Skip to main content

एल ई डी प्रकारातला टी व्ही

लेखक सुनिल साळी यांनी गुरुवार, 25/06/2015 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, गेली 12 वर्षे ते आतापर्यंत माझा एल जी कंपनीचा सी आर टी टेलीव्हिजन संच काहीही बिघाड न होता खूप चांगल्या प्रकारे चालत होता. पण सध्या सुरुवातीला दणका दिल्या शिवाय टेलीव्हिजन संच चालू होत नाही :-( असो आम्ही ह्या नीर्णयाप्रत आलो आहोत की नवीन एल ई डी प्रकारातला टी व्ही विकत घ्यावा. आपल्या मिपा सदस्यापैकी बहुतेक लोक वेग वेगळ्या कंपन्याची एल सी डि, एल ए डी वापरत असणारच. आपला बहुमोल सल्ला द्यावा. अटी: > 32 इंच ते 40 इंच > कींमत: रु. 18000 ते 25000 > स्पष्ट चित्र - कोणत्याही बाजूने बघीतल्यास

वाचने 40372
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

एल जीचा ४२ इंची /एल ई डी - ३D रेडी/ हेच डी /इंग्लंड मध्ये घेऊन वापरला - पुढे कर भरून भारतात आणला . काही प्रोब्लेम नाही - इथल्या एल जीने मस्तपैकी बसवून दिला ! पण ड्युटी भरण्यामुळे किंमत मात्र रु. ७०,००० पडली . भारतात आता हा ५५००० असेल असा अंदाज आहे. अर्थात कमीवाले पर्याय आहेतच! एल सी डी चा विचारही आता करू नये. कारण - ''स्पष्ट चित्र - कोणत्याही बाजूने बघीतल्यास '' नाही मिळत

In reply to by खेडूत

एल जी ४२ इंची ५६१०LED ५०के ला padvyala घेतला ५०के ला. मस्त आहे. फ़क्त क्रोमा मधून घेवू नका.बेक्कार सर्विस. नवरा टाटा मोटर्स employee म्हणून चला आपल्याच लोकांकडून घेतला तर मनस्ताप सहन करावा लागला.

In reply to by सुनिल साळी

बहुतेक कुठल्याच एलेडीत मागच्या बाजूने चित्र दिसत नाही. ;) ह. घ्या. इतर अ‍ॅंगलने पाहण्यास आयपीएस स्क्रीन असते असे वाटते.

:) होय! अत्यन्त क्लियर... आता पाहिले : LG 42LA620V 42 Inch Smart 3D LED TV हा आहे.

कमी किंमतीत ओनिडा एक चांगला ऑप्शन आहे. मी ३९ इंच स्क्रीन चा १.५ वर्षा आधी घेतला होता. तेंव्हा किंमत होती ४३००० रुपये आता अजून कमी झाली आहे. ३डी सपोर्ट आहे. पिक्चर क्वालिटी चांगली आहे.

In reply to by नाव आडनाव

माझ्या टीवी चं मॉडेल आहे LEO40FC3DLED. कंपनी वॉरंटी १ वर्षाची होती + मी ई-झोन मधून टीवी विकत घेतला त्यांची १ वर्षाची वॉरंटी अशी २ वर्षांची वॉरंटी आहे.

Sharp LC-32LE156M ,तुमच्या बजेट मध्ये येइल. Digi १ आउटलेट मध्ये डिस्काउन्ट चालु होता, पाहवे लागेल. मी ३ महिन्यापुर्वी घेतला आहे, छान चालतो. LED घेताना दुकानदारास मी २०००० ते २५००० मधील LG, VideoCon, Panasonic, MEPL (Local Brand) आणि Sharp जवळ जवळ मान्डून चालु करायला सान्गितले. Samsung आणि Sony या बजेट मध्ये नव्हते. मला Sharp जास्त स्पष्ट वाटला आणि warrenty पण 3 years आहे.

प्रतीसादाबद्दल धन्यवाद मायक्रोम्याक्स बद्द्ल आपले काय मत आहे. फ्लिपकार्ट वर ऑफर चालू आहे. रु. २३०००+. ४० इन्च, फुल्ल एच डि. स्थानिक दुकानदार मात्र मायक्रोम्याक्स घेऊ नका असे म्हणतात.

