विलासरावांसारखा बधिर माणुस मी भारताच्याच काय जगाच्या राजकारणात मला कळायला लागल्यापासुन बघितलेला स्मरणात नाही.
परिस्थितीच गांभिर्य लक्षात घ्यायच असत हेच या गुलछबूला माहित नसाव्,इतका संवेदनाशुन्य,तारतम्य नसलेला इसम महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे याची खरच लाज वाट्ते.
गेंड्याच्या कातडिचे राजकारणी तयार करण्याची काँग्रेसची परंपरा विलासराव पुढे नेत आहेत.
लोकांनी भर रस्त्यात जेथे जातिल तेथे यांची खेटराने पुजा बांधावी...... X(
"अनामिका"
गेंड्याची कातडी ही कोणत्याही एका किंवा समान विचारसरणीच्या पक्षाची मक्तेदारी नाही असं एक वैयक्तिक मत! (उगाच इतरांना जखमा होण्याचं नाटक करायला का भाग पाडताय?)
बाकी देशमुख पिता-पुत्र आणि रामू यांचा निषेध.
>>>लोकांनी भर रस्त्यात जेथे जातिल तेथे यांची खेटराने पुजा बांधावी......
= खेटरांचा अपमान केल्याबद्दल "अनामिका" ताईंचा जाहिर निषेध !!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
>>पूजाच्या अपमानाला वगळल्याबद्दल राजकुमाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
== ह्या अपमानाला वगळण्यामागे पुजा नावाविषयी वैयक्तिक आकस असावा काय ? :?
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
हाकला. शिवराज पाटलाप्रमाणे या विलासरावालाही हाकला. ताबडतोब शरद पवारांना महाराष्ट्रात परत बोलवा. या प्रसंगी पवारांव्यतिरिक्त परिस्थितीचे गांभीर्य जाणून निर्णय घेणारा व प्रशासनावर नियंत्रण असणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही.
त्या विलासरावाला सांगा की रितेशचे पिक्चर बघण्यासाठी तरी माणसे जिवंत राहायला हवी आहेत.
एकदम मान्य!
जरी लोकशाहीत केवळ एकाच व्यक्तीवर (आणि कुठल्याही एकाच पक्षावर) सर्व अवलंबून राहण्याची वेळ यावी असे होणे चांगले नसले आणि तसे होऊ नये असे वाटले तरी, पवार आत्ता योग्य या विषयी दुमत नाही.
पण मला तर पवारांना आत्ता गृहमंत्री (प्रधानमंत्री होणे शक्य नाही) झाले तर योग्य वाटते कारण सध्याचे हल्ले हे केवळ मुंबई आणि महाराष्ट्रापुरतेच मर्यादीत नाहीत.
ताबडतोब शरद पवारांना महाराष्ट्रात परत बोलवा. या प्रसंगी पवारांव्यतिरिक्त परिस्थितीचे गांभीर्य जाणून निर्णय घेणारा व प्रशासनावर नियंत्रण असणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही.
अरे काय रे कर्णा, महाराष्ट्राच्या मदतीसाठी पवारांना बोलवावं लागावं ? काय देव बिव आहेत का रे ते ? शरद पवार जेंव्हा मुख्यमंत्री होते, तेंव्हाच्या ,मुंबई बाँबस्फोटाच्या वेळी त्यांनाही घामच फुटलेला. क्रिकेट मधे रमलेला माणूस , काय गांभिर्य ओळखणार रे ? मला तरी कोणीच दिसत नाहीये. कदाचित ठाकरे आले तर ते काही तरी आडवा निर्णय घेतील,त्याने ही नुकसान होइल पण आता होतंय त्यापेक्षा ते बरं असं वाटेल .
अँटीपवार - टारझन
या प्रसंगी जनतेला धीर देणारा समंजस निर्णय हवा आहे. दुर्दैवाने पवार वगळता महाराष्ट्रात इतर नेता नाही याचा खेद वाटतो.
ठाकरे आले तर त्यांच्याकडे सर्व प्रश्नांना वडापाव हे एकच उत्तर आहे. अतिरेक्यांविरुद्ध लढण्यासाठी शिववड्याचा वापर करा असेही ते सांगण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे तर नकोच नको.
सगळे एकाच माळेचे मणी आहेत.. जनतेने हाकलून लावायला पाहिजे .. र र पाटील म्हणे "मी का राजीनामा देऊ. मी योग्य कारवाई केली"..
