✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

इनर पीस

क
कपिलमुनी यांनी
Tue, 06/23/2015 - 00:35  ·  लेख
लेख
"तुला निवड करावीच लागेल, हे शेवटचं सांगतेय" तिने कर्कशपणे ओरडून सांगितलं आणि टीव्हीवर कुंग फू पांडा बघत असलेल्या प्रीशाला ओढत घेऊन गेली. तो सुन्न होऊन त्या दिशेकडे पाहत होता. शेजारच्या बेडरूममधून दाबून धरलेला एक हुंदका पदर चुकवून बाहेर आला आणि बरंच काही सांगून गेला. अशी निवड करता येते? दोन्हीपैकी एक? आणि ती निवड करायचा हक्क मला आहे? आणि एकाला निवडायचे मग दुसर्‍याचं काय करायचं? कसं शक्य आहे? आणि निवडलं तरी हे इथेच थांबेल? पूर्वी थांबलंय? त्याचं डोकं गरगरू लागलं. क्षणाक्षणाला विस्फोट होत होते. प्रीशाचं टिपेला पोचलेलं रडणं त्यात भर घालत होते. तो फ्लॅटच्या गॅलरीमध्ये मोकळ्या हवेसाठी आला.. "इनर पीस.. इनर पीस" टीव्हीवर मास्टर शिफू शिष्याला आयुष्याचं मर्म शिकवत होता. "एक्झॅटली! हेच तर हवं आहे." २१ च्या मजल्यावरून दूरवर दिसणार्‍या लखलखत्या दृश्याकडे बघत त्याच्या मनात विचार आला. त्याने खाली डोकावून पाहिलं तर काळी मिट्ट शांतता होती आणि "इनर पीस ..इनर पीस" पुटपुटत त्याने स्वतःला त्या अंधार्‍या जगात झोकून दिले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
4577 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

बाप रे

श्रीरंग_जोशी
Tue, 06/23/2015 - 01:09 नवीन
हे तर कायमचे पीस... :-(. लघुकथा भावली.
  • Log in or register to post comments

:(

रातराणी
Tue, 06/23/2015 - 01:43 नवीन
:(
  • Log in or register to post comments

मिनी कथा उत्तम. पण हे नाही

सस्नेह
Tue, 06/23/2015 - 06:30 नवीन
मिनी कथा उत्तम. पण हे नाही पीस ! जीवनाचा अंत = पीस ?
  • Log in or register to post comments

Inner peace is supposed to be

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 06/23/2015 - 06:51 नवीन
Inner peace is supposed to be new beginning not the end. :(
  • Log in or register to post comments

Inner peace is supposed to be

विशाल कुलकर्णी
Tue, 06/23/2015 - 10:04 नवीन
Inner peace is supposed to be new beginning not the end. कॅप्टनशी सहमत आहे. माफ करा पण कल्पना थोडी गंडल्यासारखी वाटली मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मी

नाखु
Tue, 06/23/2015 - 12:02 नवीन
कप्तानाशी सहम्त आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

मस्त कथा

अभय म्हात्रे
Tue, 06/23/2015 - 07:33 नवीन
छान कथा आहे.
  • Log in or register to post comments

काहीही हां(श्री)...

द-बाहुबली
Tue, 06/23/2015 - 07:50 नवीन
काहीही हां(श्री)...
  • Log in or register to post comments

सलग दुसरी शोकांतिका ! :'(

उगा काहितरीच
Tue, 06/23/2015 - 08:43 नवीन
सलग दुसरी शोकांतिका ! :'(
  • Log in or register to post comments

.

पाटील हो
Tue, 06/23/2015 - 09:19 नवीन
...
  • Log in or register to post comments

अरेरे..

