Skip to main content

मद्यपींच्या नातेवाईकांना सरकारी मदत योग्य की अयोग्य ?

लेखक प्रमोद देर्देकर यांनी मंगळवार, 23/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सरकार म्हणजे काय फक्त नुकसान भरपाई केंद्र आहे काय असे वाटु लागले आहे ? हल्ली ऊठसुट कुठल्याही गोष्टींवर सरकारकडे सरसकट मदतीसाठी हात पसरणे आणि जी सामान्य जनता कराच्या रुपात सरकारी तिजोरीत पैसे भरते त्या सामान्य कष्टकरी जनतेच्या पैसाच्या जोरावर सरकार (पक्षी मंत्री लोक) जणु आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखी ते सर्वांना वाटत / देत सुटणे हा नविन पायंडा चालु झालाय. दारु पिणे तेही आपल्या स्वतःच्या मर्जीने आणि पैश्यानी राजरोस हवी तेव्हा पिणे आणि तेही आपल्या संसाराचा, बायका , मुलांच्या भविष्याचा , आई वडिलांच्या जराही विचार न करता पिणे यात कसला पुरुषार्थ आहे? आणि मग जर का विषारी दारुपाई मृत्यू झाल्यास सरकार भरपाई देईल अशी आशा तरी का बाळगावी? एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांना नुकसान भरपाई देण्यात सरकार कुचराई करते मग दारूकांडातील मृतांच्या कुटूंबीयांना तातडीने १ लाख रु "मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून" देण्यात येणार आहेत अशी घोषणा पालकमंत्री विनोद तावडे यांनी का बरे केली? सगळेच अजब आहे. मी ही ज्यांच्यावर हे दुखा:चे संकट कोसळले आहे , ज्यांचा आपल्या घरचा कमवता माणुस गमावुन त्यांच्या रोजगार नाहीसा झाला आहे , त्यांच्या दु:खात सहभागी आहे. पण त्यांना मदत करण्याचे दुसरेही काही मार्ग असतील की त्याचा विचार करयला हवा. नाहीतर थेट पैसा मिळतोय असे पाहुन ह्या अशा घटणांना आळा बसण्याऐवजी आम्ही गेलो तरी मदत मिळतेय ना मग प्या दारु असा संकेत समाजात पसरायला वेळ लागणार नाही.

वाचने 12024
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

आणि मग जर का विषारी दारुपाई मृत्यू झाल्यास सरकार भरपाई देईल अशी आशा तरी का बाळगावी?
कारण की अयोग्य/विषारी दारु-निर्मिती आणि वितरणाला चाप बसवणे ही सरकारचीच (एक्साईज खात्यातर्फे) जबाबदारी आहे. त्यामुळे विषारी दारु बनवल्या गेली आणि ती वितरीत झाली, हे सरकारचे अपयश आहे. त्यापायी झालेल्या नुकसानाबद्दल नुकसान भरपाई देणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. ही त्या नुकसानभरपाई मागची कायदेशीर/तात्विक कारणे.. आता ह्यात दोषी व्यक्तींसोबतच ज्यांच्या अधिकारक्षेत्रात ही दुर्घटना झालीय, त्या अधिकारी-कर्मचारी ह्यांच्यावरपण कारवाई व्हायला हवी.

In reply to by चिगो

मात्र सरकारचे अपशय असले तरी त्याला जबाबदार अधिकारी, कर्मचारी, पुढारी आणि दारू विक्रेते यांच्याकडून ही नुकसानभरपाई वसूल केली गेली पाहिजे.

In reply to by पैसा

मात्र सरकारचे अपशय असले तरी त्याला जबाबदार अधिकारी, कर्मचारी, पुढारी आणि दारू विक्रेते यांच्याकडून ही नुकसानभरपाई वसूल केली गेली पाहिजे.
हा नवा पायंडा पाडायला हरकत नाही.. सद्यपरीस्थितीत मात्र हे असलं काही घडू देऊ नये, ज्या काही कारणाने असेल, हे सरकारचेच (संबंधित विभाग) काम असल्याने सरकारवर अपयशाची जबाबदारी (कलेल्टीव्ह रिस्पॉन्सिबीलिटीनुसार) येते, म्हणून नुकसान भरपाई.. अवांतरः चुकीमुळे द्याव्या लागल्या जाणार्‍या नुकसान-भरपाईची वसुली सोडाच, पण घोटाळ्यांमध्ये गपापा होणार्‍या पैशांची वसुली हेच अजून कठीण कार्य आहे.. :-(

In reply to by चिगो

हे कधीच होणार नाही हे माहीत आहे. आणि पुढार्‍यांची, मंत्री संत्री, आमदार खासदार यांची काही प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष जबाबदारी आहे हेच कुणाला पटणार नाही हे ही माहीत आहे. पण हे सगळे नुकसानभरपाईचे पैसे शेवट आमच्यासारख्या करदात्यांकडूनच गेलेले आहेत हे कळतं म्हणून राग येतो.