मला जरा यातील फरक सांगाल का? HD-Ready Full HD 4K Ultra HD

In reply to by मोहनराव

एच डी = हाय डेफिनिशन. जितके जास्त हाय तितकी पिक्सेल डेन्सिटी वाढत जाते व चित्र अधिक चांगले, गुळगुळीत कागदावर छापलेल्या मासिकाच्या चित्रांसारखे दिसते. तुलनेने साध्या टीव्हीवर चित्र पेपरमधल्या फोटो सारखे ;) पण ते तसे दिसण्यासाठी मूळ टीव्ही/केबलचा सिग्नल तसा हवा. एचडी सिग्नलवाले चॅनल्स डिशवर आजकाल मिळतात, पण त्या च्यानेलसाठी जास्त पैसेही भरावे लागतात. तेव्हा सध्याच्या उपलब्धतेनुसार नुस्ता एचडी टीव्ही पुरे. * मायक्रोमॅक्स चांगला टीव्ही आहे. बेन्क्यू नामक कंपनीचा ५२" टीव्ही खूपच स्वस्तात कोरियातून आणला होता. तो छाण सुरू आहे. भारतात मिळतो की नाही ठाऊक नाही. * माझ्या मते, टीव्ही घेताना त्याच्या पाठीमागील बाजूस कोणती व किती छिद्रे आहेत, ते पाहून घेणे. उदा. यूएस्बी, एचडीएमआय, व्हीजीए, इ. इनपुट, डीव्हिडीआर व सेटटॉप बॉक्स इनपुटसाठी एकाच वेळी वापरता येतील अशी इनपुट्स, होम थिएटरसाठी आऊटपुट वगैरे. टीव्हीला यूएसबी-स्टिक उर्फ पेन ड्राईव्ह, किंवा मोबाईल, किंवा पोर्टेबल हार्ड डिस्क किंवा आपल्याकडचा डिजिटल कॅमेरा जोडल्यास त्यातून सरळ टेक्स्ट/गाणी/चित्रे/सिनेमा इ. पाहता येतो काय? आल्यास कोण-कोणत्या फॉर्म्याट्स सपोर्ट होतात, .mkv इ. नव्या फॉर्मॅट्स हा टीव्ही ओळखतो काय? हेदेखिल पाहून घ्यावे. या टीव्हीचा वापर, लॅपटॉपचा एक्स्टेन्शन स्क्रीन प्रेझेंटेशन्स, सर्फिंग इ. साठी, मोबाईलवरून/कॅमेर्‍यावरून काढलेल्या फोटोजचा फॅमिली शो, यूएसबीवरून सिनेमे पाहणे, गाणी ऐकणे इ. अनेक प्रकारांनी करता येतो.

एच डी रेडी म्हणजे ७२० P( PROGRESSIVE) 1,280×720 किंवा १ मेगा पिक्सेल फुल एच डी म्हणजे १०८० P 1,920×1,080 किंवा २ मेगा पिक्सेल Ultra HD म्हणजे २००० P (आणी जास्त) 2,048×1,536 किंवा ३ मेगा पिक्सेल (आणी जास्त) ४ K म्हणजे २१६० p 3,840×2,160 किंवा ८ मेगा पिक्सेल पहा https://en.wikipedia.org/wiki/High-definition_video

मी हल्लीच एलजी चा {LG 42LB5820} स्मार्ट एलइडी टिव्ही घेतला... हा टिव्ही घेताना खालील गोष्टी यात आहेत का ते पाहिल्या... १}फुल एचडी + आयपीएस डिस्प्ले २}नेट कनेक्टिव्हीटी { वायफाय कनेक्टिव्हीटी } ३}युएसबी आणि एचडीएमआय पोर्टची संख्या ४}फाईल फॉरमॅट प्ले सपोर्ट :- { हा जवळपास अगदी सगळे फाईल फॉरमॅट प्ले करतो अगदी .MKV सुद्धा.} ५}वॉल माउंट स्टँड :- { हा जवळपास सगळ्याच टिव्हींना हल्ली पुरवला जातो, } हव्या त्या अ‍ॅगलला टिव्ही वळवायचा झाल्यास उपयोगी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Amazing Girl Drummer Does BIGBANG ;)

In reply to by मदनबाण

वायफाय कनेक्टीवीटी हवीच हेच सांगायला आलो होतो. माझ्या मित्राकडे हा प्रकार नुकताच बघीतला. मोबाइलवरुन डायरेक्ट टीवी कनेक्ट केला आहे. ३G स्पीडमधे अप्रतीम HD वीडीओ व चित्रपट बघता येतात. तसेच शक्य झाल्यास ३D सोय असलेला घ्य जरा महाग आहे पण तेच भविष्य आहे.

In reply to by द-बाहुबली

तीन हजार रुपयात हे सर्व सहज उपलब्ध होते गुगल क्रोम कास्ट लावून तूमचा टीव्ही स्मार्ट होऊ शकतो त्यासाठी ६-८ हजार रुपये जास्त देण्याची गरज नाही https://en.wikipedia.org/wiki/Chromecast http://www.google.com/chrome/devices/chromecast/ ३ D च्या भविष्याबद्दल जर शंकाच आहेत. एकतर त्याचे किती कार्यक्रम आत्ता उपलब्ध आहेत आणि नजीकच्या भविष्यात किती उपलब्ध होतील हे माहित नाही. शिवाय जवळ जवळ ३० % लोकांना ३ D कार्यक्रम डोळ्याच्या अशक्तपणामुळे किंवा त्रिमितीत प्रतिमा तयार न करता आल्याने फायदा होत नाही किंवा थोड्या वेळाने त्रास होऊ शकतो. http://www.eyecaretrust.org.uk/view.php?item_id=566 http://3droundabout.com/2011/12/5788/understanding-requirements-for-hig…. तेंव्हा आपल्या घरातील लोकांचे डोळे तपासून घ्या आणि मगच ३D टीव्ही विकत घ्या असे सुचवावेसे वाटते.