चिगो
Tue, 06/23/2015 - 09:36 नवीन
अरेरे.. मोजक्या शब्दांत बरंच काही बोलून गेली ही कथा.. सहज सूचना: कथेतील "आणि एकाला निवडायचे मग दुसर्‍याचा काय करायचं" मधे 'दुसर्‍याचं'हवं. हेच 'निवडला', 'त्याचा डोकं', 'आयुष्याचा', 'हवा' आणि 'पाहीला'इथेपण बदलायला हवं, असं वाटतं. बघा पटलं तर..
  • Log in or register to post comments

खूप छान लिहिलंय

पैसा
Tue, 06/23/2015 - 10:35 नवीन
मोजक्या शब्दात खूप काही लिहिलंय. जीवनातला एकूण विरोधाभास छान पकडला आहे.
  • Log in or register to post comments

शॉकिंग...पटली कथा.

पद्मावति
Tue, 06/23/2015 - 12:20 नवीन
तो एकच घातकी क्षण असतो तिथेच स्वत:ला संभळायचं असतं. नाहीतर आहेच मग 'इनर पीस'......
  • Log in or register to post comments

स्वतःला सो कॉल्ड पीस मिळाली.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 06/23/2015 - 12:50 नवीन
स्वतःला सो कॉल्ड पीस मिळाली. मागे राहिलेल्यांची पीस कायमची घालवुन.
  • Log in or register to post comments

मागे राहिलेल्यांचेच कौतुक फार

बॅटमॅन
Tue, 06/23/2015 - 12:58 नवीन
मागे राहिलेल्यांचेच कौतुक फार ब्वा लोकांना. गेलेल्यांचे कांय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

बाकीच्यांवर पण बळजबरीने "इनर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 06/24/2015 - 07:16 नवीन
बाकीच्यांवर पण बळजबरीने "इनर पीस" मिळवायची वेळ येत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

इतरांच्या पीस ची काळजी करणं

वेल्लाभट
Wed, 06/24/2015 - 12:48 नवीन
इतरांच्या पीस ची काळजी करणं हे स्वतःच्या इनर पीस च्या व्याख्येत बसत नाही शेट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

चांगला प्रयत्न

स्पा
Tue, 06/23/2015 - 12:57 नवीन
चांगला प्रयत्न
  • Log in or register to post comments

+१

बॅटमॅन
Tue, 06/23/2015 - 12:59 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

कथा आवडली...

मुक्त विहारि
Tue, 06/23/2015 - 13:05 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments

आवडली कथा. इनर पीस मिळवण्याचे

खटपट्या
Tue, 06/23/2015 - 13:12 नवीन
आवडली कथा. इनर पीस मिळवण्याचे बाकीचे काही तथाकथीत मार्ग पडताळून पहायला हवे होते. असो.
  • Log in or register to post comments

मस्त रे कप्या...

मोहनराव
Tue, 06/23/2015 - 13:34 नवीन
मस्त रे कप्या...
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

आतिवास
Tue, 06/23/2015 - 13:34 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

आणी

इरसाल
Tue, 06/23/2015 - 13:47 नवीन
तो जर १ ल्या किंवा २ र्‍या मजल्यावर रहात असता तर ?
  • Log in or register to post comments

हॉस्पिटलातल्या सुंदर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 06/24/2015 - 07:18 नवीन
हॉस्पिटलातल्या सुंदर सौथैंडियन नर्सेस पहायला मिळतील. ब्लिसरिंग पीस. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

चिमणराव

सुबोध खरे
Wed, 06/24/2015 - 11:29 नवीन
चिमणराव "सुंदर सौथैंडियन" नर्सेस यातच आंतरिक विरोध आहे. आमच्या एका डॉक्टर मित्राला याबद्दल विचारले असता तो हे म्हणाला
सुसम्मा नाव असलेली नर्स सुंदर असू शकेल का?
म्हणजे समजून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

चिमणचे वाचन

कपिलमुनी
Wed, 06/24/2015 - 11:53 नवीन
चिमणचे "वाचन" जोरात चालू आहे असा दिसत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अय्यय्यो

इरसाल
Wed, 06/24/2015 - 09:34 नवीन
परफेक्टली ब्लँक बाँडी ;) (टींबावर लक्ष असु द्या !)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कपिलमुनी
Wed, 06/24/2015 - 13:12 नवीन
वाचक व प्रतिसादकांनां धन्यवाद !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा