Skip to main content

कार लोन का होम लोन टॉपअप?

मंगळवार, 23/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, हा माझा मिपावरील पहिलाच प्रयत्न, त्यामुळे चुकभुल देणेघेणे तर मित्रांनो, माझा एक मित्र आहे तो नविन गाडी घेण्याचा विचार करत आहे. फायनान्सकरीता तो दोन पर्यायांचा विचार करीत आहे.
  1. कार लोन
  2. फायदे - कमी व्याजदर, मर्यादित काळ (५ ते ७ वर्ष) तोटे - मिळकत करात सवलत नाही
  3. होम लोन टॉपअप
  4. फायदे - मिळकत करात सवलत (कार आणी जागा घेतल्यास) , स्टेट बॅकेचे घेतल्यास मॅक्सगेनचा फायदा घेता येइल. तोटे - व्याजदर कार लोनपेक्षा थोडा जास्त
होम लोन टॉपअप मिळण्यासाठी पात्रता १. तुम्ही होम लोन धारक असावे आणी कमीतकमी २/३ वर्षे हफ्ते वेळेवर भरलेले असावे. २. अधिकतम टॉपअप रक्कम = घराची सध्याची बाजारातील किमत - आधी घेतलेले कर्ज ३. परतफेड होम लोनचा कालावधी असेपर्यन्त ४. मिळकत करातील सवलती - जर तुम्ही घराची डागडुजी अथवा घराची सजावट करणार असाल अथवा नविन घर अथवा जागा घेणार असाल तर तर माझा मित्र थोडस जास्त कर्ज घेऊन, त्यात एक कार आणी योग्य संधी मिळाली कि जागा (प्लॉट) घ्यायच्या विचारात आहे. तुमच्या पैकी कुणी अस केल आहे का? असल्यास यातील फायदे व तोटे नेमके कोणते? प्रथमदर्शनी टॉपअप हा चांगला पर्याय वाटत आहे.

वाचने 7562
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

उगा एकमेकात खिचडी करायची नाही म्हणुन कार लोन घेतले. आणी फास्ट ट्रॅक मध्ये ते फेडण्याकडे लक्ष दिले. त्यावेळी कार लोन १०.७५ टक्के दर होता. ह्याच्यापेक्षा स्वस्त टॉप अप लोन मिळाल नसतच. होम लोनच १०.७५ टक्के सुरु होत. मला पैशाच गणित जास्त कळत नसल्याने सोप्पे मार्ग वापरतो मी. मित्राला शुभेच्छा. त्याचा निर्णय काय झाला आणि तो तसा का घेतला ह्याचा आढावा नंतर नक्की द्या. इतरेजनांना फायद्याच होइल ते.

आयड्या चांगली आहे, सध्याचा कर लोन चा रेट किती आहे ते पाहायला हवे , होम लोन ९.८० पासून सुरु आहे. एखाद टक्क्याचा फरक असेल तर मग गरज नाही , कारण होम लोन ची प्रोसिजर खूपच वेळखाऊ असते

सध्या इंटरेस्ट रेट खाली येण्याची दाट शक्यता आहे. कार लोन मध्ये प्री पेमेंट नसते आणि रेट फिक्स असतो . त्यामुळे टॉपअप हा चांगला पर्याय. होम लोन ची प्रोसिजर खूपच वेळखाऊ असते -> असहमत

"कार लोन मध्ये प्री पेमेंट नसते" असहमत मी माझे ७ वर्षाचे कार लोन ४ वर्षात फेडले. एकही पैसा जास्त न देता. कर्ज देणाऱ्या कंपनीला विचारून घ्या लवकर फेडले तर दंड बसवणार का? आणि तसे लिहून घ्या. कर्ज देताना ते तुमच्या सर्व अटी मान्य करतात नंतर नाही.

मी सरकारी बॅन्केतुन कार लोन घेतले. (आमची शिन्डिकेट लै भारी) एकही रुपया दन्डाखातर न भरता अधे मधे एक्स्ट्रा पेमेन्ट करत आहे. शिवाय कार लोन हे डेली रिड्युसिन्ग बॅलेन्स वरच दिले आहे. फिक्स रेट प्रायव्हेट बॅन्काचा असेल तर माहिती नाही.

४. मिळकत करातील सवलती - जर तुम्ही घराची डागडुजी अथवा घराची सजावट करणार असाल अथवा नविन घर अथवा जागा घेणार असाल तर
पण कार घेणं हे वरील निकषांत कसं काय बसतं?

In reply to by आदूबाळ

कार आणी घराची डागडुजी अथवा घराची सजावट अथवा नविन घर अथवा नविन जागा हे एकत्र केल्यास होउ शकेल

In reply to by नागेश कुलकर्णी

तरीही नाही समजलं. समजा रु. १०० चा होम लोन टॉप-अप केला. त्यातल्या रु.६० वापरून घर सजवलं, आणि रु. ४० वापरून कार घेतली, तरी करसवलत रु. १०० वर मिळेल. तुमचं म्हणणं असं आहे का?

कार आणी घराची डागडुजी अथवा घराची सजावट अथवा नविन घर अथवा नविन जागा हे एकत्र केल्यास होउ शकेल

कार ही अ‍ॅसेट नसुन liability आहे. कार ही आपल्या कंफर्टसाठी घेण्याची गोष्ट आहे. कार घेऊन मेंटेनन्स, पेट्रोल असा खर्च आहे. कारची वॅल्यू कालांतराने कमी होत जाणारी आहे त्यामुळे अशा गोष्टी साठी लोन घेणे बरोबर वाटत नाही. कार घेऊन जर ट्रॅवलचा धंदा करणार असाल आणि फायदा होत असेल तरच लोन घेऊन कार घ्यावी. बाकी घराची डागडुजी अथवा घराची सजावट अशी खोटी बिले दाखवून त्यावर लोन मंजूर करून घेऊन त्याऐवजी कार घेणे ही गोष्ट पटत नाही.

तेही तीन किंवा चार वर्षासाठी. लवकर फेडून कमी पैशात कार स्वतःची करता येते.