In reply to by सुबोध खरे

बरोबर. मला सिनेमा हॉलमधेसुद्धात २-३ तास ३D पाहताना वैताग येतो. कधीतरी ठीक आहे, पण तेवढ्यासाठी जास्त पैसे देऊन घरी टिव्ही घेताना आपण वापर किती करू याचा विचार करावा. माझ्या माहितीतल्या दोघांनी घेतलाय ३डी टिव्ही, पण गेले वर्षभर जेवढ्या फ्री मिळालेल्या ४-५ क्लिप आहेत त्याच दाखवतात आल्या-गेलेल्यांना. काय उपेग? ;) तेंव्हा आपल्या घरातील लोकांचे डोळे तपासून घ्या आणि मगच ३D टीव्ही विकत घ्या हायला, म्हणजे माझ्या डोळ्यातच प्रॉब्लेम असू शकतो काय? मला वाटायचं की अजून टेक्नॉलॉजीच डेव्हलप नाही झाली व्यवस्थीत, काही वर्षांनी असा त्रास न देणारे टिव्ही येतील.

In reply to by सुबोध खरे

तीन हजार रुपयात हे सर्व सहज उपलब्ध होते गुगल क्रोम कास्ट लावून तूमचा टीव्ही स्मार्ट होऊ शकतो त्यासाठी ६-८ हजार रुपये जास्त देण्याची गरज नाही. ह्म्म... लिनोव्हो तर याही पुढे गेला आहे... कसं ? तसेच :- Lenovo Launches $49 Google Chromecast Competitor कास्ट अ‍ॅप्स आणि डिव्हाइस यात कोण जिंकणार ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांस... ;) :- Kuch Kuch Locha Hai

In reply to by सुबोध खरे

तीन हजार रुपयात हे सर्व सहज उपलब्ध होते गुगल क्रोम कास्ट लावून तूमचा टीव्ही स्मार्ट होऊ शकतो त्यासाठी ६-८ हजार रुपये जास्त देण्याची गरज नाही टिव्हीला स्वतःची वायफाय कनेक्टीव्हीटी असल्यास ओएस ओव्हर द एअर अपडेट करता येते.वायफाय कनेक्टिव्हीटी नसलेल्या टिव्हीस ओएस अपडेट करण्याचा पर्याय आहे का ? ते ठावूक नाही. मी आत्ता पर्यंत एकदा अपडेट केला आहे. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in

In reply to by मदनबाण

मी माझा सोनी ब्राव्हिया एल.सी.डी. अपडेट केला आहे. पेन ड्राईव्ह मधुन ओ.एस. अपडेट करता येते.

In reply to by द-बाहुबली

मोबाइलवरुन डायरेक्ट टीवी कनेक्ट केला आहे. मोबाइलनेच टिव्हीचा रिमोट ऑपरेट करता येतो. विंडोज फोनसाठी आणि अ‍ॅन्ड्रॉइड फोनची त्या त्या टिव्ही मॉडेलसाठी अ‍ॅप्स अ‍ॅव्हेलेबल आहे, तसेच मोबाइलवर युट्यूब प्ले करुन ते टिव्हीवर स्ट्रीम करता येते. टिव्हीची सुद्धा अ‍ॅप्स आहेत पण अजुन त्यात जास्त डोक घातल नाही,एकंदर पाहता अजुन टिव्ही अ‍ॅप्सला ग्रोथ हजुन व्हायचा आहे असे वाटते. {इथे एलजीवाले बरेच दिसत आहेत त्यामुळे लुमियासाठीचे एलजी अ‍ॅप इथे देउन ठेवत आहे. जाता जाता :- .MKV ची व्हिडीयो सॉंंग्स प्ले करुन पहावयास लय भारी वाटतं... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Hai

सॅमसंग मॉडेल - 40 एच 5100 - शॉपक्लूस ऑफर - 40 इंच - फुल्ल एच डी - रेज़ल्यूशन - 1920 x 1080 - एच डी एम आय पोर्ट x 2 - यू एस बी x पोर्ट 2 - ध्वनी - डी टी एस 2 - किमत - रु. 23990 - इम्पोर्टेड टी व्ही इंडिया सॅमसंग वारण्टी नाही. सेलर वारण्टी आहे.

In reply to by सुनिल साळी

सेलर वॉरंटी - ऑनलाईन विकणारं पब्लिक चेन्नई, दिल्ली असं दुसर्‍या राज्यातलं असलं तर काही बिघाडासाठी त्याच्याकडे टीवी पाठवणार कसा किंवा तो तुमच्याकडे येणार कसा? मोठी झंझट आहे, त्यापेक्षा जवळच्या दुकानातून आणी कंपनी वॉरंटी असलेला टीवी बघा. किंमत जास्त पडते पण या झंझटीपेक्षा ते बरं.

Vu 42" 4K UHD SMART LED TV LED 42D6455 UHD Vu HI-FI 4K UHD TVs Four times high definition with intelligent features make your visual experience truly future ready. You're looking at the latest in LED technology. This 42" 4K UHD TV from Vu is intelligent luxury. All the features you want in a sleek TV, at a price that can't be matched! Be the envy of your city with this classy television from Vu. Overview Four times high definition, more inputs than you'll ever need, and intelligent features that make this TV an obvious choice. MRP : 42000/- - See more at: http://vutvs.com/index.php?id_product=56&controller=product#sthash.xLDu…

मी पण विचार करतोय 4K वाला LED घ्यायचा दिवाळीत. बजेट साधारण ५० हजार किंवा कमी.