In reply to by चिगो

अयोग्य/विषारी दारु-निर्मिती आणि वितरणाला चाप बसवणे ही सरकारचीच (एक्साईज खात्यातर्फे) जबाबदारी आहे. त्यामुळे विषारी दारु बनवल्या गेली आणि ती वितरीत झाली, हे सरकारचे अपयश आहे.
हे सरकारचे अपयश आहे हे मान्यच. परंतु पिणार्‍याला हे माहीत होते की ती दारु अवैध आहे. अशी हातभट्टीची दारु धोकादायक असते आणि ज्यामुळे या आधिही मृत्यू झाले आहेत. तरीही हे माहित असताना देखील जर कुणी अशी दारु पीत असेल तर तो सरकार एवढाच दोषी आहे. उदा. मॅगी धोकादायक आहे म्हणून सरकारने त्यावर बंदी घातली आहे. पण तरीही आणि मला त्यातला धोका माहित असूनपण केवळ मला मॅगी प्रचंड आवडते म्हणून ती चोरुन विकणार्‍या दुकानातून घेऊन मी खाल्ली तर मी देखील तेवढाच दोषी असेन. त्यातुन जर मला विषबाधा झालीच तर सरकारने (ईतर करदात्यांनी) का म्हणून माझी जबाबदारी घ्यावी??

हे एक लाख रुपये ज्या उत्पादन शुल्क अधिकारी आणि पोलिस यांच्या मेहेर नजरेमुळे( ज्यांनी हातभट्टी वाल्याकडून पैसे खाउन ती चालवू दिली) दारूची अवैध विक्री झाली त्यांच्या पगारातून कापून घेतले पाहिजेत. सध्या ते निलंबित आहेत. वर्ष दोन वर्षांनी ते परत कामावर येतील.

सरकारचे हे धोरण मला अजिबात मान्य नाही. नैस्र्गिक आपत्ती असेल तर गोष्ट वेगळी, ही तर दारू विकणार्‍यांची आणि दारू पिणार्‍यांची चूक आहे. त्याचा भुर्दंड आपण का सोसायचा? आरती प्रभूंनी एक मस्त कविता केली होती. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

In reply to by मुक्त विहारि

परवडत नसतांना दारू पिणार्‍यांची चूक आहे.
कृपया 'परवडत नसतांना' हा शब्द काढून टाकावा अशी विनंती. कुणाला १० रुपयांची दारु परवडते, कुणाला १०० रुपयांची तर कुणाला १००० रुपयांची. दारु प्यावी की न प्यावी हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. पिऊ नये असे तुम्ही म्हणणार नाहीच म्हणा. (ह. घ्या.)

सहमत , फक्त
आम्ही गेलो तरी मदत मिळतेय ना मग प्या दारु असा संकेत समाजात पसरायला वेळ लागणार नाही.
याच्याशी असहमत. केवळ सरकार कुटुंबियांना मदत करते म्हणून विषारी दारू पीत नाहीयेत. एरवी नेहमीचीच मिळणारी दारू विषारी निघाल्याने ते मरताहेत ! नेहमी मिळणे बंद व्हायला हवे- त्यामुळे वर चिगो यांनी म्हटल्याप्रमाणे सरकारच्या अपयशामुळे भरपाई देत आहेत.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आली माझ्या मानीटरला
"दारुतज्ञांनो, जरा तरी लाज बाळगा" लेख इज कमिंग. =))
ऐवजी "दातरूत्ज्ञानो, जरा तरी लाज बाळगा" लेख इज कमिंग. =)) वाचले. मेंबर चिमण हटेला गँग

