Skip to main content

"अतिरेकी" कोणाला म्हणावे?

लेखक विकास यांनी रविवार, 30/11/2008 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 968
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

आपण "अतिरेकी" हा शब्द ढोबळ मानाने हिंसा करणार्‍या संदर्भातच वापरतो. तो जरी १००% योग्य असला तरी, एकंदरीत ज्या शब्दात त्याचे मूळ आहे तो "अतिरेक" हा शब्द केवळ हिंसेसाठीच लागू नाही . मराठीत तर म्हण देखील आहे, "अति तेथे माती". समाजाचे "धक्का" तंत्राने (शॉ़क ट्रीटमेंटने)जे काही नुकसान केले जाते, ते केवळ हिंसक कारवाया करणारे अतिरेकीच करू शकतात. पण समाजाचे नुकसान बर्‍याचदा इतर अतिरेकाने जास्त होत असते पण त्यात धक्का तंत्र नसल्याने ते जाणवत नाही इतकेच.
आता थोडे वेगळे अवांतर उदाहरण देऊन हा मुद्दा समजवायचा झाला तर असे, "विमानाला अपघात होऊन जेंव्हा शेकड्यामधे जीव जातो तेंव्हा एकदम धक्का बसतो, आणि एअरलाईन सेफ्टीबद्दल भरभरून बोलले जाते. पण त्याहूनही जास्त एकत्रीत जीव हा जेंव्हा एका वर्षाच्या कालावधीत तुलना केल्यास रस्त्यावरील अपघातात जातो, तेंव्हा काही चर्चा होत नाही अथवा धक्का बसत नाही."
म्हणून असे वाटते की योग्य कायदा सुव्यवस्था आणि सामाजीक हक्कात भेदभाव न करता रहाण्याचा हट्ट न करता अमूक एक म्हणजेच याला उत्तर (मग ती हिंसा असोत अथवा अहींसा) , तमूकच याला कारण (उ.दा. कडवे हिंदू, बाबरी मशीद, पाकीस्तान इत्यादी) असे म्हणणे आणि त्यावर सर्व समाजाचा वैचारीक डोलारा उभारत नकळत निष्क्रीयता आणणे यानेच तर असे नुकसान होत नाही ना? थोडक्यात मुंबईतील अतिरेक कारण आहे की परीणाम? आणि ते जर परीणाम असतील तर त्याच्या मागची अतिरेकी कारणे काय? केवळ धर्मांधता, पॅन इस्लामिझम, काश्मिर वगैरे की अजून काही?

In reply to by विकास

खरं म्हणजे कोणत्या कृत्यांना अतिरेकी कृत्ये मानावे याविषयी मतभिन्नता आहे. ( एका मराठी संस्थळावर म्हणे कालचे अतिरेकी शुर वगैरे होते अशी चर्चा खरडवह्यांमधे वाचावयास मिळाली. ) जी व्यक्ती एकाच्या दृष्टीने दहशतवादी असते तीच व्यक्ती दुस-याच्या नजरेने महान देशप्रेमी, क्रांतिकारक, राष्ट्रवादी असू शकते. ब्रिटीश सत्ताधा-यांच्या नजरेत भगतसिग हे एक क्रृर, हिंसक होते. परंतू भारतीयांच्या नजरेत ते परम राष्ट्रभक्त, देशप्रेमी, निस्वार्थ आणि त्यागी युवक होते. जो आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसतमुखाने फासावर गेला. पॆलेष्टाइन मुक्तिसंग्रामाचे नेते यासेर अराफत यांनी म्हटले होते की '' क्रांतिकारक आणि दहशतवादी यांच्यातील फरक मुख्यत: ते कशासाठी लढत आहेत यावर अवलंबून असतो. जे न्यायाच्या बाजूने असतात आणि जे आक्रमकांपासून आणि वसाहतवाद्यापासून आपल्या भूमीच्या मुक्ततेसाठी लढतात त्यांना दहशतवादी म्हणून संबोधने संयुक्तिक होणार नाही. ” त्यामुळे जरा वैचारिक गोंधळ झाला आहे. म्हणून सध्या कशालाच मत टाकलेले नाही. विचार करुन निर्णय घेतो :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिरेकी शब्द आला अथवा दहशतवादी शब्द आला की त्याचे उदात्तीकरण करणारे कायम आपल्या क्रांतिकारकांना पुढे करतात आणि ते पण अतिरेकी असे म्हणतात. पण जरा विचार करा, स्वातंत्र्य युद्धासाठी परकीय शक्तीशी युद्ध आणि केवळ त्याच संदर्भात राजकीय हत्या करणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी किती निष्पापांना मारले? किती संपत्तीचा नाश केला. पार्लमेंटमधे बाँब टाकताना पण जेथे मनुष्यहानी होणार नाही त्या ठिकाणी टाकला. तेच चाफेकर बंधूंचे एक गाडी चुकली आणि चुकीचा पोलीस अधिकारी मारला पण बाकी वाटेल तशा गोळ्या झाडत मारल्याचे आठवत नाही... अशीच इतर उदाहरणे सांगता येतील. या उलट अराफत कितीही म्हणाले तरी निरपराध ज्यूंची हत्या करणारे, विमान अपहरण करणारे अतिरेकीच होते आणि आहेत. म्हणूनच जेंव्हा सत्ता हातात आली तेंव्हापण त्यांना जनतेसाठी काही करण्याऐवजी हिंसेने इस्रायल वर लक्ष ठेवणेच सोपे वाटत आहे. तेंव्हा कृपा करून इतर कोणी काही म्हणू देत , पण आपल्या क्रांतीकारकांना या अतिरेक्यांच्या पंक्तीत बसवू नका असे म्हणावेसे वाटते.