नुसत्या टी व्ही चे रेझोल्यूशन महत्वाचे नाही तर ट्रान्समिशन क्वालिटी ती हवी. आपल्याकडे दिसणारे बरेचसे चानेल ती देत नाहीत. आपली आवड एच डी चानल असलेल्याशी निगडित असेल तर एच डी अल्ट्रा एच डी घेण्यात हशील आहे. आपण लॅपटॉप वापरत असल्यास अँगल ऑफ व्यू जास्तीत जास्त असावा याचे महत्व अधोरेखित करण्याची गरज नाही. सोनी वाले चुकूनही आपले ट्रान्समिशन चे डेमो दाखवीत नाहीत. त्यामुळे शोरूम मधील पॅरिस व स्वीस चे व्हिडिओ ( हाय ल्वालिटी) पाहून सोनी टी व्ही घेउ नये. त्यातील बराचसे श्रेय ते वापरीत असलेल्या चित्रीकरणाचे असू शकते.

नुसत्या टी व्ही चे रेझोल्यूशन महत्वाचे नाही तर ट्रान्समिशन क्वालिटी ती हवी. आपल्याकडे दिसणारे बरेचसे चानेल ती देत नाहीत. आपली आवड एच डी चानल असलेल्याशी निगडित असेल तर एच डी अल्ट्रा एच डी घेण्यात हशील आहे. आपण लॅपटॉप वापरत असल्यास अँगल ऑफ व्यू जास्तीत जास्त असावा याचे महत्व अधोरेखित करण्याची गरज नाही. सोनी वाले चुकूनही आपले ट्रान्समिशन चे डेमो दाखवीत नाहीत. त्यामुळे शोरूम मधील पॅरिस व स्वीस चे व्हिडिओ ( हाय ल्वालिटी) पाहून सोनी टी व्ही घेउ नये. त्यातील बराचसे श्रेय ते वापरीत असलेल्या चित्रीकरणाचे असू शकते.

चौरा साहेब सहमत. आपल्याकडे ७२० p नेच केबल मधून रिसेप्शन येते तेंव्हा त्यासाठी ४ K चा ती व्ही घेऊन आत्ता तरी फारसा फायदा होत नाही. एच डी चे आता मला वाटते कि २०-२५ चान्नेल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे फुल एच डी टीव्ही घेतला तर ते पाहता येतील. माझी सूचना अशी आहे कि फुल एच डी चा IPS प्यानेलचा टीव्ही घ्या आकार आपल्या खिशाला आणी खोलीला शोभेल असा. VA किंवा TN प्यानेल स्वस्त आहेत पण दोन तीन वर्षांनी जसे तंत्रज्ञान सुधारेल तसा तुमचा टीव्ही तुम्हाला फारच जुनाट वाटू लागेल. http://www.pchardwarehelp.com/guides/lcd-panel-types.php मायक्रो माक्स चे फोन स्वस्त आणी मस्त आहेत हि वस्तुस्थिती असली तर त्यांनी वापरलेले तंत्रज्ञान स्वतःचे नाही. त्यामुळे त्यात येणाऱ्या त्रूटी त्यांना सहज सुधारता येत नाहीत. फोनची गोष्ट वेगळी आहे कारण साधारण माणसे फोन एक ते दोन वर्षात बदलतात, हरवतात किंवा खराब होतात. पण साधारन माणूस आपला टी व्ही पाच वर्षे तरी बदलत नाही म्हणून मायक्रो माक्स नको असे मला वाटते आत्ता तरी त्याचे रिपोर्ट फार खराब आहेत. पहा http://gizmoreport.com/micromax-uhd-4k-tv-review/#.VY4yKhsXnx0

एलिडी किंवा एलसीडी टी.व्ही. वापरणार्‍यांनी त्याचे सरासरी आयुष्य सांगावे. ३ वर्षांच्यावर ते टिकत नाहीत आणि सी.आर.टी. सारखे १५ वर्षे तर नाहीच, असे ऐकून आहे. अजूनही सॅमसंगचा सी.आर्,टी. वापरणारा (१५ वर्षे होऊन गेलीत)

In reply to by तिमा

माझ्याकडे सोनी ब्रावीया एलईडी ४० इंची (फेब २०११) - किंमत ६५ हजार - होता. एवढी उत्तम क्वालिटी, सुविधा तेव्हा उपलब्ध बजेटमधे कुणाकडेच नव्हत्या. दोन वर्षांनी स्क्रीनच्या वरच्या भागात एक ४ इंची काळसर पट्टा दिसू लागला. आणखी दीड वर्षांनी दोन-तीन पट्टे अजून वाढले. जालावर तपासणी-चौकशी केली तेव्हा कळले मी फारच भाग्यवान निघालो. इतर अनेकांचे वर्षाच्या आत स्क्रीन बोंबलले. काहिंचे तर वारंटी संपल्यावर लगेच. नवीन रीप्लेसमेंट स्क्रीन २२ हजार ला मिळतो. अनेकांना हा भुर्दंड बसलेला आहे. ६५ हजाराचा टीवीची ओनरशिप कॉस्ट तीन वर्षांसाठी काय्च्या काय होऊन जाते. माझा टीवी अजून खराब व्हायच्या आत २० हजाराला ओएलएक्स (फेब २०१५) वर विकून टाकला. घेणार्‍याला स्पष्ट कल्पना दिली की इथून घेऊन गेल्यावर काहीही झाले तर माझी जबाबदारी नाही. त्याच्याकडे अजून चालतोय. मला सर्व व्यवहारांती ओनरशीप कॉस्ट एक हजार रुपये महिना पडली. चार वर्ष सर्व फिचर्सचा भरपूर आनंद घेतला. नॅटजिओ सारखे एचडी चॅनल्स पाहतांना अगदी घटना समोर घडतायत असं वाटायचं, पाण्यातले दृश्य, निसर्गसौंदर्य अगदी जिवंत वाटायचे. त्या अनुभूतीस तोड नाही. सोनीचा दर्जा अतिउत्तम आहे. पण हार्डवेअरचा भरवसा नाही. माझा असा संशय आहे की हार्डवेअरमधे (वारंटीकाळापुरता) टायमर लावत असावेत. अशी शंका यावी असे बरेच अनुभव आले आहेत वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे.