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्रेस योरसेल्फ.
हे म्हटलं की आम्हाला शीला की जवानी मधल्या या ओळी का आठवतात कोण जाणे.. ;) Main khud ko gale lagaaun Kisi aur ki mujhko zaroorat kya Main to khud se pyaar jataaun Read more: http://www.lyricsmint.com/2010/11/sheila-ki-jawani-song-lyrics-tees-maa…

नाहीतर थेट पैसा मिळतोय असे पाहुन ह्या अशा घटणांना आळा बसण्याऐवजी आम्ही गेलो तरी मदत मिळतेय ना मग प्या दारु असा संकेत समाजात पसरायला वेळ लागणार नाही.
फक्त एक लाख प्रति व्यक्ती एवढ्या पैशात जरी समाज सुटला तर मग उलट अशा पिण्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. लोकसंख्या पण आटोक्यात आणायची आहेच ना.

वैधानिक चेतावनी : यापैकी कुठलीही दारू विषारी असू शकते पिउन जीव गेल्यास सरकार वा कंपनी जवाबदार नाही. असा इशारा प्रत्येक बाटलीवर छापायला पाहिजे .

In reply to by उगा काहितरीच

म्हणजे तुम्ही खालील गोष्टी गृहीत धरतायः १. विषारी दारू पिऊन मरणारे लोक बाटलीतून दारू पितात. २. विषारी दारू पिऊन मरणारे लोक ज्या (इमॅजिनरी) बाटलीतून दारू पितात त्या बाटलीवर वैधानिक चेतावनी छापली जाण्याची काळजी संबंधीत दारू बनविणारा घेईल. ३. विषारी दारू पिऊन मरणारे लोक ज्या (इमॅजिनरी) बाटलीतून दारू पितात त्या बाटलीवरच्या वैधानिक चेतावनीला विषारी दारू पिऊन मरणारे लोक वाचू शकण्याइतकं शिकलेले असतील. ४. विषारी दारू पिऊन मरणारे लोक ज्या (इमॅजिनरी) बाटलीतून दारू पितात त्या बाटलीवरच्या वैधानिक चेतावनीला विषारी दारू पिऊन मरणारे लोक वाचण्याच्या अवस्थेत असतील. ५. विषारी दारू पिऊन मरणारे लोक ज्या (इमॅजिनरी) बाटलीतून दारू पितात त्या बाटलीवरच्या वैधानिक चेतावनीला वाचल्यानंतर विषारी दारू पिऊन मरणारे लोक आपला निर्णय बदलतील.

In reply to by काळा पहाड

१. विषारी दारू पिऊन मरणारे लोक बाटलीतून दारू पितात.
बाटली नाही तर दुकानात लिहा. सिगारेट च्या पाकीटासारखं , चित्रपट चालू होताना दाखवा, टिव्ही रेडिओ वर ऐकवा.
२. विषारी दारू पिऊन मरणारे लोक ज्या (इमॅजिनरी) बाटलीतून दारू पितात त्या बाटलीवर वैधानिक चेतावनी छापली जाण्याची काळजी संबंधीत दारू बनविणारा घेईल.
सक्ती पाहिजे ना.
३. विषारी दारू पिऊन मरणारे लोक ज्या (इमॅजिनरी) बाटलीतून दारू पितात त्या बाटलीवरच्या वैधानिक चेतावनीला विषारी दारू पिऊन मरणारे लोक वाचू शकण्याइतकं शिकलेले असतील.
अशिक्षित , गावठी दारू पिणारे मेले तर सगळ्या साठी चांगलं नाही का
४. विषारी दारू पिऊन मरणारे लोक ज्या (इमॅजिनरी) बाटलीतून दारू पितात त्या बाटलीवरच्या वैधानिक चेतावनीला विषारी दारू पिऊन मरणारे लोक वाचण्याच्या अवस्थेत असतील.
४ च्या उत्तरात अजून एक मुद्दा
५. विषारी दारू पिऊन मरणारे लोक ज्या (इमॅजिनरी) बाटलीतून दारू पितात त्या बाटलीवरच्या वैधानिक चेतावनीला वाचल्यानंतर विषारी दारू पिऊन मरणारे लोक आपला निर्णय बदलतील.
बेस्ट केस , असं व्हावे अशी इच्छा असलेला.

In reply to by उगा काहितरीच

तुम्हाला मुद्दा कळला नाही. ही अनधिकृत दारू आहे. सक्ती कशी करणार? दारू तयार करणं आणि विकणं दोन्ही टेबलाखालून आहे. दारू प्लास्टिकच्या पिशव्यात विकली जाते. पिणारे अडाणी आहेत. बरेच वाचू शकत नाहीत. वाचले तरी त्यांना पर्याय नाही. कारण ही दारू स्वस्त पडते. आणि काही झालं तरी त्याची पर्वा करावं अशी त्यांची मनस्थिती असेलसं वाटत नाही. समाजाचं प्रबोधन करणं हा एकमेव पर्याय आहे.

In reply to by उगा काहितरीच

म्हणूनच म्हटलं की प्रबोधनाला पर्याय नाही. तुम्ही आणि मी कितीही यावर एकमत असलो तरी जोपर्यंत या पिणार्‍या जनतेला हे कळत नाही, तोपर्यंत याचा उपयोग नाही. त्यांच्या दृष्टीने दारू जीवनावश्यक असूही शकेल.

In reply to by काळा पहाड

म्हणूनच म्हटलं की प्रबोधनाला पर्याय नाही.
सहमत !
तुम्ही आणि मी कितीही यावर एकमत असलो तरी जोपर्यंत या पिणार्‍या जनतेला हे कळत नाही, तोपर्यंत याचा उपयोग नाही.
नाइलाजाने सहमत !कारण हेच सत्य आहे.
त्यांच्या दृष्टीने दारू जीवनावश्यक असूही शकेल.
असहमत! माणूस अल्कोहोलीक म्हणून जन्माला येत नसतो. सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर दारूवर सरसगट बंदी घालता येऊ शकते . (यात सरकारी संस्थाचा पण १०० टक्के सहभाग हवा , नाहीतर गुजरात सारखी स्थिती होईल.) (पण हा भाबडा आशावाद आहे, याची मलाही कल्पना आहे.)

सर्वसामान्यांच्या मनात नेहमी येणारा प्रश्न. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाबद्दल सहानुभुती आहेच,पण हा प्रश्न माझ्याही मनात नेहमीच येतो. (नाहीतर थेट पैसा मिळतोय असे पाहुन ह्या अशा घटणांना आळा बसण्याऐवजी आम्ही गेलो तरी मदत मिळतेय ना मग प्या दारु असा संकेत समाजात पसरायला वेळ लागणार नाही.) या विधानाशी १००% सहमत. बाकी मदत देण्यासाठी पैसा कोणाकडून वसूल करावा हे आपल्यालाच सुचते कारण तो नकळत आपल्याकडूनच जातो आहे. घरात मुलांनी मागितलेली वस्तू खिशाला परवडत नसेल तर त्याची समजूत काढून नंतर देण्याचे आश्वासन देणार्‍या सामान्यांचा जीव किती तळतळत असेल अशी मदत पाहून.

अशा प्रकारे मदत करण्यापेक्षा सरकारने मागे राहिलेल्या त्यांच्या वारसांना भावी आयुष्यात शाश्वत व नियमीत उत्पन्न मिळेल असे काही मिळवून देण्यास हातभार लावावा.

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

रोज कितीतरी बाप आणि नवरे आपल्या कुटुंबासाठी जीव देतील . इथे मरण स्वस्त आणि जगणं महाग आहे.

उरलेल्या सगळ्या नातेवाईकांना आजन्म तुरुंगवासात टाकावे. यापुढे पिणार्‍या आणि पीऊ देणार्‍या कुटूंबीयांना जरा धडा मिळेल. चिगो यांनी यामागचे जे सरकारी कारण सांगीतले आहे ते अतिशय तिरपागडं लॉजिक आहे. असं लॉजिक लावून तर प्रत्येक अपघाती मरणाला, वैद्यकिय सुविधेशिवाय मरणाला, रस्ते अपघाताला, या आणि अशा असंख्य प्रकारात जिथे जिथे सरकारची जबाबदारी येते तिथे तिथे सरसकट भरपाई मिळाली पाहिजे. असं होतांना दिसत नाही. ते फक्त याच प्रकरणात आढळत आहे. भाजपनी भरपाई घोषित करून राजकारण खेळले आहे. एवढ्या तडकाफडकी निर्णयामागे शंका घेण्यास जागा आहे. भाजपला आपला श्रीमंती/उच्चवर्गीय चेहरा बदलायचा असेल. किंवा इतका मोठा घातपात झाल्याने विरोधकांना उगवण्यास मोकळीक मिळू नये, त्यांच्या विरोधातली हवाच काढून घेण्यासाठी हातघाई दाखवत असतील.

In reply to by संदीप डांगे

असं लॉजिक लावून तर प्रत्येक अपघाती मरणाला, वैद्यकिय सुविधेशिवाय मरणाला, रस्ते अपघाताला, या आणि अशा असंख्य प्रकारात जिथे जिथे सरकारची जबाबदारी येते तिथे तिथे सरसकट भरपाई मिळाली पाहिजे.
असे होत नाही असं तुम्हाला वाटत असेल, तर आपल्याला थोडी माहिती देतो.. अपघाती मरणात, खासकरुन 'हिट अँड रन' केसेस मध्ये अपघातात जखमी झालेली व्यक्ती/ मृतांचे नातेवाईक भरपाई मागू शकतात, अ‍ॅक्सिडेंटल क्लेम्स ट्रायब्युनल.. मला आता नेमका कायदा आठवत नाहीये (कृपया गुगलावे), पण हीपण सोय आहे. खासकरुन अश्या अपघातात ज्यात ती व्यक्ती सरकारी वाहनव्यवस्थेचा जसे की बस, रेल्वे, विमान इत्यादींचा वापर करत असेल, तिथे भरपाई मिळते / क्लेम केल्या जाऊ शकते. तसेच जिथे सरकारी सुविधांचा अभाव असल्याने/ चुकीने (उदाहरणार्थ कठडा नसलेल्या पुलावरुन पुरात वाहून गेल्यास, अथवा खाली कोसळल्यास, पुर्ण पुलच कोसळल्यास इ.) भरपाई दिल्या जाते / क्लेम केल्या जाऊ शकते. बाकी 'पॉलिसी काय असावी' ह्यावर अध्या चर्चेचा कंटाळा आलाय.. कारण आपल्या देशात गरीबांची चुक कधी नसतेच. अधिकारांबद्दल बोंब मारणे आणि कर्तव्यांच्या बाबतीत अत्यंत उदासीन असणे, हाच आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे.

In reply to by चिगो

जिथे सरकारी व्यवस्थेचा (बस, ट्रेन, इमारत, नोकरी) उपयोग घेतांना अपघाती मृत्यू येतो ती घटनाच वेगळी आहे. इथे स्वतःच्या पैशानी अवैध दारू पिणारे सरकारी व्यवस्थेच्या तृटीचा स्वतःच्या बेकायदेशीर कृत्यासाठी फायदा घेत होते. त्यांची सरकारी बसमधे अपघातात मरणार्‍या लोकांशी तुलना का करायची? तेच सरकार अवैध वाहतूक करणार्‍या खाजगी वाहनाला अपघात झाला तर अशीच तत्परतेने भरपाई देतं का याबद्दलही उत्सुकता आहे. तिथे तर जनतेची सरळ सरळ मजबुरी असते. जिथे सरकारी सुविधांचा अभाव असल्याने/ चुकीने (उदाहरणार्थ कठडा नसलेल्या पुलावरुन पुरात वाहून गेल्यास, अथवा खाली कोसळल्यास, पुर्ण पुलच कोसळल्यास इ.) भरपाई दिल्या जाते / क्लेम केल्या जाऊ शकते. >> इथे क्लेम केल्या जाऊ शकते हा भाग महत्त्वाचा आहे. सरकार सरसकट भरपाई घोषित करत नाही जे त्यांनी या प्रकरणात केले आहे. बाकी चर्चेच्या कंटाळ्याबद्दल सहमत.

In reply to by संदीप डांगे

अवैध दारू पिणारे सरकारी व्यवस्थेच्या तृटीचा स्वतःच्या बेकायदेशीर कृत्यासाठी फायदा घेत होते.
'अवैध दारु' उपलब्ध असणे, हेच सरकारचे अपयश आहे. ती पिणे बेकायदेशीर आहे का, हे बघावं लागेल. कारण जी नसावीच ह्यावर कायद्याचा भर आहे, तीच्या 'प्रोडक्शन'बद्दल काय शिक्षा असावी हे कायदा बोलतो, 'कन्जप्शन'बद्दल नाही. दुसर्‍या कायद्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास, भा. दं. वि.च्या कलम २९३ नुसार अश्लिल साहीत्य निर्माण करणे, त्याचं वितरण वा वितरणासाठी संचय करणे ई. बेकायदेशीर आहे, पण अश्लील साहीत्य वाचणे वा त्याचा आस्वाद/उपभोग घेणे, हे बेकायदेशीर नाही.. कारण तेच जे वर सांगितलंय.. जे 'नसावं', हीच सरकारची जबाबदारी आहे, ते 'असल्यास' वापरकर्त्यावर जबाबदारी टाकता येत नाही. तिरपगडं असेल, पण हेच लॉजिक आहे राव इथं.. बाकी 'Law is an Ass' हे मलापण वाटतं, पर जो है सो तो है..

