नाडी ग्रंथ भविष्य आणि कर्म महात्म्य भाग ३ (अंतिम)
वरील लेखातील उल्लेखित गॉकलाँ बाबत तळटीप...
टीप :- हजारो व्यक्तींच्या जन्मकुंडल्या मिळवून संख्याशास्त्राच्या आधारे ग्रह ज्योतिषाचा 'शास्त्रीय' पाया घालणाऱ्या मायकेल गोकलाँ या फ्रेंच संशोधकाची कर्म सिद्धांताच्या ज्ञानाच्या अभावी कशी दिशाभूल झाली आहे हे 'ग्रहांचा मानवावर प्रभाव पडतो ' ह्या त्यांच्या निष्कर्षावरून दिसून येते. विशिष्ट ग्रहाखाली जन्मणाऱ्या व्यक्ती मधे विशिष्ट गुण प्रवृत्ती आढळून येते म्हणून ग्रहच ती गुण प्रवृत्ती निर्माण करतात किंवा ग्रहाच्या प्रभावाचा तो परिणाम आहे. हा त्याने काढलेला निष्कर्ष तर्कदुष्ट आहे, शास्त्रीय नाही. वरील उदाहरणातील भूकंप झाल्यानंतर एक बाई बाळंत झाली, म्हणून भूकंप हा तिच्या बाळंतपणाचे कारण आहे असे म्हणण्यासारखे आहे. हा तर्कदोष post hoc ergo propter hoc म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे दिवसानंतर रात्र येते म्हणून दिवसच रात्रीचे कारण आहे असे समजण्याचा तर्कदोष आहे. या तर्कदोषाला खगोलविज्ञानातील पृथ्वीच्या गतीचे असे अज्ञान कारणीभूत आहे, असे गॉकलाँच्या तर्कदोषाला त्याचे ब्रह्मविज्ञानातील कर्माच्या गतीचे अज्ञान कारणीभूत आहे. पण या तर्कदोषामुळे त्याला विलक्षण सिद्धांत मांडावा लागला आहे. हा विलक्षण सिद्धांत म्हणजे स्त्रीच्या उदरातील गर्भ आकाशातील ग्रहस्थिती पाहून आपला जन्म काळ स्वत :च ठरवतो व जन्मतो. आकाशातील ग्रहस्थितीचे हे ज्ञान त्या गर्भाच्या मेंदूला होते म्हणे! ज्योतिषासारख्या विषयात सुद्धा पाश्चात्य मनावरील भौतिक वादाचा पगडा कसा सुटत नाही याचे हे उत्तम उदाहरण आहे स्त्रीच्या उदरातील गर्भाच्या मेंदूला आकाशातील ग्रहस्थितीचे ज्ञान होते अशी कल्पना मांडणारा गॉकलाँ हे विसरला की तो गर्भ जेंव्हा जन्म घेतो, त्या वेळेची ग्रहस्थिती निर्माण व्हायची झाल्यास त्याच्या बरोबर ९महिने अगोदर त्याच्या मातापित्यांच्या संभोगातील त्यांच्या स्त्री पुरूष बीजांचा परस्पर संयोग घडून यायला पाहिजे, तरच तो गर्भ ९ महिन्यानंतर त्या विशिष्ट ग्रहस्थितीखाली जन्म घेऊ शकेल. आता त्याच्या मातापित्यांच्या स्त्रीपुरूषबीजांचा संयोगकाल कोण ठरवतो व कसा ठरतो? या प्रश्नाचे उत्तर ' गर्भाच्या मेंदूचे ज्ञान' हे असू शकत नाही. कारण त्यावेळी गर्भच अस्तित्वात नसतो. ( उलट त्या बीजसंयोगातूनच तो निर्माण होणार असतो) 'ग्रहांचा प्रभाव' हेही त्याचे उत्तर असू शकत नाही. कारण प्रत्यक्षात व्यक्तींच्या जन्मकाली ग्रहांचा प्रभाव चालू होतो. हे फलज्योतिषाचे मुलभूत गृहीतकृत्य आहे. या प्रश्नाचे उत्तर ब्रह्मविज्ञाच देऊ शकते. ब्रह्मविज्ञानानुसार हा काळ जन्मणऱ्या व्यक्तीचे पूर्वकर्म ठरवते. आणि ते कर्मदेवतेच्या माध्यमातून आकाशलेखनाच्या नोंदीनुसार ठरवले जाते. व्यक्तीची गुणप्रवृत्ती ग्रह ठरवत नसल्याचे खुद्द गॉकलाँच्या आणखी एका संशोधनानेच सिद्ध झाले आहे. शस्त्रक्रियेने कृत्रिमपणे (सिझेरियन पद्धतीने) जन्मलेल्या व्यक्तीवर तिच्या जन्मवेळच्या ग्रहांचा प्रभाव पडत नसल्याचे त्याला आढळून आले आहे! सिझेरियनने जन्मलेल्या व्यक्तीवर त्या वेळच्या ग्रहांचा प्रभाव का पडू नये याचे उत्तर गॉकलाँकडे नाही! ग्रहांचा प्रभाव पडतो हे खरे असले तर सिझेरियनने जन्मलेल्या व्यक्तीवर तो प्रभाव पडावयास नको काय? मग तो का पडत नाही? कारण माणसाची गुणप्रवृत्ती त्याच्या पुर्व जन्मातील कर्मामुळे ठरते त्याच्या जन्मवेळेच्या ग्रहांमुळे, ग्रहांच्या प्रभावामुळे नाही.
---------
वाचने
5321
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुर्व जन्मातील कर्म म्हणा वा
आपले लिखाण मला अगम्य वाटते
माझा पास-
माझं तिकीट.
In reply to माझा पास- by कंजूस
मग आमचं ऑयस्टर.. ;)
In reply to माझं तिकीट. by आदूबाळ
माझ्यासाठी एक बदलापूर रिटर्न
In reply to माझं तिकीट. by आदूबाळ
अज्ञात पॅरा मीटर्स आणि नाडी ग्रंथाची परीक्षा
कायपण..
In reply to अज्ञात पॅरा मीटर्स आणि नाडी ग्रंथाची परीक्षा by योगविवेक
फारच चमत्कारिक लेखमालिका आहे.
चमत्कारिक लेखमालिका आहे.
In reply to फारच चमत्कारिक लेखमालिका आहे. by संदीप डांगे
नाडी भविष्य
न्हाय मिळत
In reply to नाडी भविष्य by सिरुसेरि
यांना मारा, झोडा, किंवा अन्य
नाडी ग्रंथ - हे सत्यम् एव जयते या ज्ञायाने अबाधित उभे आहे...
In reply to यांना मारा, झोडा, किंवा अन्य by इनोबा म्हणे
नाडीभविष्यवाले दुसर्यांचे
जेंव्हा प्रत्यक्ष पुरावा मिळत नाही तेंव्हा तर्क करावा लागतो
In reply to नाडीभविष्यवाले दुसर्यांचे by मराठीप्रेमी
ठीक आहे ओक काका!!
In reply to जेंव्हा प्रत्यक्ष पुरावा मिळत नाही तेंव्हा तर्क करावा लागतो by योगविवेक
अरे भई कहना क्या चाहते हो ?
""ज्यांची परीक्षा करता येईल