचा फॅन) मुवि

आपल्या बोलण्याचे रेकॉर्डिंग होतय हे वागळेंना माहित नसावं. पण रेकॉर्डिंग करणार्‍या जोशींना ते पक्क माहित होत. त्यामुळे अगोदरच उचकलेल्या वागळेंना अजून शांतपणे उचकवणे सोप गेल असाव. निखिल वागळे आक्रमक व उचकणारा पत्रकार आहे हे सर्वज्ञात आहे. ते काही संयमी व विवेकी पत्रकार नाहीत. वागळे हे पत्रकारितेतील आदर्श नसले तरी पत्रकारितेला एक वेगळा पैलू देण्यात यशस्वी आहेत.माध्यमदांडग्यांची निर्मिती कशी व का झाली हा वेगळा विषय आहे. वागळे हे शेवटी एक गुणदोषांचे पॅकेज आहे. पुरोगाम्यांना शाहू फुले आंबेडकर घडोघडी लागतात हे तर सर्वश्रुत आहे. सामाजिक राजकारणसाठी शेवटी काहीतरी भांडवल करावे लागते.त्यांना काही शाहू वा फुले वा आंबेडकर काही शंभर टक्के मान्य नसतात. आपल्या सोयी साठी व सोयी पुरते मान्य असतात. पण तसे प्रत्येक संघटना वा पक्षाचे प्रेरणापुरुषां बद्दल असते.काँग्रेसला गांधी आपल्या सोयीपुरते मान्य असतात.

In reply to by कपिलमुनी

मुनी +१

In reply to by प्रकाश घाटपांडे

हे असं जर शहाण्यासारखे सर्व लिहून मान्य करू लागले तर मराठी संकेतस्थळांचे काय होईल? ;)

चायला कोणी ती ऑडीयो क्लिप नीट आणि पुर्णपणे ऐकली का? मी ऐकल्यावर अगदी शेवटच्या २-३ सेकंदाच्या संभाषणावरुन मला ती क्लिप वागळेंच्या मोबाईलवर रेकॉर्ड केल्यासारखी वाटली कारण कॉल संपल्यावरसुध्धा वागळे कोणा तीसर्याशी बोलत होते बहुतेक जर असे असेल तर ती क्लिप प्रसिध्धीसाठी कायप्पावर कोणी पसरवली ते जगजाहिर आहे

In reply to by टवाळ कार्टा

तसं वाटत नाही टका, जोशींनी स्वतः फोन कट केलाच नसेल तर रेकॉर्डींग सुरू राहू शकतं. वागळेंनी कानावरून फोन काढून कट करेपर्यंतचे ते २-३ सेकंद असावे. मी फक्त टेक्निकली बोलतोय. खरं खोटं ते दोघंच जाणे.

In reply to by टवाळ कार्टा

संभाषण कोणी ध्वनिमुद्रीत केले हा मुद्दाच नाहीय्ये. वागळे हा ब्राह्मणद्वेषाने किती पछाडलेला आहे आणि किती उन्मत्त आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय हाच खरा मुद्दा आहे.

ते मुंबईत एकाच श्टींग झाल ना ते त्यानच केलं आहे असा मला संशय आहे. म्हणजे असं की मुळात व्हिडीओ करायचा. मग ऑडेओ ट्रॅक बदलायचा . दुसर्‍याच्या आवाजातला टाकायचा. श्रेष्टीना जायचा तो मेसेज जाणार . परत चौकशीत असे सिद्ध होणार की लिप मुव्हमेट जमत असले तरी आवाज वेगळा आहे सबब आमदार निर्दोष. प्रक्रण मिटणार. ( या काडीचा या धाग्याशी तसा ठेट सम्बंध काही नाही ..म्हणून क्षमस्व)

१०० झाले..