दारूने मेलेल्यांविषयी कणव नाहीच.पण मागे राहीलेल्यांचा काय गुन्हा?माणुसकी म्हणून रोजगार मिळवायला त्यांना मदत व्हावी असे लिहीले...यात फालतुगिरी कुठेय...

अनधिकृत रित्या तयार केली गेलेली दारू पिण्यामुळे जर माणसे मेली तर ती सरकारची जबाबदारी होत नाही. हे पैसे दिले गेले ते १) मानवतावादी दृष्टीकोनातून-- जे पुरुष दगावले ते त्या त्या घरातले प्रमुख कमावणारे होते. मुळात दारूमुळे येणारी तुटपुंजी कमाई सुद्धा आता बंद झाल्यामुळे या कुटुंबात आपले पुढे काय हा यक्ष प्रश्न उभा राहतो. अशापारीस्थितीत सरकारने दिलेला हा थोड्या काळापुरता दिलासा असतो. या पैशाचा वापर त्या माणसांच्या अन्त्य्संस्कारापासून पुढील काही महिने घर चालवण्यापर्यंत उपयोगी येतो. अर्थात यानंतर कुटुंबाला स्वतःच्या पायावर उभे रहावेच लागते. २) विरोधकांनी याचे राजकीय भांडवल करू नये म्हणून. हि तर एक राजकारणातील आवडती खेळी आहे. जेंव्हा जेव्हा आणी जेथे जेथे अशी विषबाधा होते तेंव्हा प्रत्येक वेळेस विरोधक त्याचे राजकीय भांडवल करायचा प्रयत्न करतात ( याला कोणताही पक्ष अपवाद नाही) आणी ते होऊ नये म्हणून सरकार असे पैसे देते. अशी हातभट्टीची दारू भारतभर सगळीकडे मिळते हे वास्तव आहे आणि याला तेथील राजकारणी, पोलिस आणि अबकारी कहते यांचा वरदहस्त आहे हेही तितकेच सत्य आहे. एखादा नवीन प्रामाणिक पोलिस किंवा अबकारी अधिकारी आला आणि त्याने हे धंदे बंद केले कि थोड्या वेळात त्याची बदली होते. अशा लोकांनी पकडून खटले भरण्यासाठी हातभट्टी च्या दादांनी पोसलेली माणसे असतात. हि माणसे काही काळ "आत" जातात मग जामिनावर सुटतात आणि शेवटी पुराव्याभावी सुटतात. आणि हे चक्र चालू राहते. मध्येच एखादा असा विषबाधेचा "अपघात" होतो. त्यावर "कडक कायदेशीर कारवाईचा" फार्स होतो. प्रकरण थंडावले कि पुन्हा येरे माझ्या मागल्या. हे होऊ नये म्हणून सरकारने देशी दारूची दुकाने चालू केली पण हातभट्टी हि त्यापेक्षा ६०-७०% स्वस्त असते ( कारण देसी दारूवर असणारे कर) आणि वाटेल ती घातक रसायने घातल्यामुळे तिला "किक " पटकन बसते. गरीब लोकांना दूरवरचा विचार नसतो.आजचा दिवस सुखात घालवायचा इतकेच. कमी पैशात नशा आली पाहिजे इतका साधा हिशेब असतो. त्यात काही लोकांचा जीव जातो. जाणारा जातो आणि कुटुंबाची वाताहत होते. (हे अनुभव नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात काम करताना स्वतः घेतलेले आहेत.)