In reply to by तिमा

माझ्या बहिणीच्या घरी श्यामसिंगच्या ४० इंची एलईडी टिव्हीला ९-१० महिन्यातच प्रॉब्लेम आला. स्क्रीनवर पट्टे दिसू लागले. वॉरंटी संपत आली होती. सॅमसंगने सांगितले की याचे रिपेअर शक्य नाही. त्यांनी नवीन टिव्ही रिप्लेसमेंट म्हणून दिला. आता त्यानंतर ३ वर्ष काही इश्यू नाही.

In reply to by यसवायजी

अगदी असंच होतं. (स्क्रीनची वारंटी ही एकूण किती तास वापर केला आहे त्यावर असायची. हा काळ १४०० ते १८०० व्युविंग अवर्स असतो. वारंटीकार्डवर असं नमूद केलेलं असायचं पुर्वी, १ लाख किमी किंवा ५ वर्ष अशा टैप.)

In reply to by संदीप डांगे

माझा ३२" एलजी फुल एचडी एलचीडी टीवी ५ वर्षांपूर्वी घेतला होता. कुठलाही प्रॉब्लम न येता टकाटक चालतोय अजूनही. वापर भरपूर.

In reply to by प्रचेतस

सरजी, एलसीडीला प्रॉब्लेम नाही. एलसीडीचे स्क्रीन्स १०-१२-१५ वर्ष दण्कट चालतात. समस्या एलइडीला आहे.

In reply to by संदीप डांगे

ते आहेच. बाकी तांत्रिक दृष्टया एलइडी टीवी हा एलसीडीच असतो. दोघांचेही फ्रंट प्यानेल एलसीडी फिल्मचेच असते. मात्र ब्याकलिट डिस्प्ले एलसीडीमधे सीसीएफएल तर एलेडी मधे एलेडीचा असतो.

In reply to by प्रचेतस

अगदी बरोबर. एलईडी बॅकलिट डिस्प्ले (महाग) व एज एलईडी (स्वस्त) हे दोन वेगळे प्रकार आहेत. led समस्या एज एलईडी प्रकारात जास्त असावी. काही काळाने एज एलईडी स्क्रीनवर पट्टे दिसू लागतात. काही टीवींमधे हे अगदी सौम्य न जाणवण्या इतके असतात तर काहींमधे भयंकर असतात. माझा अनुभव आणि अभ्यास 'एज एलईडी' प्रकारात आहे. एलईडी बॅकलिटबद्दल सांगू शकणार नाही. मूळ धागाकर्त्याच्या विषयासंबंधी: माझ्या मते तरी टीवी घेतांना जास्तीत जास्त वारंटी पीरीयडवाला आणि त्या कालावधीपुरती ओनरशीप कॉस्ट धरून परवडण्यासारखी किंमत काढून त्या परवडणार्‍या बजेटचा टीवी घ्यावा. टीवी पुर्वीसारखे कंझुमर डुरेबल्स आहेत हा विचार चुकूनही मनात ठेवू नका. उदा. एक लाखाचा टीवी एक वर्षाच्या वारंटीसोबत येत असेल तर आपण टीवी वापरण्याचे दिवसाला २७५ रुपये देतोय असा हिशोब लावावा. एका वर्षाने टीवीला काहीही झाले तर कंपनी हात वर करते, दुरूस्ती योग्य होईलच याची काहीही खात्री नसते, तसेच नवीन मॉडेल्स लॉन्च झाल्याने जुन्या मॉडेल्सच्या पार्टसच्या किंमती जाणून बुजून महाग केलेल्या असतात अथवा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातो. 'युज अँड थ्रो' हे आपल्याला (१५-२० वर्षे सीआरटी टीवी वापरलेल्या पीढीला) टीवीच्या बाबतीत पचवणे जड जाते. माझ्या घरी '१९९९ साली तेरा हजारात घेतलेला सीआरटी अजून दणक्यात चालू आहे. आणि २०११ मधे पासष्ट हजाराचा अ‍ॅडवांस्ड टीवी खराब होतोय' हे सत्य पचवणे कमालीचे जड गेले. बाकी, उत्तम दर्जा हवा असेल तर 'हौसेला मोल नसतं' ही म्हण लक्षात ठेवावी.

Micromax 40 ईंची घ्या... फुल एच.डी....आवज बर्‍यापैकी, ६० चा रीफ्रेश रेट... किम्मत २३-२५ पर्यंत...रोज बदलते.. ऑनलाईन बघा... मी गेले ७-८ महीने तोच वापरतोय...अजून तरी काही प्रोब्लेम नाही....

प्लास्मा व एल इ डी मध्ये काय फरक आहे कोणी सान्गु शकेल का?

माझामते "लग(LG ) " च्या वस्तू भारतात मस्त चालतात. असा स्वानूभव पण आहे. माझा LCD TV मागील ५ वर्ष व्यवस्थित सुरु आहे. कदाचीत त्यांची Voltage रेंज भारतासाठी उपयुक्त आहे. याउलट साम्सुंग, सोनी यांचे डिस्प्ले खुपदा जातात. Invortor वर पण हा त्रास आहेच. माझा आवडता आहे, कारण किंमतीच्या मानाने लगच्या वस्तू बेष्टच ..

मयक्रोमाक्स चे तीवी चान्गाले आहेत, जर थाम्ब्न्याचि तयरी असेल तर शिओमि तीवी लोन्च होनार आहेत ह्या वर्शाअखेर पर्यन्त,

In reply to by नया है वह

माझ्या मित्राकडे आहे. गेले ३-४ वर्ष एकदम मस्तं चालू आहे. जेव्हढं मला आठवतं ४० इंच साईझ चा आहे त्याचा टीवी.

आज काल सर्वच कम्पन्या सर्व अप्लायन्स बनवतात. हाएर हि एयर कन्डिशनर बनवण्यासाठि प्रसिध्ध आहे - अश्या कम्पन्या बहुतेक वेळेस स्वतः डिस्प्ले पेनेल न बनवता फक्त सर्किट पेनेल व बॉक्स बनवतात.

सॅमसंग मॉडेल - 40 एच 5100 - शॉपक्लूस ऑफर - 40 इंच - फुल्ल एच डी - रेज़ल्यूशन - 1920 x 1080 - एच डी एम आय पोर्ट x 2 - यू एस बी x पोर्ट 2 - ध्वनी - डी टी एस 2 - किमत - रु. 23990 - इम्पोर्टेड टी व्ही इंडिया सॅमसंग वारण्टी नाही. सेलर वारण्टी आहे.

माझामते "लग(LG ) " च्या वस्तू भारतात मस्त चालतात. असा स्वानूभव पण आहे. माझा LCD TV मागील ५ वर्ष व्यवस्थित सुरु आहे. कदाचीत त्यांची Voltage रेंज भारतासाठी उपयुक्त आहे. माझा जुना LG मी विकुन मागील वर्षी ३२" नविन घेतला. ऑन लाईन खरेदी केल्यामुळे शोरुम किमती पेक्ष्क्षा १७०० रुपये स्वस्त पडला.

माझ्याकडे एलजी एलसीडी ३२एलएच३ आहे.६ वर्षे झाली. व्यवस्थित आहे. त्याला ३ HDMI port and 1 USB आहे. त्याला संगणक व मोबाईल व टॅब साठी स्मार्ट बनवायचा असेल तर कुठले क्रोमकास्ट वा तत्सम गॅझेट कसे लावता येईल. संगणकाला वायफाय आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

एचडीएमआय पोर्टला स्मार्ट टीव्ही डाँगल लावू शकता. माझ्या घरी एका टिव्हीला जो स्मार्ट नसल्याने अ‍ॅमेझॉन फायर टिव्ही स्टिक अन दुसरा स्मार्ट असुनही भारतीय चॅनेल्सचे अ‍ॅप (स्लिंग टिव्ही) त्यावर नसल्याने रोकू स्ट्रिमींग स्टीक वापरत आहे. दोन्ही चांगल्या चालतात. रोकू स्टिकचा रिस्पॉन्स फायर टिव्ही स्टिक पेक्षा किंचीत हळू असला तरी कटांळा येण्याइतपत हळू नाही. क्रोमकास्ट अजून वापरले नाही पण इतरांकडून चांगलेच ऐकले आहे. भारतात कदाचित आणखीही पर्याय असतील. या सर्व स्टीक एचडीएमाआय पोर्टद्वारे टिव्हीला जोडता येतात तसेच त्यांना पॉवर सप्लाय युएसबी कॉर्डने द्यावा लागतो. त्यासाठी टिव्हीच्याच युएसबी पोर्टचा वापर करण्याचा पर्याय असतो.

ह्ये vu काय भानगड हाय? किमती लै म्हंजी लैच सस्त हायेत. मले 32" घ्याचा हाय. LG पायला, पण जरा म्हाग हाय. कंचा टीव्ही घेऊ? २५०००/- पेक्षा कमी वाला पायज्येल. ३२". HD हवा.

In reply to by बाबा योगीराज

ब्रवीया घेतला दि २७ फेब्रुवारी मस्त आहे. रुपये २८९०० मात्र कुठं स्कीम इ असेल तर अजुन स्वस्त पडेल. आवाज जबरा चित्र (गुणवत्ता) खतरा नाखु

In reply to by नाखु

कुठला माडिल घ्येतला? कुंकडून घ्येतला? किती विंची हाय. हानलाईन घ्येतला आसन तर लिंक पेष्टवा कि...!

