Skip to main content

दि. ३१ जून रोजी कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे होणारा कट्टा

लेखक दमामि यांनी बुधवार, 03/06/2015 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
सद्ध्या मिपावरती कट्ट्यांचे पीक आले असल्याने नवमिपाकर अथवा डुआयडींचा कट्टा दि. ३१ जून रोजी कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे होणार आहे सर्वानी जमायची वेळ- रात्री ठिक १२ वाजता स्थान - कुर्डुची वाडी ( वरल्या अंगाची) येथिल स्मशान भूमी कार्यक्रम)- आपला हा नेहमीचाच. जे येणार त्यानीच कळवावे. उगाच फुकटचे सल्ले अथवा प्रतिसाद देऊ नये.

वाचने 15524
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

माई मोड ऑन-अरे दमाम्या,छानच रे .मी येते हं.आमचे हे पण येतील.बाई गं!!माझा पहिलाच कट्टा .goose bump ..-माई मोड ऑफ. अवांतर धागा उड..

आम्ही (म्हणजे मी अन माझे १५ डु आयडी) नक्की येणार. हेलिकॉप्टर पाठवा.

अनिवासी असल्याने कट्ट्याला लांबूनच शुभेच्छा. फोटो, व्हिडिओसकट वृत्तांताची प्रतीक्षा आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

लवकरच कविता सोडायच्या विचारात आहे . तसही पाळणा , गोंधळ झालेतच .(तुम्हीसुद्धा)थोडी कळ काढा!

In reply to by अत्रुप्त आत्मा

सोडा मामीईईईईईईईईईईई!!!!!!!
जुन्या पिच्चरांत आशा काळे, सुलोचना वैगरे निळू फुले, राजशेखर आदि मान्यवरांना 'सोड चांडाळा, सोड' म्हणायच्या, त्याच चालीवर वाचायचं का हे? =))

In reply to by सूड

आयला हा घासुगुर्जींचा आयडी आहे होय? मला वाटले कोणी नविन आयडी आहे. मूळ आयडी बदलला की हा आणखी एक?

आजचा माझा पहिला दिवस मिपावरचा परंतू मी फारच दुखात आहे माझी मैत्रिण मॅगी आता माझ्याबरोबर येऊ शकणार नाही.माझा मित्र सॅनविज याला धक्काबुक्की आणि। गर्दी आवडते पण तो रातच्या बाराला कुर्डुवाडी का काय ते जंकशन हाये तिकडं नाय म्हणतो. तो दीपक कुवेत नावाचा कोणी अरब यिणार आहे त्यांनला एक वोपन लिटर पाटवा-हितं पुन्यात कुटं ठिवु अन कुटं नें झालंय कुर्डुवाडीचं सत्कारकर पाटलांनी लइच मनावर घितलं हाये.यावर्षी नाय पन फुडल्या वर्षी कुर्डुवाडीला विमानतळ हुइल.

In reply to by आदूबाळ

आहे ते सुध्दा आहे ( वरल्या अंगाची) येथिल स्मशान भूमी येथे टंच बांध्याच्या हडळि डॅन्स सादर करणार हैत.

झ्मीमझ्मीमीम जात्र्र्रेर्तमलामीग्ज्ज्क्कम्हनुन्णु विचारते आहे.

मिस्किल लेखक द. मा. मिरासदार (दमामि ) यांची मिरास तुम्ही चालवाल असे भासत आहे.

कुर्डुची वाडी म्हणजे अगदी शेजारीच आहे की...मी येइन! रात्री बाराला ठेवलंत हे सगळ्यात उत्तम केलंत...

कट्ट्याचा धागा आणि एवढेच प्रतिसाद!

In reply to by पैसा

असं माई नानांना सांगत असताना हितेसभाय ऐकत होता, ते शरदिनीतैंनी पाह्यलं आणि त्या ते ज्योति अलवनिना सांगत असताना जेनीने ऐकलं असं जीमो सांगत होते.

In reply to by पैसा

पैसातै,माणसे महत्त्वाची,नंबर नाही असे कुणिसे म्हटले आहे. त्यामुळे धाग्याने शंभरी गाठली नाही तरी दु:ख नाही. असाच लोभ असावा ही विनंती!

पैसातै,अशी याच्या त्याच्यावरून ह्याची त्याची आठवण आली की वय झाले असे समजावे.

ओ दमामि, मेन्यु काय आहे? काही फर्माइशी चालतील काय? नाय मंजे तसं आधीच सांगून ठेवा ना सगळ्यांना!

In reply to by दमामि

लेडेड की अन्लेडेड ? (हडळाणिमुंजा सुपरमार्केट : आमच्या येथे खास लेडेड खाद्यपदार्थ माफक भावात मिळतील. रु १००० च्या खरेदीवर, आमच्या जगात एक हडळकॅब्रे फुकट दाखवून स्वागत केले जाईल. खत्री मालाची १०० टक्के खात्री. त्वरा करा, हल्ली उत्पादन बंद असल्याने स्टॉक असेपर्यंतच ही ऑफर राहील.)