In reply to by सुबोध खरे

हे होऊ नये म्हणून सरकारने देशी दारूची दुकाने चालू केली पण हातभट्टी हि त्यापेक्षा ६०-७०% स्वस्त असते ( कारण देसी दारूवर असणारे कर) आणि वाटेल ती घातक रसायने घातल्यामुळे तिला "किक " पटकन बसते. गरीब लोकांना दूरवरचा विचार नसतो.आजचा दिवस सुखात घालवायचा इतकेच. सरकारी देशी दारूवर कर थोडा कमी केला तर असा विचार डोक्यात आला गरिबाला सुखाने जगता येत नाही पण सुखाने मरण सुद्धा येऊ नये ह्याचे वाईट वाटते ह्यातील अनेक लोक आपल्या सारखे काबाडकष्ट आपल्या परीने करतात ते सुद्धा पेन्शन विमा न मिळता जगणे सुसह्य नाही पण वेदना विसरण्यासाठी दारू पिली जाते मौजे साठी हातभट्टी पिणारे फार कमी तेव्हा पैसे दिले ते योग्य झाले १ लाखात काय होते आपल्याकडे नवरा मेल्यावर त्याच्या बायकोला पेन्शन मिळणाऱ्या आज्या मध्यमवर्गात पहिल्या आहेत.

अवैध दारू व्यवसाय/वितरण रोखणं, त्यांना कडक शासन करणं ही सरकारची जबाबदारी आहे. ती पुरी पाडण्यात ते अपयशी ठरले. अर्थात ह्या मागे 'हप्त्याचे' अर्थकारण आहे. स्थानिक पोलीस, राजकिय पुढारी आणि आमदारांपर्यंत जाणारी ही साखळी आहे. हे सर्व लाभार्थी आहेत. मरणारी जनता गरिब, असंघटीत आहे. 'मरेनात का.. आपली कमाई झाली म्हणजे झाले' ही स्वार्थी कसाईवृत्ती पोलीस, राजकिय पुढारी जोपासत आहेत. झालेल्या घटनेचे पडसाद उमटून राजकिय नुकसान होऊ नये म्हणून, पिडीतांनी आपले तोंड बंद ठेवावे म्हणून राज्यकर्त्यांनी दिलेली ही 'लाच' आहे. अशीच लाच आंदोलन करून नंतर पाठपुरावा न करणार्‍या सामाजिक संस्थांनाही मिळते, सदनातील विरोधी पक्षालाही मिळत असावी. त्यामुळे अशा घटना ह्या राजकारण्यांना, पोलीसांना, प्रशासकिय अधिकार्‍यांना इष्टापत्तीच असते. नविन कांही मुद्दा मिळेपर्यंत मिडियाला चघळायलाही विषय मिळतो. आपला टिआरपी वाढवून जाहिरातींमार्फत 'कमाई' साधता येते. जाहिर झालेल्या एक लाखांपैकी किती शे किंवा हजार, प्रत्यक्ष त्या पिडीत कुटुंबापर्यंत पोहोचतील हाही संशोधनाचाच विषय आहे.

सरकारच्या बापाचा पैसा आहे का? मुंबईत दारू पिऊन मेलेल्याला प्रत्येकी अेक लाख? आणि कुटुंबातील अेकाला रोजगार ? अरे काय देशरक्षणासाठी बलीदान केलं काय ह्यांनी ?बेवडे मेले मरूदेत की ... बर तुमच्या मानधनातुन द्या काय द्यायची मदत ती... मग विदर्भातील शेतकऱ्यांना हा अुपाय सांगायला हवा... बाबांनो आत्महत्या करण्यापेक्षा दारू पिऊन मरा घरातल्या अेकाला नोकरी तर मिळेल....चांगला आदर्श घालतंय सरकार

लोकहो, अनधिकृत देशी झोकाण्यामागील हेतू केवळ मनोरंजन नाही. मुंबईतले सफाई कामगार ज्या दुर्गंधीत उतरतात तिथे शुद्धीत राहून काम करणे सर्वथैव अशक्य आहे. जोरदार किक बसल्यावरंच गटारात उतरणे होते. अधिकृत दारूने तेव्हढी किक लाभत नाही. मेलेले सगळेच बेजबाबदार दारुडे नसावेत. :-( आ.न., -गा.पै.

मद्यपींच्या नातेवाईकांना सरकारी मदत योग्य की अयोग्य ? बिलकुल योग्य है जी !

अशी मदत देण्याचा निर्णय योग्य आहे. रेव्ह पार्टी देणारे घेणारे मतदानाला येत नाहीत. त्यानी प्रामाणिक पणे आपली व्होट बॅक तयार केली तर त्यांच्याही नातेवाईकाना काही अघटित झाल्यास एकेक लाख रूपये मिळतील. लोकशाही जिंदाबाद !