अरे जरातरी लाज बाळगाकी? जबाबदरीची लोकलाजेस्तव तरी जणिव ठेवा..
पदांवर मिरवणार्यानी आपापली जबाबदारी विसरल्यास त्याना जराही जाब विचारायला नको का? किती ते घाबरून जगायच! तरीही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व
हा पदांचा उपमर्द मुळीच नाही.. पदांवर मिरवणार्यानी आपापली जबाबदारी विसरल्यास त्याना जराही जाब विचारायला नको का? किती ते घाबरून जगायच! तरीही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व..
आजकाल कोणीही शिंकले तरीही मिडीया त्याची ब्रेकिंग न्युज बनवते. त्याधर्तीवर मुख्यमंत्र्यांनी तरी थोडेफार तारतम्य पाळायला हवे होते!
असो, मुख्यमंत्र्यांनी (अन् गृहमंत्र्यांनी?) या हल्ल्याची नैतीक जबाबदारी स्वीकारुन आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे!
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
हद्द झाली.
अरे काही लोकोपयोगी कामं केली नाहीत (असं तरी कसं म्हणायचं, रामूला विध्वंस दाखवून आणलाय ते कामच आहे.)
आता निदान पोराला बरोबर घेऊन जायचं हास्यास्पद काम तरी नको.
राजीनामा द्यायलाच हवा (निदान मनाची तरी ).
रेवती
२ पाटिल गेले आता देशमुख कधी राजिनामा देतात ते बघु?
पुंन्हा "अंतरात्मा की आवाज" हा तकिया कलाम ऐकावा लागेल आता.
कानावर हात ठेवण्याची स्माईली नाही का मिपावर
?
"अनामिका"
प्रसंगाचं गांभिर्य ओळ्खून नुसताच राजिनामा मागणं हे पुरेसं आहे का? राजीनामा मागून हे सगळं थांबेल असं वाटतं का? हे नाहीतर दुसरे कोणीतरी ह्या खुर्चीवर बसायला आसुसलेले आहेतचं. सडलेल्या राज्यव्यवस्थेला नेताबदल कितपत परवडू शकतो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नविन आलेले पुन्हा निवडणुकिच्या बाजारात 'आम्ही हे केलं, आम्ही ते केलं' असं बोंबलायला तयार कारण निवडणुकांपर्यंत ह्याचा काहीतरी सुगावा लागणारच.(जो सगळ्यांना माहीत आहे. पण लोकांपुढे नव्याने तिच माहीती द्यायची). ह्यावर कायमचा उपाय एकच. सर्व नेत्यांना भर रस्त्यात उभं करुन फटके मारावेत. कामं करा नाहीतर मरायला तयार व्हा असं पाहीजे. सामान्य जनता अशी चिडून उठल्याशिवाय नेते हादरणार नाहीत. एकाला धडा शिकवला की बाकीचे सुतासारखे सरळ येतील आणि तिच खरी लोकशाही असेल.
या सर्व काथ्याकुटात कुठेहि मुळ समस्येला हात घालण्याचा प्रयत्न केलेला नाहि.
केवळ कुणा मन्त्र्या सन्त्र्याने राजिनामा दिला म्हणजे राज्य सुरळित सुरु राहिल आणि हे दहशत वादि पुन्हा असे हल्ले करणार नाहित असे कुणि समजत असेल तर ती एक शोकान्तिका आहे.
कुणिहि मन्त्रि असो तो सर्व प्रथम भारतिय आहे त्याच्या विषयी सन्मान पुर्वक भाषा वापरावि ही एक विनन्ती. आपण आपल्याच देशातिल व्यक्तिला लाखोलि वाहात असतान्ना आपले देश प्रेम सिद्ध होते, कारण ती व्यक्ति आपल्याच मतदानामुळे तिथपर्यन्त पोहोचलि आहे (मुळ चुक आपलिच..... काळ्जी आपणालाच नाहि).
या सर्व परिस्थितित देशात राष्ट्रपती शासन लागु करुन देश लष्कराच्या स्वाधीन करावा आणी या सर्व उपद्व्यापान्चा बन्दोबस्त झाल्यावरच कोण ती लोक शाहि कि काय म्हणतात ती लागु करावि.................
पाक अब नापाक हो चुका है | उसे अब भारत मे शामिल करना हि होगा |span>
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
प्रतिक्रिया