Skip to main content

पाऊस.... .वेगवेगळा •○●¤°

लेखक गोल्या यांनी शनिवार, 20/06/2015 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
खेड्यातला जाणता पाऊस जबाबदारीनं गाव रान भिजवणारा, म्हातार्या कोतार्यांची अलाबला नी पिकांची दुवा घेणारा ....!! शहरातला अप टु डेट पाऊस ऑफीस शाळांच्या वेळेत हमखास येणारा नौकरीदारांच्या शिव्या नी पालकांची बोलणी गप गुमानपणे ऐकणारा...!! घाटातला धटिंगन पाऊस निर्वस्त्र, निर्लज्ज कसाही कोसळणारा , धबधब्यांना जागं करून आनंदानं नाचविणारा....!! बागेतला खट्याळ पाऊस रेंगाळलत गुलाबी होवून पडणारा , प्रेमीकांची भिड चेपायला सजल हस्ते मदत करणारा...!! फ्लॅट मधला मुका पाऊस बंद दाराआड गपगुमान पडणारा , रेन रेन गो अवे ऐकुन खिन्नपणे परतणारा ...!! चाळीतला मनमोकळा पाऊस आस्थेने चौकशी करणारा, कांदाभजींचा वास घेत कागदी होड्यांवर आनंदाने डोलणारा ...!! मनातला झिम्माड पाऊस मनातल्या मनात पडणारा, अन् सर ओसरल्यावरही चिंब आठवांत उरणारा....!!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1895
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान आहे पाऊस कविता!

मनातला झिम्माड पाऊस मनातल्या मनात पडणारा, अन् सर ओसरल्यावरही चिंब आठवांत उरणारा....!!! सुंदरच ...

Classssss

छान सोपे शब्द त्यामुळे पटकन क्लिक झाली.