१०० निमित्त काळा पहाड़, दादा दरेकर आणि फुलथ्रोटल जीनियस यांचा सत्कार जेपी भौच्या गटारात जीव दिलेल्या मोबाइल चे भूत आणि १० रुपयाचे छोटा रिचार्ज व्हॉउचर देऊन करण्यात येत आहे. तसेच श्रीगुरुजी, संदीप डांगे आणि मुवि याना २० रुपयाचे हेडफोन देऊन सत्कार करण्यात येत आहे.

In reply to by काळा पहाड

पैसा तै जेपीच्या डूआयडी असाव्यात का?
;) बादवे, माई दिसल्या नैत बरेच दिवस. गेल्या काय त्या पण.. ;)

In reply to by श्रीगुरुजी

कशाला? आपण आपले रेकॉर्ड केलेलेच ऐकू. रेकॉर्डिंग कुणी का करेनात?

आता यापुढे मी-मराठी या वाहिनीवरील कोणतेही कार्यक्रम बघायचे नाहीत असं निदान मी माझ्यापुरतं तरी ठरविलेलं आहे. मी न बघितल्यामुळे वाहिनीला कणभरही फरक पडणार नसला तरी हरकत नाही. या वाहिनीशी संपर्क करून वागळेविरूद्ध तक्रार करण्यासाठी या वाहिनेच्या संकेतस्थळाचा किंवा ई-मेल पत्ता कोणाकडे आहे का?

एबीपी माझाच्या मराठी वाहिनीवरून प्रति-वागळे प्रसन्न जोशीची हकालपट्टी झाली की काय? बर्‍याच दिवसात चर्चासत्रात तो दिसला नाही म्हणून विचारतोय.

In reply to by श्रीगुरुजी

प्रसन्न जोशी आता "जय महाराष्ट्र" या वाहिनीवर दिसतोय. ही वाहिनी एबीपी-माझाच्या तुलनेत कमी प्रेक्षकवर्ग असलेली असावी. तसे असेल तर प्रसन्नाची एबीपी-माझा वरून हकालपट्टी होऊन पदावनती झाली आहे असे म्हणता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

बेरक्याच्या मते प्रसन्न जोशी स्वता:हून सोडुन गेलेत. बाकी वागळे स्वता:चे नवे चेनेल सुरु करत आहेत, त्याचे नाव महाराष्ट्र १ असे ठेवणार आहेत. त्याही पुढे जाउन अंबांनिंचे आयबीन आता लोकमत बरोबरची पार्टनरशिप मोडीत काढणार असे दिसतेय.

In reply to by वॉल्टर व्हाईट

बेरक्याचं सोडा हो. खुद्द प्रसन्न जोशींनी सांगितलं की मी स्वतः सोडून गेलो तरी काही लोक आपल्या मतावर कायम असतील... ;-) (अगदी प्रसन्न जोशींनी रागारागाने आपला राजीनामा बॉसच्या टेबलावर आपटतांनाचे सीसीटीवी फुटेज मिळाले तरी असली लोकं म्हणतील की हे चित्रण त्यासंबंधीचे नसून 'प्रसन्न जोशीला मिळालेल्या मेमो बद्दल तो वैतागल्याचे' आहे.)

In reply to by वॉल्टर व्हाईट

वॉल्टर व्हाईट, हा बेरक्या म्हणजे नक्की कोणती व्यक्ती आहे? त्याच्या फेबु प्रोफाईलवरून नाव समजले नाही वागळे स्वतःचे चॅनेल सुरू करीत आहे हे वाचून मजा वाटली. त्याच्या चॅनेलवर आता दिवसरात्र चर्चा, आजचा प्रश्न आणि एसेमेस पोल असेल. चर्चेत दस्तुरखुद्द वागळे, केतकर, प्रसन्न जोशी आणि आव्हाड हे एकत्रित असायला हवेत.