In reply to by विकास

>> आता थोडे वेगळे अवांतर उदाहरण देऊन हा मुद्दा समजवायचा झाला तर असे, "विमानाला अपघात होऊन जेंव्हा शेकड्यामधे जीव जातो तेंव्हा एकदम धक्का बसतो, आणि एअरलाईन सेफ्टीबद्दल भरभरून बोलले जाते. पण त्याहूनही जास्त एकत्रीत जीव हा जेंव्हा एका वर्षाच्या कालावधीत तुलना केल्यास रस्त्यावरील अपघातात जातो, तेंव्हा काही चर्चा होत नाही अथवा धक्का बसत नाही." बरोबर आहे...मला अगदी असेच वाटते. -- लिखाळ.

प्रथम पहिल्या पर्यायाला मत देणार होतो परंतु विचाराअंती दुसर्‍या पर्यायाला दिले! :)

अतिरेकी ह्या शब्दाची व्याख्या खूपच व्यापक आहे.
आपण "अतिरेकी" हा शब्द ढोबळ मानाने हिंसा करणार्‍या संदर्भातच वापरतो. तो जरी १००% योग्य असला तरी, एकंदरीत ज्या शब्दात त्याचे मूळ आहे तो "अतिरेक" हा शब्द केवळ हिंसेसाठीच लागू नाही . मराठीत तर म्हण देखील आहे, "अति तेथे माती".
इथे ह्या शब्दाचा कीस काढलेला पाहून, 'मिसळपावच्या एकाच वेळेस चार-प्लेट फस्त करणारा' देखिल अतिरेकीच की! 'दहशतवादी' हा शब्द वापरला असता तर वेगळा विचार करावा लागला असता.

In reply to by कोलबेर

अतिरेकी ह्या शब्दाची व्याख्या खूपच व्यापक आहे.
आपण "अतिरेकी" हा शब्द ढोबळ मानाने हिंसा करणार्‍या संदर्भातच वापरतो. तो जरी १००% योग्य असला तरी, एकंदरीत ज्या शब्दात त्याचे मूळ आहे तो "अतिरेक" हा शब्द केवळ हिंसेसाठीच लागू नाही . मराठीत तर म्हण देखील आहे, "अति तेथे माती".
इथे ह्या शब्दाचा कीस काढलेला पाहून, 'मिसळपावच्या एकाच वेळेस चार-प्लेट फस्त करणारा' देखिल अतिरेकीच की!
हाहाहाहाहा. आपण अतिरेकी हा शब्द ढोबळ मानाने फार चुकीचा वापरतो तर.
'दहशतवादी' हा शब्द वापरला असता तर वेगळा विचार करावा लागला असता.
खरे आहे. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

वाटले की सगळेच अतिरेक करणारे अतिरेकी म्हणजे कधीनाकधी सगळेच आपण.. पर्याय १ सोपा वाटतो आहे.

