मृत्युन्जयाच्या या प्रतिसादावरुन आमचा हा उपक्रमावरचा का कू आठवला. त्यावर अगदी नीट चर्चा देखील झाली होती पण काही तरी राहिल्यासारखे वाटत राहिलेच. म्हणून तोच इथे परत टाकतोय पण तिथले प्रतिसाद आधी वाचलेत तर चर्चेस अजून मदत होईल..
इतर अभिनिवेश सोडून चर्चा होईल अशी आशा.
======
मराठेशाहीचा शिवाजी ते संभाजी तसेच राजाराम इथवरचा इतिहास थोडाफार समजण्यास सोपा वाटला, कमीत कमी तो एका हेतूने प्रेरित असा वाटतो (जेवढा वाचला तो तरी). अगदी औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 'मोघल सत्तेशी लढा' असे म्हणता येते.
परंतु मग शाहू राज्य करू लागल्यावर त्याच मोगलांकडे दक्षिणेच्या चौथाईसाठी सनदा मागण्याचे प्रयोजन काय ते मात्र कळत नाही. ज्यांच्याविरुद्ध २७ वर्षे लढा दिला त्यांच्या दारात त्यानंतर सदैव सनद, चौथाई वगैरे साठी मराठे (सातारकर (पेशव्यामार्फत), कोल्हापूरकरदेखील ) जाताना दिसतात.. हे कसे?
पहिल्या बाजीरावाची आणि निजामाची जवळ जवळ सर्व युद्धे या चौथाईच्यासाठी झालेली दिसतात. अगदी त्यानंतरही बहुतेकवेळा मराठे सर्व भारतात वर्चस्व गाजवत असताना देखील एक राज्यव्यवस्था म्हणून काहीही वैशिष्टये दिसत नाहीत. बंगालात तर कोलकात्याबाहेर 'maratha ditch' नावाची गोष्ट मराठा 'लुटारूंना' रोखण्यासाठी होती असे दिसते.
जर कोणतीही राज्यव्यवस्था म्हणून मराठेशाही उभी राहिली नसेल आणि (नामधारी मोगल सत्तेच्या परवानगीने) चौथाई, खंडणी आणि लूट अशा मार्गांनी तिचे बहुतांश अस्तित्व जाणवत असेल तर शिवाजींचे कार्य आणि दृष्टीकोन(vision) यांच्याशी नाळ तुटलेल्या व्यवस्थेस 'मराठा साम्राज्य' किंवा तत्सम उपाधी कितपत योग्य?
(मला चौथाई काय तेही नक्की माहीत नाही.. परंतु 'मराठ्यांचा इतिहास' (लेखक आठवत नाही) हे पुस्तक वाचताना उद्भवलेल्या या शंका इथे मांडतोय.. )
====
वर्गीकरण
वाचने
4320
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्रे हो, खासकरुन हा प्रतिसाद
चौथाई म्हणजे आपल्या
चौथाई म्हणजे तिथल्या
अर्थात.. चौथाईचा शोध
आपण कोणताही प्रशासकीय शोध
In reply to अर्थात.. चौथाईचा शोध by अस्वस्थामा
मराठी राज्यकर्त्यांनी तसे
In reply to आपण कोणताही प्रशासकीय शोध by एस
"अष्टप्रधान मंडळ आणि त्याचा
In reply to मराठी राज्यकर्त्यांनी तसे by अस्वस्थामा
चौथाई हा तो-तो राजा स्वतःच्या
In reply to आपण कोणताही प्रशासकीय शोध by एस
ती आकडेवारी मॅक्सिमम पॉसिबल
In reply to चौथाई हा तो-तो राजा स्वतःच्या by आदूबाळ
नक्की का?
In reply to आपण कोणताही प्रशासकीय शोध by एस
त्यासाठीच मी 'मध्ययुग' असा
In reply to नक्की का? by पुण्याचे वटवाघूळ
अंदाजपंचे..
गजानन भास्कर मेहेंदळे यांचे
In reply to अंदाजपंचे.. by चिगो
तिथले रोचनासारख्यांचे
तिथले रोचनासारख्यांचे
In reply to तिथले रोचनासारख्यांचे by एस
तिथले रोचनासारख्यांचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद पाहिल्यावर अजूनही आपल्या मनात काय शंका राहिलीय असा प्रश्न पडलाय.असेच म्हणतो.निरनिराळ्या मोहिमा, लढाया यात
औरंगजेब मरेपर्यंत मराठ्यांचे
ज्युरी समिती