राजदीप सरदेसाई म्हणजे साधारणपणे निखिल वागळेचीच सौम्य आवृत्ती. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना जाहीर पत्र लिहिले होते. त्याला फडणविसांनी खालील उत्तर दिले. http://www.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=7987140 __________________________________________________________ देवेन्द्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) प्रिय राजदीप (सरदेसाई), सहसा मी ज्येष्ठ पत्रकारांनी लिहिलेल्या प्रत्येक खुल्या पत्राला उत्तर देत नाही. पण तुमचे पत्र वाचल्यावर विचार केला की उत्तर देणे जर टाळले तर गोबेल्सनीती प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. तुमचा पत्रप्रपंच म्हणजे माध्यम क्षेत्रातील एका कंपूने नीट माहिती न घेता स्वत: ठरविलेला अजेंडा राबविण्यासाठी सरकारला कसे ेझोडपून काढावे, याचा उत्तम नमुना वाटतो. स्पष्टच सांगायचं तर सध्या तरी राज्य सरकारच्या कामाकडे उपहासात्मक वृत्तीने किंवा गैरविश्वासाने पाहण्यासाठी काही वाव राहिलेला नाही. कारण आमचे सरकार सामान्य माणसाशी निगडीत अशाच विषयांवर लक्ष केंद्रीत करून आवश्यक त्या प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहे. आपल्या तीन शेलक्या मुद्यातील पहिला मुद्दा मांसाहार बंदीचा. माझ्या सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही वा एकही नवीन आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेला नाही. सन २००४मध्ये तेव्हाच्या काँग्रेस सरकारने पर्युषण पर्व काळातील दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता व पुढे मीरा भाईंदरसह अन्य महापालिकांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली. त्याशिवाय मुंबई आणि मीराभार्इंदर महापालिकांनी त्यांच्या स्तरावर काही ठराव केले व बंदीचा कालावधी त्यांच्या अधिकारात वाढविला. मुंबईबाबत असा निर्णय १९९४पासून अंमलात आणला जात आहे. आश्चर्य म्हणजे आम्ही सत्तेवर येण्याआधी तुमच्यापैकी कोणीही यावर आक्षेप घेतला नव्हता. म्हणजे यापूर्वीच्या सरकारची प्रतिमा कितीही ढोंगी-धर्मनिरपेक्ष, भ्रष्ट आणि अकार्यक्षम असली तरी तुम्ही त्याबाबत आश्वस्त होता. श्री. राकेश मारिया यांच्या प्रकरणात तुम्हीच गोंधळून गेलेले दिसता. पत्राच्या शेवटी तुम्ही लिहिता की चटपटीत बातम्यांमागे असलेली माध्यमेदेखील तितकीच दोषी आहेत. त्यांना बरबटलेल्या खुनाच्या प्रकरणामध्ये अधिक स्वारस्य होते आणि शेतकऱ्यांच्या मृत्यूची नोंदही घेतली जात नव्हती. मग मला सांगा, तुम्ही या खून प्रकरणाचा उल्लेख करून त्याचा संबंध मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीशी का लावता? एखादा पोलीस प्रमुख हा तपासी अधिकारी असत नाही, तर तो फक्त नियंत्रकाच्या भूमिकेत असतो. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बढतीच्या नियत दिनांकाच्या आधी उच्च पदावर नेमणे हेही काही नवे नाही. सप्टेंबर आणि आॅक्टोबर हे महिने विविध सणांचे आहेत. या काळात मध्येच एखादी नियुक्ती करण्यापेक्षा सण सुरू होण्याआधीच नवीन अधिकारी आला तर त्याला नियोजनास पुरेसा अवधी मिळतो व काही योजना आखता येतात. त्यात काही चूक आहे का? आणि एवढा गहजब करण्याचे कारण काय? अधिकाऱ्यांना जात आणि धर्म नसतो असे मी मानतो. तरीही मारिया यांना पोलीस आयुक्त करताना जावेद अहमद या अल्पसंख्यांक समुदायातील आणि विजय कांबळे या मागास प्रवर्गातील अधिकाऱ्यांना का डावलले गेले, अशीही टीका केली जाऊ शकली असती. तरीही मी असे ेमानतो की त्यावेळी मारिया यांना नियुक्त करताना ते या पदाला अधिक योग्य असल्याचे तत्कालीन सरकारला वाटले असावे. तुमचा राजद्रोह या विषयावरील लिहिण्याचा रोखसुद्धा योग्य अभ्यास आणि माहितीअभावी अत्यंत तर्कहीन वाटतो. शासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याच्या इर्षेपोटी एखादी व्यक्ती किती टोकाची पक्षपाती मानसिकता बाळगू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मी याबाबत एकच प्रश्न विचारतो, मा. उच्च न्यायालयाने दिलेला एखादा आदेश पोलिसांना कळवावा की नाही? आमच्या सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही. एका प्रकरणात याआधीच्या सरकारने मा.उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर मा.उच्च न्यायालयाने एका सविस्तर निकालपत्राद्वारे राजद्रोह या विषयावर आरोप कधी व केव्हा लावले जाऊ शकतात याबाबत सविस्तर विवेचन केले आणि ते सर्व पोलिसांना कळविण्याचे निदेशही दिले. सदर निकालपत्राचे संबंधित विभागाने केवळ मराठीत भाषांतर केले आणि सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना एका शासकीय परिपत्रकाद्वारे ते कळविले. तुम्ही जर ते काळजीपूर्वक नजरेखालून घातले तर त्यात हेही नमूद केल्याचे दिसून येईल की, ‘केवळ न्यायालयीन निकालपत्रावर अवलंबून राहू नये, कारण प्रत्येक प्रकरण वेगळे असते, त्यामुळे राजद्रोहाचे आरोप लावण्याआधी कायदेशीर सल्ला स्वतंत्रपणे घेण्यात यावा’. श्रीयुत सरदेसाई, आपण कार्यालयीन परिपत्रक आणि शासन निर्णय यातील फरक समजून घेण्यास इच्छुक दिसत नाही. कारण आपल्याला आपला डावा अजेंडा अत्यंत जोमाने व त्वेषाने पुढे न्यावयाचा आहे. आता जलसंधारण विषयाबाबत. राज्याला दुष्काळमुक्त करू शकणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेबाबत आमच्या सरकारने घेतलेल्या पुढाकाराबाबत उल्लेख करताना आपल्याला किती दु:ख होते आहे, हे दिसूनच येते. हा कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला आहे. राज्यातील जनतेने अतिशय उदारपणे ३०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम यासाठी सढळ हस्ते दिली आहे. त्यामुळे सहा हजार गावांमध्ये जवळपास एक लाख कामे केवळ सहा महिन्यात पूर्ण करू शकलो. थोड्याशा पावसानेसुद्धा गावांना पाण्याचे विकेंद्रित साठे उपलब्ध झाले आहेत व पाण्याची पातळीसुद्धा वाढली आहे. हा एक कलाटणी देणारा प्रयोग असल्याची पावती दस्तुरखुद्द भारताचे जलपुरुष म्हणून गौरविले जाणारे राजेंद्रसिंहजी यांनी स्टॉकहोम येथे आंतरराष्ट्रीय जलपरिषदेत दिली आहे. या कार्यक्र मामुळे जमिनीतला ओलावा वाढणार असून बदलत्या वातावरणातही पिके जगण्याचे प्रमाण वाढणार आहे. आपल्या ताटात दोन दिवस मांसाहारी पदार्थ असणार नाहीत, या कल्पनेनेच आपल्यासारखे लोक अस्वस्थ होतात तर दुसऱ्या बाजूला आपल्या अन्नदाता शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीपणामुळे जगण्याची भ्रांत आहे. वाईट खरे याचेच वाटते. पण मला आपल्या ताटापेक्षा त्या शेतकऱ्याच्या ताटात काय असेल याची अधिक चिंता आहे. म्हणूनच राज्य सरकारने ६०लाख शेतकऱ्यांसासाठी दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ वितरीत करणारी अन्नसुरक्षा योजना आणली आहे. गेल्या १५वर्षांचा कुशासनाचा आणि शेतकरी आत्महत्त्यांचा वारसा हे आमच्यापुढचे खरे आव्हान आहे. पण आमच्या सरकारने हाती घेतलेले काही उपक्रम नक्कीच चांगले निकाल देतील याची मला खात्री आहे. जर तुम्हाला यात रस असेल तर जरूर या आणि पाहा. वातानुकुलीत दालनात बसणाऱ्यांचे अजेंडे शेतकऱ्यांची चिंता सोडून अन्य काही असू शकतात. श्रीमान सरदेसाई तुमच्या पत्रातील तपशील हा तुमच्या व्यावसायिक बांधिलकीचाही भाग असू शकतो पण माझे उत्तर हे मी हाती घेतलेल्या अभियानाचा भाग आहे आणि मी ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कार्य करा अथवा संपून जा, हा माझ्या जीवनाचा मंत्र आहे आणि येता काळच माझे नशीब ठरवेल. कोणत्याही द्वेषभावनेशिवाय आपला नम्र, देवेंद्र फडणवीस