In reply to by सहज

अतिरेकी म्हणजे कधीनाकधी सगळेच आपण..
आपल्या सगळ्यांनाच पर्याय एक मध्ये कसे बसवणार मग?

सत्याग्रही, अतिरेकी, क्रांतिकारक, दहशतवादी, नक्षलवादी. स्वातंत्र्यसेनानी. शब्दाच्या जंजाळात फारसे अडकू नका. त्यामागे तत्व काय आहे हेही महत्त्वाचे आहे. इतरांना किती त्रास होऊ शकतो हेही महत्त्वाचे आहे.

माझं मत पर्याय २ ला बिपिन कार्यकर्ते

पर्याय # ४ ला मत दिले आहे. दहशतवादात राज्याच्या (नेशन स्टेट) राजकीय शक्तीचा क्षय करण्यासाठीचे युद्ध असा अर्थ घेतला पाहिजे. तो इथे नाही म्हणून पर्याय # ४ - अभिजीत

In reply to by अभिजीत

दहशतवादात राज्याच्या (नेशन स्टेट) राजकीय शक्तीचा क्षय करण्यासाठीचे युद्ध असा अर्थ घेतला पाहिजे. हा अर्थ आवडला.

अतिरेकी आले आणि त्यांचे काम करुन स्वर्गात तरुणी भोगायला गेले सुद्धा. आम्ही घेतोय कौल 'अतिरेकी कोण?'... कृती मात्र शुन्य. असल्या बिनबुडाच्या वांझोट्या कौलाने काय साध्य होते? -खरा डॉन

In reply to by खरा डॉन

दोन दिवसांपासून प्रत्येक शहाणा उठून चर्चा/ कौल/ लेख टाकतो आहे. वैताग आला आहे या पोळ्या भाजणार्‍यांचा. गप्प बसा आपापल्या घरांत सांगायची वेळ आली आहे. काही करायची वेळ आली तर आपल्या शेजार्‍यांकडेही दुर्लक्ष करून "कसं सांगायचं हो तोंड उघडून" असं म्हणणारे पांढर्‍या कॉलर्सवाले आम्ही टाकतो आहोत चर्चांची गुर्‍हाळं. हात जोडून पुरे करा आता म्हणायची वेळ आली आहे.

असल्या बिनबुडाच्या वांझोट्या कौलाने काय साध्य होते? फक्त वांझोटी चर्चा करण्यात अर्थ नाही. पण वरील अतिरेकीच्या व्याख्या पुरेश्या नाहीत. वेताळ

वरील कौलामध्ये हातात बंदुका घेणारे, बंदुका घेऊन धमकावणार्‍यांना गुलाबाचे फुल देऊन हृदयपरिवर्तन करण्याची इच्छा बाळगणारे, कुणी काही करत असेल तर तेवढ्यानेच काय होणार आहे? असे मत मोठ्या मोठ्याने प्रदर्शित करणारे, सर्वांचा सतत बुद्धीभेद करणारे किंवा सतत आपली मते लादुन समोरच्यातली विचारशक्ती क्षिण करणारे, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होत असतानासुद्धा डोळ्यावर कातडे ओढून वर्षांनुवर्षे वावरणारे, रस्त्यावरील वाळू आवरण्याचे पैसे घेऊन न आवराणारे आणि इतरांच्या अपघातांना कारणीभूत होणारे, ..... ..... अश्या अनेकांकडे निर्देश होत आहे. या कौलाचे उत्तर देणे यामुळे कठिण आहे. वर कुणी म्हणाले तसे अतिरेक शब्दाच्या ऐवजी दहशत हा शब्द असता तर उत्तर देणे सोपे गेले असते. पण कौलकर्त्याला आततायीपणा करणार्‍या सर्वांकडेच मत देणार्‍यांनी पाहावे असे वाटत असावे. अतिरेक या शब्दाला असलेला सध्याचा दहशतवादी अर्थ बाजूला सारला आणि आततायीपणा असे म्हटले तर पर्याय तीन निवडावासा वाटतो. पण तसा अर्थ गृहित धरावा असे स्पष्ट नसल्याने पर्याय चार निवडुन चार ओळी खरडल्या.. -- लिखाळ.