In reply to by बाबा योगीराज

ब्रॅव्हीया ३२ इंच ५१२,रिलाय्न्स डिजीटलमधून (नाविलाजाने कारण गिफ्ट कुपन रू २००० चे मिळाले होते एका घरगुती स्मारंभात ते वसूल करणे होते) थेट घेतला किमान ५-७ रिलायन्स पालथे घातल्यावर हिंजवडी रिलायन्स्मध्ये मिळाला नेमका त्यावर ही तिथे किमान दोन हजार सवलत होतीच लगे हाथ बार उडवून दिला... सोनी ब्रॅव्हीया घ्यायचे आधिच मुक्रर केले होते, टीव्ही दुकानात गेल्यावर सोनी शेजारी दुसरा लावून पाहिला तर चित्राची गुणवत्ता,रंगसंगती कळते स्वतंत्र सगळेच छान मस्त दिसतात. ता.क. नुकतीच वल्लींकडून ह ट्वीव्ही चांगला आहे अशी (ताजी) पावती मिळाली आहे (प्रत्यक्ष पाहून) मैतर नाखु

In reply to by नाखु

ना खु साहेब सोनीची सर्व उत्पादने "सर्वोत्तम" असतात हा एक "जाणून बुजून" पसरवलेला गैरसमज आहे. (याचा अर्थ असा नव्हे कि ती उत्तम नाहीत ती उत्तम आहेतच). महाग ते उत्तम हा आपल्या समाजाचा गैरसमज आहेच. परंतु आपण जेथे जातो तेथील विक्रेता "सोनीच" घ्या असे का सांगतो तर सोनी विक्रेत्यांना सर्वात जास्त "दलाली" देतात. आपण दुकानात गेलात तर तेथे असलेले सोनी चे टीव्ही इतर टीव्ही च्या तुलनेत आपल्याला जास्त दैदिप्यमान दिसतात कारण चित्र "सुधारण्यासाठी" असलेली सर्व प्रणाली ( picture improvement systems) त्यात कामाला लावलेली असते तर बाजूच्या "इतर" टी व्ही मध्ये "जाणून बुजून" चित्र सपक ठेवले जाते. हीच वस्तुस्थिती आपल्याला "म्युझिक सिस्टीम" मध्ये दिसते.येथे सोनीची सिस्टीम sound enhanced असते तर इतर कंपन्यांची सिस्टीम plain असते. कोणताही टीव्ही किंवा म्युझिक सिस्टीम घेताना त्यातील अशा सर्व "प्रणाल्या" मुद्दाम बंद ठेवून मूळ चित्र आणि आवाज कसा आहे हे प्रथम पाहावे नंतर या प्रणाल्या "ऑन" करून दोन्ही कंपन्यांचे टी व्ही किंवा म्युझिक सिस्टीम चा तुलनात्मक अभ्यास करावा. म्हणजे प्रत्यक्ष वस्तुस्थिती समजेल. यानंतर आपल्याला जी सिस्टीम आवडेल ( आणि खिशाला परवडेल) ती विकत घ्यावी. प्रत्येक माणसाची आवड आणि निवड हि वेगळी असते त्यामुळे यानंतर जी सिस्टीम आपल्याला "आवडेल? जे रंग आपल्या डोळ्यांना भावतील आणि ज्या सिस्टीमचा आवाज आपल्याला आवडेल अशीच सिस्टीम विकत घ्या मग ती महाग असो व स्वस्त. प्रत्येक सिस्टिमचे चित्र आणि आवाज वेगळा असतो आणि त्यातील आपल्याला कोणता आणि का आवडेल हे सांगता येत नाही.तेंव्हा तुमची आवड हि तज्ञांची निवड असेल असे नाही तरीही तुम्ही स्वतःच्या "आवडी"प्रमाणे निवड करणे आवश्यक आहे. (वैयक्तिक रित्या मला स्वतःला फिलिप्स उत्पादने त्यांच्या आवाज आणि नैसर्गिक रंगांसाठी आवडतात.) परंतु जी सिस्टीम महाग तीच चांगली या मनोवृत्तीतून आपण बाहेर येणे पण आवश्यक आहे. बर्याच वेळेस आपली अभिरुची "उच्च" आहे हे दाखविण्यासाठी "नव" श्रीमंत लोक दुप्पट पैसा खर्च करून महागातील महाग उत्पादने विकत घेतात आणि तीच बाजारात सर्वात चांगली कशी हे हट्टाने आपल्याला सांगत असतात. या जाळ्यात न अडकण्यासाठी आपली "विचारांची बैठक" पक्की असणे आवश्यक आहे. हा प्रतिसाद कृपया वैयक्तिकपणे घेऊ नये.

