वाटतं असं... की!
वाटतं असं... की
तुझ्या हातात मोगरा भरभरून ठेवावा..
आणि सुगंधाशी सुगंधाला स्पर्धा करू द्यावी..
नक्की मला वेडं करणारा त्यातला कोणता आहे? ते शोधण्यासाठी!
वाटतं असं... की
पावसाने शांत झालेल्या मऊशार हिरवळीत तुझ्यासवे एकरूप व्हावं..
खऱ्या मीलनाचा मृद्गंध
कळण्यासाठी!
वाटतं असं... की
तुझ्या हातांशी एकरूप झालेली मेहेंदी , मी नेहमी आठवावी..
हव्यास आणि सहजतेची ओढ यातला फरक..
मला समजण्यासाठी.
वाटतं असं... की
हरेक ठिकाणी तुझंच रूपक,तुझीच छटा,तुझा नाद...गंध!
यात मिसळून जावं
उरलेल्या सगळ्या आयुष्याचे
'जगणे' होण्यासाठी..
(फ़ोटो:- फेसबुक वरून, साभार! )
(फ़ोटो:- फेसबुक वरून, साभार! )
अतीसुंदर कविता.
हेच म्हणतो
नाही! बोंबल्या वरून
आंssssssssssss फोटू कुटं
लावला का परत...? वाह! थांकु!
व्वा!
व्वा!
इचारतूस काय? जिलबी कर! ;-)
सुरेख कविता.
वाह, किती अलवार शब्द आणि
सुंदर तरल कविता !
मस्त
अतिशय तरल. सुरेखच एकदम.
कविता आणि फोटो एकदमच जबराट ओ
मस्त!
एकदम छान
वा वा वा ही जिल्बी आव्डली :)
@जिल्बी आव्डली :)>>> दुत्त
वा!
खासच, आवडली, पैजारबुवा,
जबरी
फंटास्टिक् चित्र आणि आह!
मस्त....
सुरेख कविता,बुवा!
सुंदर
आपका हुकुम सर आंखों पर जी!
बुवाजी ईन रोम्यानटीक कवीता :)