Skip to main content

मत्सर ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 13/06/2015 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
आधी पावसाची, पावसाळ्याची चाहूल लागायची ती वातावरणात होत जाणार्‍या बदलाने. झाडांवर फुलणार्‍या कोवळ्या पालवीने आणि वळिवाच्या साक्षीने मदहोश करणार्‍या मृदगंधाच्या मादक सुवासाने. आजकाल ती लागते सोशल नेटवर्क्सवर पडणार्‍या कुत्सित स्टेटस अपडेट्सने.. उदा. आता पावसाच्या कवितांचा पाऊस येणार वगैरे..वगैरे... पण त्याला पर्याय नाही तसेच पावसाच्या कवितांनासुद्धा पर्याय नाही.... गंमतच आहे सगळी... त्याला माझाही... अगदी माझाही मत्सर वाटावा? ओके, अ‍ॅग्रीड...! मी आलो की ती सुखावते.. मी पाहीलेत, माझ्या आगमनाने... तिच्या अंगोपांगी फुललेले निशिगंध, मी अनुभवली आहेत, माझ्या .... ओझरत्या स्पर्शानेही शहारून आलेली तिची गात्रे! कधी कधी नकळत तिच्या हनुवटीवर रेंगाळते माझी नजर... आणि मग ती हरवते... तो संतप्त होतो, रुसतो, चरफडतो... तिला म्हणतो, तू अशीच आहेस... तो आला की मला विसरतेस...., मला पण? तुला खरं सांगू... ती तर मला आवडतेच रे... पण तुझा तो रुसवा पण मोहवून टाकतो, प्रेमाचं असंच असतं बघ... त्याला कुणाशीच वाटणी मान्य नसते... मग वाटणीदार माझ्यासारखा सखा का असेना ! अरे वेड्या, तुला कळत कसे नाही? तिच्या हरवण्यात तर मज्जा आहे खरी, त्यावेळी ती कसली गोड दिसते माहितीये? तिला तशी मुग्ध बघीतली ना... की मग मलादेखील उत्साह येतो... आणि मग... मी आनंदाने, भरभरून बरसायला लागतो...!! विशाल...
लेखनविषय:

वाचने 2224
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मस्त आणि मस्तच!!!!!!!

बाहेर संततधार पडणार्‍या पावसात ही कविता वाचते आहे!

लै मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त!

पाऊस म्हटलं की ती आलीच पाहिजे. आणि ती म्हटली की पाऊस आलाच पाहिजे. मला तिला आणि पावसाला कवितेत वाचायला आवडतं. :)
तेरे मशरुफ रहने का अंदाज तुझे तनहा न कर दे रिश्ते फुरसत के नहीं तवज्जो के मोहताज होते है
-दिलीप बिरुटे

खरय दिलीप सर पाऊस आणि सखीचे नाते जर वेगळेच आहे। पाऊस म्हटलं की ती आलीच पाहिजे.