Skip to main content

नंगा नाचेन मी एक दिवस

लेखक पथिक यांनी शुक्रवार, 26/06/2015 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
हाता पायातील बेड्या तोडून अंगावरील लक्तरं वाऱ्यावर भिरकावून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत अंधाराची होळी करून प्रकाशानं मनाची झोळी भरून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत नाव गाव पाण्याखाली बुडवून स्वत्त:चीच राख पायाखाली तुडवून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत
लेखनविषय:

वाचने 12217
प्रतिक्रिया 56

प्रतिक्रिया

नाही पोचली बुआ.

In reply to by सूड

सगळे विकार, वासना, बंधने, इ. (आत्म्याची वस्त्रे या अर्थाने) चा त्याग केल्यावर नंगाच असणार ना !

In reply to by पथिक

आत्म्याची वस्त्रे
यावरुन नंगा हे देहासंदर्भात आलं असं समजतो. जर आत्म्याचे वस्त्र, म्हणजे देहच नसेल तर नंगा होण्याचा संबंध कुठे येतो.

In reply to by सूड

देह रुपी वस्त्र तर फार सहज गळून जाते आणि नाही गेले तरीही फारसे नुकसान नाही त्यापासून. आत्मा जी प्रतिष्ठेची, लज्जेची, संकोचाची, इ. लक्तरे नेसून असतो ते इथे अभिप्रेत आहे. 'सर्व बंधनांतून मुक्त होऊन ' त्या आनंदात नंगा नाचेन असा अर्थ आहे.

क भौ ? काहून नाचू राह्यला बे ?

देखिये जी इस तरह धमकि देने से तो काम नहि होगा..जंतर मंतर हमारी वजह से हि आज दुनिया मे जाना जाता है! अगली पांच साल का हमारा अ‍ॅडव्हांस बुकिंग हय. आप अगर इस तरह से नाचने कि धमकि दोगे तो यार हमारे लिये क्या काम रह जायेगा.

नाचायचंच तर नच बलिये वा आजा नच ले, अशा कार्यक्रमात नाचा, म्हणजे टी.व्ही. वरुन सगळ्यांनाच दिसेल.

In reply to by तिमा

त्यांना तुमचा नंगा नाच आवडला तर बक्षिस पण मिळेल!!

नगरशेव्हक, आमदार किंवा खासदार होउन, अंगावरती खादिची झूल पांघरुन, पैशांच्या राशीत लोळेन मी एकदिवस, या सुरेश, लालु, जया आणि मायाच्या भूमीत, न्याय नितीची होळी करुन, टेंडर साठी बड्या अधिकार्‍यांची झोळी भरुन, पैशांच्या राशीत लोळेन मी एकदिवस, या सुरेश, लालु, जया आणि मायाच्या भूमीत टगेगिरी करत धरणाचे पाणी पळवून, जमिनी लुबाडून टोलेजंग इमारती बांधून, पैशांच्या राशीत लोळेन मी एकदिवस, या सुरेश, लालु, जया आणि मायाच्या भूमीत, पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, मस्तच एकदम. तदुपरि नगरशेव्हक म्हणजे अख्ख्या गावाची भादरणारा, बरोबर?

In reply to by बॅटमॅन

अख्ख्या गावाची भादरणारा = ग्रामशेव्हक अख्ख्या नगराची भादरणारा = नगरशेव्हक अख्ख्या देशाची भादरणारा = प्रधानशेव्हक पैजारबुवा,

छान

नाना तर्‍हेच्या डु आयडया काढुन ब्रिगेडि साहित्यसूर्यांचे साहित्य वाचुन नंगा नाचेन मी एक दिवस या द्वेष मत्सराच्या गुर्मित जातिवाचक धागे काढुन त्यांचेच आडनाव उधार घेउन नंगा नाचेन मी एक दिवस या द्वेष मत्सराच्या गुर्मित

स्वत्त:चीच राख पायाखाली तुडवून
अरे भाई आखीर क्या दिखाना चाहते हो ? हाडुक???

(चाल- नाच मेरी जान नाच नाच) - नाच पथिका नाच नाच तुझ्या पाण्याखाली गाव गाव राख पायात तुडव दण दण दण. दं दं दं दण... दं दं दं दण नाच पथिका नाच नाच.

कल्पना चांगली आहे पण नंगानाचाचा अतिरेक झाल्यामुळे फसलीय. प्रत्येक कडव्यातल्या त्या दोन ओळी काढून शेवटी कनक्लूजनच्या स्वरुपात वापरा. मजा येईल.

In reply to by विशाल कुलकर्णी

मी विकू भाऊ शी सहमत आहे. अति तिथे माती होते. त्यामुळे थोडक्यात गोडी असते असे समजून नाचावे. बघायला येउत..............

http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-018.gif + http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-005.gif = http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-026.gif

नारायण ! नारायण ! या घोर कलियुगात नेत्रांवर अजुन कोण कोणत्या प्रकारचा ताण सहन करावा लागेल हे त्या वैकुंठपतीसच ठावुक ! देवा नारायणा... मी यक्ष लोकात एक चक्कर टाकुन आपल्या चरणी लोटांगण घालण्यास परत यावे म्हणतो... कसे ? नारायण ! नारयण ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Hai

कुंभमेळा जवळ आला आहे. कविमहाराज, या वर्षी नाशिक/ त्र्यंब्यकला येणं करा. तुमची इच्छा पुर्ण करण्यासाठी एकदम गोल्डन चांस. बाय द वे, पुनम पांडेंचं काय झालं ? टीप : हा प्रश्न मारुती कांबळेचं काय झालं ? (चित्रपट : सामना) या चालीवर वाचावा.

In reply to by संदीप डांगे

एकदम चपखल गाणं या गाण्यातले लोक सुध्दा "अव्वा अव्वा" नाचतात. पैजारबुवा,

भाऊ कविता चांगलीच आहे. फक्त त्यातला गहन आध्यात्मिक अर्थ लक्षात येत नसावा. पण एक सुधारणा केलीत तर बरे होईल. नंगा नाच याला आपल्या समाजात वाईट हास्यास्पद अर्थ चिकटलेला आहे. त्यामुळे लोकांच्या डोळ्यासमोर वेगळी चित्रे तरळली असतील. त्यापेक्षा "नग्न होईन मी अर्भकापरी" अशी शब्दरचना चालली असती. असो आपले आपले मत!

नाच बाबा आम्हाला कंटाळा येइपर्यन्त नाच. सध्या मी डोळे झाकुन घेतो.