In reply to by श्रीगुरुजी

पर्युषण काळातील मांसविक्री बंदी आणि राजद्रोहविषयीचे परिपत्रक, ह्या दोन्ही मुद्द्यांना मुंबई उच्च न्यायालयाने परस्पर उत्तर दिले आहे. ह्या दोन्ही बाबतीत सरकार सपशेल तोंडघशी पडले आहे.

दूध का दूध और पानी का पानी कर दिया , देसाई को उसकी जगह बता दी , मुख्यमंत्रीजी , ये आपने बहुत अच्छा कर दिया. वाह , आपका जबाब नही. ऐसेही आगे बढते रहो, हम आपके साथ है !

आयबीएन लोकमत, मी मराठी, टीव्ही ९ असा वागळेंचा आजवरचा प्रवास झाला आही. आता त्यांची टीव्ही ९ वरील इनिंग सुद्धा संपली आहे.

या लिंक वर त्यांचे भाषण ऐकू शकता! चांगले आहे. उघडपणे सरकारवर टीका करणारे पत्रकार हे असायलाच हवेत, पण आजकाल लोकांना त्यांच्या लाडक्या नेत्यावर, पक्षावर टीका अज्जिब्बात झेपत नाही! एका वर्षाचा करार झाला झाला असताना अचानक एक दिवस कार्यक्रमाचे प्रसारण कसे थांबवले गेले? एक महिना आधी नोटीस देणे अपेक्षित होते असे म्हटले आहे. काही तरी गडबड आहेच! Nikhil Wagle Quits TV9 After TV Show is Dropped Due to ‘Political Pressure’

In reply to by शब्दबम्बाळ

उघडपणे सरकारवर टीका करणारे पत्रकार हे असायलाच हवेत, पण आजकाल लोकांना त्यांच्या लाडक्या नेत्यावर, पक्षावर टीका अज्जिब्बात झेपत नाही! आजकाल..? नक्की का..?

In reply to by मोदक

आलात? या! तुम्ही फक्त असे प्रश्न विचारायचेच काम करता का हो? भाजप सोडून बाकी पक्ष सुद्धा आहेत हो नका इतकं लावून घेऊ मनाला... पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस... असो तुमच्या समोर हे बोलून जास्त काही उपयोग नाहीच आहे म्हणा! बाकी "जमल्यास" ती लिंक किंवा बातमी पहा..

In reply to by शब्दबम्बाळ

पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस... (१) मनमोहन सिंग यांना फारसे समर्थक नव्हते. (२) मनमोहन सिंगांवर ज्या कारणांनी टीका व्हायची त्याचे समर्थन करणे त्यांच्या कट्टर समर्थकांनाही खूप अवघड होते.