In reply to by सुबोध खरे

म्हटल्याबद्दल निषेध.. बाकी सविस्तर प्रतिसाद आवडलाही आणि पटलाही.. माझ्याकडील आधीची उप्करणे ठरावीक एका कंपनीची नव्हती नाहीतही, फ्रीज फक्त गोदरेज नवीन ४ स्टारवाला घेतला (आधीचा १२ वर्षे वापरून ) तेच टीव्हीचेही आधिचा ओनीडा केवाय रॉक होता. मी आधी सरव तपशील आणि (माझा खिसा) पाहून ठरविले होते (आणि तिथे सॅमसुन्गची जोरदार भलामण करणारा इसम असूनही मी सोनी (आणि हेच मॉडेल घ्यायचे ठरविले होते ) हाल न होता हॉलला साजेसा म्हणून हा ३२ ईंच घेतला. खरे प्रतिसाद वैयक्तिकपणे न घेणारा मिपा मित्र नाखु

In reply to by सुबोध खरे

वैयक्तिक रित्या मला स्वतःला फिलिप्स उत्पादने त्यांच्या आवाज आणि नैसर्गिक रंगांसाठी आवडतात मग तुम्हाल व्हिडीयोकोन देखील आवडायला हरकत नाही. बाकी प्रतिसादाशी सहमत. सोनी व्हॅल्यु फॉर मनी या कॅटेगरीत येत नाही.

In reply to by सुबोध खरे

सोनी ही माझ्या माहीती प्रमाणे तोट्यात चालु आहे. सोनीच्याच म्हणण्याप्रमाणे ते २०१८ साली पुन्हा फायद्यात येतील. मार्केट शेअर प्रचंड घसरला आहे. सोनी चे टीव्ही बरासचा सॅमसंग च करुन देतो असे ऐकले आहे. फक्त ब्रँडच्या नावावर चालु आहे. काही वर्ष अशीच गेली तर सोनी हा ब्रँड कोणी चीनी किंवा कोरीअन कंपनी विकत घेइल.

In reply to by सुबोध खरे

डिअर डॉक, मला घरगुती उपकरणाचा इतका अनुभव नाही पण डिस्प्ले च्या बाबतीत आम्ही (ग्राफिक आर्टिस्ट अनिमेटर) फार चुझी असतो. आमचा बराचसा भर दिसप्लेच्या त्रुमॅच true match quality वर असतो. आधी सीआर्टी असतांना पन आम्ही सोनी त्रिनिट्रॉन प्रेफर करायचो, आता पण एल इ डी असताना ब्राव्हिया. इतर सगळ्या डिस्प्ले मध्ये सोनीचा डिस्प्ले जास्त रिअलिस्टिक असतो. बाकी हे वैयक्तिक मत हा भाग आहेच. मोबाईल असो कि मॉनिटर सोनिशिवाय दुसरा डिस्प्ले पाहायलाच नको वाटतो.

सोनी , एलजी , सँमसंग ( १२० hz)वगळता बर्याच टीव्हीचे रिफ्रेश रेट ६० Hz आहे. याचा कितपत फरक पडतो??

In reply to by कपिलमुनी

कंटीन्यूइटी ऑफ व्हिजन नावाचा एक प्रकार असतो. ज्यामुळे "मूव्ही" उर्फ चलत्चित्र तयार करता आले. वहीच्या पानाच्या कोपर्‍यावर स्टिक फिगर्स काढून मारामारीचा आभास तयार करता येतो, हे त्यामुळेच होते. 'रिफ्रेश रेट' हे एका सेकंदात किती वेळा स्क्रीन नव्याने 'चित्रित' केला जातो याबद्दल असावे असे वाटते. स्क्रीनवर कितींदाही नवे चित्र काढलेत, तरी तुमचा डोळा १५ सेकंदांनी 'रेफ्रेश' होतो : उदा. https://www.theguardian.com/science/2014/apr/11/visual-perception-eyes-… -- हे मी नीटसं मांडलंय की नाही ठाउक नाही, पण मी व्यक्तिशः इलेक्ट्रॉनिक करमणूकीच्या वस्तू, जसे टीव्ही मोबाईल इ. वर मोठा खर्च करण्याच्या विरोधात आहे. कारण कितीही लेटेस्ट प्रॉडक्ट घेतले, तरी सगळे ब्रँड्स महाग ते स्वस्त, सिमिलर फीचर्स देतात, अन कितीही भारी ब्रँड आणलात तरी रफली १४ महिन्यांत तो आउटडेटेड टेक्नॉलॉजी होतो..

जुन्या panasonic tvनी २० वर्ष सेवा दिल्यावर आता picture tube ख़राब झालीय.नवीन घ्यावा लागणार आहे.बजेट साधारण ४५हजाराच्या आसपास.स्क्रीन साधारण बेचाळीस/त्रेचाळीस इंच जे बैठकीच्या खोलीला अनुरुप.सध्या बाजारात या बजेटमधे काय लेटेस्ट features आहेत?शोरूम मधे बघायला गेल्यावर सगळे टीवी सारखेच वाटतात.सो तिथे एक्साक्ट्ली काय बघावं.काय विचारवं? माझा बेसिक क्राइटेरिया पिक्चर/साउंड क्वालिटी चांगली हवी.usb/इन्टरनेट हवं.चांगली wifi कनेक्टिविटी हवी.लैपटॉप/कैमरा/मोबाइल टिवी ला जोड़ता यावं. धागा जुना आहे सो आता अजुन नविन प्रकार आले आसतील.

In reply to by Maharani

सो तिथे एक्साक्ट्ली काय बघावं.काय विचारवं? सो आता अजुन नविन प्रकार आले आसतील.
हे 'सो, सो' काय आहे, नक्की?