.....पाऊस गात आहे .....
विस्तीर्णशा नभाला सोडून जात आहे
पाऊस भोवताली, पाऊस आत आहे ...
ठरले कधीच होते, नयनी पुन्हा न पाणी
मी कोरडा तरीही पाऊस न्हात आहे ...
शब्दात लपविलेली दु:खे क्षणात कळती
शब्दाविना सूरांनी , पाऊस गात आहे ...
राजांस वाचवाया, खिंडीत झुंजलेला,
रक्तात पेटलेला पाऊस ज्ञात आहे ...
कर्जात बुडलेला, गळफास लावताहे
आई जमीन त्याची, पाऊस तात आहे ...
हे
:( आज सगळे असं का लिहीत आहेत.
टेक अ बो !
फारच छान!
हे वृत्तात बसतय का हो?
:)
:):)
आमचेयेथे मॅगीचे चार पुडे उरले
काहीतरी सुचलं...
वाह!
मस्त आहे
छानच गझल...
बरोबर आहे ,
नो नो
कर्जात जो बुडाला , गळफास
कर्जात जो बुडाला , गळफास
हा हे बरोबर आहे आता.
वेल्लाभट, तुम्ही दिलेला
मान्य ! :)
सुंदर!
मस्त!
धन्यवाद सर्वांनाच!
सुंदर!