मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मौनांची भाषांतरे

महासंग्राम · · जे न देखे रवी...
काव्यरस
तसा हट्ट नाहिये माझा अगदी तश्याच राहिल्या तरी चालतील मरीन ड्राइव च्या आठवणी, तुझी झालेली पाठवणी माळलेल्या मोगर्‍याचा सुगंध, पहिल्या पावसाचा मृद्गंध सोबतीने काढलेली कुडकुड़ती रात्र, नकळत एकमेकात विरघळलेले अनिमिष नेत्र अगदी अबोल शब्दांची पेरणी पण तशीच राहु दे तसा हट्टच नाहिये माझा फक्त बघ जमलच तर कर मौनांची भाषांतरे #जिप्सी #gypsykavita.blogspot.in

वाचने 4339 वाचनखूण प्रतिक्रिया 21

गणेशा Fri, 06/19/2015 - 14:36
कविता आवडली ... मौनाची भाषांतरे नाव छान ... मला वाटते संदिप खरेच्या पहिल्या कवितेच्या पुस्तकाचे हे नाव आहे.. निटसे लक्षात नाही...

In reply to by महासंग्राम

गणेशा Fri, 06/19/2015 - 15:10
ओके... तुमची कविता मात्र रीअल वाटली का काय माहीत.. मृदुगंध हे नाव असावे असे मला उगाच वाटले

In reply to by महासंग्राम

गणेशा Fri, 06/19/2015 - 15:11
ओके... तुमची कविता मात्र रीअल वाटली का काय माहीत.. मृदुगंध हे कवितेला नाव असावे असे मला उगाच वाटले

In reply to by गणेशा

गणेशा Fri, 06/19/2015 - 15:43
मृद्-गंध असा शब्द येथे लिहिला असताना ही वरील शब्द- मृद्गंध असा जॉईंट का होतोय कळाले नाही.. मला आधी चुकीचाच वाटला.. मृदुगंध.. मध्ये चुकुन हुकार दिल्या गेल्या होता.. असो .. मुळा कवितेला हे असले उपरिप्लाय आल्याने, मुळ कवीला दिलगीरी व्यक्त करतो .. लिहित रहा.. वाचत आहे

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

महासंग्राम Sat, 06/20/2015 - 10:41
१. स्वत्तः लिहिलेल्या लेखणात बदल करायचा असल्यास कसा करता येतो. २. मूळ लेखका शिवाय दुसर कोणी व्यक्ती तो बदल करू शकते का

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

महासंग्राम Sat, 06/20/2015 - 12:16
मृद्-गंध मला येथे पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा सुंगध अपेक्षित आहे, म्हणून मृद्-गंध हा शब्द योजिला आहे